Login

हिरव्या चिंचेची चटणी

हिरव्या चिंचेची चटणी
आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे. हिरव्या चिंचेची चटणी . हिरवी चिंच बघून तोंडाला तर पाणी सुटलं. त्याची चटणी खुप छान लागते. कधी तरी चवीत बदल म्हणून करून बघा.

साहित्या -
ओल खोबर २ वाट्या
कोथिंबीर १ मोठी वाटी
लसूण चार पाकळ्या
हिरव्या मिरच्या चार
ओली हिरवी चिंच १ /२ छोटी वाटी
मीठ
फोडणी साठी
तेल, हळद ,कढीपत्ता आणि हिंग .

कृती -
मिक्सर च्या भांड्यात सर्व साहित्या घालून वाटून घ्या. पाणी एक ते दीड चमचा इतकचं घाला. जास्त पातळ वाटू नका.

नंतर चटणीला फोडणी करण्यासाठी तेल गरम करा. त्यात हिंग, हळद, कढीपत्ता आणि हिंग घालून चुर चुरीत फोडणी करा. गरम असताना चटणी वर घाला.

गरम गरम पोळी किंवा भाकरी सोबत हि चटणी चवीला खुप छान लागते.