दीर्घकथा लेखन स्पर्धा
" सई ताई.. सगळी भांडी घासून झाली आहे आणि किचन पण साफ करून घेतलं. " एवढ बोलून ती तिथून निघणारच मध्येच सई ताईने तिला थांबवलं.
सई ताई " थांब आधी मला बघू दे सगळं बरोबर केलस की नाही ते. काल तू तशीच निघून गेलेलीस एका तांब्याला साबण तसच होत. तुझा काल पहिला दिवस होता म्हणून काही बोललं नाही. पण यापुढे अस नाही चालणार. रोज मी तपासून बघेन बरोबर केलं की नाही ते मगच इथून जायचं. तुला गरज आहे म्हणून ठेवून घेतलं आहे नाहीतर कालच काढून टाकलं असत तुला. "
ती भावनाशून्य चेहऱ्याने " हो ताई.. यापुढे अस नाही होणार. तुम्ही मला समजून घेतलं आणि ठेवून घेतलं त्यासाठी तुमचे खूप आभार आहे. "
तिचं बोलून झाल्यावर सई ताई किचनमध्ये जातात आणि चहूबाजूंनी बघतात किचन बरोबर साफ केलं की नाही. किचन बघून झाल्यावर त्यांना कुठे काही चुकीच भेटत नाही त्यामुळे ती सुटकेचा श्वास घेते. नंतर सई ताई घासून धुवून झालेल्या भांड्यांकडे वळतात. भांडी जाळीत न ठेवता बेसिनच्या बाजूला मांडून ठेवली असल्याने त्यांना तपासायला सोप गेलेलं. त्या एक एक भांडी निरखून बघत असताना त्यांना एक ताटलीवर छोट डाळीचं उष्ट दिसत. त्या ती ताटली उचलून तिला दाखवतात. ते बघून तिच्या मनात आता सई ताई काय बोलतील , आपल्याला काढून टाकले असे बरेच विचार येत होते.
सई ताई राग शांत ठेवून " हे काय आहे भाग्यश्री ? घरी अशीच कामं करतेस का ? "
हे ऐकून भाग्यश्रीला अचानक डोळे भरून येत होते. पण तिने डोळ्यातलं पाणी कसेबसे आत दाबून ठेवले.
भाग्यश्री हळू आवाजात खाली मान करून " त.. ताई.. माफ करा. पुढे लक्ष देऊन काम करेन. "
भाग्यश्रीला बघून सई ताई " भाग्यश्री तू जर असच रोज करत राहिलीस तर कोणी तुला कामावर नाही ठेवणार. आजपण काही बोलत नाहीये मी. पण पुढे अस होता कामा नये समजल. जाण्याआधी ही ताटली स्वच्छ धुऊन काढ. "
भाग्यश्री " हो ताई. खूप धन्यवाद. " बोलून ती ताटली धुवायला घेतली. स्वच्छ धुऊन झाल्यावर सई ताई तिथून निघून गेल्या. भाग्यश्री पण तिथलं काम झाल्यावर सई ताईच्या घरातून निघून गेली.
भाग्यश्री सई ताईच्या घरातून निघाल्यावर घड्याळात वेळ बघते तर तिच्या चेहऱ्यावर घाम जमा झाला. ती घाबरत स्वतःशीच " खूप उशीर झालाय. आता वसुंधरा ताईकडे गेले तर खूप काही बोलतील. तरीही मला जावच लागेल नाहीतर ते एक काम हातातून गेलं समजायचं. " एवढ बोलून ती झपझप पावले टाकत दुसऱ्या बिल्डिंग मध्ये आली आणि बी विंग मध्ये जात लिफ्ट न घेता पायऱ्या चढत गेली कारण तिला खूप उशीर झालेला लिफ्ट खाली येईपर्यंत वाट बघितली तर तिला आणखी उशीर झाला असता.
ती पटापट पायऱ्या चढत चौथ्या माळ्यावर पोहोचली आणि वेळ घालवता तिने लिफ्टच्या बाजूच्या फ्लॅटची बेल वाजवली. दोन तीन बेल वाजवल्यावर समोरून दरवाजा उघडला गेला. दरवाजा वसुंधरा ताईने उघडलेला. त्यांची रोखलेली नजर बघून भाग्यश्रीच्या कपाळावर घाम जमा झाले आणि हात जणू कापायला लागले. तिच्या मनात भीती होती की हे काम सुटू नये. तिला या कामाची खूपच गरज होती. त्यामुळे तिला जे करता येईल ते करायला तयार होती.
दरवाजा उघडल्यावर तिने आत पाऊल टाकताच अचानक तिचा फोन वाजू लागला. फोन वाजल्यावर जस तिने वसुंधरा ताईकडे बघितलं तर त्यांच्या डोळ्यात आगीच्या ज्वालामुखी भडकत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे असे भाव बघून भाग्यश्रीला काय बोलावं, कुठून सुरुवात करावी काही समजत नव्हत. त्यात तिचा फोन सारखा सारखा वाजत होता.
थोडा धीर धरून भाग्यश्री काही बोलणार त्याआधीच वसुंधरा ताईने हात दाखवत तिला रोखल. आता वसुंधरा ताई काय बोलणार ? आपल्याला काढून टाकणार का ? असे अनेक प्रश्न भाग्यश्रीच्या मनात येत होते. प्रत्येक प्रश्नाला तिचा श्वास रोखत होता. वरून एका मागोमाग येणारे फोन.
क्रमशः
©भाग्यश्री परब
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा