गुंतता हृदय हे भाग 53

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का

गुंतता हृदय हे भाग 53
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

कबीर विराजशी बोलत होता. "सुदेश, सोनु कडे लक्ष द्यावं लागेल."

"दादा मामा खरच असा आहे?"

"या पेक्षा डेंजर आहे. खूप स्वार्थी आहे. त्याच्या साठी पैसा सगळं काही आहे . अरे तू त्याचे लोक बघायला हवे होते. एवढी मोठी टीम आहे त्याची. पहिलवान मुल. इतके मारामारी करतात. त्यात काही माझे मित्र होते. त्यांच्या कडे गन होती. आपण खूप मोठ्या संकटातून वाचलो आहोत." कबीर खूप सांगत होता.

" मला हे इतके दिवस का सांगितल नाही? "

"तु शिकतो आहेस. लहान आहेस. आरामात रहा. या कामाचा मोठ असल्याचा खूप त्रास होतो. बर झाल तु या पासून दूर आहेस. असच छान हसत खेळत आयुष्य जग. मोठ्यांच जग वाईट असत. बाबा आले आहेत. एन्जॉय कर आता. " कबीर म्हणाला.

" आपण आता काळजी घेवू मी ही आहे." विराज म्हणाला.

" हो तुझ शिक्षण होऊ दे मग मी आरामात राहणार आहे. तू कर काय करायच ते. "कबीर म्हणाला.

" खुशी सोबत? " विराज म्हणाला.

" हो. " कबीर थोडा हसल्या सारख वाटत होता.

" दादा आता तरी नीट सांग. कधी लग्न करताय? " विराज उत्सुक होता.

" काय सांगणार? आहे ते दिसत ना. लग्नाच माहिती नाही. आमच्या लव स्टोरीत व्हीलन खूप होते. म्हणजे आहेत. "

" आता कोण? "

" तिच्या घरचे अजून त्या मॅडमची समजूत काढावी लागेल." कबीर म्हणाला.

"पण असा चांगला जोडीदार मिळण महत्वाच आहे ना दादा."

"हो मिळण ही महत्त्वाच. आणि टिकवून ठेवण ही महत्वाच. मलाही आधी हे समजल नाही. खुशीला मी टाळत होतो. नंतर तिच्या साठी मला काय काय कराव लागल माझ मलाच माहिती. अजूनही आमच लग्न ठरलं नाही.

"पण आता तुम्ही दोघ तयार आहात होईल आता थोडे दिवस."

"हो. मी लकी आहे की खुशी माझ्या आयुष्यात आहे. जेव्हा अशी चांगली व्यक्ति आयुष्यात येईल ना तो चान्स सोडायचा नाही. स्वतःच चांगल करून घ्यायच. "

"हो दादा बरोबर. खूप छान आहे खुशी वहिनी. तुम्ही दोघ सोबत छान दिसतात. "

सोनू आली." कबीर दादा आई रडते आहे. "

ते दोघ आत गेले. सविता मामी रूम मधे दार लावून बसली होती.

सुदेश दार वाजवत होता. "दादा, आई बघ कस करते आहे."

"काय झालं मामी दार उघड." कबीर दार वाजवत होता.

सुलक्षणाताई ही आल्या. "सविता अग काय हे? दार उघड. काय चाललय?"

"आई रडते आहे." सोनू ही रडत होती. कबीरने तिला जवळ घेतल. "घाबरू नको मी आहे ना. "

"मामी दार उघड हे बघ सगळे घाबरले." विराज म्हणाला.

"मी दार तोडेन." कबीर म्हणाला.

त्यांनी दार उघडलं.

सविता मामी रूममध्ये बसलेली होती. सगळे आजुबाजूला होते. कबीर त्यांच्या जवळ जाऊन बसला. "मामी का त्रास करून घेते आहेस. अस करता का? "

सुलक्षणाताईंनी त्यांना जवळ घेतलं." सविता इतकी साधी आहे. तिला त्रास होतो आहे. जास्त विचार करायचा नाही सविता."

"काय झालं कबीर? मला माहिती आहे या मागे तुझे मामा आहेत. हे खर आहे ना?" सविता मामी विचारत होती.

कबीर शांत होता . " आपण या विषयावर नको बोलायला."

"मला हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे कबीर. प्लीज सांग. " सविता विचारत होती.

" विराज, सुदेश, सोनू तुम्ही जरा बाहेर बसा." ते बाहेर गेले. सुलक्षणाताई सविताजवळ बसलेल्या होत्या. कबीर उठून उभा राहिला.

" हे प्रशांत मामाने, विकास मामाने आणि त्यांच्या ग्रुपने केल. बाबांना इतके वर्ष कीडनॅप केल. कोंडून ठेवल. त्रास दिला. मी गेलो तर बाबा तळघरात बसलेले होते. घाबरलेला चेहरा. किती बारीक झाले आहेत बघितल ना. त्यांना काही झाल असत तर? बहुतेक हा विकास मामाचा प्लॅन होता. त्यांचा ग्रुपच कटकारस्थानी आहे. " कबीर सांगत होता. सुलक्षणा ताई, सविताच्या डोळ्यात पाणी होत.

" भयानक प्रकार आहे हा. तुझे मामा का असं करतात ते समजत नाही. कसली कमी होती का घरात. बहिणीचा सुद्धा विचार केला नाही. मला तर अगदी लाजल्यासारखं झालं आहे. ताई माफ करा. " सविता म्हणाली.

" तू का त्रास करून घेते सविता. तू कशी आहेस हे आम्हाला माहिती नाही का? तू का माफी मागतेस. शांत हो. "

" मला यातल काहीच माहिती नव्हत. "

" हो सविता आम्हाला माहिती आहे ते."

" बरं का केलं यांनी हे? प्रॉपर्टी साठी ना. एवढं काय डबोल वरती घेऊन जायचं आहे का? शेवटी आपले कर्मच आपल्याला कामे येतात. देवाच्या घरी त्यालाच न्याय असतो. " सविता मामी म्हणाली.

" एवढ जर प्रशांतला समजलं असतं तर काय झालं असतं. माझ्या सख्या भावाने अस केल हेच दुर्दैव आहे. " सुलक्षणा ताई म्हणाल्या.

एकीकडे बाबा सापडले म्हणून आनंद होता . तर मामाने हे केल त्याला अटक झाली म्हणून दुःख ही होत. सोनू, सुदेश शांत बसलेले होते. विराज तिकडे बघत होता.

"मी एक बोलू का ताई? मी, सुदेश आणि सोनू आम्ही दुसरीकडे रहायला जातो. "

" का आमचं काही चुकलं का? " सुलक्षणाताईंनी विचारलं.

"तुमचं काही चुकलं नाही ताई. मलाच लाज वाटते आहे. येणारे जाणारे बोलतील. मुलांच्या मनावर परिणाम होईल. आम्ही आधी सारख मानाने इथे राहू शकत नाही. "

" काय बोलतेस तू सविता. प्रशांच्या कर्माची शिक्षा तुला कशाला? मुलांचं कॉलेज इथे आहे. तुझा मला आधार आहे. मी आजारी असतांना या घरासाठी मुलांसाठी तू किती केल हे मी विसरु शकत नाही. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तुला आणि मुलांना कधीच अंतर देणार नाही. या पुढे असा विचार करायचा नाही. " सुलक्षणा ताई म्हणाल्या.

" प्लीज परवानगी द्या ताई . तुमच्या समोर मला अपराध्या सारख वाटत आहे. "

" सविता शांत हो. "

विशाल राव आत आले.

ते सविता कडे बघत होते. कबीरने त्यांना बसायला खुर्ची दिली. सविता उठून उभी आली.

" सविता रडू नकोस. अजिबात काळजी करायची नाही. तु म्हणशील ते करू आपण. वाटल तर आपण प्रशांतला शिक्षा होवू देणार नाही. तुला मुलांना जे हव ते सांग. "

" नाही भाऊ यांच्या सोबत मी आता राहणार नाही. यांचा माझा काही संबंध नाही." सविताने निर्णय घेतला होता. अश्या माणसाची सावली ही आता मुलांवर पडू द्यायची नाही.

" अस करु नकोस सविता. माणसाकडून चुका होतात ."

"या चुका नाही भाऊ जाणून बुजून केलेल कारस्थान आहे. याला माफी नाही. तुमच्या सोबत अस केल तरी तुम्ही कस काय त्यांना माफ करताय? " तिने विचारल.

" माफी अशी नाही. पण मुलांकडे बघून वाटत. त्यांचा काय दोष आहे. सोनु सारखी रडते आहे. " विलास राव म्हणाले.

कबीरला कसतरी वाटत होत. मामाने का अस केल त्याला ही मोठा प्रश्न पडला होता. पूर्ण घर दुःखी आहे. बाबा किती वर्षांनी आले तो आनंद ही घेता येत नाही.

कबीर हॉल मध्ये आला. सोनू आली." दादा काय झाल बाबा वाईट वागले का?"

"काळजी करायची नाही सोनू .तू तुझा अभ्यास कर जा."

सुदेश ही एकदम येवून भेटला. कबीर त्याला सांभाळत होता. "विराज या दोघांना आत ने लक्ष दे. मला पोलिस स्टेशन मधून फोन येतो आहे. मी बाहेर आहे."

"बोला इंस्पेक्टर."

"तुम्हाला आणि नाईक साहेबांना इकडे याव लागेल. या लोकांविरूध्द कंप्लेंट करायला. मग केस तयार होईल."

"हो उद्या सकाळी येतो."

"त्यांच्या बाकीच्या साथीदारांना पकडल."

" बर झाल कोणाला सोडू नका. उद्याच्या पेपर मधे ही बातमी येवू द्या नावा सकट. म्हणजे तो एक मोठा पुरवा तयार होईल. या पुढे कोणी आमच नाव घेणार नाही. "

"हो साहेब. लगेच करतो हे काम. "

विलास राव, सुलक्षणा ताई, कबीर हॉस्पिटल मधे निघाले. " विराज घराकडे बघ. "

" हो दादा. "

डॉक्टर विलास रावांना तपासत होते. त्यांच्या टेस्ट करून घेतल्या. " वजन खूप कमी झाल आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही. त्यांना एकट सोडू नका. आनंदी वातावरणात ठेवा. " डॉक्टरांनी डायट लिहून दिला.

येतांना त्यांना कपडे घेतले. बाकीचे चांगल्यातले कपडे नंतर घेणार होते.

"मामाच काय करू या?" कबीरने कार मधे विषय काढला.

" सविता नाराज आहे. पण ती चिडलेली ही आहे ." सुलक्षणा ताई म्हणाल्या.

"हो ना मलाही कसतरी वाटत आहे. " विलास राव म्हणाले.

" प्रशांतला शिक्षा व्हायला हवी. कोणी कस ही वागू शकत नाही. " सुलक्षणा ताई म्हणाल्या.

"बरोबर. बाबांसोबत आपल्याला ही खूप त्रास झाला." कबीर म्हणाला.

"हो ना माझ्या मुलांच बालपण हरवल. ह्यांन परिवार असून एकट त्रासदायक जगण नशिबी आल. ही काही गम्मत नाही. यांच्या आयुष्याशी तो खेळला. त्याच्या मुळे आपण किती सहन केल. तरी आपण सोबत होतो. हे एकटे होते." सुलक्षणा ताई म्हणाल्या.

" हो आई तू किती आजारी होती त्याच काय?" कबीर म्हणाला.

" हो ना सुलक्षणा आता बर वाटतय ना? कबीर अरे आता का नाही हिची तपासणी करून घेतली. " विकास राव काळजीत होते.

" बाबा आईचा डॉक्टर वेगळा आहे. "

" त्या विलास. प्रशांतला सोडू नको कबीर. नाहीतर त्याची हिम्मत वाढत जाईल. ते मूल डेंजर आहे पैसे साठी प्रॉपर्टी साठी काहीही करतील असे." विलास राव म्हणाले.

" हो ना. बाबा उद्या सकाळी आपल्याला पोलीस स्टेशन वर जाव लागेल. कंप्लेंट करून टाकू. " कबीर म्हणाला.

हो.
......

परांजपे घरी आले. रश्मी ताई काळजी करत होत्या. त्यांनी खुशीला जवळ घेतल." हात बघू."

" आई मी ठीक आहे. "

आधी तर त्या काळजीने विचार पुस करत होत्या. तरी खुशीने विशेष काही सांगितल नाही. नंतर त्या चिडल्या.

" खुशी तुझ काय सुरू असत आम्हाला समजेल का? तू कधीही कुठेही फिरत असते. ते चालणार नाही. एवढी रिस्क घ्यायचो काय गरज होती? " त्या चिडल्या.

"आई आता काही प्रॉब्लेम नाही ना. नको ना ओरडू." खुशीने त्यांना मिठी मारली.

" तरी सुद्धा मी काय सांगते ते समजल ना खुशी . फक्त ऑफिस मधे जायच घरी यायच. उगीच इकडे तिकडे केलेल मला चालणार नाही." त्यांना म्हणायच होत त्या कबीरला भेटायला जायच नाही.

भक्ती तिच्या कडे बघत होती.

" भक्ती इकडे ये इथे बस. काय आहे हे? तू हिला कोणत्याही कामात काय सपोर्ट करते? तुम्हाला दोघींना समजत नाही का की अश्या एकट्या ठिकाणी जावु नये. "

" काकू हे काम महत्वाच होत. मंगेश सोबत होता. " भक्ती म्हणाली.

" तरी खुशी कीडनॅप झालीच ना? आम्ही आहोत. आम्ही बघू. जा आत आवरून घ्या."

सतीश राव आत होते. रश्मी ताई आत गेल्या. त्या चिडलेल्या होत्या.

" काय सुरू आहे हे रश्मी? अग मुली दमल्या आहेत. "

" म्हणून त्यांना काही बोलायच नाही का? मला ना त्या कबीरचा खुप राग येतो आहे. " रश्मी ताई म्हणाल्या.

" का?"

"का म्हणजे काय? आज ही त्याच्या मुळे खुशी वर तुमच्यावर संकट आल. "

"अस काही नाही. उलट आज त्या कबीरने मला वाचवल. खुशी त्याच्या मुळे सुटली. तो चांगला आहे. "

"काय झाल होत?"

"अग इतके गुंड होते ना. खर तर मी तुला हे सांगणार नव्हतो .पण एकाने माझ्या डोक्यावर गन ठेवली होती. कबीरने मला वाचवल. "

" बापरे..." रश्मी ताई पुढे आल्या घाबरून गेल्या होत्या.

" त्या लोकांपासून आपण दूर बर . "

" मी काय सांगतोय रश्मी त्या कबीरने मला वाचवल."

" पण ही वेळ त्याच्या मुळे आली ना. ते बघा ना. "

" नाही रश्मी गैरसमज नको आहे. कबीर म्हणत होता तुम्ही नका येवू. तिकडे मीच गेलो. खुशी ही स्वतः फार्म हाऊसवर गेली. कबीर ने नव्हत सांगितल. "

" तुम्ही काय त्याची बाजू घेताय?"

"मी बाजू घेत नाही रश्मी .जे सत्य ते सांगतोय. कोणी परमनंटली चांगल किंवा वाईट नसत परिस्थिती तशी असते. पण यातून चांगल झाल नाईक साहेब सापडले. ते लोक खूप संकटात होते. खूप चांगले आहेत ते. तू ओळखत नाही का त्यांना? "

" ओळखते पण जे झाल ते माझ्या मनातून जात नाही." रश्मी ताई म्हणाल्या.

"असा राग धरून ठेवायचा नाही. आपल्याला झाला थोडा त्रास. पण ते आपल्या नशिबात असेल. "

रश्मी ताई आता शांत झाल्या होत्या.

सतीश राव विचार करत होते. हे काहीही असेना मला खुशीचा विचार करावा लागेल. ती आणि कबीर प्रेमात आहेत स्पष्ट दिसत आहे. नाईक फॅमिली चांगली आहे. कबीर किती वेळा माफी मागत होता. माझ्या मुलीच चांगल होईल.

खुशी भक्ती जेवायला आल्या. रश्मी ताई आता काही म्हणाल्या नाही. जेवण झाल्यावर खुशी आत होती. रश्मी ताई मलम घेवून गेल्या. त्यांनी खुशीचा हात हातात घेतला. मलम लावून दिल. तिला जवळ घेतल.

" आई सॉरी."

" झोप आता." त्या गेल्या.

खुशी विचार करत होती. आईशी कधी बोलू? कबीरला ही या बद्दल सांगायला हव. तो ऑनलाईन नव्हता. जावू दे त्याचे बाबा इतक्या वर्षाने भेटले. तो बिझी असेल.
......

सुलक्षणा ताईंच्या रूम मधे सगळे जमले होते. विलास राव आराम खुर्चीवर बसले होते. त्यांच्या बाजूला कबीर, सोनू, विराज, सुदेश होते. कॉटवर सुलक्षणा ताई, सविता मामी बसलेल्या होत्या. सगळे मामी कडे लक्ष देत होते.

विलास राव काय काय झाल ते सांगत होते. सगळ्यांच्या अंगावर काटा आला होता. कठिण वेळ होती. इतका त्रास दिला.

"विकास मामा मेन होता का? की प्रशांत मामा? " कबीरने विचारल.

"विकासचा हा प्लॅन होता."

"तरी यांना समजत नाही का घरचे कोण? कोणावर विश्वास ठेवायचा?" सविता म्हणाली.

"मला ही याच गोष्टीच वाईट वाटत की माझ्या भावांनी अस केल." सुलक्षणा ताई म्हणाल्या.

"हो ना एकदा सांगितल असत काय हव ते. मी दिल नसत का? " विलास राव म्हणाले.

" आम्ही उद्या त्यांची कंप्लेंट करतो. " कबीर सोनू, सुदेश कडे बघत होता.

" समजू दे त्यांना ही खराब वागल की काय होत." सविता म्हणाली.

सगळे जेवायला बसले. आज सुलक्षणा ताई ताट करत होत्या. सविता आत मधे होती.

" चला अहो. "

" हो आधी मुलांना दे." विलास राव म्हणाले.

" बाबा चला बसा. " विराज त्यांना घेवून आला.

नेहमीचा बेत होता. गोड केल नव्हत. प्रशांत मामाला अटक झाली होती म्हणून. सविता , सोनू, सुदेशला काय वाटेल.

नेहमीच वरण भात, भाजी, पोळी केली होती. तसं विलासरावांना पुरणपोळी खूप आवडत होती. पण आज असं एकदम पुरण टाकणं सुलक्षणाताईंना बर वाटल नाही. त्यांनाही प्रशांत बद्दल वाईट वाटत होतं.

विलासराव, कबीर, विराज, सुदेश, सोनू जेवायला बसले. सुलक्षणाताई सविताच ही ताट तयार होत. सगळे सविताची वाट बघत होते.

"चल ग सविता काय करते आहेस?" सुलक्षणा ताई आवाज देत होत्या.

सविता आत मधून वाट्यांमध्ये खीर करून घेऊन आली. सगळे त्यांच्याकडे बघत होते. त्यांना माहिती होतं हिच्या मनाची अवस्था नीट नाही. किती केलं तरी नवऱ्याला अटक झाली आहे. पण मनातलं दुःख बाजूला ठेवून विलासराव बऱ्याच वर्षांनी घरी आल्यामुळे तिने खीर केली होती.

" याची काही गरज नव्हती सविता." विलासराव म्हणाले.

"तुमच्यासाठी आणि ताईंसाठी केली भाऊ. तुम्ही खूप वर्षांनी भेटलात. जेवणात गोड पदार्थ हवा."

कबीर उठून मामी जवळ गेला. "मामी आपण बघू काय करता येईल ते."

"कबीर तुला खरच माझ्यासाठी काही करायचं असेल तर यांना शिक्षा झालीच पाहिजे. चुकीचं वागणाऱ्यांच मी समर्थन करत नाही. तुम्हीही त्यांना सोडू नका. मी परत एकदा सांगते. "सविता म्हणाली.

जेवण झालं विलासराव, सुलक्षणाताई रूम मध्ये गेले. ते दोघं बराच वेळ बोलत होते.

कबीर रूम मध्ये आला त्याने फोन बघितला. खुशी झोपली असेल. ती घरी गेल्यानंतर तिच्याशी बोलणं झालं नाही. तिला घरचे ओरडले असतिल. माझ्या मुळे तिला बोलणी बसतात.

त्याने राऊत यांना फोन लावला. ऑफिस कामाबद्दल बराच वेळ तो बोलत होता. बर्‍याच सूचना दिल्या.

"हो साहेब मी उद्या पासून कामाला सुरुवात करतो."

"आधी वकिलांना काॅन्टॅक्ट करून पेपर तयार करायला घ्या."

" हो साहेब."

"परांजपे इंडस्ट्रीचे प्रोजेक्ट ही त्यांना परत करायचे आहेत ते ही पेपर करा."

"ते दिले तर आपल्या कडे चार प्रोजेक्ट रहातील." राऊत म्हणाले.

"हो. ते ही मोठे प्रोजेक्ट आहेत करू ते. "

" साहेब तुम्ही हा चांगला निर्णय घेतला. "

" मला ही आता खूप बर वाटतय राऊत."

" तुम्ही इकडे केव्हा येताय. "

" एक दोन दिवसात. इकडे खूप गोंधळ झाला आहे."

" काय? "

कबीर सांगत होता.

" नाईक साहेब सापडले हे छान झाल."

" हो. " कबीरने थोड बोलून फोन ठेवला.
.....

विकास प्रशांतला लॉकअप मधे झोप येत नव्हती. त्यांचे बरेच साथीदार पकडले गेले होते.

" प्रशांत तू तर म्हणत होता कबीर विराज लहान आहेत माझ्या शब्दा बाहेर नाहीत. पण त्यांनी आपला पूर्ण प्लॅन खराब केला. आपल्याला जेलची हवा खावी लागते." विकास म्हणाला.

"तुमच्या मुळे मला ही अस लॉक अप मधे रहाव लागत." रुद्र ही चिडला होता .

"होईल काही तरी काळजी करायची नाही. ते इमोशनल लोक आहेत. सविता नक्की त्रास करून घेईल. मग हे लोक ठरवतील की आपल्याला शिक्षा नको करायला. " प्रशांत म्हणाला.

सगळे प्रशांत कडे बघत होते. "अस होईल?"

" हो. बघा तुम्ही. "

या वेळी सविताने प्रॅक्टिकली निर्णय घेतला होता. आणि तीच बरोबर होत. प्रशांत मामाला याची कल्पना नव्हती.


🎭 Series Post

View all