Login

आजी आणि शेपूची भाजी

This is sweet story of Riya who experienced the moment about thought share by her friend which makes her SMILE???
आईने रियाला हाक मारली ." रियू ऐकतेस का ग? आज पण जाशील का बाजारला. तू मला उरकणार नाही तू जाऊन ये ." तर रिया म्हणाली काय ग आई सकाळी का नाही सांगितलं? आता मी नाही जाणार माझा मूड नाही ."
आई म्हणाली ," कमाल आहे. बाजाराला जाण्यासाठी कशाला लागतो ग बाई मूड ? जा उरकून .एक तर आपल्याकडे तीन-चार गावात मिळून बुधवारी आठवडे बाजार भरतो. आज नाही गेलीस. नंतर ही भाजी नको ती भाजी नको असं ऐकणार नाही मी. जा ग . तुझा मूड ही फ्रेश होऊन जाईल. रिया म्हणाली ,"ठीक आहे जाते मी . "रिया तयारीला लागली जायच्या. तिच्या चेहऱ्यावर 12 का वाजले होते? हे आईला माहिती नव्हते. पण ती समजूतदार आहे हे आईला माहिती होतं.
रिया बाजारात गेली. आधी फळांची दुकाने नंतर खाऊ पेठ नंतर शेतातल्या उत्तम, ताज्या, टवटवीत भाजीपाला . ते विक्रीसाठी असणारे शेतकरी. ठरल्याप्रमाणे रिया पप्पांच्या दुकानात गेली . बाजारला जाते सांगितले . बाबांनी तिला सांगितले समोर पुढे गेलीस की मोबाईल शॉपी समोर आजी आहे. तिच्याकडून शेपूची भाजी घे रिया हो म्हणाली आणि थोडीशी पुढे गेल्यानंतर ती आजी दिसली. हिरव्या रंगाची साडी त्याला सोनेरी काठ 60 ते 65 वय असावा कदाचित. चेहऱ्यावर आठ - दहा पावसाळे आणि अनुभव असलेल्या सुरकुत्या आणि ती शेपूची भाजी . तिच्या मागे बसलेला एक सातवी किंवा आठवीत असणारा मुलगा असावा . जो तिला काहीतरी सांगतोय. कदाचित हिशोबातच मदत करत असावा . तेव्हा मनात प्रश्न पडला की . हा मुलगा तिचा नातू असेल का ? मग आजीला का भाजी विकायला बसवलं आहे ? तो का नाही भाजी विकत आहे ? आणि आजीच्या डाव्या बाजूच्या कपाळाला बँडेज का लावल्यात कुठे धडपडली असेल का ? पटकन वाटलं विचारावं. कदाचित तो मुलगा सकाळपासून तर भाजी विकत बसला नसेल ना . पण तरी आजीचा चेहरा इतका उत्साहीत आणि हसरा होता आणि ती खूप प्रेमाने भाजी विकत होती. की ते प्रश्न रिया विसरूनच गेली.
रिया पुढे आली आणि आजीला म्हणाली ,"आजी मला पण दोन जुडी शेपूची भाजी हवी आहे .या दोन घेते किती झाले ? "
आजी म्हणाली, "चाळीस रुपये झाले पण तू 30 दे."
रिया म्हणाली," घ्या शंभर रुपये."
आजी म्हणाली ,"अग छकुली सुट्टे नाहीत का ग तुझ्याकडे? "
रिया म्हणाली," नाही थांबा या शेजारच्या वडापाव वाल्या काकांना विचारू या."
त्या काकांनी पैसे सुट्टे दिले नाहीत . रीयाला प्रश्न पडला पिशवीतली भाजी परत कशी ठेवायची आणि तीने शंकेनेच आजीला म्हणाली," आजी मी तुम्हाला खालून बाजार करून आल्यानंतर देऊ का पैसे ? "
क्षणाचा ही वेळ न लावता आजी म्हणाली "ठीक आहे चालेल," रिया बाजारात निघाली. आजूबाजूला गर्दी होती आठवडे बाजार म्हणले की तेवढी गर्दी राहते . रियाच्या मनात विचार आला. बाजारात फक्त भाज्यांचा आणि विक्रीसाठी असलेल्या प्रत्येक गोष्टीचा भाव ठरलेला नसतो तर त्या भावाबरोबर शेतकऱ्यांच्या भावनाही जोडलेल्या असतात . खरंतर असं वाटतं आपल्या आजूबाजूचे जीवन हा एक खरेदी-विक्रीचा बाजारच आहे. फक्त इथे भाजीचा भाव नाही ठरत . तर माणसांच्या भावनांची खरेदी विक्री होत असते . बाजारात पैसा हे साधन असतं . भावनिक जगात दुसऱ्या व्यक्तीसाठी असणाऱ्या आपल्या क्रिया आणि याच क्रियामुळे माणूस सुखावला जातो तर कधी दुखावला जातो . सुख किंवा दुःख हा तर क्रियेचा परिणाम आला.
कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आपण जेव्हा क्रिया करत असतो मग ती गोष्ट व्यवहारिक असू किंवा भावनिक कोणतेही नातं. त्यासाठी आपण 100% मेहनत घेतली आणि विश्वास ठेवला की झालं. त्याचा परिणाम काय असेल ? हे आपल्या हातात नाही.
आणि तेच या आजीने केलं होतं. रियाने विचार करत करतच सगळा बाजार केला होता .आता परत ती पप्पांच्या दुकानाकडे निघाली आणि तिला आजी दिसली. आजीला चाळीस रुपये दिले . आजी म्हणाली" दिले बाई छकुलीने आणून पैसे." रिया हसून म्हणाली "ते तुमचेच होते आणि तुम्हाला मिळणारच होते."
रिया पप्पांना भेटून घरी आली आणि आईला म्हणाली, " आणला बघ मी तुझा बाजार सगळा . आता मला हव्या त्याच भाज्या करायच्या." आईला रियाच्या चेहऱ्यावर गोड हसू दिसलं आणि आईने विचारलं काय झालं बाजारात मग रिया. रिया म्हणाली.." एकदा माझा मित्र म्हणाला होता.. Whatever happens in a life happens for a good reason. Either you will get a good lesson or the thing you want... मला तेव्हा ते पटलं होतं पण वळलं नव्हतं म्हणूनच म्हणतात. माणूस अनुभवातूनच शिकतो आणि हेच मी बाजारला जाऊन अनुभवल."?
0