Login

परमात्मा

God Is One Soul

परमात्मा


भगवंता आहे सिंधू
त्यातील तू एक बिंदू
तो आहे परमात्मा
तू एक आत्मा

जग सुंदर आहे
जो ज्यादृष्टीने पाहे
त्यास ते तसे दिसे
सुख दुःख म्हणजे
लपंडाव ऊन पावसाचा

सुखात सारे हसते
दुःखात सारे रडते
हा तर खेळ मायेचा
ओळख तू खेळ प्रभुचा

जीवनाच्या दोन बाजू
एक सुख दुसरी दुःख
दोन्ही बाजू जाणणे
म्हणजेच जीवन जगणे

सुख म्हणजे
चांगल्या कर्मांचे फळ
दुःख म्हणजे
वाईट कर्मांचे फळ

संचिताचे भोग
कुणा न सुटले
प्रभू राम आणि कृष्ण
त्यांनीही भोगिले

कर्म तू कर चांगले
इच्छित फळ मिळेल
भगवंताच्या भक्तीने
तो खरा परमात्मा कळेल

....... योगिता मिलिंद नाखरे
0