भाग 4
सोनू कोमात जाऊन जवळजवळ महिना होत आला होता. त्यादिवशी हर्षित नुकताच एका पेशन्टचं सेशन आटोपून सोनूच्या खोलीत आला होता. रोजच्याप्रमाणे तो सोनूशी गप्पा मारत होता. तेव्हाच अचानक मशिन्सवर आकडे बदलायला लागले. सोनुने थोडासा हात हलवला. हर्षितला वाटलं की त्याला भास होतोय. पण तेवढ्यात त्याचो छाती वेगाने वरखाली व्हायला लागली. जणू तो गुदमरत होता. त्याला त्रास होत होता. हर्षित ताबडतोब डॉकटरना बोलवायला धावला. हर्षितच बोलणं ऐकून डॉकटर आणि नर्स जवळजवळ धावतच सोनूच्या खोलीमध्ये आले. डॉकटर आणि नर्सने पटकन त्याच्या तोंडातली नळी काढली. त्याबरोबर तो शांत झाला.
“काय होतंय डॉकटर? ती नळी का काढली? त्याला ऑक्सिजन मिळावा म्हणून घातली होती ना ती? मग आता तो श्वास कसा घेणार?” “हो, हो, थांबा जरा. अहो ही आनंदाची गोष्ट आहे. तो स्वतः श्वासोच्छ्वास करतोय. त्याला नळीची किंवा ऑक्सिजनची गरज लागत नाहीये. हे तो बरं होत असल्याचं लक्षण आहे. कदाचित पुढच्या काही तासांमध्ये तो शुद्धीवर देखील येऊ शकतो.” डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून हर्षितला प्रचंड आनंद झाला. त्याने फोन करून घरच्यांनाही ही गोष्ट सांगितली. आशेचा कोवळा किरण साऱ्यांच्याच मनात अलवार शिरू पहात होता.
सोनू शुद्धिवर येऊ शकेल हे ऐकल्यावर हर्षित एकही मिनिट त्याच्या खोलीतून हलला नव्हता. काही वेळाने सोनुने डोळे उघडले. तब्बल महिना दीड महिन्याने, तो शुद्धीवर आला. हर्षितला बघून तो हसला. त्याला काका म्हणून हाक मारली. तो आपल्याला ओळ्खतोय हा खूप मोठा दिलासा होता हर्षितसाठी.
सोनू शुद्धीवर आल्यावर डॉक्टर आणि नर्सने त्याच्या विविध तपासण्या केल्या. त्याची समरणशक्ती तपासण्यात आली. त्याला विविध त्याच्या आयुष्यातल्या घटना विचारल्या गेल्या. मेंदूला इजा पोचलेली नाही हे बघून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. सोनू शुद्धीवर आल्याचं कळताच घरचेही सगळे तातडीने गाडी करून हॉस्पिटलमध्ये पोचले. सगळ्यांनाच प्रचंड आनंद झाला होता.
सोनूच्या सर्व तपासण्या झाल्यावर डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं. ते गरजेचेच होते. पोलीस लवकरच हॉस्पिटलमध्ये आले. सोनूच्या खोलीत पोलीस, आणि घरचे एकत्रच जमले. पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्डींग सुरू केलं.
“सांग आता, आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केलास तू? तुला कोणी उद्युक्त केलं होतं का? आणि हो, सगळं खरं सांगायचं. माहीत नाही का तुला? आत्महत्या हा गुन्हा आहे.” पोलिसांनी दरडावतच सोनूला विचारलं. सोनू जरा घाबरला होता. पण त्याला खरं संगण्यापलीकडे काहीच पर्याय नव्हता.
त्याने सांगायला सुरुवात केली. “मी कॉलेजमध्ये आलो. नवीन होतो. घरापासून एवढ्या लांब आलो होतो. अभ्यास करण्यासाठी मी रात्री उशिरापर्यंत लायब्ररीत बसायचो. त्यादिवशीही असाच मी रात्री उशिरा लायब्ररिमधून होस्टेलवर परत चाललो होतो. सगळीकडे अंधार होता. परीक्षा सुरू व्हायला अजून दोन आठवडे होते, पण सगळे अभ्यासाला लागले होते. पण बहुतांश मुलं त्यांच्या खोलीत अभ्यास करत असल्यामुळे बाहेर फारसं कोणीच नव्हतं. लायब्ररीच्या शेजारीच मुख्याध्यापकांची खोली आहे. त्या खोलीतून अंधारातच काही माणसांचा बोलण्याचा आवाज येत होता. उत्सुकतेने मी हळूच आवाज न करता दाराच्या फटीतून आत डोकावलो”.
त्याने सांगायला सुरुवात केली. “मी कॉलेजमध्ये आलो. नवीन होतो. घरापासून एवढ्या लांब आलो होतो. अभ्यास करण्यासाठी मी रात्री उशिरापर्यंत लायब्ररीत बसायचो. त्यादिवशीही असाच मी रात्री उशिरा लायब्ररिमधून होस्टेलवर परत चाललो होतो. सगळीकडे अंधार होता. परीक्षा सुरू व्हायला अजून दोन आठवडे होते, पण सगळे अभ्यासाला लागले होते. पण बहुतांश मुलं त्यांच्या खोलीत अभ्यास करत असल्यामुळे बाहेर फारसं कोणीच नव्हतं. लायब्ररीच्या शेजारीच मुख्याध्यापकांची खोली आहे. त्या खोलीतून अंधारातच काही माणसांचा बोलण्याचा आवाज येत होता. उत्सुकतेने मी हळूच आवाज न करता दाराच्या फटीतून आत डोकावलो”.
एवढं बोलल्यामुळे सोनूला धाप लागली. काही वेळ तो शांत बसला. सगळ्या खोलीत फक्त मशिन्सचा आवाज येत होता. काही वेळाने सोनुने परत बोलायला सुरुवात केली. “त्या मुलांनी सरांच्या कप्प्यातून परीक्षेचे पेपर बाहेर काढले. त्यातल्या एकाने मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात पेपरचे फोटो काढले. पेपर पुन्हा होते तसे ठेऊन ते घाईने बाहेर पडायला लागले. पण, मी मात्र तेवढ्या वेगाने बाहेर पडू शकलो नाही. त्यांनी मला बघितलं. त्यांच्या लक्षात आलं की मी त्यांना पाहिलंय. त्यांनी मी जर कोणाला सांगितलं तर मला मारून टाकायची धमकी दिली.
तेव्हापासून ते मला मारण्याची धमकी देऊन माझ्याकडून विविध कामं करून घेऊ लागले. माझ्याकडून ते पेपरचे फोटो मिळवायचे. त्यांचे प्रोजेक्ट्स मला करायला लावायचे. होस्टेलमध्ये परवानगी नसलेल्या वस्तू मला घेऊन यायला लावायचे. नंतर नंतर मी विरोध केल्यावर त्यांनी माझे पेपर चोरतानाचे व्हिडिओ सरांना दाखवण्याची धमकी द्यायला सुरुवात केली.
ह्या सगळ्याला मी कंटाळलो होतो. थकलो होतो, चुकीची कामं करून. माझं मन मला रोज खात होतो. पण त्यादिवशी त्यांनी मला जे काम सांगितलं, ते करणं मला शक्यच नव्हतं. मी इतक वाईट काम कधीच करू शकणार नव्हतो. समोर फक्त बदनामी आणि बदनामीच दिसत होती. माझं आयुष्य उद्धवस्त होणार होतं. माझ्यामुळे माझ्या घरच्यांची मान खाली जाणार होती.आणि म्हणूनच मी निर्णय घेतला. मला आता फक्त परीक्षा संपण्याची वाट बघायची होती….
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा