Login

ग्रीष्मातला गारवा (९)

तिचा स्वतःवर असलेला विश्वास पूर्णपणे नाहीसा झालेला. ती पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवेल का? जाणून घेण्यासाठी वाचा " ग्रीष्मातला गारवा"
दीर्घकथा लेखन स्पर्धा

बोलत असताना भाग्यश्रीला कोणाचा तरी फोन येतो. फोन उचलल्यावर समोरून काहीतरी बोलणं होत ज्यामुळे भाग्यश्री खूप घाबरते.

समोरची व्यक्ती बोलून झाल्यावर फोन कट करते. फोन कट झाल्यावर भाग्यश्री तिथेच मटकन खाली बसते. तिला अस बघून सागरही घाबरतो. पण स्वतःला शांत करत " भाग्यश्री.. काय झालं ? कोणाचा फोन होता ? "

भाग्यश्री भानावर येत तिथून उठून जाते. तिच्या पाठोपाठ सागरही जातो. थोड्या वेळाने भाग्यश्री आणि सागर दोघे भाग्यश्रीच्या दारासमोर उभे राहतात. बघतात तर तिथे एक व्यक्ती हाताची घडी घालून भिंतीला टेकून उभी होती.

ती व्यक्ती भाग्यश्रीसमोर उभ राहत " मी तुला खूप संधी दिल्या , पण आता नाही. आजपासून मला माझे पैसे वेळेवर भेटायला हवेत. "

भाग्यश्री " साहिल दादा. तुम्हाला माझी परिस्थिती माहिती आहे ना. कृपा करून अस नका करू. ( हात जोडत ) विनंती करते तुम्हाला. "

साहिल " ते मला काही माहिती नाही. तुझे दोन महिन्याचे आठ हजार झालेत. मला आताच हवेत आणि मला माझे पैसे दिल्यावर तुला इथे रहायची गरज नाही. "

भाग्यश्री " साहिल दादा. कृपा करून समजून घ्या. "

साहिल " नाही म्हणजे ,  नाही. "

दोघं बोलत असताना सागर हातातले पैसे साहिलपुढे करत " हे घ्या आठ हजार. ( भाग्यश्रीकडे बघत ) भाग्यश्री तुला इथे रहायची गरज नाही. तुला तर घरी नाही ठेवू शकत. पण तू माझ्या ऑफिसला लागून एक छोट घर बनवलं आहे तिथे तू राहू शकते. मी ते घर यासाठी बनवलं होत की कधी जास्त काम असताना घरी जाऊ शकत नाही तर तिथे राहू शकेल. "

भाग्यश्री " सागर दादा तुम्ही पैसे नका देऊ आणि मी दुसर घर शोधेन. ते तुमचं घर आहे मी कशी राहू तिथे ? "

सागर " भाग्यश्री.. आता तू घर कस शोधणार आणि राहिली गोष्ट पैशाची , तू माझी लहान बहीण आहेस. लहान बहिणीची मदत करायला काय हरकत आहे. ते काही नाही तुला भावाच ऐकावं लागेल. "

भाग्यश्री " पण.. "

सागर " पण बिन काही नाही.. ( साहिलच्या हातात पैसे देत. ) हे घ्या पैसे. आम्ही आताच घर खाली करत आहे. "

थोड्यावेळाने सागर आणि भाग्यश्री सागरच्या ऑफिसवळ आले. सागरने ऑफिस खोलून भाग्यश्रीला मागे असलेल्या घराजवळ आणलं.

भाग्यश्री " ह.. सागर दादा. याचे भाडे ? "

सागर " भाडे द्यायची गरज नाही तुला. "

भाग्यश्री " नाही दादा.. मी मोफत मध्ये नाही राहू शकत. कृपा करून मला जबरदस्ती नका करू. "

सागर " ठीक आहे. याचे भाडे दोन हजार दे. "

भाग्यश्री खूश होत " धन्यवाद दादा.. ते आठ हजार मी हळू हळू तुम्हाला परत करेन. "

भाग्यश्री काही ऐकणार नाही म्हणून सागर ती जे बोलतेय ते मान्य करत " हो चालेल. हरकत नाही. "

सागर भाग्यश्रीला त्या घरात सोडून बाहेरून ऑफिस बंद करून घरी येत झोपी गेला. इथे भाग्यश्री पण समाधानाने
झोपी गेली. 

नेहमीप्रमाणे सागर आवरून ऑफीसमध्ये आलेला. बघतो तर भाग्यश्रीने ऑफिस साफ करून ठेवलं होत आणि एका बाजूला बसत चहा पित. सागरने बघितलं की ती फक्त चहा पित आहे. लगेच त्याने जवळच्या दुकानातून खमंग म्हणून नाष्टा घेऊन आला.

सागर भाग्यश्रीसमोर नाष्टा ठेवत " हे घे. खाऊन घे. "

भाग्यश्री " दादा याची काय गरज होती. "

भाग्यश्रीच्या बोलण्यावर सागरने थोड रागाने तिच्याकडे बघितलं. त्याला तस बघून तिने समोर असलेला नाष्टा गप्पपणे खाल्ला. तिला खाताना बघून सागरच्या चेहऱ्यावर हास्य पसरले.

सागर आणि भाग्यश्री बोलत असताना अचानक तिथे कोणीतरी येत आणि दोघांना अस बघून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आठ्या पडतात.

क्रमशः
©भाग्यश्री परब

माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
0

🎭 Series Post

View all