Login

नवीन वर्षाचा सण

नवीन वर्षाचा सण

फाल्गुनाला निरोप
चैत्र मास आला
नवीन वर्षाचा
उत्सव सुरू झाला

चैतन्याची गुढी
उभारूया सारे
आनंदाचे पसरले
सगळीकडे वारे

गोड पुरणपोळी
सजली ताटात
रांगोळी दारात
उपस्थित थाटात

कडुलिंबाचे पाने
करी रोग दूर
चोहीकडे संस्कृतीचे
ऐकू येती सूर

पहिला वर्षाचा
आहे हाच सण
गोळा करुया
त्याचे गोड क्षण

© विद्या कुंभार

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे राखीव आहेत.
0

🎭 Series Post

View all