लेकासोबत आश्लेषा ताई अखेर घरी परत आल्या. त्यांच्या माघारी रूपाने घर व्यवस्थित सांभाळलेलं दिसत होतं. आपल्या वाचून इथं काही अडलं नाही, हे पाहून त्यांना चीड आली.
'इतकी वर्षे मी सगळं करत होते. आपण माहेरी गेलो तरी अनिकेत अन् सुहास याचं पदोपदी अडत होतं. पण आता..या दोघांना रूपाचं कौतुक करायचा छंदच जडलाय जणू! हल्ली दोघं तिच्या मदतीला काय धावतात, तिचे हट्ट काय पुरवतात. ती मागेल ते लगेच हजर करतो माझा अनिकेत. माणसाला नको तितका मान आणि किंमत दिली की ती डोक्यावर चढून बसतात.
सुलेखा सुध्दा आपल्या सुनेचे नको तितके लाड करते. पण शिवानी आहेच तशी. बँकेत काम करते. भरपूर पगार कमावते. घरी सासूच्या हाताखाली राबते, सगळं शिकून घेते.' ताई आपल्या विचारात मग्न झाल्या होत्या.
स्वयंपाकघरातून येणारा खिरीचा छान सुगंध, पोळ्या लाटणारी रूपा आणि कसलीशी भाजी करणारा अनिकेत.. आतून येणाऱ्या वासाने ताईंची भूक चाळवली. पट्कन उठून त्या आत गेल्या.
"रूपा, खीर कुठे शिकलीस?"
"तुमच्याकडून."
"मी कधी शिकवली?" ताईंना आश्चर्य वाटलं.
"म्हणजे तुम्ही खीर कशी करता ते मी बघून ठेवलं होतं. तशीच बनवायचा प्रयत्न केला." तिने खीर चवीला म्हणून एका वाटीत घालून ताईंना दिली.
"बरी झालीय. पण माझ्यासारखी चव काही जमली नाही." वाटी बाजूला ठेवत ताई म्हणाल्या. "आणि इथून पुढे माझ्या लेकाला कामाला लावायच्या आधी माझी परवानगी घेत जा.."
फोनच्या आवाजाने आश्लेषा ताई आठवणीतून जाग्या झाल्या.
"अगं, इतके दिवस कुठे होतीस? बैठकीलाही आली नाहीस! मंडळातली मैत्रिण विचारू लागली. तिला उत्तरं देताना गोंधळलेल्या ताई आजच्या बैठकीला यायचा फारच आग्रह झाल्याने ठीक चार वाजता तयार झाल्या. ठरल्याप्रमाणे मैत्रिणीची गाडी न्यायला आली.
"आज काय विशेष?"
"आज स्पेशल सेशन आहे म्हणून तुला न्यायला आले." मैत्रिण डोळे मिचकावत म्हणाली.
----------------------------------------------
----------------------------------------------
हॉल गच्च भरला होता. मंडळातल्या शिवाय शेजार- पाजारच्या, इतर अनोळखी तरुण मुली, महिला जमल्या होत्या.
"आजचा विषय आहे तरी काय? इतकी गर्दी झालेली पाहून आश्लेषा ताई मैत्रिणीच्या कानात कुजबुजल्या.
इतक्यात स्टेजवर रूपा आणि तिच्यासोबत असणाऱ्या, सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या स्त्रियांचं स्वागत करण्यात आलं. आजचे पाहुणे म्हणून त्यांची ओळख करून देण्यात आली. ताईंना आश्चर्य वाटलं. रूपाच्या सहकाऱ्यांची भाषणं झाली अन् शेवटी रूपा बोलायला उभी राहिली.
'आता ही बोलणार? घरी तोंडातून धड शब्द फुटत नाही आणि इथे काय बोलणार? माझी लाज राख बाई.' ताई मनातल्या मनात बोलत होत्या. त्यांच्या मंडळातील बाकी मैत्रिणी मात्र आश्लेषाची सून म्हणून रुपाकडे कौतुकाने बघत होत्या.
'आता ही बोलणार? घरी तोंडातून धड शब्द फुटत नाही आणि इथे काय बोलणार? माझी लाज राख बाई.' ताई मनातल्या मनात बोलत होत्या. त्यांच्या मंडळातील बाकी मैत्रिणी मात्र आश्लेषाची सून म्हणून रुपाकडे कौतुकाने बघत होत्या.
रूपाचं भाषण कधी सुरू झालं हे ताईंना कळलंच नाही. तिचा चेहरा आत्मविश्वासाने फुलला होता. डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसत होती. घरी बावरून राहत असलेली रूपा इथे मात्र धिटाईने बोलत होती. तिने स्व - संरक्षणावर काही धडे दिले. प्रात्यक्षिके सादर केली. महिलांनी सजग राहावे, घरी कामाच्या ठिकाणी काही अडचण असल्यास मनमोकळे बोलावे, गरज लागल्यास समुपदेशकांची मदत घ्यावी. स्वतःसाठी वेळ द्यावा, इतरांना आनंदी ठेवताना आपला आनंद कसा जपावा याबाबत मार्गदर्शन केलं अन् महिला सबलीकरणावर बोलून आपलं तडफदार भाषण संपवलं.
कार्यक्रम संपला आणि मंडळाच्या बायका तिच्याभोवती जमा झाल्या.
कार्यक्रम संपला आणि मंडळाच्या बायका तिच्याभोवती जमा झाल्या.
"आश्लेषा उगीचच आपल्या सुनेला बोल लावते. कित्ती छान बोलली ही! आता एकमेकांची उणीदूणी काढण्यापेक्षा समाज, महिला जागरूक करण्याचं काम करू. तेवढाच सामाजिक कार्यात आपला हातभार लागेल."
जमलेल्या बायकांपैकी कोणीतरी म्हणाले. आपल्या मैत्रिणी सुनेच्या गटाला जाऊन मिळाल्याने ताईंनी वरवर हसत वेळ मारून नेली.
जमलेल्या बायकांपैकी कोणीतरी म्हणाले. आपल्या मैत्रिणी सुनेच्या गटाला जाऊन मिळाल्याने ताईंनी वरवर हसत वेळ मारून नेली.
इतक्यात सुलेखा काकू आणि शिवानी गर्दीतून वाट काढत रूपाकडे आल्या.
"खूप मस्त रूपा. हे समाज जागरूक करण्याचं जे काम करतेस ना..खरंच आम्हाला तुझा अभिमान वाटतो. आमच्या बँकेत सुद्धा ठराविक दिवशी असे कार्यक्रम होतात. यासाठी मी नक्की तुझं नाव सुचवेन." शिवानी तिला मिठी मारत म्हणाली.
"कधी कधी या कामाचा खूप कंटाळा येतो गं. लोकांना मिळणारा पैसा दिसतो. पण त्यामागे प्रचंड कष्ट असतात, ज्याची जाणीव कोणालाच नसते. आणखी काही वर्ष काम करून सरळ राजीनामा देऊन मी तुला जॉईन होईन हे मात्र नक्की."
"कधी कधी या कामाचा खूप कंटाळा येतो गं. लोकांना मिळणारा पैसा दिसतो. पण त्यामागे प्रचंड कष्ट असतात, ज्याची जाणीव कोणालाच नसते. आणखी काही वर्ष काम करून सरळ राजीनामा देऊन मी तुला जॉईन होईन हे मात्र नक्की."
सुलेखा काही बोलत नाही हे पाहून आश्लेषा ताई जवळ आल्या. "तुला भाषण आवडलं नाही का? नाही म्हणजे सगळेच तिचं कौतुक करत आहेत. पण तू काही बोलत नाहीस म्हणून म्हणाले मी."
मी रूपाचं कौतुक केलं तर ते तुला आवडत नाही ताई. उगीच गैरसमज होतो तुझा. पण आज इथे जमलेला प्रत्येक जण तिचं कौतुक करतोय. आता तू तिला प्रोत्साहन देण्याची वेळ आली आहे. तू जेव्हा तिचा स्वीकार करशील तेव्हाच बोलेन मी."
सुलेखा काकू आणि शिवानी निरोप घेऊन निघून गेल्या.
आल्पोपहारानंतर कार्यक्रम संपला.
"कसं वाटलं सरप्राईज?" ताईंची मैत्रिण उत्साहाने म्हणाली."मुद्दामच तुला काही सांगितलं नाही आम्ही. आपल्या माणसांची अशी ओळख झाली की आपल्याला नव्याने उमगतात ती."
घरी आल्यावर देखील मैत्रिणीचे हे शब्द ताईंच्या कानात घुमत राहिले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा