गुलाल ! पार्ट 5
" मोहक..मोहक..उठ. " आभास आवाज देत म्हणाला.
" काय झाले बेबी ?" मोहक डोळे पुसत म्हणाला.
" काय झाले ? तुझे लग्न झालेले तू मला सांगितलेदेखील नाहीस. तू माझा विश्वासघात केलास. "
" अरे मी तुला सांगणारच होतो. लग्न नाही तर ती जबरदस्तीच होती एकप्रकारे. बाबांना बिजनेस डिल करायची होती म्हणून माझा वापर केला. मला माझ्या बायकोचा स्पर्शही आवडत नाही. मला माझ्या मुलांचे बोलणेही किरकिर वाटते. त्यांच्याबद्दल कधी आपुलकी वाटत नाही. "
" ते काहीही असो. तू मला फसवलेस. "
" काय फसवले रे ? तुला किती गिफ्टस दिले मी. तुझे आईवडील शेतकरी आहेत. तुझी लायकी तर आहे का ब्रँडेड कपडे , मोबाईल वापरायची ? माझ्या बाबांनी तुला नोकर म्हणूनही घरात ठेवलं नसत. तू माझ्यासाठी एक रखेल आहेस. उद्या कुणी चार पैसे फेकले तर त्यांच्या अंगाखाली जायलाही तयार होशील तू. चांगलं ओळखतो मी तुझ्यासारख्या मुलांना."
आभासने मोहकला एक थोबाडीत मारली.
" तुझी एवढी हिंमत ? निघ माझ्या घरातून. गेट आउट. "
मोहकने भरपूर शिवीगाळ केली आणि आभासला हाकलून दिले.
***
आभास रडत रडत घरी परतला. दर्शनही अभ्यासिकेतून परतला होता. आभासची अवस्था पाहून दर्शनला धक्का बसला. त्याने आभासला खाली बसवले आणि पाणी पाजवले.
" काय झाले ? मोहकसोबत भांडण झाले का ?" दर्शनने विचारले.
" तो विवाहित आहे. मला कुणाचे उष्ट प्रेम नको. "
" काय ? तो विवाहित आहे ?" दर्शन आश्चर्य व्यक्त करत म्हणाला.
" हो. त्याने माझी फसवणूक केली. "
" जाऊदे. कदाचित त्याला तुझा देह हवा असेल उपभोगण्यासाठी. तुझाही त्याच्या संपत्तीवर डोळा होताच की. "
" यार या अवस्थेतही तुला तुझेच म्हणणे सत्य कसे हेच सिद्ध करायचे आहे का ?"
" ठीक आहे. सॉरी. चल आता झोप. भूक लागली असेल तर मॅगी बनवू का तुझ्यासाठी ?"
" हो. "
" आता तरी या सर्वांचा नाद सोड. अभ्यास कर. काही तर बनून दाखव. "
" हम्म. "
दर्शनने मॅगी बनवली आणि दोघेही मॅगी खाऊन झोपी गेले.
***
दुपारचा प्रहर होता. दर्शन दर्पण सरांच्या केबिनमध्ये होता.
" बोला दर्शन साहेब. काय शंका आहेत ? टेस्ट सिरीजमध्ये स्कोअर खूप छान येतोय तुमचा. "
" सर , समाजसुधारक खूप आहेत. त्या सर्वांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, पुस्तके , नाटके , वृत्तपत्रे हे सर्व पाठ होत नाही. "
दर्पण सर हसले.
" आधी महत्वाचे समाजसुधारक डिटेलमध्ये रिवाईज कर ज्यांच्यावर प्रश्न फिक्स असतात. जसे की महात्मा ज्योतिबा फुले , राजर्षी शाहू महाराज , गोपाळ गणेश आगरकर , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , महर्षी कर्वे , पंडिता रमाबाई इत्यादी. आणि एमपीएससीत यशस्वी व्हायचे असेल तर पिवायक्यूशिवाय गत्यंतर नाही. पिवायक्यु इज की. तू जर नीट पिवायक्यु करशील तर तुला एक्सामची डेप्थ कळेल. भरपूर फायदा होईल परीक्षेत. बाकीचे समाजसुधारक हळूहळू लक्षात राहतील. शॉर्ट नोट्स बनवत जा. "
" शॉर्ट नोट्स कसे बनवायचे सर ? दहा पुस्तके टेबलावर मावत पण नाहीत. "
" दहा पुस्तके एक वेळा वाचण्यापेक्षा एकच चांगल्या दर्जाचे पुस्तक दहा वेळा रिवाईज कर. मी बुकलिस्ट दिली होती ना पहिल्या लेक्चरला. त्यातूनच कर. टेस्ट सिरीजमधून काही ऍडीशनल माहिती मिळाली तर ती माहिती स्टीकी नोट्स लावून शॉर्ट नोट्स मध्ये ऍड कर. आता लवकरच कमबाईनचा निकाल लागेल. तेव्हा टॉपरचे भाषण ऐक. तेही हेच म्हणतील की Quantity doesn't matter , Quality matters. "
" ओके. थँक्स सर. " दर्शन म्हणाला.
दर्पण सर आणि दर्शन सोबतच केबिनबाहेर पडले. बाहेर आभास दर्शनची वाट पाहतच उभा होता. दर्पण सरांचे लक्ष आभासकडे गेले.
" आभास , खूप कमी स्कोअर येतोय तुझा टेस्ट सिरीजमध्ये. "
" सर मी आजारी होतो म्हणून अभ्यास झाला नव्हता. " आभास म्हणाला.
दर्पण सर हसले.
" माणूस जगाला फसवू शकतो पण स्वतःला फसवू शकत नाही. म्हणून आत्मपरीक्षण कर. आपण इथे का आहोत , काय करतोय हे विचार स्वतःला. आणि जमत नसेल एमपीएससी तर सोडून दे. कशाला आईवडिलांचे पैसे वाया घालवतोय ?"
" सॉरी सर. " आभास म्हणाला.
दर्शन आणि आभास दोघेही तिथून निघाले. तेवढ्यात त्यांना प्रकाश येताना दिसला. दर्पण सर आणि प्रकाशने एकमेकांना जुन्या मित्रांप्रमाणे मिठी मारली.
" दर्पण सर पण..?" आभास कुजबूजला.
क्रमश..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा