Login

गुलाल ! पार्ट 17

.
गुलाल ! पार्ट 17


" सर , माझं भविष्य मला अंधकारमय दिसतंय. इतकी वर्षे अभ्यास केला. यूपीएससीपासून बँकिंग सर्व परीक्षा दिल्या. पण कुठं काह सिलेक्शनी झाले नाही. घरी जावं तर लाज वाटते. इथं रहावं तर अभ्यास करू वाटत नाही. " ऋत्विक म्हणाला.

" या वर्षी निवडणूका आहेत. म्हणून सरळसेवेच्या भरपूर जाहीराती आल्या आहेत आणि येतीलही. सरळसेवेवर फोकस कर. " दर्पण सर म्हणाले.

" सरळसेवेत जागा आधीच विकल्या जातात अस ऐकले आहे. तश्या केसेस पण समोर आल्या. " ऋत्विक म्हणाला.

" 10 जागा असतील तर 5 आधीच फिक्स असतात असं समजून उरलेल्या 5 साठी तयारी कर. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. सिस्टीम बदलण्यासाठी आधी सिस्टीममध्ये शिरावे लागेल. तू सध्या सिस्टीममध्ये घुसण्याच्या फेजमध्ये आहे. " दर्पण सर म्हणाले.

" पण सर ते हजार हजार रुपये फीस परवडत नाही हो. "
दर्पण सर म्हणाले.

दर्पण सरांनी खिशातून काही पैसे काढले.

" हे धर. " दर्पण सर म्हणाले.

" नको सर. " ऋत्विक म्हणाला.

" उपकार करत नाहीये. एकदा तुला नोकरी लागली तर व्याजासाहित वसूल करेल. पण सर्व फॉर्म्स भर. कोणतीही पोस्ट सोडू नको. एकदा तुला जॉब लागला मग घरून प्रेशर कमी होईल. फायनान्शियल स्टेबिलीटी येईल. मग कमबाईन, राज्यसेवा कर. " दर्पण सर म्हणाले.

ऋत्विकच्या डोळ्यात पाणी आले. त्याने दर्पण सरांना आलींगन दिले.

***

दिवसामागून दिवस जात होते. दर्शन आणि ऋत्विक एकाच फ्लॅटमध्ये राहू लागले. दोघेही मन लावून अभ्यास करू लागले. एकेदिवशी आभासचे वडील दर्शनच्या फ्लॅटवर अचानक आले. ते आभासबद्दल चौकशी करू लागले. सोबत आभासची लहान बहीणपण होती.

" आभास कुठे आहे ?" आभासच्या वडिलांनी विचारले.

" काका आता तो या फ्लॅटमध्ये राहत नाही. तो दुसऱ्या मित्रासोबत राहतो. " दर्शन म्हणाला.

" का ? आपण सारख्या गावातले. मिळून मिसळून राहायचे सोडून तुम्ही वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहतात. कुठे आहे तो ?" आभासच्या वडिलांनी विचारले.

" माहिती नाही. " दर्शन म्हणाला.

" तुमची मैत्री नाही राहिली का आता ?" आभासच्या वडिलांनी विचारले.

" तस नाही काका. पण मला पत्ता माहिती नाही. खूप दिवस झाले बोलणे झाले नाही दोघांचे." दर्शन म्हणाला.

" त्याचा फोन पण लागत नाहीये. वाटलं होतं त्याला अचानकपणे भेटावं. त्याला सुखद धक्का बसेल पण आम्हालाच धक्का बसलाय. " आभासच्या वडिलांनी विचारले.

" माझा एक लायब्ररीमधला मित्र आहे. तो भेटून आला होता आभासला. त्याला विचारतो. " ऋत्विक म्हणाला.

तेव्हा कुठे आभासचा पत्ता सापडला. आभासचे वडील आणि बहीण त्याला भेटायला गेले. वडील जाताच दर्शन आभासला सावध करण्यासाठी कॉल करत होता पण त्याचा कॉल लागत नव्हता. दर्शनला जी भीती होती तेच घडले. आभास नको त्या अवस्थेत भेटला. त्याने क्रॉस ड्रेसिंग केली होती. तो दारूच्या नशेत होता. आभासच्या वडिलांनी त्याला थोबाडीत मारले.

" कुठून असलं कार्ट जन्माला घातलं मी. ह्यापेक्षा निपुत्रिक राहिलेले बरं झालं असत. तोंड काळे केले माझे. " वडील म्हणाले.

आभासची लहान बहीण भावाचे हे रूप पाहून रडत होती.

" बाबा , तुम्ही माझ्यासाठी काय केले आजपर्यंत ? मी तुम्हाला पुणे मुंबईच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ द्या म्हणत होतो पण तुम्ही मला तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजमध्ये टाकले. कुठे बाहेर मित्रांसोबत फिरायलापण पाठवत नव्हते. मला पण एन्जॉय करू वाटते आणि आता मी माझी लाईफ माझ्या पद्धतीने जगतोय. कुणाची बंधने नाहीत , काही नाही. माझ्यावर प्रेम करणारे , माझ्यावर पैसा उधळणारे शुगर डॅडी आहेत माझ्याजवळ. तुमची आता गरज नाही उरली बाबा. " आभास म्हणाला.

" तुझ्या आईचा खूप जीव होता तुझ्यावर. तिनेच मरताना तुला जपण्याचे वचन घेतले होते. पण ती आज जिवंत असती तर मरणयातना झाल्या असत्या तिला. " वडील म्हणाले.

" मी मुक्त करतो त्या वचनातून तुम्हाला. आजपासून तुम्हाला मुलगा नाही असं समजा. " आभास म्हणाला.

" बेबी कोण आहे ? कसला गोंधळ आहे?" आतून कस्टमरचा आवाज आला.

" काही नाही बेबी. आलोच.

बाबा , तुम्ही जा आता गावाकडे. मला इंटरेस्ट नाही तुमच्या गावात आणि त्या शेतीत. तुम्ही बसा शेण उचलत आणि चिखल तुडवत. बाय. मी बिझी आहे. " असे बोलत आभासने वडिलांच्या तोंडासमोरच दार बंद केले.

रात्री आभासने दर्शनला कॉल लावला.

" आनंदी असशील ना तू ? मला माझ्या वडिलांच्या नजरेत खाली पाडलेस. " आभास म्हणाला.

" तस काही नाही. मी कॉल केले होते तुला. " दर्शन म्हणाला.

" नाटक नको करू आता. आज माझा अपमान झाला. उद्या मीपण तुझा अपमान करेल. मैत्री बघितली माझी , आता शत्रुत्व बघ. " आभास म्हणाला.

क्रमश...
0

🎭 Series Post

View all