गुलाल ! पार्ट 11
राज्यसेवेच्या प्रीलियमला थोडेच दिवस उरले होते. त्यामुळे दर्शन रात्रंदिवस एक करून अभ्यास करत होता. आभास आणि आर्यन हेदेखील लोणावळ्याच्या पार्टीची जय्यत तयारी करत होते. अखेरीस लोणावळ्याला पार्टी झाली. बरेच जण आले होते. पार्टीत डीजे , पूल पार्टी , गेम्स , बॉनफायर अश्या बऱ्याच गोष्टी होत्या. दुसऱ्या दिवशी आर्यन आभासला भेटला. धोनीप्रमाणे आर्यननेही लांब केसांची हेअरस्टाईल ठेवली होती.
" आभास , अपेक्षेहून कमी मुले आली होती पार्टीला."
" खरच ? मला तर भरपूर मुले दिसली. "
" म्हणजे मी खोटे बोलतोय का ? लॉस झालाय आपला. "
" आता काय करायचं ?"
" दहा हजार द्यावे लागतील तुला. "
" कसले दहा हजार ? मी आधीच पंचवीस हजार दिले होते. "
" तुला आधीच सांगितले होते जर नुकसान झाले तर दोघे अर्धेअर्धे वाटून घेऊ. "
" अरे पण मी कुठून आणू दहा हजार ?"
" ते मला काही माहिती नाही. मी माझ्या खिश्यातून दहा हजार भरलेत. माझ्या कष्टाची कमाई आहे ती. तुझ्यासारखे आईवडिलांच्या पैश्यांवर उड्या मारत नाही मी. आयतोबा नाही तर स्वतःच्या पायावर उभा आहे मी. "
" चूक झाली पार्टी होस्ट करून तुझ्यासोबत. "
" मला माझे पैसे हवेत. अजून डीजेची पेमेंट बाकी आहे. "
" मी कुठून देऊ ? घरचे आता परत पैसे पाठवणार नाहीत. "
" मग तू पेड बॉय का नाही बनत ?"
" म्हणजे ?"
" देहविक्री कर. तुझं अकाउंट बनवून देतो डेटिंग अँपवर."
" अरे पण माझी प्री जवळ येत आहे. "
आर्यन हसला.
" आता एवढ्या कमी दिवसात होणारे तरी का प्री क्लियर ? पी हळद हो गोरी असे होत नसते. वर्षभर अभ्यास करावा लागतो. "
आभासने होकारार्थी मान हलवली. आभास निघून गेल्यावर आर्यनने एका मित्राला फोन लावला.
" त्या गावठी आभासला धंद्याला लावलं मी. पार्टी तर यशस्वी झाली होती पण मी त्याला खोटं सांगितले. त्याला हिशोब वगैरे कळत नाही. डोळे बंद ठेवून विश्वास ठेवतो माझ्यावर. स्वतःच्या आईवडिलांना फसवून फार हुशार समजत होता स्वतःला आता मीच त्याला फसवले. "
दुसऱ्या दिवशी आभास आर्यनच्या फ्लॅटवर गेला. तिथे आर्यनने त्याला क्रॉस ड्रेसिंग करायला लावली. मेकअप करायला लावला. मग आर्यनने आभासच्या अनेक फोटो काढल्या. गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी आर्यनने आभासचे अश्लील फोटोज काढले. मग आर्यनने डेटिंग अँपवर आभासचे नवीन अकाउंट बनवले.
" सुरुवातीला एक हजाराचा रेट ठरवू. नंतर वाढवत जाऊ. " आर्यन म्हणाला.
" मला हे चुकीचे वाटत आहे रे. " आभास म्हणाला.
" सुरुवातीला वाटते रे चुकीचं. पण नंतर सवय होते. आवडायला लागते. तुझं शरीर तुझ्यासाठी एटीएम मशीन बनेल. " आर्यन म्हणाला.
आर्यनने समजवल्यानंतर आभास " कॉल बॉय " बनण्यासाठी राजी झाला.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा