Login

गुलाल ! पार्ट 14

.
गुलाल ! पार्ट 14

आभास आणि राजवंशची मैत्री दिवसेंदिवस वाढत होती. आभासला राजवंश खूप आवडायचा. तो सतत राजवंशच्या मागेपुढे असायचा. एखादी मुलगी राजवंशच्या जवळ आली की आभासचा जळफळाट व्हायचा. एकेदिवशी संध्याकाळी राजवंश ग्राऊंडवर रनिंग करत होता. तेवढ्यात तिथे आभास आला. दहा राउंड झाल्यावर राजवंशने त्याचा भिजलेला टीशर्ट काढला. आभास दुरूनच हे चित्र बघत होता. राजवंशने शर्टाने आपला देह पुसला. त्याची बलदंड शरीरयष्टी त्याच्या राजस रुपाला कळस चढवत होती. राजवंशचे ते तेजस्वी रूप आभास नेत्रांमध्ये साठवत होता. आभासला वाटत होते धावत जाऊन राजवंशला मिठी मारावी आणि त्याच्या पूर्ण देहावर चुंबनाचा वर्षाव करावा. आतापर्यंत तो अनेक पुरुषांसोबत झोपला असला तरी त्याला एवढे आकर्षण कधीच कुणाबद्दल वाटले नव्हते. राजवंशला आभास दिसला. त्याने आभासला बोलावले.

" अरे इथे कसकाय ?"

" तुला भेटायला आलो होतो. एकाने सांगितले तू इथे आहेस. "

" हो. रनिंग करायला आलो होतो. "

" छान आहे तुझी बॉडी. अगदी मर्दासारखी. "

" मर्द आहे तर मर्दासारखीच बॉडी ठेवावी लागणार ना. " राजवंश हसत म्हणाला.

" पण आवड कशी निर्माण झाली व्यायामाची ?"

" अरे पीएसआयच्या ग्राऊंडसाठी तयारी सुरू केली होती. तेव्हापासून सवय लागली व्यायामाची. "

" पीएसआयची ग्राऊंड दिलीय तू ?"

" हो. पण शेवटच्या क्षणी क्रॅम्प आले पायांना. म्हणून संधी हुकली. नाही तर आज पीएसआय ऑफिसर असतो. तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात दुर्दैवी दिवस. "

तेवढ्यात राजवंशला त्याच्या घरच्यांचा फोन आला.

" बोल आई. "

" बाळा हे काय आंदोलनाचे खुळ डोक्यात घेऊन बसला आहेस ? अभ्यास कर , अधिकारी बन. "

" आई आता इच्छा मेली अभ्यासाची. कदाचित माझ्या नशीबात यश नसेल. मला माझ्या आयुष्याचे ध्येय सापडले आहे. मी राजकारणात जाणार. जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार श्री सूरज पाटील यांचा मला पाठिंबा मिळाला आहे. ते मला विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष बनवणार आहेत. पूर्वी पैसे नव्हते तर एकवेळची मेस लावायचो. आता साहेब आठवड्यातून तीन-चार वेळा मटण थाळी खाऊ घालतात. माफ कर आई. आता हेच माझे जीवन आहे. आता मी मागे वळून बघणार नाही. "

" उद्या अटक वगैरे झाली तर साहेब येणार आहे का सोडवायला ?"

" आई , भगतसिंग सारख्या क्रांतिकारकांनी जर पोलीसांची भीती बाळगली असती तर क्रांती झाली असती का ? देश स्वतंत्र झाला असता का ? तसच कोणताही मोठा बदल घडवून आणण्यासाठी त्याग करावाच लागतो. मी त्याग करणार. क्रांती घडवणार. एकेदिवशी मी संसदेत असेल. आणि भविष्यात हे पेठेत अभ्यास करणारे माझ्याच मागेपुढे असतील. असो. ठेवतो."

राजवंशने फोन कट केला. मग आभास आणि राजवंश दोघेही चहा प्यायला गेले.

***

पुण्यात मोठे आंदोलन झाले. मीडिया पोहोचली. आभासही राजवंशच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी घाबरत घाबरत का होईना पण मीडियाला मुलाखती देत होता. आभासच्या वडिलांनी त्याला फोन केला.

" आभास अरे तू टीव्हीवर दिसतोय. "

" वाह ! कसा दिसतोय मी ?"

" अरे गाढवा तुला अभ्यासाला पाठवलं आहे की नेतेगिरी करायला ? मुकाट्याने अभ्यासाला जा नाही तर मी येतो आणि तुझे कान पकडून इकडं घेऊन येतो. असेही शेतात मजूर कमी पडत आहेत. "

" सॉरी बाबा. "

वडिलांनी चांगलेच खडसावल्यामुळे आभास आंदोलनस्थळ सोडून निघून गेला.

***

लोकसभेच्या निवडणूका जवळ येत होत्या. मीडियामुळे आंदोलनाला कव्हरेज मिळत होते. विरोधी पक्षाचे नेतेही आंदोलनस्थळी भेट देत होते. त्यामुळे सरकारवरचा दबाव फार वाढत होता. शेवटी सरकारने दोन अटेम्प्ट वाढवून दिले आणि 2 वर्षांनंतर वर्णनात्मक पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांनी पेढे वाटले. फटाके फोडले गेले. आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पक्षात राजवंशचे वजन हळूहळू वाढत होते. एकेदिवशी आभास आर्यनला भेटायला गेला.

" हे बघ , घे तुझे पैसे. आता आपला व्यवहार संपला." आभास पैसे देत म्हणाला.

" चिडू नको यार. मी मुद्दाम केलं का हे ?" आर्यन म्हणाला.

" चिडत नाहीये. पण माझी उधारी संपली इतकंच सांगत आहे. "

" हो. अजून काय चालू आहे ?"

" यार राजवंश नावाचा नवीन मित्र बनला आहे. कार्यकर्ता आहे एका पक्षाचा. "

" बघितले मी त्याला टीव्हीवर. हॅन्डसम आहे."

" पण स्ट्रेट आहे. "

" मग काय झाले ? घे कोपऱ्यात. "

" म्हणजे ?"

" अरे त्याच्या प्रायव्हेट भागांना टच कर. त्याला सेड्यूस कर. पॉर्नमध्ये करतात तस. तू राजवंशला पटव. सुरुवातीला तो विरोध करेल पण नंतर त्याला सवय होईल. "

" त्यापेक्षा प्रेमपत्र लिहू का ? माझं मनापासून प्रेम आहे रे त्याच्यावर. "

आर्यन जोरजोरात हसला.

" तू आणि प्रेम? प्रेमपत्र दिले तर ब्लॉक करेल तो. डायरेक्ट ऍक्शन घे. नाही तर विसरून जा. "

आभासने होकारार्थी मान हलवली.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आभास राजवंशच्या रुमवर गेला. तिथे राजवंश वगळता कुणीच नव्हते. आभास राजवंशच्या जवळ गेला आणि त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या प्रायव्हेट भागांवर टच करू लागला.

" काय करतोय तू ?"

" राजवंश माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. "

राजवंश आभासला दूर सारत होता पण आभास राजवंश जवळ येत होता. शेवटी राजवंशसारख्या बलदंड शरीरयष्टीच्या मुलासमोर नाजूक फुलासारखा आभास किती वेळ टिकणार होता ? राजवंशने आभासला जोरात थोबाडीत मारली. आभासचे गाल गरम झाले. कानात किर्रर्रर आवाज घुमू लागला.

" अरे तुला मित्र मानत होतो. पण तू तर छक्का निघालास हरामखोर. इतकीच आग माजली आहे तर निगडीत रात्री ट्रक थांबतात तिथं साडी नेसून उभा रहा. शंभर रुपयेही देतील. नाही तर सिग्नलवर टाळ्या वाजवत बस. हिजडा साला. निघ इथून. आणि पुन्हा समोर आला तर बघ. "

राजवंशला पहिल्यांदाच इतक्या रौद्ररुपात आभासने पाहिले होते. आभास तिथून सरळ घरी गेला. त्याने स्वतःला खोलीत कोंडवले. रात्रभर रडत बसला. मोहकवर त्याचे कधीच प्रेम नव्हते पण राजवंशवर त्याचे मनापासून प्रेम होते. क्षणिक वासनेला बळी पडून अनेक स्ट्रेट ( की बायसेक्सउल ) समलैंगिक लोकांसोबत समागम करतात. परंतु जे समलैंगिक प्रेमपत्र देऊन प्रपोज करतात किंवा आपल्या भावना स्वच्छपणे मांडतात त्यांचा स्ट्रेट लोक तिरस्कार करतात. प्रेम व्यक्त करणे गुन्हा नसतो. परंतु प्रेम मिळवण्यासाठी जबरदस्ती / बलात्कार करणे निश्चितच गुन्हा असतो. एखाद्या स्त्रीने पुरुषाला प्रपोज केले तर पुरुष जास्तीत जास्त नकार देतो. तिचा तिरस्कार करत नाही. हाच नियम स्ट्रेट लोकांना प्रपोज करणाऱ्या समलैंगिकाना का नाही लागू होत ?

क्रमश...
0

🎭 Series Post

View all