गुलाल ! पार्ट 7
आर्यन हा आभासचा समलैंगिक मित्र. दोघांची एका पार्टीमध्ये ओळख झाली आणि नंतर दोघांमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली. त्यानेच कॉल करून आभासला भेटायला बोलावले होते.
" बोल आर्यन. तू मला अचानक का बोलावले आहेस ?"
" कॉल उचलत नाहीस , मेसेजला रिप्लाय देत नाहीस. काय प्रॉब्लेम आहे ? आतापासूनच अधिकाऱ्याचे थाट सुरू झाले तुझे. "
" तस नाही रे. मोहकसोबत ब्रेकअप झाले तेव्हापासून मी ठरवले की अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे. "
" अभ्यास तर चालूच राहील. पण माझ्याकडे एक आयडिया होती तुझ्यासाठी. "
" कसली आयडिया ?"
" आपण दोघे मिळून लोणावळ्याला एक पार्टी अरेंज केली तर ?"
" म्हणजे ? होस्ट करायचं ?"
" हो. कम्युनिटीमध्ये आपल्या दोघांचेही नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे. पार्टीजचा अनुभवही आहे. खूप जण येतील आपल्या विनंतीवरून. प्रॉफिट हवं तर अर्धा अर्धा वाटून घेऊ."
" नको रे. प्रिलियम जवळ येत आहे. "
" अरे जास्त काम नाहीये. तू अभ्यास सांभाळूनही ही कामे करू शकतो. मला तर वाटत आहे तू पण दर्शनसोबत राहून पुस्तकी किडा बनला आहेस. "
" तस नाही रे. बर सांग. काय करावं लागेल ?"
" तू पंचवीस हजार दे. मी पण पंचवीस हजार देतो."
" पंचवीस हजार ? एवढी रक्कम ?"
" हो. प्रॉफिट पण मोठा असेल. जर लॉस झाला तर तोही अर्धा अर्धा वाटून घेऊ. "
" लॉस ?"
" सहसा होणार नाही. पण इन केस झालाच तर. "
" अरे पण मी इतकी मोठी रक्कम कुठून आणू ? मला घरून दहा हजारच मिळतात. त्यात पण भागत नाही. कुणी बॉयफ्रेंड पण नाही आता. "
" घरून माग ना. एखादा कोर्स आहे म्हणावं. "
" टायपिंगच्या कोर्ससाठी मागितले होते. पण मी क्लास तर लावला नाहीच उलट पार्टी करण्यातच उडवले. "
" अरे ही पार्टी सक्सेसफुल झाली ना तर तुझ्या खात्यात पन्नास हजारपण येऊ शकतात. "
" सिरियसली ?"
" येस. तू फोन लावून थोडं इमोशनल कर घरच्यांना."
" ओके. "
आभासने घरी फोन लावला. त्याच्या बाबांनी फोन उचलला.
" बोल बाळा. अभ्यास कसा चालू आहे ? दर्शनसोबत नीट रहा. भावाप्रमाणे राहत जा. तब्येत ठीक आहे ना ?"
" बाबा सर्व ठीक आहे. थोडे पैसे हवे होते ?"
" किती ?"
" तीस हजार. "
" बापरे ! परवाच टायपिंगसाठी दिले होते ना. "
" हो. एक वेगळा कोर्स करायचा होता. प्री जवळ येत आहे ना. खूप महत्त्वाचा आहे. अर्जंट हवे आहेत पैसे. पेठेतील सर्व हुशार मुले लावत आहेत तो क्लास. जर अडचण असेल पैश्याची तर राहूद्यात. "
" नाही नाही. महत्वाचे असेल तर लावून टाक. तू फक्त अभ्यास कर राजा. पैश्याचे टेन्शन नको घेऊ. मी बघतो काही तर. "
आभासने फोन कट केला. त्याच्या वडिलांनी घरी सर्व हकीकत सांगितली. आभासची लहान बहीण म्हणाली ,
" बाबा , माझ्या लग्नासाठी जे दागिने बनवले होते त्यातले काही विकून टाका. दादाला गरज आहे. "
" अग पण तुझं लग्न ?"
" दादा जेव्हा अधिकारी बनेल तेव्हा मला परत दागिने बनवून देईल. दादाचा अभ्यास महत्वाचा. दागिने तर पुन्हा बनवता येईल. "
शेवटी आभासचे बाबा तयार झाले आणि त्यांनी तसा मेसेज आभासला पाठवला. आभासच्या आनंदाला पारावार तो उरला नाही.
" पंचवीस हजार मागायचे होते ना ?"
" हो. पण पाच हजार माझ्या शॉपिंगसाठी मागितले. होस्ट आहे मी. सो थोडा स्टायलिश तर दिसायलाच पाहिजे ना. "
" हो. खरय. "
" बघितले ना आर्यन , आईवडील अडाणी असतील तर किती फायदा होतो. लगेच फसवता येते. बिचारा माझा अडाणी बाप. "
आभास मोठमोठ्याने हसू लागला.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा