गुलाबाच्या पाकळ्या कोमल, सुगंधी,
हळुवार स्पर्शाने झुलती, मंद वाऱ्याची बंदी.
हळुवार स्पर्शाने झुलती, मंद वाऱ्याची बंदी.
त्याच्या रंगात लपले आहेत असंख्य भाव,
कधी प्रेम, कधी विरह, कधी हळवे घाव.
कधी प्रेम, कधी विरह, कधी हळवे घाव.
ठिणग्या जरी असू दे काट्यांच्या त्या शेजारी,
तरीही त्याचे सौंदर्य मनास वेड लावी भारी.
तरीही त्याचे सौंदर्य मनास वेड लावी भारी.
ओंजळभर गंध त्याने विश्वात पसरावा,
प्रेमाचा दूत बनून हृदयात उतरावा.
प्रेमाचा दूत बनून हृदयात उतरावा.
गुलाबासारखेच नाते असू दे आपले,
सुगंधी, सुंदर, आणि हृदयाला भावणारे!
सुगंधी, सुंदर, आणि हृदयाला भावणारे!
सौ. रोहिणी किसन बांगर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा