Login

ग्रीष्मातला गारवा (३)

तिचा स्वतःवर असलेला विश्वास पूर्णपणे नाहीसा झालेला. ती पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवेल का? जाणून घेण्यासाठी वाचा " ग्रीष्मातला गारवा "

दीर्घकथा लेखन स्पर्धा

विधी " हो समजल मला. तू तर काही ऐकणार नाहीस माझं. ते जाऊदे मी तुला यासाठी फोन केला होता की.. "

भाग्यश्री विधीला मध्येच रोखत " थांब.. तू जर त्यासाठी फोन केला असशील तर मला त्याबद्दल काही नाही बोलायचं.. "

विधी " अगं... "

भाग्यश्री " नाही विधी.. कृपा करून तो विषय नको. "

विधी " ठीक आहे.. भाग्यश्री तू किती वेळा अशी जगत राहणार आहेस. माझ्याकडे बोलावलं तर येत नाहीस. "

भाग्यश्री " जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत जगेन. ही माझी मी केलेल्या चुकीची शिक्षा आहे. "

विधी " तुझी चूक नव्हती भाग्यश्री. त्याने आधीच तुला सांगायला हवं होतं. नाहीतर एवढं लाखोच नुकसान झालं नसतं. "

भाग्यश्री " विधी.. चूक माझीच होती. मला समजायला हवं होतं. मी लक्ष ठेवलं असत तर.. कदाचित.. " एवढं बोलून भाग्यश्री शांत झाली.

तिला शांत झालेलं बघून विधी " कदाचित... तुम्ही दोघं आता खूपच जवळ असता हो ना. "

भाग्यश्री " हम्म.. सोड त्याचा विषय. "

विधी " काय झालं ? अजूनही तो तुझ्या मनात आहे ना ? भाग्यश्री... म्हणूनच मी तुला बोलत आहे.. एकदा प्रयत्न कर. पण तुला तो विषय नकोस असत. "

भाग्यश्री " मी स्वतःवर पुन्हा विश्वास नाही करू शकत विधी.. "

विधी " एकदा तरी प्रयत्न कर.. स्वतःला एकदा संधी देऊन बघ भाग्यश्री.. कदाचित तो.. "

भाग्यश्री विधीच बोलणं मध्येच तोडत " विधी नाही.. "

भाग्यश्रीचा त्रासलेला आवाज ऐकून विधी शांत बसते. तिला समजत नाही की भाग्यश्रीला कसं समजावून सांगू. भाग्यश्रीकडे बघून अस वाटतं होतं की तिचा स्वतःवर असलेला आत्मविश्वास कमी झालेला. पूर्वी तिच्या डोळ्यांत स्वप्न , आवाजात आत्मविश्वास असायचा आणि आता ती स्वतःलाच कमी समजू लागलेली " आपण काहीच करू शकणार नाही. " हे वाक्य सतत तिच्या मनात असायचे. जणू आपली किंमत शून्य झाली आहे अशी खोलवर रुजलेली भावना तिच्यात तयार झालेली. विधीला माहिती होत ती आयुष्यात खूप वेळा हरलेली आणि आता तर स्वप्न , माणसं, सर्वात वाईट म्हणजे स्वतःवरचा विश्वास. तिची अशी अवस्था बघून विधीला खूप वेदनादायक वाटतं होतं.


विधी तिला समजावून सांगण्याशिवाय काही करू शकत नव्हती. विधीला तिच्यावर बळजबरी करायची नव्हती. पण ती तिच्यासोबत नेहमी उभी राहायला तयार होती. प्रत्येक संकटात तिला साथ द्यायला तयार होती.

विधी " ठीक आहे.. ठीक आहे.. आपण त्या नको बोलूया आणि हो तुला जर जास्त काम जमत नसेल तर कामे कमी कर पण स्वतःला कोसत काम नको करू समजल. हवं तर मी तुझ्या घरच्या भाड्याची जबाबदारी मी घेईन. मला माहिती आहे एवढी कामे तू  घरच्या भाड्यासाठी करत आहेस. "

भाग्यश्री " नाही विधी.. तू मला मदत करायला तयार आहेस हेच खूप आहे आणि मला तुला त्रास द्यायचा नाही आहे.  तू नसती तर माझं माहित नाही काय झालं असतं. तू आहेस म्हणून मी जगतेय. नाहीतर.. "

विधी भाग्यश्रीला पुढे बोलू न देता " गप्प बस.. काहीही बोलू नकोस. "

विधीचा राग बघून भाग्यश्री " माफ कर.. माफ कर.. रागवू नकोस. "

विधी " हा.. खबरदार जर परत अस बोलशील तर.. "

भाग्यश्री " नाही बोलत.. माफ कर. "

विधी " हम्म.. जेवलीस का ? नाही जेवलीस तर जेवून घे. मग आता ठेवू मी फोन ? तुला उद्या लवकर जायचं असणार कामाला आजचा दिवस बघता ? "

भाग्यश्री " हो.. आज सई ताईंचं ऐकून उद्यापासून लवकर जावं लागेल. "

विधी " हो.. चल ठेवू फोन ? जेवून घे ? "

भाग्यश्री " हो.. "

विधी " चल.. बाय.. "

भाग्यश्री " बाय. "

विधीसोबत बोलून झाल्यावर भाग्यश्रीला बर वाटतं होतं. ती स्वतःला जेवण वाढून घेते. एक घास खाल्ल्यावर तिला वांग्याच्या भाजीत मीठ कमी जाणवतं. यावरून तिला तिच्या आईची आठवण येते. आईच्या आठवणीत तिचे डोळे भरून येतात आणि ती हुंदके देत देत रडतच समोर असलेलं जेवण नाईलाजाने खाते.

क्रमशः
© भाग्यश्री परब


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
0

🎭 Series Post

View all