गुलाल ! पार्ट 15
सकाळचा प्रहर होता. दर्शन दर्पण सरांच्या केबिनमध्ये आला होता.
" सर प्रिलीयममध्ये 115 स्कोअर आला आहे. पण युट्युबवर खूप जण 120 चा कटऑफ लागेल असं म्हणत आहेत. काही जण शंभरचा कटऑफ लागेल असे म्हणत आहेत. ऋत्विक म्हणत होता की दुसऱ्या अन्सर की नंतर 10-20 मार्क्स पुढे मागे होतात. काय करावं कळत नाही. "
" सर प्रिलीयममध्ये 115 स्कोअर आला आहे. पण युट्युबवर खूप जण 120 चा कटऑफ लागेल असं म्हणत आहेत. काही जण शंभरचा कटऑफ लागेल असे म्हणत आहेत. ऋत्विक म्हणत होता की दुसऱ्या अन्सर की नंतर 10-20 मार्क्स पुढे मागे होतात. काय करावं कळत नाही. "
" ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याचा विचार करून फायदा नाही. तुझ्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक तर कटऑफ काय लागेल याचे व्हिडीओ बघणे , रिझल्टची किंवा दुसऱ्या अन्सर कीची वाट बघणे आणि या सर्वांमध्ये वेळ वाया घालवणे नाही तर दुसरा पर्याय आहे की मेन्सचा अभ्यास करणे. कमीत कमी मेन्स आणि प्रीमध्ये जे कॉमन विषय आहेत त्यांचा तरी अभ्यास कर. अभ्यास कधीच वाया जात नाही. कमबाईनच्या प्रीला कामाला येईल. राज्यसेवाची प्री निघाली तर ऐनवेळी गोंधळ होणार नाही. "
" ओके सर. "
" बाकी गेला नाही आंदोलनाला ?"
" नाही सर. मला इंटरेस्ट नाही या सर्वांमध्ये. सरकारने जो निर्णय घेतला आहे तो योग्यच असेल ना. "
" गुड. पण इतकी टोकाची भूमिका कधीच घ्यायची नाही. कधी कधी शासन पण चुकते आणि कधी कधी विद्यार्थी तर कधी कधी आयोगाचाही दोष असतो. म्हणून आयुष्यात डिप्लोमॅटीक राहायला , बोलायला शिक. सुवर्णमध्य काढायला शिक. उद्या शासनात काम करायचे आहे तुला. राजकारणीपासून सर्वसामान्य जनता सर्वांशी जुळवून घ्यावं लागतं. किमान समोर तरी गोड गोड बोलावं लागते. "
" हो सर. "
दर्शन दर्पण सरांच्या केबिनबाहेर पडला.
***
रविवारचा दिवस होता. प्रकाश आणि दर्शन दोघेही सोबत एका हॉटेलमध्ये गेले होते.
" प्रकाश , एखाद्या साध्या हॉटेलमध्ये जायचे का ? हे हॉटेल खूप महागडे दिसत आहे. "
" अरे तू चिंता करू नकोस. या हॉटेलचा ओनर माझा मित्र आहे. तो आपल्याला डिस्काऊंट देईल. आणि तुला पोस्ट मिळाल्यावर सर्व पैसे वसूल करणार आहेच मी. "
" नक्कीच. याच हॉटेलमध्ये तुला घेऊन येईल जेवायला. "
दोघांनी जेवण ऑर्डर केले. अचानक दर्शनला चक्कर येऊ लागली. त्याला बरे वाटत नव्हते. त्याची खालावलेली तब्येत पाहून प्रकाशने त्याला फ्लॅटवर आणले. फ्लॅटवर आधीपासूनच आभास एका व्यक्तीसोबत समागम करत होता. राजवंशसोबत भांडण झाल्यानंतर दुःख विसरण्यासाठी आभास अधिकाधिक मुलांना फ्लॅटवर बोलवून त्यांच्यासोबत समागम करत होता. वासनेच्या चिखलात बुडून तो प्रेमाने दिलेल्या जखमा मिटवत होता. आभासला वासनेचे व्यसन लागले होते. क्लाइंट ज्या डिमांड करत त्या आभास पूर्ण करत. कधी भडक मेकअप करून क्रॉस ड्रेसिंग करणे तर कधी दारू पिऊन समागम करणे. कधी कधी क्लाइंटला समागम करताना मारहाण किंवा शिवीगाळ करण्याची सवय असे तेव्हा आभास ते सर्व मुकाट्याने सहन करत. या सर्वांमुळे त्याला चिक्कार पैसा भेटत होता. त्या दिवशी असाच एक क्लाइंट आला होता. त्याने आभाससोबत मद्यप्राशन केले आणि त्यानंतर दोघांमध्ये समागम झाला. तो क्लाइंट जाणार इतक्यात प्रकाश आणि दर्शन फ्लॅटवर आले. फ्लॅटची अवस्था पाहून दर्शनच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याला जे समजायचे होते ते समजले. तो दारूच्या नशेत असलेला क्लाइंट दर्शनजवळ आला आणि दर्शनला स्पर्श करू लागला.
दर्शनने ढकलताच तो क्लाइंट नशेत दर्शनला शिव्या देऊ लागला.
प्रकाशला हे सहन झाले नाही. त्याने त्या क्लाइंटला दूर ढकलले आणि रागात त्याला एक मुक्का मारला. घाबरून तो व्यक्ती पळून गेला. आता दर्शनने आपला मोर्चा आभासकडे वळवला.
" छान अभ्यास चालू आहे. आभास आजूबाजूचे लोकपण माझ्याकडे तक्रारी करत होते की इथे रोज विचित्र माणसे येतात पण मी दुर्लक्ष करत होतो. पण आज मला सत्य समजले. हे घर आहे आपले *डीखाना नाही की इथं तू देहविक्री करशील. यापुढे अश्या गोष्टी चालणार नाहीत. "
" तू कोण आलास सांगणारा ? स्वतःची औकात विसरू नकोस. तुझा बाप दारू पिऊन गावभर कसा हिंडायचा विसरलास का ? चार पुस्तके वाचली आणि त्या दर्पण सरांनी तुझं कौतुक काय केलं तर स्वतःला शहाणा समजतोस का ?"
" आभास नीट बोल. " प्रकाश म्हणाला.
" तू भिकारडा मधे पडू नकोस. कितीतरी श्रीमंत लोक माझे क्लाइंट आहेत. मी आताच हा फ्लॅट सोडतो. "
दर्शनने आभासला समजवण्याचा प्रयत्न केला पण आभास बधला नाही. त्याने फ्लॅट सोडला. ही गोष्ट दर्शनने मनावर लावून घेतली. तो आजारी पडला. त्याला डेंग्यू झाला होता. प्रकाश त्याची सर्वतोपरी काळजी घेत होता. हॉस्पिटलमध्ये प्रकाशने दर्शनसाठी पपईच्या पानांचा ज्यूस आणला होता.
" दर्शन , अजून किती दिवस गिल्टी फील करवून घेणार आहेस ? आभासला जितकं समजवू शकला असता तितकं तू त्याला समजवले. आता त्याचे कर्म आणि त्याचे नशीब. श्रीकृष्णही दुर्योधनाला समजवू शकले नव्हते. म्हणून आता जास्त विचार नको करू आणि लवकर बरा हो. हा ज्यूस घे. "
" मला काही तरी बोलायचे आहे. कदाचित हॉस्पिटलमध्ये अश्या गोष्टी बोलणारा मी एकटाच असेल पण तरीही आता राहवत नाही. आय लव्ह यु प्रकाश. "
" आय लव्ह यु टू. " प्रकाश दर्शनचा हात हातात घेत म्हणाला.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा