शहराच्या बाहेर एका लांबट जंगलाच्या वाटेवर एक जुने वाडे होते. त्या वाड्याबद्दल गावात विचित्र कथा प्रसिद्ध होती – म्हणे, रात्री त्या वाड्यातून रडण्याचे आणि हसण्याचे आवाज येत.
एकदा नील नावाचा पत्रकार त्या वाड्याचा शोध घेण्यासाठी तिथे गेला. त्याला नेहमीच अशा रहस्यमय जागांबद्दल आकर्षण होतं. पण त्या दिवशी, काहीतरी वेगळंच घडणार होतं.
नीलने संध्याकाळी वाड्याच्या आत पाऊल टाकले. वाड्यात अंधार दाटला होता. हातात टॉर्च घेऊन त्याने पाहणी सुरू केली. भिंतींवर कोळ्यांचे जाळे, फाटलेल्या पडद्यांमागे हालणाऱ्या सावल्या, आणि गडद अंधार – हे सर्व नीलच्या मनात थरकाप निर्माण करत होतं.
वाड्याच्या आतल्या खोलीत एक जुना आरसा होता. त्याच्यावर धूळ जमली होती, पण आरशात एक विचित्र चमक होती. नील जवळ गेला आणि आरशात स्वतःचा चेहरा पाहिला. पण तो स्वतःचा चेहरा नव्हता! आरशात एका स्त्रीचा चेहरा दिसत होता – डोळ्यांतून रक्तासारखं पाणी वाहणारं आणि हसताना भयानक दिसणारं.
"कोण आहेस तू?" नील ओरडला.
आरशातील चेहरा हळूहळू बोलू लागला, "मी 'त्या'चा आत्मा आहे. या वाड्यात येणारा प्रत्येकजण माझा होतो. आता तूही माझा आहेस."
आरशातील चेहरा हळूहळू बोलू लागला, "मी 'त्या'चा आत्मा आहे. या वाड्यात येणारा प्रत्येकजण माझा होतो. आता तूही माझा आहेस."
नीलने मागे वळण्याचा प्रयत्न केला, पण काहीतरी शक्ती त्याला आरशाकडे खेचत होती. अचानक, वाड्याभर प्रकाश लखलखला. एका जुन्या दिव्यातून अजीब लहान मुलाचा आवाज ऐकू आला, "या वाड्यातून पळ, नील! ती तुला सोडणार नाही."
पण तो काहीही समजून घेण्याआधीच, आरशातून बाहेर आलेला काळा धूर नीलला वेढू लागला. त्याचा श्वास कोंडू लागला. तो बाहेर पळायचा प्रयत्न करू लागला, पण दरवाजे बंद झाले होते. अचानक आरशामधून हात बाहेर आले आणि त्यांनी नीलला आत ओढलं. त्याचं अखेरचं ओरडणं वाड्यात घुमलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी, गावकऱ्यांनी वाड्याजवळ नीलचा कॅमेरा सापडला. कॅमेरामध्ये शेवटची क्लिप होती, ज्यात नील आरशाकडे पाहत होता आणि अचानक गायब होत होता. ते पाहून गावकरी थरकापले.
त्या दिवसापासून, वाड्यातून येणारे आवाज अधिक भयानक झाले. आता, त्या वाड्याचा भाग नीलही झाला होता.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा