Login

ग्रीष्मातला गारवा (७)

तिचा स्वतःवर असलेला विश्वास पूर्णपणे नाहीसा झालेला. ती पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवेल का ? जाणून घेण्यासाठी वाच "ग्रीष्मातला गारवा"
दीर्घकथा लेखन स्पर्धा

स्मृती स्वतःशीच " भाग्यश्री तुझ्यामुळेच माझे दहा हजार जात आहेत. पण हरकत नाही हे दहा हजार तुझ्याकडून कशी वसूल करून घेते बघ. "

भाग्यश्री सगळे काम करून नेहमीप्रमाणे संध्याकाळी घरी आली आणि बाकीचे काम करून जेवणासाठी बसली. जेवत असताना तिला अचानक स्मृती आठवली.

भाग्यश्री मनात " स्मृती इथे आली म्हणजे ती तिच्या भावाचा बदला नक्की घेणार. मला स्मृतीचा स्वभाव चांगल माहिती आहे. जर तिने मी जिथे काम करते तिथे सगळ्यांना माझ्याबद्दल काही सांगितलं तर.. नाही.. नाही.. तिला माझ्या कामाचे कुठे माहिती. त्यात ती कुठे राहते ते पण माहित नसणार. बस ती इथून लवकरच निघून जाऊ दे. जोपर्यंत ती इथून नाही जाणार तोपर्यंत माझ्या मनात भीती असणार. " जेवत जेवत भाग्यश्री स्मृती बद्दल विचार करत होती. पण स्मृती पुढे काय काय करणार हे फक्त देवालाच माहिती होतं. कदाचित स्मृती भाग्यश्रीला नकोस करणार होती ज्यामुळे भाग्यश्री आतून पूर्णपणे तुटणार होती.


सागर नेहमीप्राणे काम करून घरी आलेला. घरी आल्यावर बघतो तर सई ताई घरात नव्हती ती कुठे तरी बाहेर गेलेली. ती बाहेर आहे बघून सागरला आनंद झाला.

सागर स्वतःचीच " सई घरी नाहीये.. म्हणजे मी भाग्यश्री बद्दल विशालशी बोलू शकतो. " त्याने वेळ न घालवता विशालला फोन केला.

फोन उचलल्यावर सागर " हॅलो.. विशाल.. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. "

विशाल " हो.. बोल.. "

सागर " तुला भाग्यश्री माहिती. "

विशाल " हो.. तीच ना जी आपल्या ऑफिसमध्ये लादी पुसण्याच काम करते ? "
सागरचं एक मार्केटिंगचे ऑफीस आहे. तिथेच भाग्यश्री लादी पुसण्याच काम करते. तिला आणखी काम हवे असल्याने तिने सई ताईला सांगितलेले आणि योगायोग म्हणजे सागरला ऑफिसमध्ये जादू लादी करण्यासाठी एक बाई हवी होती. म्हणून त्यांनी भाग्यश्रीला हे काम सांगितलं तेव्हापासून ती सागरच्या ऑफीसमध्ये काम करत आहे. विशाल हा सागरचा असिस्टंट आणि एक चांगला मित्र. त्यामुळे विशालकडे ऑफीसची सगळी माहिती असते. त्यामुळे त्याच्याकडे भाग्यश्रीबद्दल थोडीफार माहिती असेल म्हणून सागरने सई ताई नसताना त्याला फोन केलेला.

सागर " हो. मला तिच्याबद्दल काही सांगशील का ? कारण ती दिसण्यावरून शिकलेली वाटत आहे. "

विशाल " अरे.. दिसण्यावरून काय ? ती खरच शिकलेली आहे. तिने पंधरावी करून. एमएस सीआयटी, टॅलीचे कोर्स केले आहे. "

भाग्यश्री एवढी शिकलेली आहे हे ऐकून सागरला विश्वास बसेना " तू खरच सांगत आहेस ना ? "

विशाल " हो रे. मी खरच सांगत आहे. तिला कामाला ठेवण्याआधी तिच्याबद्दल माहिती करून घेतलं. "

सागर " ती एवढी शिकली असून असे काम का करत आहे ? तिला ऑफीसमध्ये कुठेही काम भेटेल. "

विशाल " मी तिला हेच सांगितलं होतं आणि तिला हेही बोललो की हे लादी वैगरे नको करुस त्यापेक्षा आमच्याबरोबर काम कर आम्ही तुला शिकवतो कस करायचं ते. पण तिने या कामाला नकार दिला. ती बोलली मला लादी पुसण्याच काम करायचं आहे. हे नको. "

सागर " तिला ते काम का नाही करायचं ? याबद्दल काही बोलली का ? "

विशाल " नाही.. मी बोललो तेव्हा तिने तो विषय टाळला. पण तू तिच्याबद्दल एवढी चौकशी ? "

सागर " मला तिच्याकडे बघून अस वाटत की ती आपलीच आहे. मला तिला मदत करायची आहे. तिचा चेहरा बघितला की अस वाटत त्या चेहऱ्याच्या मागे खूप खोलवर काहीतरी आहे. बस मला त्या खोलवर जाऊन तिथून तिला परत आधीसारख करायचं आहे. तिचा कधी हसरा चेहरा बघितला नाहीये. तो हसरा चेहरा बघायचं आहे मला. "

सागर बोलत बोलत मागे वळतो आणि समोर बघतो तर तिथे.. त्या व्यक्तीकडे बघून त्याची बोबडीच वळते.

क्रमशः
©भाग्यश्री परब

माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.

0

🎭 Series Post

View all