गुलाल ! पार्ट 12
दर्शन दिवसभर अभ्यासिकेत अभ्यास करत बसायचा तर आभास याचाच फायदा घेऊन फ्लॅटवर कस्टमरला बोलवायचा. सुरुवातीला आभासने ठरवले होते की दहा हजार जमा होताच डेटिंग अँप अनइन्स्टॉल करून टाकायचे परंतु एकदा व्यसन लागले की ते व्यसन माणसाला सहजासहजी सोडत नाही. आभासलाही आता व्यसन लागले होते.अँपवर एज-लाईक सांगण्यात , पीक सेंड करण्यात , व्हिडीओ कॉल करण्यात , कस्टमर शोधण्यात , त्यांना लोकेशन सेंड करण्यात , चार्जेस कमी जास्त करण्यात दिवस कधी निघून जायचा कळतच नव्हते. प्रीचा दिवस उजाडला. जवळच्या हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण करून दर्शन निघणार इतक्यात समोर प्रकाश स्कुटी घेऊन उभा होता. प्रकाशने स्कुटीवरूनच दर्शनला परीक्षा केंद्रावर नेऊन सोडले. प्रकाश आल्यामुळे दर्शनला फार बरे वाटले. कुणीतरी आपला जवळचा माणूस सोबत असल्यासारखे त्याला वाटत होते. पहिला पेपर जीएसचा होता. सकाळी 9 ते 11 जीएसचा पेपर झाला. अकराला पेपर सुटल्यावर दर्शन बाहेर आला तर त्याला समोर प्रकाश उभा दिसला. त्याच्या हातात डब्बा होता.
" प्रकाश तू इथे ?" दर्शन म्हणाला.
" तुझ्यासाठी पराठे बनवून आणलेत. कसा गेला पेपर ?" प्रकाश म्हणाला.
" चांगला गेला. पण याची काय गरज होती ? मी आजूबाजूच्या हॉटेलमधून जेवण केले असते काही तरी. तू उगाच त्रास करवून घेतलास. "
" इट्स ओके. बाहेरचे जेवण पचले नाही तर पोटदुखी होऊ शकते. पेपर चांगला जाणार नाही त्याने. म्हणून घरचेच जेवण केलेले बरे. चल इथं कुठेतरी बसू. "
कॉलेजचे कॅम्पस मोठे होते. तिथे एका झाडाखाली दोघेही जेवायला बसले.
" कसे झाले आहेत पराठे?"
" खूप चविष्ट. थँक्स यार."
" बाय द वे. किती अटेम्प्ट केले ?"
" 95. "
" बापरे ! एवढे ?"
" हो. एक प्रश्न बरोबर आला तर 2 मार्क्स मिळतात आणि चुकला तर 0.5 मार्क्स कट होतात. म्हणजे 4 प्रश्न जरी चुकले आणि 1 जरी बरोबर आला तरी न्यूट्रलाईज होऊन जाते. म्हणून थोडी रिस्क घेतली."
" अच्छा. अच्छा. "
" पॉलिटी सोपे होते पण त्याचे दहाच प्रश्न असतात. बायोलॉजी अवघड गेले. "
" जाऊदे. आता रिलॅक्स होऊन सिसॅट सोडवून ये."
" सिसॅटचे टेन्शन वाटत नाही मला. पॅसेजच खूप असतात. आणि असेही कॉलीफाईंग आहे पेपर. "
थोड्या वेळाने दर्शन पुन्हा पेपरला गेला. दुसऱ्या दिवशी ऋत्विकसोबत त्याची भेट झाली.
" अरे बातमी ऐकली का ?" ऋत्विक म्हणाला.
" कसली बातमी ?" दर्शन म्हणाला.
" सरकारने एक कमिटी नेमली होती. त्या कमिटीने रिपोर्ट सबमिट केला आहे. त्यानुसार आता राज्यसेवा यूपीएससीप्रमाणे डिसक्रिप्टीव होईल. "
" म्हणजे मेन्स ऑब्जेक्टीव्ह नसणार ?"
" हो ना. ऑब्जेक्टीव्हमध्ये जर एखादा प्रश्न अवघड असेल तर किमान टूक्का मारून नशीब आजमवता येते पण आता तस करून चालणार नाही. "
" पण अचानक का निर्णय घेतला सरकारने असा ?"
" यूपीएससीमध्ये मराठी टक्का वाढावा म्हणून. यूपीएससी आणि एमपीएससी यांचा एक्झाम पॅटर्न सारखाच झाल्यावर विद्यार्थ्यांना वेगवेगळा अभ्यास करावा लागणार नाही."
" म्हणजे डिसक्रिप्टीव राज्यसेवा द्यायची असेल तर नवीन क्लासेस लावावे लागतील. जे आपल्या सारख्या गरीब मुलांना परवडणार नाही. एकंदरीत हा आपला शेवटचा अटेम्प्ट ठरू शकतो. "
"सध्या तर असच वाटत आहे. "
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा