Login

गुलाल ! पार्ट 4

.
गुलाल ! पार्ट 4

दिवसांमागून दिवस जात होते. दर्शन खूप मन लावून अभ्यास करत होता. दर्पण सरचा तो आवडता विद्यार्थी बनला. आभासचे मात्र अभ्यासात लक्ष नसे. शनिवार-रविवार तर तो मोहकसोबतच असे. दर्शन त्याला खूप समजावत पण आभासवर काहीच फरक पडत नव्हता. " पालथ्या घड्यावर पाणी " असाच प्रकार होता. उलट त्याला मोहककडून मिळणाऱ्या महागड्या गिफ्ट्समध्येच जास्त इंटरेस्ट होता.

***

" ते लायब्ररीचे मॅनेजर तुझ्याबद्दल विचारत होते. फीस का नाही भरली या महिन्याची ?" दर्शनने विचारले.

" अरे ते माझ्याकडे पैसे नाहीत. " आभास म्हणाला.

" सिरियसली ? परवाच तर तू मोठ्या हॉटेलमध्ये चिकन थाळी खायला गेला होता. खर सांग. लोणावळ्याला पार्टीसाठी जातोय ना ?"

" हो. तसही माझा घरी अभ्यास होतो. लायब्ररीची गरज नाही. तुला पण बोलावलं आहे पार्टीला. "

" माझ्याकडे पैसे नाहीत. "

" एक विकेंड पार्टीमध्ये जाऊन एन्जॉय केले तर काय फरक पडतो ? तिथं ना डार्क रूम असते. "

" म्हणजे ?"

" म्हणजे कुणीही कुणासोबतही काहीही करू शकते अंधारात. "


" पण तू तर रिलेशनशिपमध्ये आहे ना. "

" मी नाही जाणार. फक्त पार्टी एन्जॉय करणार. अरे मोहक काही कामानिमित्त बाहेरगावी गेला आहे. त्यामुळे त्याला पैसे मागणे बर दिसत नाही. तो येऊ शकणार नाही ना पार्टीला. "

" आभास , आपण ज्या लोकांमध्ये राहतो , उठतो , बसतो आपले विचारही त्यांच्यासारखेच बनतात. तुझे नवीन मित्र हे वेल सेटल्ड आहेत. त्यांना जॉब आहे. आठवडाभर ते कमावतात आणि शनिवारी-रविवारी उडवतात. आपले तसे नाही. आपण बेरोजगार आहोत. आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. आपल्या घरचे श्रीमंत नाहीत. अभ्यासिकेत चार ओळखी होतात. मार्गदर्शन मिळते. वातावरण निर्माण झाल्यामुळे अभ्यासात अजून मन रमते.

तुला माझ्यासोबत टायपिंगचा क्लास लाव म्हणलं तर तुला तेही जमले नाही. त्यालाही नकार दिला. "

" मला खालचा जॉब नाही करायचा. "

" तुझ्या अभ्यासावरून तर तू जिल्हाधिकारी होशील असच वाटत आहे. "

" मला नको शिकवू. तुझं तू बघ. "

हळूहळू आभासला पुण्याची हवा लागत होती. पार्टी करणे त्याला आवडू लागले. त्याचे अनेक नवीन मित्र बनले. दारू पिणे , सिगरेट ओढणे त्याला नित्याचे झाले. मोहक त्याला वेळोवेळी पैसे द्यायचा. त्यामुळे आता त्याचा पेहरावही बदलला होता. पूर्वी तो साधे कपडे घालायचा आणि आता तो फॅशनेबल कपडे घालू लागला.

***

रात्रीचा प्रहर होता. मोहक आणि आभास नग्नावस्थेत होते. अचानक मोहकला जाग आली आणि तो वॉशरूमला गेला. तेवढ्यात मोहकचा फोन वाजला. फोन नंबर " स्मिता " नावाने सेव्ह केला होता. खूपदा याच नंबरवरून मोहकला फोन येत होता. मोहकने वॉशरूममधून आल्यावर फोन उचलला आणि बाल्कनीत जाऊन गप्पा मारू लागला. आभासने त्या गप्पा ऐकल्या. नंतर मोहक वळताच परत आभास गादीवर आडवे होउन झोपी जाण्याचे नाटक करू लागला. मोहक झोपताच आभास उठला आणि त्याने मोहकचा फोन चेक केला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

क्रमश...
0

🎭 Series Post

View all