गुलकंद भाग ३(अंतिम)
वैभव घरात आला.अन् तोफ धडाडली.
“वैभवा ssss तू कामावर जातोस की,पोरी फिरवायला?”
“तुला कोणी सांगितलं?”
“मी.” विदया पुढे येत बोलली.
“तू काय करत होतीस तिथे??”
“सिनेमा बघायला गेले होते फ्रेंड सोबत.”
“मला कशी दिसली नाहीस?”
“तू जेंव्हा मिठीत घेऊन बसला होतास तिला तेंव्हा अगदी तुझ्या समोर होते मी.पण तुम्ही दोघे इतके गुंतला होता की तुमचे मी फोटो काढले हेही तुम्हाला माहीत नाही.” विदया तोऱ्यात बोलली.
“म्हणजे? तू आमचे फोटोही काढलेस??” वैभव आश्चर्य व्यक्त करत बोलला.
“हो, हे बघ”
“ तुला नसते कारभार कोण करायला सांगत ग?”
“मी काहीही वाईट केलेलं नाहीय दादा.”
“ मग तू हे आईला का सांगितलेस?” वैभव विद्याला जवळ घेऊन तिच्या कानात पुटपुटला.
“मग काय करू? जी आहे ती एकदम छान आहे.तिलाच वहिनी म्हणून घेऊन ये”
“ होय का आता आईला सांगून सगळ बिघडवून टाकलेस त्याच काय?”
“चील दादा येवढंही काही वाईट नाही झालं. तसेही आई उद्या मुलगी बघायला जाणार होतीच.म्हणून आजच तिला तिच्याविषयी सांगून टाकलं.यात मी चुकीचं काय केलं सांग बरं!”
“माकडे चुकीच्या वेळी सांगितलेस.” वैभव तिच्या डोक्यात टपली मारून तिच्या कानात बोलला.
“दादा वहिनी भारी आहे बरं का!”
“नक्की!”
“हो.”
“ए, दोघांचं काय खसुरपुसुर चालू आहे?” वैभवची आई त्या दोघांना एकमेकाशी हळू आवाजात बोलताना बघून ओरडली.
“काही नाही ग आई.” विदया घाबरून बोलली.
“वैभव आम्हाला मुलगी पसंत आहे.उद्या आपल्याला मुलगी पाहायला जायचं आहे.”
“ आई!एवढ्यात?”
“हो मग अजून मी जास्त दिवस वाट पाहू शकत नाही.लवकरात लवकर हे लग्न उकरून घेऊ.”
“तिच्या कडून तिच्या घरच्यांचा फोन नंबर घेऊन तो तुझ्या बाबांकडे दे..”
“पण आई ss.” तो पुढे काही बोलणार होता पण त्या अगोदर वैभव ची आई निघून गेली होती.
“भारी बाबा मी आता नवरदेवाची करवली होणार!” विदया वैभवला चिडवत बोलली.
“ हे ना सगळ तुझ्यामुळे होत आहे .” तो आपल्या चेहऱ्यावरची खुशी लपवत बोलला
“ठीक आहे मीच केलंय ना हे सगळ मीच मोडते आता बघ तू.. आई sss ए आई ss दादा..” ती पुढे आईला की सांगणार तोच वैभवने तिचे तोंड दाबत तिला आपल्या रूम मध्ये नेलं.
“ए,माकडे काय करतेय हे? ”
“काय कुठे जुळलेले सूर तोडतेय.”
“येडी आहेस का ग!”
“का बरं”
“भावाच लग्न मोडायला निघालीस अस कुठे असत होय?”
“जर तुला तुझ्या मनासारखं हवे असेल तर मला माझ्या फोन वर आताच दहा हजार रुपये पाठवावे लागतील.”
“काय!दहा हजार ?”
“हो मग,तुला द्यायचे नसतील तर आताच आईला सांगते.”
जाणाऱ्या विद्याला वैभवने पकडलं.
“ए, जानी दुश्मन देतोय थांब.” त्याने देतो म्हटल्याबरोबर विद्या हरखली. तिच्याकडे रागात बघतच
“देवा , असली बहीण पुढच्या जन्मी मला तर नको” वैभव मनातच पुटपुटला.
“देवा , असली बहीण पुढच्या जन्मी मला तर नको” वैभव मनातच पुटपुटला.
दुसऱ्या दिवशी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटोपून तिथेच त्यांचा साधेपणाने साखरपुडा देखील झाला. लवकरात लवकर लग्न उकरून घ्यायचं ठरलं.
जवळच्या शुभ मुहूर्तावर त्यांचं लग्न ही झालं.अन् दोघांचा संसार सुरू झाला.
काही दिवसातच वैभवच्या आईचे आणि विभूतीचे काही कारणांनी खटके उडू लागले.आई जुन्या विचाराची असल्याने विभूतीकडे संपूर्ण दिवस घरासाठी देण्यासाठी हट्ट करू लागली.अन् विभूती देशसेवा करण्याचं आपले स्वप्न तोडण्यास नकार देऊ लागली. इथे या दोघींच्या वादात बिचाऱ्या वैभवाची दयनीय अवस्था होऊ लागली.
जेंव्हा परिस्थिती अत्यंत बिकट होऊ लागलेली तेंव्हा मात्र विभूतीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. वैभवने तिला अडवल नाही.कारण त्याची आई अजिबात ऐकत नव्हती. बायको एक पोलिस अधिकारी आहे.आणि तिला आपले कर्तव्य किती प्रिय आहे ते तो एक पोलिस अधिकारी या नात्याने अनुभवत होता.
आज गेली तीन वर्ष ते दोघीही वेगळे रहात होते. प्रेम तर दोघांचं एकमेकावर खूप होत.पण परिस्थितीच अशी होती की,दोघांना वेगवेगळं राहण्याशिवाय पर्याय नव्हता.दोघे वेगळे राहिलेही असते.पण वैभवच्या आईने त्यांना वेगळं राहण्यापासून अडवल.
दोघे रोज फोनवर बोलायचे,आठवड्याला भेटायचे.जरी घरी वाद विवाद होत असेल तरी याचा परिणाम त्याच्या प्रेमावर कधीच झाला नव्हता.
आजही वैभवला तिला भेटायचं होत. खूप काही बोलायचं होत.पण सकाळी एका आमदाराच्या मुलाने तिला डिवचले अन् मॅडम चांगल्याच चवतळल्या.आणि रागात असतानाच. वैभवचा तिला फोन आला.अन् तिचा राग कुठल्या कुठे पळाला.
अंगावर खाकी वर्दी, त्यावर जॅकेट,डोळ्यावर गॉगल, केसाची बांधलेली पोनी, गळ्यात मंगळसूत्र, एका हातात कॅप,एका हातात काठी अन् चेहऱ्यावर कायम असणारी खुशीची लकेर. वैभव तिच्याकडे केंव्हापासून पाहत होता
“ मला बघून झालं असेल तर काही खायला मागावंशील का?” ती वैभव समोर चुटकी वाजवत बोलली.
“हो मागवतो.” त्याने खाण्याची ऑर्डर दिली.
“बोला मॅडम, सकाळी इतक्या का रागात होता?”
“काही नाही या शहरात बिनकामी उंदरांची पिसावळ इतकी माजली आहे की, कधी कधी डायरेक्ट डोक्यात शिरतात.” तिच्या बोलण्याचा रोख त्याने ओळखला होता.
“ ती पिसावळ कधीच कमी होणार नाही. म्हणून आपण का आपले डोके खराब करून घ्यायचं विभु ”
“बरोबर आहे तुझं”
“मी नेहमी बरोबरच असतो राणीसाहेब!”
“हो ते तर आहेच..मला का बोलावलं आज अचानक?” ती गंभीर होत बोलली.
“विभु आपण एकत्र राहूया ना ग!” वैभव आर्जव करीत बोलला.
“ तुझ्या घरचे आपल्याला सुखाने राहु देणार आहेत?”
“मी ट्रान्सफर करून घेतोय नागपूरला आपल्या दोघांचीही.”
“नक्की मिळेल आपल्याला?”
“फक्त तुझा होकार येऊ दे सगळं शक्य होईल.” वैभव तिच्या हातावर हात ठेवत बोलला.
विभूतीलाही आता त्याच्यापासून दूर राहायचं नव्हत.म्हणून तिनेही होकार दिला. ऑर्डर आल्यावर दोघांनीही जेवण केलं अन् दोघेही आपापल्या घरी गेले दोघांनीही आपला निर्णय घरातल्यांना सांगितला त्यांनीही त्या दोघांना होकार दिला.
अखेर उद्या त्यांची ट्रान्सफर होणार होती. दोघांनीही त्या पोलिस स्टेशनमधून आपल्या बदलीचा लिफाफा घेतला.अन् ते नागपूरला जाण्यासाठी रवाना झाले.
दोघांच्या गोड नात्याचा, गोड प्रेमाचा,हा गोड गुलकंद इथेच सफल संपूर्ण!!!
समाप्त….
©® सविता पाटील रेडेकर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा