गुंतता हृदय हे भाग 52

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का
गुंतता हृदय हे भाग 52
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

सुलक्षणा ताईंनी ओवाळल्यावर विलास राव आत मधे आले. त्यांच्या मागे सगळे होते . विलास राव, सतीश राव सोफ्यावर बसले होते.

सुलक्षणा ताई बाकीच्या लोकांकडे बघत होत्या. या बसा.

सगळे घराकडे बघत होते.

या दोन मुली कोण? हे का आले इथे. ही खुशी आहे का? त्या नीट बघत होत्या. तिचा फोटो मी बघितला आहे. त्या कबीर कडे बघत होत्या. " कोण आहे ही?" त्यांनी विचारल.

" आई ही भक्ती आणि खुशी. त्या परांजपे सरां सोबत आल्या आहेत." कबीरने सांगितल.

" तुम्ही सतीश राव ना ?"

" हो वहिनी."

"तुम्ही इथे कसे?"

ते काही म्हणाले नाही.

" मी सांगतो. ते माझ्या मुळे इथे आले आहेत." कबीर म्हणाला. सुलक्षणा ताई विलास राव बाकीचे त्याच्या कडे बघत होते. तो सतीश रावां कडे चालत गेला. हात जोडले. सॉरी सर.

" हात नका जोडू कबीर." सतीश राव उभे राहिले. त्यांनी त्याचे हात हातात घेतले.

" बसा तुम्ही सर. मला माफी मागु द्या. मी मोठी चुकी केली आहे. "

" कबीर अरे काय झालं आहे? " सुलक्षणा ताई विचारत होत्या.

" परांजपे सर आज मी सगळ्यां समोर तुमची माफी मागतो. माझा खूप मोठा गैरसमज झाला होता. मला वाटल होत बाबा गायब होण्या मागे यांचा हात आहे. कारण बाबा आणि हे सर शेवटच्या दिवशी सोबत होते. मामाने मला थोडे पुरावे दाखवले होते. बाबा गेल्या वर आपली बरीच प्रॉपर्टी कमी झाली. फार्म हाऊस, वर्क शॉप, एक बंगला. ते यांनी घेतल अस सांगितल. "

" अरे ते तुझ्या मामाने विकल. मी त्यांच बोलण ऐकल होत. " विलास राव मधे म्हणाले.

" मला चौकशी केल्यावर समजल होत की यात परांजपे निर्दोष आहेत. फक्त कोणी विकल ते माहिती नव्हतं. म्हणजे तस मामाने मला लहान पणा पासुन सांगितल होत . म्हणून मी यांची कंपनी टेक ओव्हर केली होती. मी या लोकांना खूप त्रास दिला. या साठी मी खुशीच्या सह्या घेतल्या. तिला माझ्याकडे काम करायच नव्हत तरी बळजबरी धमकी देवून तिला ऑफिस असिस्टंट केल. तिचा अपमान केला. या लोकांना रहायला घर नव्हतं, पैसे नव्हते. खुशी रीक्वेस्ट करत होती. बाबांना घरी राहू दे. मी तीच काहीही ऐकत नाही. परांजपे सर आजारी होते. ट्रीटमेंट साठी पैसे नव्हते. कसतरी त्यांनी केल. " कबीरच बोलून झाल. सगळे शांत बसले होते.

" कबीर खुशी जवळ आला. सॉरी खुशी. "

" ठीक आहे कबीर आम्ही विसरलो ते. ती परिस्थिती तशी होती. काही हरकत नाही. " खुशी हळूच म्हणाली.

विराजला आत्ता समजल सगळं की दादा का टेंशन मधे होता. खुशी का त्याला सर म्हणत होती. अशी स्टोरी आहे का ही. आता काय होईल? ही वहिनी दादाला हो म्हणेल का? दादा किती ड्रामा करतो आहे तिच्या समोर. तिच्या समोर शांत असल्याचा दाखवतो आहे.

"पण तू का अस केल कबीर? मी तुला अस शिकवल का? पैसे तुझ्यासाठी एवढे महत्वाचे आहेत का?" सुलक्षणा ताई ओरडल्या.

" नाही आई. मला काही समजल नाही. मी बाबांसाठी अस केल. " कबीरने सांगितल.

" असा बदला घेण. दुसर्‍याला त्रास देण कितपत योग्य आहे? या पोरीचा त्यात की दोष आहे सांग बर. लहान आहे ती. तुझ्या मुळे किती तिला वाईट अनुभव आला. सतीश राव पूर्वी पासून अतिशय सज्जन माणूस. ते का अस करतील आणि त्यांना कसली कमी होती तर ते आपली प्रॉपर्टी घेतील. तुला आधी चौकशी करता आली नाही का? स्वतः च्या बाबांसाठी तू दुसर्‍याचा बाबांना त्रास देत होतास. या पुढे मला विचारल्या शिवाय असे कोणतेही प्रकार तू करणार नाही कबीर समजल ना?" सुलक्षणा ताई खुपच रागवत होत्या.

" हो आई, माझी चूक झाली. "

सुलक्षणा ताई सतीश रावांजवळ गेल्या. हात जोडले. " माफ करा भाऊजी."

" वहिनी प्लीज अस करु नका. मी सगळ विसरलो. "

" तुमच किती नुकसान झाल ते आम्ही भरून देवू. तुम्ही मला फोन करायचा होता. मी चांगल बघितल असत कबीर कडे."

" मला काय माहिती हा तुमचा मुलगा आहे. त्याने नाव बदलल होत. तुमच्या कंपनीच ही नाव आता भालेराव ग्रुप अस आहे. मला तुम्ही नाईक म्हणून माहिती आहात. " सतीश राव बरोबर म्हणाले.

" अरे हो आपल्या कंपनीच नाव का बदलल कबीर ? " विलास राव विचारत होते.

" ते मी लहान असतांना मामाने बदलल. मला माहिती नाही. " कबीर म्हणाला.

" सुलक्षणा तुला माहिती असेल. "त्यांनी विचारल.

कोणी काही म्हणाल नाही.

" सुलक्षणा सांग. " विलास राव परत म्हणाले.

" बाबा तुम्ही सापडत नव्हते. आई सिरियस होती. तिला मधले बरेच वर्ष काय झाल ते माहिती नाही. विराजला मामीने मोठा केला. " कबीरने सांगितल.

" काय? " ते उठून आले. सुलक्षणा ताईंना परत जवळ घेतल. " आता बर वाटतय ना."

" हो मी ठीक आहे. "

" सविता थँक्यु."

"हे दोघ मुल माझेच आहेत भाऊ. अस म्हणु नका. " सविता म्हणाली.

विलास राव सतीश रावांकडे गेले." माफ कर सतीश. हे ना अगदी काहीच्या काही झाल. "

" याची खरच काही गरज नाहिये विलास. " सतीश राव म्हणाले.

" हा तुमच्या मनाचा मोठे पणा झाला पण कबीरची यात चूक झाली आहे. कबीर इकडे ये यांची नीट माफी माग. "

कबीर पुढे आला त्याने हात जोडले. सतीश रावांनी त्याला जवळ घेतल.

"सोनू सगळ्यांना पाणी आण बेटा. " सुलक्षणा ताई म्हणाल्या.

ती आणि सविता मामी आत गेली.

"पण हे झाल कस? तुम्हाला कोणी किडनॅप केल? " सुलक्षणा ताई विचारत होत्या.

" प्रशांत, विकासने केल." विलास राव हळूच म्हणाले. सविताने ऐकायला नको एवढ्यात अस त्यांना वाटत होत. ती खूप चांगली होती.

"काय? ते दोघ बदमाश आहेत हे माहिती होत. पण इतक करतील वाटल नव्हत." सुलक्षणा ताई म्हणाल्या.

" हो मामा दोषी होता. त्याने हे प्लॅनिंग केल होत."

" जावू द्या तो विषय. सविता त्रास करून घेईल."

सोनू सगळ्यांना पाणी देत होती. ती खुशी कडे बघत होती. खुशी तिच्याशी हसली. छान आहे कबीरची बहीण. दीपु सारखी. खुशीने तिच्या कडून तांब्या पेला घेतला. तिने मंगेश, रोहित, भक्तीला पाणी दिल.

" आई आज आज खुशी मुळे बाबा सापडले. ती तिकडे चौकशी करायला गेली होती तर तिला ही या लोकांनी किडनॅप केल होत. खूप गोंधळ झाला." कबीर अगदी हळू हळू आईला काय झाल ते सगळं सांगत होता.

कबीर खुशीच्या ग्रुप जवळ गेला. "भक्ती, रोहित, मंगेश, प्रकाश थँक्स. तुम्ही खूप मदत केली. मी शब्दात सांगू शकत नाही. मी आज किती खुश आहे. "

सुलक्षणा ताई त्यांच्या कडे बघत होत्या.

खुशी शांत उभी होती. चांगली आहे मुलगी. हे दोघ प्रेमात होते तरी कबीरने हिला इतका त्रास दिला. यांच्या साठी का? प्रशांतने हे चुकीच शिकवल. पण या केस मुळे हे दोघ भेटले हे छान झालं.

" निघायच का खुशी, भक्ती?" परांजपे म्हणाले.

" अस कस आता जेवून जा. " विलास राव म्हणाले.

" नाही घरी काही माहिती नाही. रश्मी काळजी करत असेल. आम्ही निघतो. "

" चहा तरी घ्या." विलास राव म्हणाले.

"ठीक आहे. घरी फोन करतो." सतीश राव बाजूला उभे होते. ते रश्मी ताईंना सगळ सांगत होते. त्या टेंशन मधे होत्या. "पण एक बर झाल संकट टळल. आपल्या वरचा आरोप गेला. खुशी कडे फोन द्या. "

खुशी... त्यांनी आवाज दिला." तुझी आई आहे. "

" तू कशी आहेस बेटा? हाताला जास्त लागल का?" रश्मी ताई काळजी करत होत्या.

"आई मी ओके आहे. "

" कोणी काही केल नाही ना? "

" नाही काहीच नाही. "

" केव्हा परत येताय? "

" थोड्या वेळाने निघतो. "

" आता कुठे आहात?"

"कबीरच्या घरी. "

"तिकडे कश्याला जात बसलात?" रश्मी ताई चिडल्या होत्या.

" भक्ती कुठे आहे?"

"भक्ती घे. आई बोलते आहे." त्या दोघी बोलत होत्या.

खुशी घाबरली. बापरे आईचा विरोध आहे. मी ही गोष्ट विसरून गेले होते. आईला काही माहिती नाही की कबीर चांगला आहे. तिच्याशी मोकळ बोलाव लागेल. मला तिला सांगव लागेल माझ्या आणि कबीर बद्दल. मी कबीर बाबतीत खूपच पुढे गेली आहे. आता मी त्याच्या शिवाय राहू शकत नाही.

सतीश राव, विलासराव बोलत होते. रोहित, खुशी, भक्ती, मंगेश एका बाजूला उभे होते. कबीर त्यांच्यात आला. "खुशी इकडे ये ओळख करून देतो."

"विराज, सुदेश, सोनू ही खुशी."

" तुझी मैत्रीण का दादा?" सोनूने डायरेक्ट विचारल.

" माझ्या ऑफिस मधे होती." कबीर म्हणाला.

ती त्यांच्याशी हसली.

"आपण ऑफिस मधे भेटलो आहोत. तू आता कुठे जॉब करते?" विराज म्हणाला.

"रोहित कडे."

"तु एमबीएची तयारी करते आहेस ना?" विराजने विचारल.

"हो पण माझा काहीच अभ्यास झाला नाही ." खुशी म्हणाली.

"आता परीक्षा आहे. मला ही टेंशन आहे." विराज छान बोलत होता.

"हो ना. आता मी सिरियस होणार आहे. "खुशी म्हणाली.

कबीर खुशी जवळ आला. "खुशी एक मिनिट इकडे ये. "

विराज कबीर कडे बघत होता." आम्ही बोलतोय ना."

"तुम्ही नंतर बोला. आईशी ओळख करून द्यायची आहे. प्लीज."

कबीर खुशीला घेवून किचन मधे आला. मामी, सुलक्षणा ताई काहीतरी बोलत होत्या. मामी टेंशन मधे होत्या. नक्की यात मामांचा हात असेल त्यांना शंका होती. त्या विचारत होत्या.

"आई, मामी ही खुशी." कबीर म्हणाला.

त्या छान हसल्या. "ये ग इकडे. गोड मुलगी आहे."

सुलक्षणा ताईंनी दोघांना जवळ घेतल. खुशी, कबीर दोघ गडबडले. विराज ही त्यांच्या मागे होता. तो सुलक्षणा ताईंशी हसत होता.

"मी मदत करू का काकू?" खुशी म्हणाली.

" तुला चहा करता येतो?"

हो. खुशी विचार करत होती. माझ तेच तर काम होत ऑफिस मधे .

"नको खुशी, आई तिच्या हाताला लागल आहे." कबीर अति काळजी करत होता.

" कबीर जा हिला हाताला मलम लावून दे." सुलक्षणा ताई म्हणाल्या.

"आई तू पण चल ना. "

भक्ती ही किचन मधे आली. ती मामींना मदत करत होती.

खुशी, कबीर, सुलक्षणा ताई आत आल्या.

"बस बेटा काय लागल?"

"आई तिला बांधल होत तर दोर लागला. "

"एवढा. " त्यांनी मलम बाहेर काढल.

सुलक्षणा... सुलक्षणा.... विलास राव आवाज देत होते.

"आई जा आता. " कबीर म्हणाला.

त्या छान हसत होत्या. "कबीर तू बघ हिच्या कडे."

"हो. मी तयार आहे." कबीर हळूच म्हणाला. खुशी लाजली होती तिने त्याला मारल.

" हळू हात सांभाळ. "

" काही झाल नाही मी ठीक आहे कबीर."

" गप्प एकदम." कबीरने हाताला मलम लावल.

"दुखतोय का हात? "

" थोडासा."

"आता बघ मी मलम लावला ना. तुझा हात लगेच नीट होईल. "कबीर म्हणाला.

" काहीही कबीर. तू स्वतःला खूप भारी समजतो ना." खुशी म्हणाली.

" मग आहेच मी छान. एकदा मिठीत ये ना. "

" नाही कबीर काकू येतील. "

" नाही येणार."

" मी जाते." खुशी उठली. कबीरने तिचा हात धरून ठेवला.

खुशी हसत होती." जावू दे ना."

तो तिच्या कडे बघत होता. "आता लवकर होकार दे खुशी. माझ्याशी लग्न कर. आता बोर झाल हे. हो नाही."

ती त्याच्या मिठीत होती.

" अस छान वाटत ना? "

हो. खुशी म्हणाली.

बाहेरून आवाज आला. खुशी बाजूला सरकली. सुलक्षणा ताई आल्या. "झाल का ड्रेसिंग? अरे काहीही केल नाही तुम्ही. दोघ काय बोलत बसले नुसत. "

" ठीक आहे काकू. कबीरने मलम लावल. "

" बर वाटतय ना? कबीरच्या हाताला गुण आहे ह. तो खूप प्रेमाने सगळ्यांच करतो. जखम लगेच बरी होते. " सुलक्षणा ताई म्हणाल्या. खुशी हसत होती. कबीर ही हसत होता.

" चला आता चहा घ्या. की बसताय इथेच. "

खुशी उठली. ती बाहेर आली.

"कुठे होती ग?" भक्ती विचारत होती.

"आत." खुशीने हात दाखवला.

"मजा आहे."

"भक्ती चूप."

" आई काय म्हटली?" खुशीला काळजी वाटत होती.

"आपण इकडे आलो म्हणून काकू चिडल्या आहेत." भक्ती म्हणाली.

"हो ना भक्ती. आईची भीती वाटते. तिचा नकार आहे."

सगळे मुल एका जागी बसले होते. कबीरला खुशी जवळ बसायच होत. पण एका बाजूने भक्ती होती एका बाजूने सोनू. तो नुसता तिच्या कडे बघत होता.

"कबीर दादा बस ना. ओह तुला जागा नाही. " विराज मुद्दाम म्हणाला.

रोहित कबीर कडे बघत होता. याला माहिती आहे वाटत. भक्ती बाजूला सरकली.

"इकडे ये कबीर." रोहितने हाक मारली. ते चहा घेत होते. कबीर खुशीला मदत करत होता.

" कबीर काय हे कबीर. सगळे बघत आहेत. माझा कप खाली ठेव." खुशी ओरडली.

" तुला हाताला लागल ना म्हणून मदत करत होतो."

" मला काहीही झाल नाही." ते दोघ सोबत खूपच गोड दिसत होते.
......

सविता मामी रूम मध्ये होत्या. त्या मामांना फोन लावून बघत होत्या. काय झाल आहे नक्की? यांनी केल का हे? त्या काळजीत होत्या. पाहुणे गेल्याशिवाय समजणार नाही.

चहा झाला.

"आम्ही निघतो. चला मुलांनो." सतीश राव आवाज देत होते.

सुलक्षणा ताई मुलांजवळ आल्या. "ये ग परत खुशी. आवडल का घर."

"हो काकू छान आहे."

"तुमची खुशी छान आहे सतीश राव." त्या म्हणाल्या.

ते सुध्दा हसत होते.

खुशी लाजली होती.

"भक्ती ये ग परत."

"हो काकू. "

सगळे बाहेर आले.

कबीर खुशीच्या मागे मागे होता. ती पण त्याच्याशी छान बोलत होती. त्यांचा ग्रुप त्यांना प्रोटेक्शन देत होता.

सगळे कार मधे बसले. रोहित कार चालवणार होता. मंगेश पुढे बसला होता. भक्ती, खुशी, सतीश राव मागे. कबीर बाहेरून आत बघत होता. तो रोहितशी बोलत होता.

"परांजपे सर थँक्स. मी दोन तीन दिवसानी येतो तिकडे आपण कंपनी ट्रान्सफरची प्रोसेसिंग सुरू करू."

"भक्ती, खुशी थँक्स." त्याने खुशी कडे बघितल. डोळ्याने बाय सांगितल.

खुशी रस्त्याने खुश होती. ती भक्ती भक्ती जवळ आरामात बसलेली होती. सतीश राव फोनवर बोलत होते. आज सकाळपासून त्यांचं सगळं काम बाकी होतं. तसा विजय हुशार होता. दिवसभर काय झालं ते विचारत होते.

"भक्ती मला असं वाटतं आहे की माझ्यावर आई चिडली आहे." खुशी म्हणाली.

"तुझ्यावर नाही कबीर वर नक्की चिडल्या आहेत काकू." भक्ती म्हणाली.

"काय करू मी भक्ती तुला असं वाटतं का की कबीर खराब आहे."

"नाही कबीर खूप चांगला आहे. तू जेव्हा आत मध्ये किडनॅप होते तेव्हा त्यांनी ज्या पद्धतीने काकांची काळजी घेतली ते मी बघितला आहे. त्याने काकांचे सगळे संकट स्वतःवर घेतले. त्या मामाने काकांच्या डोक्यावर गन ठेवली होती. "

"बापरे."

" हो, तर कबीरने त्यांना वाचवलं. तू एक काम कर ख़ुशी काकूंना सगळं सांगून दे. त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणू दे. त्यांच्या मनात नाही गोष्ट जायला पाहिजे. "भक्ती म्हणाली.

" बरोबर बोलते आहेस भक्ती. मला पण आईला लपवून कुठलीही गोष्ट करायची नाही. पण मला तर त्यासोबत कबीर सोबत सुद्धा राहायचं आहे. कबीर इकडे परत आला की आम्ही बोलणार आहोत. "

" छान बोला. सगळं ठरवून घ्या. मी तुझ्यासाठी खूप खुश आहे खुशी. "
....

कबीर, विलास राव बाहेर बोलत बसले होते. सुदेश, विराज त्यांच्या सोबत होते. सुलक्षणा ताई ही बसलेल्या होत्या.
" आई बाबांना आत ने आराम करा. "

सुलक्षणा ताई, विलास राव उठले. त्या त्यांना घर दाखवत होत्या.

" कबीर अरे यांना कपडे नाहीत. "

" हो बाबा चला आपण खरेदीला जावु."

"आता नको मला तुझे कपडे दे."

कबीर टी शर्ट पँट घेवून आला.

"मला सैल होतील पण ठीक आहेत."

सुलक्षणा ताई, विलास राव रूम मधे आले. त्यांनी सुलक्षणा ताईंना जवळ घेतल. "अहो तुम्ही आता मला सोडून कुठे जायच नाही. "

" मला ना सुलक्षणा आता काहीच नको. तुझ्या सोबत आरामात रहायचा आहे."

" कबीरने छान बिझनेस सांभाळला आहे. विराज ही आता हाताशी येईल. काळजीच कारण नाही."

"कबीरच लग्न झाल नाही?"

"नाही आता तुम्ही आले ना आता वाजत गाजत करू. "

"ठरल का त्याच काही?" त्यांनी विचारल.

" हो म्हणजे त्याने अजून मला सांगितल नाही. असच समजल. परांजपेची खुशी. "

"छान आहे मुलगी. मला वाटलच होत. मलाही ती आवडली. " त्यांनी थोडा वेळ आराम केला.

कबीर आत आला. "बाबा आपल्याला थोड्या वेळाने हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. "

" का बरं मला काय झालं? "

" काही झालं नाही. पण मला तुमचं फुल चेकअप करायचं आहे. आई तू पण तयार रहा. आपण तिघे जाऊ तिकडुन येतांना बाबांसाठी कपडे घेऊन येऊ. "

" हो चालेल."


🎭 Series Post

View all