गुलमोहर

गुलमोहर
गुलमोहर

रणरणत्या उन्हातही खुलूनी
झोकात डोलतो जसा गुलमोहर
तसा खुलावा संसार आपला
सहसोबतीने जीवनभर

वैशाखाच्या झळांतही फुलतो
लाल भगव्या फुलांचा बहर.
टिकून राहते हिरवळ जशी
तसेच टिकावे आपलेही घर
--------------------
©®सौ. वनिता गणेश शिंदे