अनुभव कथन - पैशांची गोष्ट - ग्रास ऑलवेज ग्रीनर ऑन दअदर साईड

Marathi Story- पैशाची गोष्ट, लघुकथा
अनुभव कथन - पैशांची गोष्ट

ग्रास ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड

संध्याकाळची वेळ होती सोसायटीच्या गार्डनमध्ये एकीकडे मुल खेळण्यात दंग होते तर दुसरीकडे त्यांच्या आयांची गप्पांची मैफिल रंगली होती.

पुनम मुद्दाम टोमणा मारण्याच्या उद्देशाने सायली ला म्हणाली,
" काय सायली मॅडम आज तुझी मैत्रीण मधुरा दिसत नाही.आहे कुठे ती?"

यावर सायलीही चिडून म्हणाली,

" असं का म्हणतेस ती फक्त माझीच मैत्रीण आहे का तुझी नाहीये?"

" तसे नाही पण तुझी जरा जास्तच जवळची म्हणून विचारले?"..... पुनम

तेवढ्यात दोघींचेही बोलणं तोडत जया ने विचारले
" मी अस ऐकले आहे की ती दुबईला फिरायला जाणार आहे? खरं आहे का हे?"

" हो जाणार आहे पण कधी ते माहीत नाही."
सायलीने उत्तर दिले

"वाव किती छान ना!"
जया उत्साहाने म्हणाली.

त्यावर पुनम
" तिला काय बाई पैशांची कमी दुबईला जाईल नाहीतर अमेरिकेला."

" का ग असं का म्हणतेस? तू ही जाऊ शकतेस"
जया म्हणाली.

" नाही बाबा आपल्याला नाही जमणार आपण जॉब वाले माणसं."

" जॉब वालेच तर जातात आजकाल फॉरेनला."
सायली
" ते जॉब ला जातात फिरायला नाही.
मधुराच काय बाबा त्यांचा व्यवसाय ( business) आहे.त्यामुळे इन्कम ( income) पण जास्त आणि स्वतःच मालक(owner)असल्याने सुट्ट्यांचाही प्रॉब्लेम नाही."
पूनमने आपले मत स्पष्ट केले.

" असं काही नसतं ग आणि तुम्हाला काय (salary) सॅलरी कमी आहे का"....सायली

"सायली तु ना अगदीच साधी भोळी आहेस तुला काही समजत नाही.अग सॅलरी महिन्याच्या शेवटी येते ना आपल्याला. बिझनेस मध्ये तसा पैसा चालूच असतो.महिना संपण्याची वाट पाहावी लागत नाही."

"असेल मला काही जास्त माहित नाही त्याबद्दल खूप उशीर झालाय मी आता घरी जाते."
*******
वरील सर्व संवाद जिच्या विषयी चालू होता ती म्हणजे मधुरा अजित मोरे.
मधुराच्या मिस्टरांचा म्हणजे अजितचा स्वतःचा बिझनेस होता. त्यांना रोहन नावाचा एक आठ नऊ वर्षांचा मुलगा होता.
मैत्रिणींमध्ये मधुरा विषयी वरील चर्चा होती तर मधुराच्या घरात वेगळी चर्चा चालू होती.
******

मधुरा अजितला जरा काळजीच्या स्वरात म्हणाली,
" अजित मला असं वाटतं की बुकिंग करण्याआधी तुम्ही परत एकदा विचार करावा."

" काहीतरीच काय मधु. अगं सगळी चौकशी करून झाली आहे आता त्यांना ऑनलाइन पेमेंट ट्रान्सफर केले की झाले. तू ना तुझ्या डोक्यातले सगळे निगेटिव्ह विचार काढून टाक."

"निगेटिव्ह नाही , हे बघा आपला एक तर बिझनेस आहे. फ्लॅट घेऊन अजून वर्ष पण नाही झाले आपल्याला आणि लगेचच हा खर्च. मला वाटतं आपण जरा एक-दोन वर्षांनी जाऊयात."

" एकदोन वर्षांनी असं काय होणार आहे?फ्लॅटचे लोन
( loan ) लगेचच निल होणार आहे का?"
अजित चिडून म्हणाला.

"कार चे तर होऊ शकते ना."
मधु पटकन बोलून गेली.

"हो होऊ शकते आणि ते मी करणारच आहे. हे बघ आत्ता सध्या कार लोन साठी लॉकिंग पिरियड(locking period) आहे.सहा ते नऊ महिने आपण ते निल करू शकत नाही."
अजित मोठ्याने म्हणाला.

तो पुढे मधु ला समजावत म्हणाला,

"अग, आपण करू सगळं हळूहळू. त्यासाठी कुठे फिरायला जायचं नाही, एन्जॉय करायचं नाही असं काही आहे का?
हे बघ आता आपलं स्वतःच ऑफिस आहे, आपल्याकडे गाडी आहे, त्याच लोन लॉकिंग पिरियड संपला की निल करून टाकू बस एक फॉरेन ट्रिप करून आलो की बिझनेस वाढवण्यावर आणि होम लोन ( home loan) निल करण्यावरच मी लक्ष देणार आहे."

यावर मधु शांत बसली काहीच बोलली नाही.
हे बघून अजित तिच्या जवळ येते तिचा हात हातात घेत म्हणाला,
" तु हे विचार सोड आणि फक्त शॉपिंगचा विचार कर."
******
चार-पाच दिवसांनंतर
संध्याकाळचे पाच वाजले होते. मधुच्या मोबाईलची रिंग वाजली. सायलीचा कॉल होता. तिने कॉल उचलला

"हाय!"

तिकडून रिप्लाय
"काय करतीयेस?"

"हाय नाही,हॅलो नाही डायरेक्ट काय करतीयेस? विशेष काही नाही तू बोल.".......मधुने उत्तर दिले.

" मला खूप बोअर झालय चल वॉकला जाऊ. हे पोट पण एवढं वाढलाय ना."
सायली च्या स्वरात नाराजी होती.

"बोअर झालय म्हणून वॉक ला जायचे की पोट वाढलं म्हणून..."
मधुने हसत विचारले.

"दोन्हीही....येणार आहेस का?"

सायलीच्या या उत्तरामुळे तिचं काहीतरी बिनसल्याचं मधुच्या लक्षात आले. त्यामुळे अजून जास्त काही न विचारता ती वॉक ला जाण्यासाठी तयार झाली.
दोघीही जवळच्या गार्डन मध्ये गेल्या. अधूनमधून त्या तिथे वॉक साठी जात असत.

"अरे वा !खूप दिवसांनी आलो ना ग आपण वॉकला ...किती छान हिरवळ पसरली आहे ना."
मधु म्हणाली.

" हो ना ".....सायली

"हा आता बोल ..काय झाले आहे ?"........मधु
" काय झाले म्हणजे? कुठे काय?"

"मग बोअर का झाली?"

"हां ते ....काही नाही नेहमीचेच."
मधुने प्रश्नार्थक नजरेने पाहिले.

सायली ही मान हलवत म्हणाली,
हो..नेहमीचेच....ऑफिस मध्ये बॉस बरोबर काही बिघडलं की घरी येऊन चिडचिड करायची आणि मागचा पुढचा विचार न करता जॉब सोडायचा.हे माझ्यासाठी नेहमीचेच झाले आहे. तुला माहितीये या दोन वर्षात सचिन चा तिसरा जॉब आहे हा."

सायली डोळ्यातले पाणी लपवण्याचा प्रयत्न करत पुढे म्हणाली,
इथे महिना झालं की फ्लॅट चा (EMI) ई यम आय, (light bill) लाईट बिल, मुलांची ट्युशन फि(tution fees) ब्ला ब्ला ब्ला....(salary) सॅलरी कशी संपते ते ही समजत नाही. पैसा येताना फक्त एकीकडून येतो पण जातो मात्र चारही बाजूने आणि आता जॉब सोडल्यावर नवीन जॉब मिळेपर्यंत रोजची धाकधूक.तुमचे बरे आहे यार बॉस चे ही टेन्शन नाही आणि सॅलरी ची ही वाट पहावी लागत नाही."

" ए...एक मिनिट म्हणजे काय आमचं बरं आहे म्हणजे काय म्हणायचे आहे तुला ? "
मधुने विचारले.

"अग तुमचा बिझनेस आहे ना मग तुम्हाला तर पैशांची अडचण नसेल ना काही ....महिन्याची ही वाट पाहावी लागत नसेल ना?"

मधुची संशयक नजर बघून ती पुढे म्हणाली,
"अग म्हणजे अस पुनम म्हणत होती."

"पुनम ? "मधुने परत डोळ्यांनीच तिला विचारले.

" हो ..म्हणजे त्या दिवशी आम्ही सगळे गप्पा मारत होतो. तू नव्हती आलीस तर तुझा विषय झाला तेव्हा पुनम म्हणत होती."
शेवटचे शब्द सायली ने मधु कडे न बघताच उच्चारले.
" गॉसिप करायला मी सोडून दुसरे कोणी भेटलं नाही."
मधु म्हणाली.

"गॉसिप नाही ग.....म्हणजे मी नाही ती पुनम."

"बरं जाऊदे पण ती काय म्हणाली मग मला लाईटबिल (light bill), EMI, पे (pay) करावा लागत नाही का.?"..... मधु

"तसे नाही ग...म्हणजे तुला( salary) सॅलरी साठी महिन्याची वाट बघावी लागत नाही. बॉस चे टेन्शन नाही, सुट्टी पण तुमच्या मनाने घेऊ शकता.इन्कम पण फिक्स नाही म्हणजे आम्हाला महिन्याच्या शेवटी ठरलेलीच (salary) सॅलरी मिळते. तसं तुमचे नाही ना."

"हो अगदी बरोबर. आत्ता तूच म्हणाली महिन्याच्या शेवटी तुम्हाला फिक्स salary ( सॅलरी) मिळनार हे तुम्हाला माहित असते. पण बिझनेस चे तसे नाही. एखाद्या महिन्यात जास्त प्रॉफिट होते तर एखाद्या कमी.पण खर्च मात्र फिक्स असतात. बरं बिझनेस मध्ये जेवढे येते ते आपले सगळे प्रॉफिट असते असे ही नाही,त्यात खर्च ही असतो.employee चे पेमेंट, CA ची फीस असते.वेळोवेळी (investment) इन्व्हेस्टमेंट ही करावी लागते.वर्षभर झालेले प्रॉफिट, लॉस, खर्च , (investment) इन्व्हेस्टमेंट याचा रेकॉर्ड ठेवावा लागतो.व्यवसाय म्हंटले की बारा भानगडी असतात.
एक दीर्घ श्वास घेऊन ती पुढे म्हणाली,

" स्वतः बॉस असलो तरी (client) क्लायंट नावाचे भूत डोक्यावर असते. त्याला संभाळणाही तेवढंच गरजेचे असते, नाहीतर मार्केट मध्ये अजून तुमचे कॉम्पीटेटर तयारच असतात.
नवीन क्लाएंट ही वाढवावे लागतात.त्याबरोबर अजूनही बऱ्याच गोष्टी असतात ज्या( बिझनेस ) व्यवसायात बघाव्या लागतात. आता तू म्हणतेस सुट्ट्यांचे....सुट्ट्या घेतल्या तरी काम करावे लागते. फिजिकली नाही केले तरी मेंटली असतेच ना."

"बापरे... एवढा बारीक विचार नव्हता केला मी."
सायली मध्येच म्हणाली.

"एवढेच नाही (बिझनेस) व्यवसाय म्हंटले की ( investment) इन्व्हेस्टमेंट आली त्यासाठी लोन(loan) घ्यायचे म्हंटले तरी ते सहजासहजी मिळत नाही, त्याचे रुल्स- रेगुलेशनस वेगळेच.
हा आता हे एक बरे आहे की बऱ्याच फायनान्स कंपन्या(gold loan)गोल्ड लोन देतात.त्याचा (interest rate) इंटरेस्ट रेट बिझनेस लोन च्या (intrest rate ) इंटरेस्ट रेट पेक्षा कमी असतो."...........मधु

"हो ... ऍड लागते ना टीव्ही वर.ये पण बँका पण गोल्ड लोन देतात ना.कोणाकडून तरी एकले होते मी."........
सायली.

"हो देतात ना. प्रत्येक बँकेचे रुल्स वेगळे असतात.
मग आता सांग काय वाटते तुला,माझे बरे आहे ना."
मधुने विचारले.

"तुझे आहेच ग पण हे सगळे सचिनला नाही जमणार हे मात्र नक्की ...नको तो बिझनेस आपला जॉब च बरा.
असं नुसतं बिझनेस म्हणायला छान वाटते पण बापरे एवढे सगळ्या गोष्टी बघव्या लागतात. लांबूनच बघायला छान वाटते.तिथे ऍक्चुअल असल्यावर कळतं काय आहे ते."
सायली ने आपले मत मांडले.

"हम ...समजले म्हणजे तुला.व्यवसाय असू दे नाहीतर जॉब दोन्हींमध्ये प्लस - मायनस पॉईंट आहेत.प्रत्येकाने बघायचे स्वतःला काय जमेल.
हेच बघ ना मघाशी तू म्हणालीस इथे नको तिथे जाऊ बसायला तिथले ग्रास ग्रीन आहे पण जरा बघ समोर"
मधु म्हणाली.

सायली ने समोर नजर टाकली आणि चमकून म्हणाली
"अग हो ग खरच आता तिथले गवत इथल्या पेक्षा हिरवे दिसते आहे."

"हो डियर,...ग्रास ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड."

"आणि सायली यालाच जीवन असे म्हणतात.जॉब असो, बिझनेस असो, डॉक्टर असो, वकील असो नाहीतर शेतकरी प्रत्येकाच्या आयुष्यात चढ - उतार
चालू असतात. पैशांचे प्रॉब्लेम असतात. आता ती व्यक्ती कशा पद्धतीने आपल्यावर आलेली परिस्थिती हाताळते यावर त्याचे यश -अपयश अवलंबून असते."

"त्यामुळे चीड - चीड करणे सोड आणि आलेल्या परिस्थितीत तू काय करू शकतेस याचा विचार कर."

यावर सायलिनेही होकारार्थी मान हलवली.पण मधु चे बोलणे अजून संपले नव्हते.मऊ, लुसलुशीत गवतावर हात फिरवत ती बोलू लागली,

"प्रत्येकाला आपल्या पेक्षा समोरचीच परिस्थिती चांगली वाटते. अरे यार किती छान आहे ना तिचे, छान आहे ना त्याचे.त्याच्या जागेवर जाऊन बघा मग समजेल रियालिटी."

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे,
"कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती असल्याशिवाय त्याविषयी कमेंट करणे वा एखाद्या व्यक्तीविषयी गॉसिप करणे, आपल्याच मनाने एखादी समजूत करून घेणे, आपल्या जवळच्या व्यक्तींविषयी चुकीचे ग्रह करणे या कृती प्रत्येकाने टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे." कारण....
मधु पुढे बोलणार तेवढ्यात सायलीच म्हणाली
कारण....
"ग्रास ऑलवेज ग्रीनर ऑन दअदर साईड."
*******
समाप्त.
सुजाता इथापे.