गुमनाम भाग - १
रात्रभर जोरदार पाऊस कोसळत होता. मुंबईच्या क्राईम ब्रांचच्या जुन्या इमारतीत, रात्री 2:17 वाजता, बहुतेक दिवे बंद होते. फक्त वरच्या मजल्यावरचा एकच काचेचा केबिन उजळलेला, Senior Inspector अद्वैत देशमुखचा.
अद्वैत कागदपत्रांत बुडालेला होता. तीन दिवसांत सलग तीन मर्डर झाले होते आणि तिन्ही ठिकाणांवर एकाच प्रकारचा खूनी खेळ होता:
मृतदेहाभोवती लाल खडूने आखलेला वर्तुळ.
“या वेड्याला पकडता येणार नाही का?” अद्वैतने बोलला. तेवढ्यात दार उघडल्याचा मंद आवाज आला.
अद्वैत चकित झाला. इतक्या रात्री कोण? समोर कुणीच नव्हतं. पण जमिनीवर एक वस्तू शांतपणे ठेवलेली होती,
एक लाल रंगाची फाईल. कोणीतरी दार उघडून, फाईल टाकून परत गायब झालं होतं, क्षणात. अद्वैतने फाईल उचलली. पाण्याचे थेंब तिच्यावरून ओघळत होते. म्हणजे ती बाहेरून आणली होती. फाईलवर पांढऱ्या मार्करने लिहिलेलं, “Case – 24 Hours”

“एक दिवसात संपणारी केस? कसला खेळ आहे हा?” तो पुटपुटला. फाईल उघडताच त्याच्या डोळ्यांत चमक निर्माण झाली. पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, “3 Crimes – Next 24 Hours”
खाली अनुक्रमे तीन ठिकाणांची नावे व टाइम लिहिला होता.
02:45 AM – वडाळा फूटओव्हर ब्रिज
09:30 AM – कापड मार्केट, भायखळा
08:00 PM – कार्टर रोड, बांद्रा
खाली अनुक्रमे तीन ठिकाणांची नावे व टाइम लिहिला होता.
02:45 AM – वडाळा फूटओव्हर ब्रिज
09:30 AM – कापड मार्केट, भायखळा
08:00 PM – कार्टर रोड, बांद्रा
अद्वैत जवळजवळ ओरडल्यासारखा झाला, “हे तर… उद्याचे गुन्हे आहेत! अजून घडायचेच आहेत!”
त्याच पानाखाली लाल शाईने लिहिलेलं एक वाक्य थंडगार झटका देणारं, “त्यांना वाचवू शकशील? की परत तीन वर्तुळं पाहशील?”
त्याच पानाखाली लाल शाईने लिहिलेलं एक वाक्य थंडगार झटका देणारं, “त्यांना वाचवू शकशील? की परत तीन वर्तुळं पाहशील?”
त्याच्या हाताला थंडी वाजली. त्याला वाटलं हा एखादा वेडा खेळ खेळतोय… पण मनात दुसरा विचारही आला, तीन दिवसांपूर्वीही गुन्हे अशाच रात्री, याच वेळेत घडले होते.
हा माणूस फक्त खूनी नसावा… तो भविष्य सांगतोय?
किंवा, तो गुन्हे स्वतःच घडवणार आहे?
किंवा, तो गुन्हे स्वतःच घडवणार आहे?
त्याने तातडीने वायरलेस उचलला. “Control, वडाळा FOB ला तातडीने दोन युनिट्स पाठवा. आत्ताच!”
घड्याळात 02:32 झाले होते. त्याच्याकडे अवघा 13 मिनिटांचा वेळ होता.
घड्याळात 02:32 झाले होते. त्याच्याकडे अवघा 13 मिनिटांचा वेळ होता.
पाऊस वाढला होता. अद्वैतने गाडी बाजूला लावून ब्रिजकडे धाव घेतली. ब्रिजवर अंधार, दिवे लुकलुकत होते. फक्त एकच माणूस तिथे उभा, काळा रेनकोट घातलेला.“ओये! थांब!” अद्वैत ओरडला.
त्या माणसाने मागे पाहिलं… चेहरा अंधारात झाकलेला.
क्षणात तो धावू लागला.
त्या माणसाने मागे पाहिलं… चेहरा अंधारात झाकलेला.
क्षणात तो धावू लागला.
अद्वैतही मागे धावत सुटला. “पकड त्याला!” मागच्या युनिटला तो ओरडला. ब्रिजच्या मधोमध त्या माणसाने काहीतरी खाली फेकलं, एक पर्स.
अद्वैत जवळ गेला, पर्स उचलली. आत ओळखपत्र, एका स्त्रीचं. नाव सोनाली पाटील.
अद्वैतने वर पाहिलं, माणूस पळून गेला होता, पण ब्रिजच्या दुसऱ्या टोकावर एक छोटीशी सावली उभी होती. सावली अचानक कोसळली.
अद्वैत धावत पोहोचला. एक स्त्री जमिनीवर पडलेली, श्वास एकदम मंद. तो घाबरून तपासू लागला.
“Ambulance! जलद!”
“Ambulance! जलद!”
अचानक त्याच्या नजरेत चमकली ती गोष्ट… स्त्रीच्या भोवती पावसातसुद्धा दिसणारं, लाल खडूचं वर्तुळ!
“तो इथेच होता… वर्तुळ कधी काढलं ?” अद्वैतचे मन हादरले. फाईलने दिलेला पहिला गुन्हा योग्य निघाला होता.
“तो इथेच होता… वर्तुळ कधी काढलं ?” अद्वैतचे मन हादरले. फाईलने दिलेला पहिला गुन्हा योग्य निघाला होता.
सोनाली पाटील, जिवंत होती पण बेशुद्ध. पोलिसांनी तिला रुग्णालयात पाठवलं. अद्वैत फाईल हातात धरत होता आणि पावसात थरथरत म्हणाला,
“हा माणूस फक्त गुन्हा करत नाही… तो मला आधीच सांगतोय. मला खेळात ओढतोय.”
“हा माणूस फक्त गुन्हा करत नाही… तो मला आधीच सांगतोय. मला खेळात ओढतोय.”
अद्वैतने टीमसोबत बैठक घेतली. सहायक अधिकारी रवी म्हणाला, “सर, कोणी फाईल कशी काय आत टाकली? रात्री वॉचमनही नव्हता म्हणे.” “वॉचमन नव्हता?” अद्वैत थबकला.
“हो सर, त्याला अचानक फोन आला आणि तो बाहेर गेला. तो म्हणतो कसला तरी ‘Senior Officer’ बोलावतोय.”अद्वैतला समजलं, वॉचमनला बाहेर काढूनच हा खेळ झाला असणार.
शिर्के नावाच्या दुसऱ्या अधिकाऱ्याने फाईल पलटली.
“सर, या फाईलमधली माहिती इतकी बरोबर कशी असू शकते? उगीच थट्टा वाटते.” अद्वैत शांतपणे म्हणाला,“जर ही थट्टा असती, तर वडाळ्यावरची ती मुलगी मरून गेली असती.” संपूर्ण ऑफिस शांत झालं.
“सर, या फाईलमधली माहिती इतकी बरोबर कशी असू शकते? उगीच थट्टा वाटते.” अद्वैत शांतपणे म्हणाला,“जर ही थट्टा असती, तर वडाळ्यावरची ती मुलगी मरून गेली असती.” संपूर्ण ऑफिस शांत झालं.
सकाळच्या धांदलीत मार्केट भरलेलं. अद्वैत व टीम
आडोसा घेऊन सर्व ठिकाणं तपासत होती. तो वेळ वारंवार घड्याळाकडे पाहत होता. 09:28…
आडोसा घेऊन सर्व ठिकाणं तपासत होती. तो वेळ वारंवार घड्याळाकडे पाहत होता. 09:28…
त्याला अचानक डोळ्यांना टोचणारं काहीतरी दिसलं,
समोरच्या दुकानाच्या काचेत लाल रंगाचं वर्तुळ चिकटवलेलं. त्याने धावत जाऊन काच उघडली.
आत एक माणूस कापडाच्या गाठीमध्ये गुडघ्याने खाली बसलेला, हाताला दोरखंड. अद्वैतने त्याचे तोंड उघडले, श्वास चालू होता, तो अजून जिवंत होता.

पण… त्या माणसाच्या खांद्यावर एक छोटासा स्टिकर लावलेला, “Welcome To Game – 2”
“हा आपल्याला चिडवतोय…” अद्वैत ओरडला.
“हा आपल्याला चिडवतोय…” अद्वैत ओरडला.
टीमने आसपास धाव घेतली. एक तरुण मुलगा पळत दिसला. अद्वैत त्याच्याकडे धावत गेला, पण मुलगा घसरून खाली आदळला. त्याच्या हातात एक छोटा व्हॉईस-रेकॉर्डर होता. अद्वैतने रेकॉर्डर ऑन केलं.
आवाज एकदम शांत, पण आतपर्यंत थंडी देणारा.
“अद्वैत देशमुख, गुन्हेगार तू नाही पकडले… मी तुला दाखवतोय. तिसरा खेळ ८ वाजता. ही फाईल उघडलीस ना? मग तुझंच आयुष्य उघडणार आहे पुढे.” रेकॉर्डर संपतो. अद्वैतला काहीच सुचत नाही. हा माणूस त्याचं नाव, त्याची हालचाल, सर्व काही जाणतो.
पण एक गोष्ट त्याला समजली, हा माणूस फक्त गुन्हा करत नाही… तो अद्वैतच्या भूतकाळाशी जोडलेला आहे.
कुठेतरी, कधीतरी.

अद्वैत आपल्या केबिनमध्ये एकटाच बसलेला.
त्याच्यासमोर लाल फाईल उघडी आहे. शेवटच्या पानावर एक वाक्य, त्याने अनेकदा वाचलेलं, “तिसरा गुन्हा हा खून नाही… तर एक उलगडा आहे.”
त्याच्यासमोर लाल फाईल उघडी आहे. शेवटच्या पानावर एक वाक्य, त्याने अनेकदा वाचलेलं, “तिसरा गुन्हा हा खून नाही… तर एक उलगडा आहे.”
त्याच्या डोक्यात विचारांचा गरघोटा चालू होता,
हा माणूस कोण? याचा माझ्याशी काय संबंध?
हा माणूस कोण? याचा माझ्याशी काय संबंध?
तेवढ्यात फोन वाजला. एका अनोळखी आवाजाने मंदपणे म्हटलं, “अद्वैत.. तिसरा खेळ वेगळीच गोष्ट सांगणार आहे. तू भूतकाळ विसरलास का एवढ्या लवकर?” फोन कट झाला.
अद्वैतचे हात थरथरले. हा आवाज… कुठेतरी ऐकलेला!
पण केव्हा? कोणाचा? घड्याळाने सुचित केले,
07:12 PM. तिसऱ्या गुन्ह्याला आता 48 मिनिटे उरलेली होती.
पण केव्हा? कोणाचा? घड्याळाने सुचित केले,
07:12 PM. तिसऱ्या गुन्ह्याला आता 48 मिनिटे उरलेली होती.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा