दीर्घकथा लेखन स्पर्धा
त्या मुलीला बघून भाग्यश्रीच्या कपाळावर घाम जमा झाले. ती आतून खूप घाबरलेली.
ती मुलगी भाग्यश्रीच्या खांद्याला हलवत " हे भाग्यश्री. ऐकतेय ना ? "
भाग्यश्री भानावर येत " ह.. हो.. हो.. ( भीती लपवत त्या मुलीकडे बघून ) स्मृती तू इथे ? "
स्मृती " का ? मी नको का यायला इथे ? अरे माझं काम होतं म्हणून आली इथे. परवाच मुलुंडला जाणार. "
स्मृतीच्या तोंडून मुलुंड नाव ऐकून तिच्या अंगावर काटा आला.
भाग्यश्री " अच्छा.. ( काढता पाय घेत ) मी.. मी जाते.. मला एक काम आठवलं. आपण नंतर आरामात भेटू. चालेल का ? "
स्मृती " हो चालेल ना ? का नाही ? तू मला फोन कर कुठे भेटायचं वैगरे सांग. मग भेटू आपण. "
भाग्यश्री " ह.. हो. मी जाते. बाय. "
स्मृती हसत " बाय. "
भाग्यश्री स्मृतीचा निरोप घेऊन तिथून निघून गेली. भाग्यश्री गेल्यावर स्मृतीच्या चेहऱ्यावरच्या हास्याचे भाव जाऊन रागीट भाव पसरले.
स्मृती रागातच पर्स घट्ट पडकून दात ओठ खात " भाग्यश्री.. तू मुलुंड सोडून माटुंगाला येऊन लपलीस. पण लपून लपून किती लपशील. मी तुला सोडणार नाही. तिथे माझ्या भावाच लाखोच नुकसान करून आणि त्याची इज्जत घालवून इथे येऊन लपलीस. तेही आनंदाने राहत आहेस इथे. "
जेव्हा भाग्यश्रीने एका कुटुंबाला हसत बघत होती त्याच वेळी स्मृतीच लक्ष तिच्याकडे गेलं. तिला अस बघून स्मृतीच्या मनात रागाच्या ज्वालामुखी उफाळत होत्या. तिने बघितलं की भाग्यश्री तिथून जात तेव्हा ती जाऊ नये म्हणून दुसऱ्या रस्त्याने जात ती भाग्यश्रीच्या समोर येऊन उभी राहिली.
स्मृतीने कोणाला तरी फोन लावला. समोरून फोन उचलल्यावर स्मृती " हॅलो. मला एका व्यक्तीची माहिती काढायची आहे. मी तुला फोटो पाठवेन तुझ्या नंबरवर. "
समोरून " ठीक आहे. तुला कशा प्रकारची माहिती हवी. "
स्मृती न समजून " म्हणजे ? "
समोरून " त्या व्यक्तीची कोणती माहिती हवी. पत्ता , लाइव्ह लोकेशन, कॉल रेकॉर्डिंग की तिच्या पूर्ण फोनची. "
स्मृती " मला तिची पत्ता आणि ती काय काय करते , कुठे राहते. एवढीच माहिती हवीय. "
समोरून " मग माझ्या खात्यात दहा हजार पाठव. देतो तुला पूर्ण माहिती. यासाठी मला एक आठवडा लागेल. "
स्मृती आश्चर्याने " काय ? दहा हजार ? एवढे ? वेड लागलंय काय तुला विनोद. एवढे पैसे कोण घेत ? मला वाटलं दोन , तीन हजार असेल. "
विनोद " मला वेड नाही लागलंय. तुला माहिती नाही का ? माहिती काढायला किती मेहनत लागते. मी पंधरा हजार घेतो अश्या माहितीची. तू माझी मैत्रीण आहेस म्हणून तुला डिस्काउंट दिलं आहे. तू दुसऱ्या प्रकारची माहिती मागितली असती तर त्याचे खूप जास्त फी आहे. "
स्मृती प्रश्नार्थक " दुसऱ्या प्रकारची म्हणजे ? "
विनोद " दुसऱ्या प्रकारची म्हणजे कॉल रेकॉर्डिंग, डाटा हॅक चे पंचावन्न हजार. पूर्ण मोबाईल आणि अँप हॅक चे दहा लाख. "
स्मृतीला विश्वासच बसत नव्हता की अश्या प्रकारच्या माहितीचे एवढे पैसे घेतात.
स्मृती " ठीक आहे.. ठीक आहे.. मला फक्त ती कुठे राहते आणि काय काय करते एवढंच हवंय. माहिती भेटल्यावर मी पैसे ट्रान्सफर करते. "
विनोद " माहिती भेटल्यावर नाही. तुला पाच हजार आधी ॲडव्हान्स द्यावे लागेल. "
स्मृती " अरे.. तू माझाच मित्र आहेस ना ? तुला माझी परिस्थिती माहिती आहे ना ? "
विनोद " माहिती आहे. तरीही तुला द्यावे लागतील. नाहीतर दुसऱ्या कोणाकडून माहिती काढायला सांग. "
स्मृती " देते मी. पाच हजार जास्त देण्यापेक्षा दहा हजार बरे आहे."
विनोद " ठेवतो फोन. पाठव पैसे. "
बोलून झाल्यावर विनोदने फोन ठेवून दिला. फोन ठेवल्यावर स्मृतीने लगेच त्याला पाच हजार ॲडव्हान्स पाठवले.
स्मृती स्वतःशीच " भाग्यश्री तुझ्यामुळेच माझे दहा हजार जात आहेत. पण हरकत नाही हे दहा हजार तुझ्याकडून कशी वसूल करून घेते बघ. "
क्रमशः
©भाग्यश्री परब
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा