ग्रंथ हेच गुरु

In this Books or granth are the real Guru of our life

                                                            ग्रंथ हेच गुरु 

वेळो वेळी आपल्याला मार्गदर्शन करणारा गूरू. आपल्याला शिकवणारा गुरू , आपल्याला घडवणारा गुरु , अशा या गुरुचे महत्व आपल्या जीवनात अनन्य साधारण असते.  एखादी कला , विद्या शिकायची असेल तर आपल्याला गुरु असावा लागतो . श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात " जीवन जगणे हि पण एक कला आहे .

ज्या आई वडिलांनी जन्म दिला ते तर पहिले गुरु असतात . मोठे बंधू भगिनी हे सुद्धा एक प्रकारे गुरूच आहेत . वेळो वेळी ते हि मला गाईड करत असतात .शाळेतील शिक्षकानीं तर मला घडवलं . या निमित्तानं मी आज सर्वांचे आभार मानते आणि त्यांना नमन  करते .

वरील सर्व मंडीळीच्या आशीर्वादाने माझ्या जीवन सुरु झाले आणि इथपर्यंत आले .एकदा का संसार सुरु झाला कि जीवन हि एक कला नसून एक तारेवरची कसरत आहे असे वाटायला लागते . कितीही प्लांनिंग करा, कितीही सोशिक व्हा , कितीही स्मित हास्य ठेवा  एक ना एक दिवस तुमची साधना भंग होतेच . हे चित्र मला विश्वामित्र ऋषींची तपस्या भंग करायला येणाऱ्या अप्सरांची आठवण करून देते . अर्थात कोणाचंही चेष्टा किंवा ऋषीं बरोबर माझी स्वतःची बरोबरी करण्याच  हेतू नाहीये . मुद्दा हाच कि ऋषींची तपस्या भंग करण्या साठी जशा अप्सरा नृत्य करत असतात तसाच काहीशी माझी न चिडण्याची , न रागवण्याची तपस्या रोज भंग होत असते .

असो तर मग जीवन हि कला कशी साध्य करायची ?आणि हि कला शिकवण्यासाठी पण गुरु तर पाहिजेच ना !

या सगळ्यात माझी नाव जर तरली असेल तर केवळ एका  गोष्टीमुळे . मला असेलेली वाचनाची आवड . जेव्हा वेळ आणि मूड येईल तेव्हा वेग वेगळी आणि वेग वेगळ्या विषयावरची पुस्तके वाचायची .

मानवी मेंदूच एक काम खूप भारी आहे कि तो कधीही पूर्ण भरत नाही . आणि एकदा वाचले कि आपल्या मेंदूत ते ज्ञान कुठेतरी साठून ठेवते . आपण जर आठवायचा प्रयन्त केला तर आठवते बरे ! बघा अजूनही आपल्याला पहिलीच्या बाई नि शिकवलेली किंवा आजीने सांगितलेली गोष्ट आठवत असते . लहान असताना जवळच लायब्ररी होती . राज संध्याकाळी तिथे जायचं आणि लहान मुलांच्या सेकशन मधलं हवं ते पुस्तक   काढायचं , वाचायचं आणि पुन्हा ठेवून द्यायचं . जास्तीत जास्त हाच प्रयत्न असायचा कि आज च्या आज हे वाचून पूर्ण झालं पाहिजे कारण उद्या हे मिळेल कि नाही याचा काहीच  नेम नाही .

सिंहाच्या देशात , चांदोबा , श्यामची आई , पंचतंत्रातील गोष्टी अशी अनेक पुस्तक मी लायब्ररीत बसून वाचलेली आहेत . जस जशी मोठी होत गेले म्हैस , व्यक्ती आणि वल्ली , मग वपुर्झा , मृत्युन्जय , ययाती , राधेय अशी पुस्तके वाचून काढली. मग दुनियादारी, एक होता कार्व्हर , शितू , अग्निपंख , अशी पुस्तके वाचून काढली . शिक्षण चालू असे पर्यंत खूप वाचन झालं . मग जॉब सुरु झालं मग वेळ मिळेना  आणि हे वाचन कमी झालं . हि एवढी पुस्तके मी कधीच स्वतःहून खरेदी करून वाचली नाहीत . मित्र मैत्रिणी , सर , शेजारी  ह्यांची मागून  आणायची आणि वाचायची . कितीतरी पुस्तके मला गिफ्ट्स किंवा बक्षीस म्हणून पण मिळालेली आहेत. मला तर वाटतं हि पुस्तके च स्वतःहून माझ्याजवळ येतात आणि मला वाचायला भाग पाडतात.

.

जसा गुरु आपल्या शिष्यांना शोधून काढतो अगदी तसाच. तसाच माझा गुरु पण मला शोधून काढतो माझ्या आयुष्यात  ग्रंथ हेच गुरु आहेत . शिक्षण किंवा शिक्षणे व्यतिरिक्त असो पण वेगवेगळ्या पुस्तकांनी, ग्रंथांनी  मला घडवलंय . या ग्रंथांनी मला चांगली दिशा दिली, आत्मविश्वास दिला, ज्ञान दिल . आणि माझं जीवन जगण्याची कला मला दिली , मला हेतू दिला. पुलं च असो वा , मॅनेजमेंट गुरु फिलिप कोटलर  असो त्यांचा पुस्तकांनी मला नेहमीच मार्गदर्शन केले , शिकवले .

जिथे जाईल तिथे हा गुरु माझ्या बरोबर येतो. काही कारणाने मन नाराज झाले तर मोटिवेशनल , जेवण बनवायला शिकायचंय तर पाककलेचे पुस्तक, आर्थिक ताण आलय वॉरेन बफेट , तुम्ही प्रॉब्लेम सांगा पुस्तक म्हणजे गुरु हजर

आपल्या सर्वांचे लाडके छत्रपती महाराजांनी श्री समर्थ रामदास स्वामींना आपला गुरु मनाला होता . स्वराज्याचा भगवी झेंडा हे रामदास स्वामींची आठवण म्हणून भगवा रंगाचा होता . रामदास स्वामींनी  जगाच कल्याण होण्याकरता दासबोध लिहला. सध्या  हा दासबोध ग्रंथ  मला परिपूर्ण बनवण्यासाठी रोज झटत आहे . माझ्यामध्ये वागताना काय चुकतंय , कुठे चुकतंय हे मला दाखवून थाम्बत नाही तर काय नाही केले पाहिजे, काय  केले पाहिजे ते सुद्धा सांगतोय .

ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीता सर्व सामान्य लोकांना कळावी म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली .संत तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले , महर्षी वेद  व्यासांनी वेद , उपनिषदे लिहिली . हे सर्व महान ग्रंथ हे सर्व गुरूच आहेच . माणूस म्हणून आपण संपून जाऊ पण जगात हे ज्ञान कधीच संपणार नाही . सध्या मी दासबोध वाचत आहे विश्वास बसणार नाही दासबोध हा एक लेटेस्ट मॅनॅजमेण्ट गुरु आहे . सर्व सामान्य माणसाच्या मानसिकिकतेचा पूर्णतः अभ्यास करून त्याच्या प्रगतीसाठी लिहिलेला ग्रंथ आहे . मी तर म्हणते आयुष्यात एकदा तरी हा ग्रंथ सर्वांनी वाचला पाहिजे . मूर्खांची लक्षणे , उत्तम लक्षणे , भक्ती , नीती, व्यवसाय , नाती गोती , धर्म ,गुरु आणि अनेक विषय हाताळले आहेत .

असा हा माझा गुरु   मला जेव्हा पाहिजे तेव्हा तो माझ्यासाठी माझ्यासमोर वेगवेगळ्या रूपात येतो . मला कधी हसवतॊ , कधी रडवतो , कधी अंतराळ , कधी पाताळ , कधी इतिहास , कधी विज्ञान , कधी कथा , कधी कादंबरी , कधी अध्यात्म ,कधी पुराण, कधी काव्य  अशा अनेक रूपात तो येतो . हल्ली तर ऑनलाइन पण असतो . फक्त मनापासून आठवण काढली कि दर्शन देतोअसा माझा गुरु मला प्रिय आहे .

© सौ . शीतल महामुनी  माने