Login

ग्रीष्मातला गारवा (८)

तिचा स्वतःवर असलेला विश्वास पूर्णपणे नाहीसा झालेला. ती पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवेल का ? जाणून घेण्यासाठी वाचा " ग्रीष्मातला गारवा"
दीर्घकथा लेखन स्पर्धा

सागर बोलत बोलत मागे वळतो आणि समोर बघतो तर तिथे.. त्या व्यक्तीकडे बघून त्याची बोबडीच वळते.

सागर अडखळत " व.. वसुंधरा ताई.. तुम्ही इथे ? "
सई ताई आणि वसुंधरा ताई बाजूलाच राहत. त्यामुळे काही कामानिमित्ताने त्या सई ताईकडे आलेल्या.

वसुंधरा ताई " हो.. ते मला काम होत म्हणून आले. पण तुमचं तर सई ताई नसताना वेगळच काहीतरी चालू आहे. "

सागर " तस काही नाही. तुमचा गैरसमज होतोय. "

अचानक दारातून सई ताई आत येत " गैरसमज नाही. माझ्या मागे वेगळच काही तरी चालू आहे. तेही एका भांडी , लादी करणाऱ्या बाई सोबत. "
सागरने बाहेरचा दरवाजा उघडा ठेवल्याने वसुंधरा ताई सहज आत आलेल्या आणि त्यांनी सागरला अस बोलताना बघून लगेच सई ताईला फोन केला. ज्यामुळे सई ताईला सागरच बोलणं सगळ ऐकू येत होतं. त्यामुळे त्या लवकरच घरी आल्या. हे सगळ बघून वसुंधरा ताईंना मज्जा येत होती. त्या दोघांचं भांडण बघत एका बाजूला उभ्या होत्या. सागर आपल्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावतो म्हणून वसुंधरा ताईंना आतून खूप राग यायचा. आज संधी हातात आल्याने ती संधी थोडी ना जाऊ देणार होत्या.


सई आपल्याबद्दल असा विचार करते बघून सागरला खूप राग आलेला तो रागातच " सई.. एका भाऊ बहिणीच्या नात्याला काहीही बोलू नकोस. भाग्यश्री माझी बहीण आहे. सख्खी नसली तरी तिच्यात मला एक बहिणीची छबी दिसते. परत जर तिच्याबद्दल काही बोललीस तर बघ . " एवढ बोलून सागर पुढे काही न बोलता तिथून बाहेर निघून गेला.

सागरने अस पहिल्यांदाच मोठ्या आवाजात बोलल्याने त्यांना भाग्यश्रीचा खूप राग येत होता. त्या स्वतःशीच " भाग्यश्री.. तुझ्यामुळे सागर आज पहिल्यांदा माझ्याशी अस बोलले. तुझी काय हालत करते बघ आता. "


भाग्यश्रीच आज लवकर जेवून झालेलं. आता काय करावं म्हणून ती दाराला कुलूप लावून एका जवळच्या बागेत आलेली. एका बाकावर बसत आजुबाजूच निरीक्षण करत होती. निरीक्षण करत असताना तिला एके ठिकाणी एक व्यक्ती जखमी दिसतो. ती लगेच त्या दिशेने जाते. थोडं पुढे आल्यावर तिला ओळखीचा चेहरा दिसतो.

भाग्यश्री ओरडून त्या व्यक्तीकडे जात " सागर दादा.. "

भाग्यश्रीच्या तोंडून दादा ऐकल्यावर सागरला आतून समाधान वाटत.

भाग्यश्री सागरजवळ जात " सागर दादा.. तुमच्या हातातून रक्त ?  ( आपल्याजवळ असलेल्या ओढणीचा तुकडा फाडत त्याच्या हाताला बांधते. ) खूप दुखत आहे का ? हवं तर दवाखान्यात जाऊ. "

सागर " मी ठीक आहे भाग्यश्री. काळजी नको करुस. "

दोघं एका बाकावर बसतात. भाग्यश्री जवळच असलेल्या दुकानातून पाण्याची बाटली आणते आणि सागरला पाणी प्यायला देते.

सागर पाणी पिऊन झाल्यावर " भाग्यश्री.. तू इतकी शिकली आहेस तरी असे काम का ? "

भाग्यश्री " यामागे खूप  मोठं कारण आहे. ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. "

सागर " ठीक आहे. मी तुला जबरदस्ती नाही करणार. "

दोघं थोडावेळ काही बोलत नाही. सागर आकाशाकडे बघून भाग्यश्रीकडे बघत " भाग्यश्री.. एक बोलू ? "

भाग्यश्री आकाशाकडे बघतच " हो.. "

सागर " सत्य अर्धवट दिसायला लोकांना सोपं जातं. सपूर्ण माणूस पहायला धैर्य लागतं. "

भाग्यश्री " अस्तित्व ओझं नसतं. अपेक्षा ओझं बनतात. स्वतःला सिद्ध करायचं थांबलं की , श्वास हलका होतो. "

सागर " अंधारातही असणं , हेच प्रकाशाचं सर्वात प्रामाणिक रूप असतं भाग्यश्री.. "

भाग्यश्री " दादा..  मी पुन्हा नाही उभी राहू शकत. आता माझ्यात कोणतीच शक्ती नाही आहे. मी दमले खूप. "

आपण काही बोलून भाग्यश्रीवर काही परिणाम होणार नाही म्हणून सागरने शांत राहणं पसंत केलं.

बोलत असताना भाग्यश्रीला कोणाचा तरी फोन येतो. फोन उचलल्यावर समोरून काहीतरी बोलणं होत ज्यामुळे भाग्यश्री खूप घाबरते.

क्रमशः
©भाग्यश्री परब

माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.

0

🎭 Series Post

View all