भाग 5
डॉक्टरांनी सोनूला आराम करायला सांगितल्यामुळे पोलिसांनी त्यादिवशी थांबण्याचा निर्णय घेतला. सोनूदेखील बोलून दमला होता. दुसऱ्या दिवशी परत जबाब नोंदवायला सुरुवात झाली. सोनु सांगू लागला, “आमची परीक्षा जवळ येत चालली होती. आता लायब्ररीत बऱ्याच उशिरापर्यंत मुलं अभ्यास करत बसलेली असायची. त्यामुळे मी निर्धास्त होतो. पण त्यादिवशी त्या मुलांनी मला गाठलं, आणि कॉलेजच्या मागच्या बाजूला बोलावलं. तिथं चिटपाखरूही नव्हतं. एकच पिवळा दिवा रस्त्यावर क्षीण प्रकाश पाडत होता. त्यांनी मला एका माणसाचा फोटो दाखवला. त्यांची ओळखीची खूण दाखवली.पत्ता दिला. आणि सोबतच एक पांढऱ्या पुड्या असलेलं खोकं दिलं. ते हा ड्रग्स चा धंदा करायचे, पण अजूनपर्यंत त्यांनी मला हे काम कधी सांगितलं नव्हतं. पण ह्यावेळेस धोका जास्त होता. पोलिसांना सुगावा लागला होता. धाड पडायची शक्यता होती. त्यांना ह्याय अडकायच नव्हतं. आणि म्हणून त्यांनी मला हे काम सांगितलं. ते माझ्यावर पाळत ठेऊन असल्याने मला ते खोकं होस्टेलवर नेऊन लपवावं लागलं. अनेकदा मी ते खोकं फेकण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मला कॉलेजच्या शिक्षकांना सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे नाईलाजाने मी ते खोकं माझ्या कपाटात अगदी आत लपवून ठेवलं.परीक्षेच्या शेवटच्या दिवशी मला ते खोकं नेऊन द्यायचं होतं.
पण मी हे काम कधीच करू शकणार नाही हे मला माहित होतं. माझं मन मला खात होतं. मला सतत दडपण जाणवायला लागलं होतं. अभ्यासातील लक्ष कमी होत होतं. सारखी कोणीतरी आपल्याला बघेल अशी भीती वाटत होती. त्यामुळे मी पेपर झाल्यावर होस्टेलवर गेलो. सगळं संपवून टाकायचं होतं त्या दिवशी मला. पण दुर्दैवाने वाचलो.” सोनूचं हे बोलणं ऐकून सगळे गंभिर झाले. आपला मुलगा काय झेलत होता हे कळल्यावर सगळ्यांनाच अतीव यातना झाल्या.
सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं.
सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं.
हल्ली एक वॉर्डबॉय सोनूच्या खोलीबाहेर सारखा घोटाळताना दिसत होता. एक बेत शिजत होता. काय, ते काळच सांगणार होता. सोनूची तब्येत हळूहळू सुधारत होती. त्याची कौंसलिंग सेशन्स झाल्यावर त्याला डिस्चार्ज मिळाला. पूर्ण दोन महिन्यांनी तो घरी घरी आला. सुट्टी अजून महिनाभर होती. घरचे सगळे त्याची खूप काळजी घेत होते. स्वतः हर्षितने त्याची अनेक सेशन्स घेतली. त्याला काही डिप्रेशन विरोधी औषधं द्यायला त्याने सुरवात केली त्यांच्या देखरेखीमुळे पुन्हा एकदा तो पूर्वीसारखा हसायला, बोलायला लागला होता.
महिनाभराने सुट्टी संपली. त्याचा परत जायचा दिवस उगवला. सगळ्यांनी त्याला भरपूर सूचना दिल्या. वेडंवाकडं पाउल न उचलण्याच वचन घेऊन मगच त्याला सोडलं सगळ्यांनी. होस्टेलवर मित्रांनी देखील त्याला चांगलाच दम भरला. अक्खा दिवस सगळ्या मित्रांना भेटण्यात, आणि नवीन विषयांची ओळख करून घेण्यात गेला.
सगळे जरा उशिरानेच खोलीत आले. रात्री खोलीतले सगळे झोपल्याची खात्री करून सोनू हळूच उठला. कपाटात सगळ्यात मागे लपवून ठेवलेलं ते पाकीट त्याने बाहेर काढलं. बराच वेळ तो त्या पाकिटाकडे बघत होता. भीतीने त्याचे हात कापत होते. हळूच दार उघडून तो बाहेर पडला. सगळीकडे अंधार होता. फक्त रातकिड्यांचा आवाज शांतता चिरत होता. तो होस्टलच दार चोरपावलांनी ओलांडून मुख्य रस्त्यावर आला. आता वर्दळ चांगलीच कमी झाली होती. त्याला काम सांगणारी मुलं त्याला कळणार नाही ह्या बेताने त्याच्या मागोमाग चालत होती. सोनू ठरलेल्या ठिकाणी पोचला. ज्याला ते खोकं द्यायचं होतं, तो आधीच तिथे आलेला होता. त्याने मनगटावर ओळखीचा लाल धागा बांधला होता.
सोनुने त्या माणसाला ते खोकं दिलं. त्याने ते खोकं आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करून घेत उघडलं. आतल्या पुड्या मोजल्या आणि पैसे सोनूला दिले. तो निघाल्यावर एक कर्कश शिट्टी वाजली, आणि काही कळायच्या आत धडाधड त्यांच्या अंगावर पोलिसांच्या लाठ्या पडल्या. अचानक हल्ल्यामुळे गांगरून गेल्याने कोनालव्ह पळता आलं नाही.सोनू, तो मुलगा आणि सोनूच्या कॉलेजमधली पाळत ठेऊन असलेली मुलं, सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
तुरुंगात काळोख पसरला होता. अचानक उजेडाची तिरीप डोळ्यांवर पडली. एक वोर्डबॉय आला. त्याने सोनूला हळूच उठवलं. आणि कोणाला काही समजण्याच्या आधी दोघेही दिसेनासे झाले. पोलीस स्टेशनला एकच धांदल उडाली. एक कैदी पोलिसांच्या नाकावर टिच्चून पळून गेला होता. ताबडतोब पोलिसांच्या गाड्या बाहेर पडल्या, पोलीस चौकीचा परिसर पिंजून काढण्यात आला. पण दोघांचाही काही कुठेच मागमूस नव्हता. आता काय घडणार होतं पुढं? काय उत्तर देणार होते तिथले पोलीस? कोण होता तो वोर्डबॉय?
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा