दीर्घकथा लेखन स्पर्धा
आईच्या आठवणीत तिचे डोळे भरून येतात आणि ती हुंदके देत देत रडतच समोर असलेलं जेवण नाईलाजाने खाते.
खाऊन झाल्यावर जेवणाची भांडी धुवून बाकीचे आवरून झोपण्याची तयारी करते. विचार करता करता तिला मध्यरात्री झोप लागते.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून लवकरच सई ताईकडे कामाला आली. यावेळी तिने कोणतीही चूक न करता भांडी घासली. घासून झाल्यावर दोन तीन वेळा तपासून बघितलं की काही कमी राहिली आहे का ?
तिने चांगल काम केल्यावर सई ताईला छान वाटलं.
तिने चांगल काम केल्यावर सई ताईला छान वाटलं.
सई ताई भाग्यश्रीला " यावेळी छान काम केलस. कोणतीच चूक केली नाहीस. असच काम करत रहा. "
भाग्यश्री " धन्यवाद सई ताई. " बोलून ती वसुंधरा ताईकडे जाणार तर सई ताई तिला थांबवत " थांब.. एक मिनिट " एवढं बोलून त्या किचनच्या दिशेने गेल्या.
किचनमधून बाहेर आल्यावर आपल्या हातातली पिशवी भाग्यश्रीच्या हातात देत " हे घे.. यात भात , डाळ आणि भाजी आहे. खा.. "
भाग्यश्री खूश झाली की तिला आजही दुपारचं जेवण भेटलं. तिला सई ताईकडे कामाला लागून सात दिवस झालेले. पहिल्यांदा जेव्हा कामाला लागली तेव्हा तिला दुपारच्या जेवणाची काळजी होती. पण सई ताईने तेव्हा तिला अश्याच पिशवीत डब्यामध्ये डाळ, भात आणि भाजी दिलेली. तेव्हा तिचा आनंद द्विगुणित झालेला. असेच त्या दिवसापासून सई ताई तिला जेवण देत होत्या आणि भाग्यश्रीची दुपारच्या जेवणाची काळजी मिटायची, त्यात आनंदने जेवायची. ते जेवण शिळं असलं तरीही. कारण तिची परिस्थितीच अशी आहे की ती एक वेळच जेवण खाऊ शकेल. तिला पगारच सात हजार होता.
भाग्यश्री पिशवीकडे बघून सई ताईकडे बघत " खूप खूप धन्यवाद ताई. चला मी निघते. " बोलून ती वसुंधरा ताईकडे निघाली.
भाग्यश्री गेल्यावर सई ताईच्या बाजूला उभा असलेला त्यांचा नवरा त्यांना " अगं.. तू तिला शिळं जेवण का देत असतेच ? "
सई " सागर.. ते जेवण फेकण्यापेक्षा कोणाच तरी पोट भरत असेल तर द्यायला काय हरकत आहे. "
सागर " अगं.. पण ते जेवण शिळं आहे. तुला माहीत आहे ना रोज शिळं जेवण जेवल्यावर माणूस आजारी पडू शकतो. "
सागरच ऐकून सई ताई वैतागत " तू मला नको शिकवू. " एवढं बोलून त्या आपल्या खोलीत निघून गेल्या.
सई ताईला गेलेलं बघून सागर स्वतःशीच " ही काही ऐकणार नाही. मलाच काहीतरी करावं लागेल. "
सागर हा एक समजूतदार होता. त्यामुळे त्याला भाग्यश्रीची काळजी होती. त्याला बहीण नसल्याने तो तिलाच एक लहान बहीण मानत होता. त्याच्या मनात आलेलं की भाग्यश्रीला लिगली आपली बहीण बनवून तिची मदत करावी. पण त्याने विचार केला की आता नको आधी तिला माझ्यावर विश्वास बसू दे , त्यात ती कशी हे पण समजेल. तो आतापासून कोणाला कळू न देता तिची मदत करणार होता. पण हीच लपून केलेली मदत पुढे जाऊन सागरला खूप महागात पडणार होती.
भाग्यश्री सई ताईकडून वसुंधरा ताईकडे गेली. आज ती वेळेवर आली म्हणून वसुंधरा ताई काही बोलल्या नाही. नाहीतर त्यांना तिच्याकडून बाकीची मोफत कामे करून घ्यायला कारण भेटायचं. भाग्यश्री वसुंधरा ताईकडून सगळी कामे करून निघणारच होती की तिला त्यांच्या खोलीतून आवाज आला. खोलीत जे काही बोलत होते ते ऐकून भाग्यश्रीला खूप वाईट वाटलं.
खोलीत वसुंधरा ताई शेजारीच राहत असलेल्या मेघा ताईला " अगं.. माहिती का ? मी आता जी बाई कामाला लागली तिला गंडवल. "
मेघा ताई " काय म्हणतेस ? कसं ? "
वसुंधरा ताई " बाकीचे भांड्यांचे पाचशे घेतात आणि जाडू , लादिचे तीनशे. तर तिची माहिती काढल्यावर समजल की तिला कामाची खूप गरज आहे. म्हणून मी याचाच फायदा घेत मी तिच्याकडून भांड्याचे तीनशे आणि जाडू, लादिचे दिडशे देते. वरून ती उशीर झाली तर फ्री मध्ये शिक्षा म्हणून बाकीची कामे करून घेते. "
मेघा " पण वसुंधरा. हे चुकीचे आहे ना ? "
वसुंधरा " अगं.. यात काय चुकीचं ? आपण फक्त फायदा बघायचं समजल. "
दोघी बोलत असताना अचानक बाहेरून काहीतरी पडल्याचा आवाज आला. तर इथे फुलदाणी खाली पडली म्हणून भाग्यश्री घाबरलेली.
क्रमशः
© भाग्यश्री परब
© भाग्यश्री परब
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
