दीर्घकथा लेखन स्पर्धा
आता वसुंधरा ताई काय बोलणार ? आपल्याला काढून टाकणार का ? असे अनेक प्रश्न भाग्यश्रीच्या मनात येत होते. प्रत्येक प्रश्नाला तिचा श्वास रोखत होता. वरून एका मागोमाग येणारे फोन.
सतत येणारे फोन बघून वसुंधरा ताई वैतागत " आधी ते फोन उचल. "
वसुंधरा ताईच्या चिडण्याने भाग्यश्रीने पटकन फोन उचलला. भाग्यश्री " हो.. हो.. " म्हणत एका छोट्याश्या बॅगेत असलेला फोन उचलते.
फोन उचलल्यावर समोरून " हॅलो भाग्यश्री. ठीक आहेस ना ? फोन उचलायला इतका वेळ लावलास म्हणून विचारलं. "
फोन उचलल्यावर समोरून " हॅलो भाग्यश्री. ठीक आहेस ना ? फोन उचलायला इतका वेळ लावलास म्हणून विचारलं. "
भाग्यश्री " हो विधी. मी ठीक आहे. ते मी वसुंधरा ताईकडे आलीय कामावर. "
विधी " ओह. म्हणजे मी चुकीच्या वेळी फोन केला. माफ कर. "
भाग्यश्री " अगं काही नाही. काही महत्वाच काम होतं का ? सतत फोन करत होतीस म्हणून. "
विधी " महत्वाच काही नव्हत. जेव्हा मी फोन करते तेव्हा तू लगेच उचलायची. यावेळी उशीर केलास म्हणून मला वाटलं तुला काही झालं का ? त्यात तू एकटीच राहतेस तिथे. "
भाग्यश्री " मला काही नाही झालं घाबरू नकोस. ते.. मला खूप उशीर झाला आज कामाला. "
विधी " मला माहिती आहे का झाला असणार तुला उशीर ? मी नंतर करते फोन. आधी वसुंधरा ताईच काम पूर्ण कर. नाहीतर त्या मोठी शिक्षा द्यायचा अजून उशीर होण्याचं.
भाग्यश्री " हो. हो. ठेवते मी फोन. नंतर बोलते तुझ्याशी. " एवढं बोलून भाग्यश्रीने विधीच पुढचं न ऐकता घाईतच फोन ठेवून दिला आणि घाबरतच वसुंधरा ताईकडे बघितलं.
वसुंधरा ताई भाग्यश्रीचं बोलून झाल्यावर रागाने तिच्याकडे बघत " झालं का बोलून ? की अजून एक एक तास बोलायचं ? "
भाग्यश्री " ह.. हो.. हो.. झालं माझं बोलून. "
वसुंधरा ताई " आज तू दहा मिनिट उशीर आहे. आता या दहा मिनिट उशीर झाल्याने तुला चार मोठे ब्लँकेट धुवावे लागतील समजल. हीच तुझी उशीरा येण्याची शिक्षा. "
चार मोठे ब्लँकेट धुवावे लागतील म्हणून भाग्यश्री " ताई चार ब्लँकेट याला एक तास लागेल आणि मला फक्त दहा मिनिटे उशीर झाला आहे. तुम्ही मला तीस मिनिटाचं जास्त काम देत आहात. "
वसुंधरा " तुला जर हे सोडायचं असेल तर सोडू शकते. मला काही अडचण नाही मी दुसरी बाई बघेन. "
वसुंधरा ताई तिला काम सोडायला सांगतात म्हणून भाग्यश्री विनवणी करत " नाही.. नाही.. ताई.. मी.. मी.. हे काम करते."
भाग्यश्रीला हे काम हातातून जाऊ नये याचीच भीती होती म्हणून वसुंधरा ताई जे काही शिक्षा देतील ते तिला नाईलाजाने पूर्ण कराव्या लागायच्या. आजही तिला शिक्षा पूर्ण करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ती पुढे काही न बोलता काम करायला निघून गेली. वसुंधरा ताईचे काम करायला तिला एक तास लागला , ज्यामुळे तिला दुसऱ्या कामावर जायला खूपच उशीर झालेला. तरीही त्यांनी तिला समजून घेऊन काही बोललं नाही.
सगळे कामे करून ती शेवटी सायंकाळी सहा वाजता घरी परतली आणि तिच्या लक्षात आलं की विधीला फोन करायचा आहे. तिने मनात विचार केला की " आधी जेवण वैगरे बनवून नंतर आरामात तिला फोन करेन. "
वेळ न घालवता तिने जेवण बनवायला घेतलं. जेवणं किती बनवणार. एकटीसाठी तिने दोन चपात्या आणि एका छोट्या कढईत तिच्या आवडीची वांग्याची भाजी बनवली. जेवण झाल्यावर तिने पटकन बाकीचे आवरून विधीला फोन केला.
विधीने फोन उचलल्यावर " हॅलो भाग्यश्री.. आलीस का घरी ? "
भाग्यश्री " हो.. काही वेळापूर्वीच घरी आले. तू सांग तुला काहीतरी बोलायचं होतं ना.. "
विधी " हो.. त्याआधी मला सांग आज काय शिक्षा दिली वसुंधरा ताईंनी ? "
भाग्यश्री " ते.. चार ब्लँकेट धुवायचे होते. "
विधी " काय ? चार ब्लँकेट ? म्हणजे तीस मिनिटे जास्त ? "
भाग्यश्री " हो. मी पण असच बोलली तीस मिनिटे जास्त होतात पण त्या बोलल्या की तुला नाही करायचं तर दुसरी बाई बघेन आणि तुला माहिती मला ते काम किती महत्वाचं आहे. "
विधी " हो समजल मला. तू तर काही ऐकणार नाहीस माझं. ते जाऊदे मी तुला यासाठी फोन केला होता की.. "
भाग्यश्री विधीला मध्येच रोखत " थांब.. तू जर त्यासाठी फोन केला असशील तर मला त्याबद्दल काही नाही बोलायचं.. "
क्रमशः
© भाग्यश्री परब
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा