गुंतता हृदय हे भाग 54

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का
गुंतता हृदय हे भाग 54
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

सकाळी नाश्ता झाल्यावर कबीर आणि विलासराव पोलीस स्टेशन कडे जायला निघाले. त्यांचा वकीलही सोबत होता.

पेपर मधे बातमी आल्यामुळे सगळीकडे समजल होत. पोलिस स्टेशन बाहेर गर्दी होती. बर्‍याच मुलांचे आई बाबा कबीरची वाट बघत होते. त्यांना कल्पना नव्हती आपले मूल हे उद्योग करत आहेत. आता अटक झाल्यावर ते घाबरले होते.

कबीरची कार पोलीस स्टेशनच्या आवारात आली. बर्‍याच जणांनी मागे यायचा प्रयत्न केला. पाच मिनिट बोलू द्या. त्यांना बाहेर अडवल.

कबीर, विलास राव आत गेले. खूप लोक कबीरच्या पुढे मागे करत होते. पत्रकार विलास रावांशी बोलायची परमिशन मागत होते.

" हो साहेब बाहेर आले की बोलतील."

विकास. प्रशांत त्यांना आत बातमी समजली कबीर आला आहे.

विकास मामा, प्रशांत, रुद्र त्यांची टीम इतर मुलं सगळ्यांवर कंप्लेंट केली. बराच वेळ लागला.

किडन्याप करणे, प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न करणे, धोका देणे, धमकावणे असे बरेच आरोप लावले होते.

"मला या लोकांकडे चांगल बघायच आहे." कबीर म्हणाला.

" आत्ता नाही साहेब. हे प्रकरण खूप ताज आहे. लोकांच लक्ष आहे." इंस्पेक्टर म्हणाले.

" मला वाटत कबीर तू कायदा हातात घेऊ नको. या लोकांना इतका वेळ द्यायची गरज नाही. आपण कंप्लेंट केली आहे. आता त्यांना बरोबर शिक्षा होईल." विलास राव म्हणाले.

" त्यांनी तुमच्या सोबत जे केल ते योग्य होता का बाबा? गुन्हेगार सरळ गुन्हा करतो. ज्याने सहन केल त्याने काही बोलायच नाही. हा कोणता न्याय आहे. " कबीर म्हणाला.

" असच असत बेटा. आता ते लॉक अप मधे आहेत आपल्याला नियमाप्रमाणेच चालव लागेल. " विलास राव खूप धीराने घेत होते. कबीरला सांभाळत होते. तरुण मुलगा उत्साही, उगीच मारामारी नको.

" या लोकांकडून थोडी माहिती काढून घ्या. अजून आमची काही प्रॉपर्टी घेतली असेल तर ती यांची सही घेवून आम्हाला परत करा. "कबीर बर्‍याच सूचना देत होता.

" आजच हे काम सुरू करतो बघू कसा गुन्हा कबुल करत नाही. तुमच्या कडून साक्षीदार लागतील. त्याची लिस्ट द्या." इन्स्पेक्टर म्हणाले.

हो.

वकील ही केस तयार करत होते.

" बाबांना मृत घोषित केले होत, त्याच काय करता येईल? "कबीरने विचारल.

" वकील प्रोसेस सांगत होते. हे कागद पत्र लागतील. "

" हे काम आधी करा. "

त्यानंतर विलास राव, कबीर बाहेर आले त्यांना पत्रकारांनी घेरल. विलास राव त्यांच्याशी बोलत होते.

कबीर कोणाशी बोलला नाही.

नंतर ते दोघ ऑफिसमध्ये आले. विलास राव आता एकदम उत्साही वाटत होते." आपल्या फॅक्टरीत बराच फरक पडला आहे. कबीर तू सगळ खूप छान सांभाळल आहे . अतिशय हुशार आहेस. आहे त्यापेक्षा तू हा सगळा कारभार दुप्पट केला. मला तुझा अभिमान आहे कबीर." विलास राव खूप बोलत होते. मला ही तरुण पणी अशी कामाची आवड होती.

कबीरला वडिलांकडून मिळालेली ही शाबासकी खूप आवडली. कबीरने बाबांना पूर्ण फॅक्टरी दाखवली . ऑफिस फिरून दाखवल. सगळे येवून भेटत होते.

" शॉप ही मोठा छान आहे. स्वच्छ ठेवला आहे वर्क शॉप. "

ते केबिन मध्ये आले.

"बसा बाबा इथे." कबीरने खुर्ची पुढे केली.

"ही मेन चेअर. ती तुझी आहे." विलास राव म्हणाले.

"तुम्ही बसा ना बाबा. आता तुम्ही मेन बॉस आहात. मला तुमचा आशिर्वाद हवा आहे. "

"नाही रे बाबा मला आता मेन बॉस व्हायचं नाही. ही जबाबदारी मोठी असते. मला झेपणार नाही. तुम्ही मुलं बघा आता कारभार. मला आता तुझ्या आई सोबत आरामात रहायचं आहे. "विलास राव म्हणाले.

" तरीसुद्धा बाबा तुम्हाला आठवड्यातुन एक दोन वेळा ऑफिसमध्ये यावच लागेल. मला तुमच्या अनुभवाचा फायदा करून घ्यायचा आहे. जास्त काही नाही पण महत्त्वाच्या गोष्टीत तुमचं डिसिजन महत्वाचं आहे. " कबीर म्हणाला.

" काय सुरू आहे सध्या? "

कबीर सांगत होता कोणकोणते प्रोजेक्ट सुरू आहे. "यातले तीन प्रोजेक्ट परांजपे यांचे आहेत ते त्यांना मी परत करणार आहे. "

" परांजपे मंडळी चांगली आहे बेटा. तुझ्या मनात त्यांच्या विषयी काही राग नाही ना. "

" नाही बाबा. "कबीर म्हणाला.

"हे बघ कुठलाही निर्णय विचार करून घ्यायचा. नुसता आपला नाही समोरच्या लोकांचाही विचार करायचा."

" हो बाबा मी लक्षात ठेवेन. " विलास राव खूप बोलत होते. कबीर ऐकत होता. बाबा शांत छान आहेत. मधेच उठून तो त्यांना भेटला.

" अरे काय झाल कबीर? "

" बाबा मला अस तुमच्या समोर लहान असल्याच खूप छान वाटत आहे . "

ते हसत होते. मॅनेजर आत आले. कामाला सुरुवात झाली.
.....

सतीश राव सकाळी तयार होते. रश्मीताई पण नाश्ता बनवत होत्या. त्या शांत होत्या.

खुशी ऑफिसला जायची तयारी करत होती. भक्ती, दिपू कॉलेजला गेलेल्या होत्या. खुशी तिचा डबा भरत होती.

" आज आराम केला असता. "रश्मी ताई म्हणाल्या. त्या कितीही रागावल्या असल्या तरी त्यांना खुशीची काळजी होती.

" आई मी ठीक आहे. लवकर येईल. आई थोडी भाजी जास्त घेते . रोहितला आपल्या कडची भाजी आवडते."

हो.

खुशी ऑफिस मध्ये आली. नेहमीप्रमाणे वातावरण होतं तिचे मित्र-मैत्रिणी चहा घेत होते. राहुल तिच्याकडे बघत होता. "वेलकम खुशी. आज मी तुझ्या स्वागतासाठी फुलांचा बुके आणणार होतो. ऑफिसला यायला वेळ मिळाला वाटत. मग आज दुपारनंतर कुठे जायच? "

"सॉरी राहुल. ते मी सांगणार होते. " खुशी गडबडली.

" तुला माहिती ना हे ऑफिस आहे? आणि मी तुझा बॉस. तू कोणाची ही परवानगी न घेता सुट्ट्या घेतेस. मधेच कुठे तरी निघून जाते. आम्ही काय समजायचं? तुझ काम कोणी पूर्ण करायच? " राहुल ओरडत होता.

" काल ही इमरजन्सी होती. " खुशी म्हणाली.

" तुझ आयुष्य सिरियलच्या हेरॉईन सारख आहे वाटत. सगळे प्रॉब्लेम सोडवायला तुलाच जाव लागत. "

" अरे खरच राहुल."

" खुशी तुला नक्की इथे काम करायच की नाही ते समजत नाही. अस अॅबसेंट राहिल्याने तुझा पेमेंट कट होईल. एक तर तू परमनंट एप्लाई नाही. मग मला काही सांगू नकोस ."

"अरे मला तसं काम होतं. रोहितला माहिती आहे. किती ओरडतो आहेस राहुल. " खुशी चिडली.

" हो तो पण काल मधेच निघून गेला तो आलाच नाही. " स्नेहा म्हणाली.

खुशी जागेवर बसली. ती तीच सामान आत ठेवत होती. कबीरला मेसेज करावा लागेल. तिकडे घरी कस वातावरण आहे काय माहिती?

स्नेहा तिच्या कडे बघत होती. "हाताला काय लागल?"

"ते असच. " खुशीने हात लपवला.

" दाखव काय झाल. ओह माय गॉड दोघी हातांना लागल. तुला कोणी बांधल होत का?" तिने विचारल.

"नाही ."

"मग काय झाल खुशी? "स्नेहा घाबरली होती.

" खुशी ऐनी सिरियस प्रॉब्लेम?" राहुल तिच्याकडे बघत होता.

" नाही."

" सांग काय झाल?"

राहुल, स्नेहा, खुशी कॅन्टीन मध्ये बसलेले होते. खुशी सगळं सांगत होती. दोघ आश्चर्य चकित झाले होते.

"खरच अस झाल? गुंड त्याचा अड्डा असा चित्रपटात असत. मारामारी झाली का? " स्नेहा विचारत होती.

हो. खुशी म्हणाली.

"तुझ्या आयुष्यात इतक काही झाल, आम्हाला माहिती नव्हत. आता सगळं ठीक आहे ना ?" राहुल म्हणाला.

"आता काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही दोघ हे कोणाला सांगू नका. " खुशी म्हणाली.

हो. स्नेहाने मान हलवली.

"मला नेल असत तिकडे तर मी पण फायटिंग केली असती. खुशीला वाचवल असत. " राहुल उगीच गम्मत म्हणून मधेच अस म्हणाला.

" तिच्या साठी तिचा हीरो आहे. राहुल तू शांत रहा. आणि मला खात्री आहे तु मार खावून आला असता. " स्नेहा म्हणाली.

खुशी हसत होती. "आता गम्मत वाटते आहे. तेव्हा काय झालं ते माझ मलाच माहिती. "

" हो बरोबर आहे. " राहुल म्हणाला.

" खुशी तुम्ही कधी करताय लग्न ?ओह माय गॉड तू खुशी परांजपे आहेस आणि आता होणारी मिसेस कबीर. " स्नेहा एक्साइटेड होती.

"काहीही काय?"

" दोन दोन कंपनीची मालकीण." राहुल म्हणाला.

" तू इतकी श्रीमंत आहेस वाटल नव्हत. मग आता हा जॉब सोडणार का ?" स्नेहा विचारत होती.

" माहिती नाही. कॉलेज ही सुरू होईल. कबीर काय म्हणतोय ते बघू. " खुशी सहज म्हणाली.

" ओह हो. आता आमचे हे म्हणतील ते होईल." ती चिडवत होती.

" नाही ग कबीर खूप छान सल्ला देतो. इतका हुशार आहे ना. "खुशी खूप कौतुक करत होती.

" पुरे समजल. " राहुल चिडला. " आता कामाला लागा खुशी मॅडम. इथे काही तुझा कबीर मदतीला येणार नाही."

" तू का चीड चीड करतोस राहुल? " स्नेहाने विचारल. बहुतेक हा सिंगल राहील. ती हसत होती.

" स्नेहा तू हसू नकोस. ठीक आहे मग गर्ल्स. माझा हा ही चान्स गेला. वाटल होत की ऑफिस मधे नवीन मुलगी आली. माझ काहीतरी होईल." राहुल तोंड पाडुन म्हणाला.

खुशीला माहिती होत हा गम्मत करतो आहे.

"बेटर लक नेक्स्ट टाईम राहुल." स्नेहा म्हणाली.

"स्नेहा तू माझ्याशी लग्न कर. "

ईईईई...

" म्हणजे काय स्नेहा? हे बघ मी चांगला मुलगा आहे."

" काहीही राहुल. खुशी मला वाचव. "

" प्लीज स्नेहा. "

" जा ना. "

" राहुल आता प्रॉमिस मी सुट्टी घेणार नाही. फक्त एन्टरन्स इक्जामला सुट्टी होईल. मी माझ काम करेल." खुशी म्हणाली.

" कराव लागेल. सगळ्यांचे शेड्युल ठरलेले असतात." राहुल तिला काय काम आहे ते सांगत होता.

" मी आता दोन-चार दिवसात आधीच सगळं काम संपवून टाकते."

राहुल त्याच्या कामासाठी गेला.

स्नेहा कडे बघून तिला हसू येत होत. हिची आणि राहुलची जोडी छान दिसेल. वेडे आहेत हे लोक. ती कामाला लागली.
....

सविता तीच काम करत होती. सुलक्षणा ताई किचन मधे आल्या. "सविता आराम कर थोड्या वेळ. राहू दे ते. "

" मी ठीक आहे ताई. "ती भाजी कापत होती. तिच्या विचारत होती.

"दे इकडे लागून जाईल." सुलक्षणा ताई म्हणाल्या.

" ताई तुम्ही काळजी करू नका. तुम्ही भाऊंना काय आवडत तो पदार्थ करा."

सुलक्षणा ताईंना कसतरी वाटत होत. पोरगी कशी शांत झाली आहे.

कबीर आणि विलासराव दुपारी घरी आले. सुलक्षणा ताई ताट करत होत्या.

" आई, मामी ठीक आहे ना?" कबीरने विचारल.

त्यांनी नाही अशी मान हलवली." काय झाल कंप्लेंट केली का? "त्यांनी हळूच विचारल.

हो.

" प्रशांत भेटला का? "

" नाही आत जायचा काही संबध नाही. "

जेवण झाल्यानंतर कबीर परत ऑफिसमध्ये गेला. त्याला खुशीची आठवण येत होती. त्यांने फोन केला खुशीचाही लंच टाईम सुरू होता. आज ती तिच्या मैत्रिणींसोबत बसून जेवत होती. रोहित उशिरा आला होता. तो मीटिंगमध्ये बिझी होता.

"काय करते आहेस खुशी?" त्याने गोड आवाजात विचारल.

"काही नाही ऑफिसमध्ये आहे." ती लाजली होती.

"सुट्टी घ्यायची होती ना?"

"काल मी सुट्टीवर होती तर आज मला किती रागावलं." खुशी हळू आवाजात म्हणाली.

"कोणी रागवलं कोणाची एवढी हिम्मत?" कबीरने विचारल.

खुशी आता हसत होती.

"कबीर तुला सांगून काय उपयोग? या ऑफिसमधल्या लोकांना तू ओरडू शकत नाही. आमचा बॉस वेगळा आहे."

" मी कोणालाही ओरडू शकतो. माझ्या खुशीला असं केलं. येवू का तिकडे सांग. " कबीर म्हणाला.

" नको. घरी कसे आहेत. बाबा, मामी? "तिने विचारल.

" मामीने त्रास करून घेतला आहे. बाबा हळूहळू ऍडजेस्ट होत आहेत. "

" मग आता काय ठरलं? "

" काही नाही, आज मामा विरुद्ध कंप्लेंट केली. आज मी आणि बाबा पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो. त्यांचा पूर्ण ग्रुप सापडला एक दोन मुलं पळाले आहेत ते डेंजर आहेत. घराची सिक्युरिटी वाढवून घे. तुम्ही लोकांनी पण काळजी घ्या. "

" हो. बर झाल कंप्लेंट केली. मामांना थोडी तरी शिक्षा व्हायला हवी. तुझ्या बाबांना आणि तुम्हाला झालेला त्रास हा खूप मोठा आहे. "

" हो बरोबर आहे . उद्याही पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं आहे. "

" बाबा घरी आहेत तर काकू खुश असतील ना? "

" हो खुश आहे. पण मामाला अटक झाल्यामुळे जरा घरात दुःखाचं वातावरण आहे. तुमच्या घरी कस वातावरण आहे?" कबीरने विचारल.

"आई खूप चिडलेली आहे. ती मला इनडायरेक्टली असं सांगते आहे की मी तुला भेटायच नाही. " खुशी सांगत होती.

" अरे बापरे हे काय आहे आता? "

"मला आईशी बोलावं लागणार आहे." खुशी काळजीत होती.

"खरंच व्यवस्थित बोलून घे."

"मला भीती वाटते आहे कबीर की आई नाही म्हटली तर?" खुशी म्हणाली.

"एक आयडिया सांगू का? जेव्हा तुझे बाबा घरी असतील ना तेव्हा आईशी बोलायच. कारण मला कुठेतरी असं वाटतं आहे तुझ्या बाबांचा विरोध नाही." कबीर म्हणाला.

" आई पण चांगली आहे. पण तिने तुला बघितलं नाही आणि भेटली नाही तिला आत्ताही असं वाटतं आहे की तुझ्यामुळे मला आणि बाबांना त्रास झाला. "

" ते खरंच आहे की एवढं सगळं माझ्यामुळेच झालं आहे. "

"तु मुद्दामून थोडी केल. तुला अस सांगितल गेल होत. कबीर या पुढे अस बोलायच नाही. तू किती चांगला आहेस. " खुशी म्हणाली.

" अजून तुला काय वाटत माझ्या बद्दल? मी चांगला आहे हुशार आहे... पुढे? " कबीरने विचारल.

" अस नको कबीर. " खुशी लाजली.

" अरे प्रेम आहे तर ते सांगायला ही हव खुशी. "

" तू कधी इकडे येतो आहेस? तू इकडे नाही तर वेगळंच वाटतं आहे. "खुशी मुद्दामून दुसर बोलत होती.

" मी तिकडे आल्यावर बोलशील का?"

" काय? "

" आय लव यु. "

" मी फोन ठेवते. बाय. "

" थांब जरा खुशी. माझ कोणी ऐकत नाही. मी लवकर येतो. मला पण तुझी खुप आठवण येत आहे . "कबीर म्हणाला.

"बाकी सगळं तर झालं पण आता हे आई-बाबांना सांगणं म्हणजे मोठं काम आहे. " खुशी म्हणाली.

" काळजी करायची नाही शांततेत बोलायचं. चल मला काम आहेत मी ठेवतो उद्या फोन करतो. " कबीरने फोन ठेवला.
.....

रोहीची मीटिंग संपली तो खुशी जवळ येऊन उभा राहिला. "बरी आहे का तब्येत? हात दाखव. "

"ठीक आहे आता. हा घे डबा. "

" बापरे तू एवढा हात दुखत असताना स्वयंपाक केला? " त्याने विचारल.

"आज मी नाही आईने केला आहे. "

" तू जेवली का? "

" हो. "

" तरी इतका बाकी आहे." डबा जड होता.

" मी रोज जास्तीचा डबा आणते कारण माझा डबा तूच खातोस. मला काही राहू देत नाही." खुशी म्हणाली.

"घे तुला काय ऑर्डर करायचं ते. " रोहितने तिच्याकडे फोन दिला.

"मी जेवली आहे. आधीच सांगते आहे. "

" तेव्हा तू ही माझा डबा खाल्ला की. तू तर इतकी जास्त करते ना खुशी. कोणाला वाटेल की तुला खूपच त्रास आहे. " रोहित म्हणाला.

" आहेच मग तू बघ कस करतोस. सारख बोलतोस. "

त्याने हात जोडले." तो कबीर कसा रहातो तुझ्या सोबत काय माहिती. बिचारा. "

" काय म्हणालास ? "

" आपल अजून भांडण होण्यापेक्षा मी केबिन मध्ये जाऊन जेवतो. मला भूक लागली आहे. "तो गेला.

रोहित थांब

या रोहितला मी सोडणार नाही.

खुशी संध्याकाळी घरी आली. रश्मी ताई अजून आलेल्या नव्हत्या. भक्तीने चहा केला.

"भक्ती मी आज बोलू का आईशी?" खुशी म्हणाली.

"बोलून बघ."

थोड्यावेळाने सतीश राव, रश्मीताई सोबत घरी आले. त्यांनी बरंच सामान आणलेलं होतं. भक्ती आणि दिपू काय काय आणलं ते बघत होत्या. खुशी नुसतीच खुर्चीवर बसलेली होती. सगळ्यांना तिच्यातला बदल जाणवला. नाहीतर ती आधी चॉकलेट ताब्यात घ्यायची.

" खुशी दी तुझ चॉकलेट. " दीपु आवाज देत होती.

"फ्रीज मधे ठेव." खुशी शांततेत म्हणाली.

रश्मीताई कपडे बदलून आल्या. माई पोळ्या करत होत्या. "माई द्या इकडे तुम्ही बसा." त्या पोळ्या करत होत्या. खुशी त्यांच्या बाजूला येऊन उभी राहिली. सतीश राव टीव्ही बघत होते.

"आई मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे."

"बोल ना. "

" मला माझ्या आणि कबीर बद्दल बोलायचं आहे." खुशी हळूच म्हणाली.

"थांब आता नको. जेवण झाल्यावर तुझ्या बाबांसमोर सांग." रश्मी ताई म्हणाल्या.


🎭 Series Post

View all