गुंतता हृदय हे भाग 55

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का
गुंतता हृदय हे भाग 55
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

"आई मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे." खुशी शांत पणे म्हणाली.

"बोल ना. "

" मला माझ्या आणि कबीर बद्दल बोलायचं आहे." खुशी हळूच म्हणाली.

"थांब आता नको. जेवण झाल्यावर तुझ्या बाबांसमोर सांग." रश्मी ताई म्हणाल्या.

"हे उलट बरं झालं. " खुशी विचार करत होती.

जेवण झालं. सतीश राव, रश्मीताई हॉलमध्ये बसलेले होते.

खुशी.... त्यांनी आवाज दिला. " सांग तू काय म्हणत होतीस? "

ती बाबांकडे बघत होती.

"आई, बाबा मला यापुढे तुमच्या दोघांपासून कुठली गोष्ट लपवायची नाही. मला कबीर सोबत रहायचं आहे. त्यालाही माझ्यासोबत आवडतं. आम्हाला लग्न करायचं आहे." खुशीने सगळं बोलून टाकल.

" तुम्हीच ठरवल? " रश्मी ताई म्हणाल्या.

" नाही आई अस नाही. म्हणजे मी आत्ता तुम्हाला सांगते आहे. "

रश्मीताई सतीश रावांकडे बघत होत्या. " आता आम्ही काय म्हणणार?"

" आई ऐक तरी, हे सगळ झाल. सुरुवातीला मलाही असं वाटलं होतं कबीर चांगला नाही. त्याने अस केल म्हणून मी त्याच्याशी खूप भांडले .त्याला खूप बोलली. त्रास ही दिला. पण सत्य समजल्यावर तो बदलला आहे. आधी सारखी चूक त्याने केली नाही. त्याला खूप पस्तावा होत आहे. त्या मामांनी त्याला खोटं सांगितलं होतं." खुशी म्हणाली.

"एवढा साधा आणि लहान आहे का तो कबीर ? की त्याला काही समजत नाही. आधी व्यवस्थित चौकशी करायची ना. मग दुसर्‍या वर एवढा मोठा आरोप करायचा. चांगल्या लोकांच्या मागे लागायला काही वाटत नाही का? दुसरे किती त्रासात आहेत ते दिसत नाही का? " त्या म्हणाल्या.

" आई झाल ना आता हे. आता काही प्रॉब्लेम नाही. तू एकदा कबीरला भेट. त्याच्याशी बोल. तो तुझ्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देईल. मग हो नाही ठरव. बाबा तुम्ही तरी बोला. " खुशी मदत मागत होती.

" रश्मी जरा ऐक. सगळ स्पष्ट आहे आता. हे का झाल? का नाही? आपण नेहमी थोडी बोलणार आहोत? वाईट आठवणी सोडून सोडून द्यायच्या. मी बघतो. खुशी तु थोड आत बस. " सतीश राव म्हणाले. खुशी तिच्या रूम मधे गेली.

काल इतक समजावून सांगितल तरी रश्मी चिडचिड करते.

" काय झालं रश्मी? तुझ्या मनात अजून शंका आहे का? हे बघ मला नकार देण्यासारखं काही दिसत नाही. ते लोक ओळखीचे आहेत. नाईक पती-पत्नी चांगले आहेत. कबीर तर खूपच चांगला आहे. त्याचा गैरसमज झाला होता आता काही प्रॉब्लेम नाही. आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं." सतीश राव म्हणाले.

" काय चांगलं झालं आहे यातून? तुम्हाला, मला, मुलींना किती त्रास झाला . "रश्मी ताई म्हणाल्या.

" हे बघ खुशी, दीपू समजूतदार झाल्या आहेत. आपण दोघे पण सिरियसली काम करायला लागलो. भक्ती भेटली. आणि आता नाही तरी आपली कंपनी, घर, वर्कशॉप आपल्याला परत मिळणार आहे. "

" ते आपण दोषी नाही म्हणून. आणि ते आपलच होत. " रश्मी ताई म्हणाल्या.

" ते परत करत आहेत म्हणून मिळतय. त्यांनाही फायदा झाला आहे ते नाईक साहेब सापडले. नाही तर ते कुटुंब गेले पंधरा-वीस वर्षे खूप त्रासात होत. तू तिथे ते सगळं बघायला पाहिजे होतं. असं जर त्यांच्या बाबतीत झालं असेल तर कबीर चिडणारच. त्याला वाटलं असेल की आपण त्याच्या बाबांना गायब केलं. " सतीश राव म्हणाले.

"अहो पण आपण असे लोक आहोत का? "

" आता समजले ना त्यांना की आपण का चांगले लोक आहोत. त्यानंतर त्या कबीरने काही त्रास दिला का? " सतीश राव विचारत होते.

" नाही."

" समजल का मी काय म्हणतो ते. तो मुलगा चांगला आहे. हे बघ रश्मी ते दोघे पहिल्यापासून एकमेकांना पसंत करतात आणि आता समजलं आहे काय झाल होत ते तर उगीचच त्यांनी पूर्वी काय केलं ते लक्षात ठेवून हे स्थळ मोडणं म्हणजे चुकीचं आहे. जुन्या गोष्टी सोडून द्यायच्या. पुढे जायच. खुशी आपला ऐकेल त्याला नकार देईल. ती तरी खुश राहणार आहे का? तुला काय हवं आहे मुलीचा आनंद की तुला राग आला आहे तो व्यक्त करायचा आहे?"

"नाही मला मुलीचा आनंद हवा आहे. पण मला अशी भीती वाटते की त्या मुलांमुळे आपल्याला परत त्रास व्हायला नको. "रश्मी ताई कबीरला भेटल्या नव्हत्या त्यांना अस वाटण सहाजिकच होत.

" नाही कशामुळे आपल्याला परत त्रास होईल. तू एकदा कबीरशी बोलून बघते का? तुझे काय प्रश्न असतील ते त्याला विचार. असा टोकाचा निर्णय घेऊ नको. यावर आप फक्त आपलंच नाही तर त्या दोघांच आयुष्य अवलंबून आहे. समजा दोघांनी ऐकल नाही परस्पर लग्न करून घेतल तर. ते मान देता आहेत तर आपण ही त्यांना थोड समजून घ्यायला हव. "सतीश राव सगळी बाजू सांगत होते.

" ते दोघ अस करु शकतात? "

" मग, त्या कबीरला काहीही अशक्य नाही. एकदम पॉवर फुल मुलगा आहे. आपल्याशी बोलतांना तो शांततेत घेतो. आणि त्याच खुशी वर खूप प्रेम आहे ते दिसत. "

रश्मीताई विचार करत होत्या. "खरच जर खुशी आनंदात राहणार असेल तर माझी काही हरकत नाही."

आता सतीश रावांना आनंद झाला होता.

"अहो खुशीला बोलवून घ्या. आपण तिच्याशी मोकळं बोलून घेऊ. उगाच ती रात्रभर चिंता करत राहील." त्या म्हणाल्या.

"चालेल. खुशी इकडे ये." त्यांनी आवाज दिला.

ती आई बाबांच्या रूम मध्ये गेली.

"हे बघ खुशी आता आम्ही दोघेजण बोललो. तुझी आईच्या मनात अजून ही थोडा डाऊट आहे. ती आधी कबीरशी बोलून बघणार आहे. कारण तिला तुझी काळजी आहे."

" हो चालेल. समजलं ."

"जर तिने हो म्हटलं तर आपण पुढची बोलणी करू. " सतीश राव म्हणाले.

"काही प्रॉब्लेम नाही." खुशीला खात्री होती आई कबीरशी बोलली तर ती होकार देईल. तिला खूप आनंद झाला होता. चला थोड्या तरी गोष्टी पुढे गेल्या होत्या. ती आईच्या गळ्यात पडली. त्या ही थोड्या हसत होत्या.

" आई तू नक्की कबीरला भेट. तुला त्याला काय विचारायचं ते विचार. तुला त्याला ओरडायचं असेल तर ओरड. तो काहीच म्हणणार नाही. अग तो मोठ्या लोकांचं खूप रिस्पेक्ट करतो. सगळ्यांशी मानाने वागतो. तो नक्की तुझी समजूत काढेल. त्याच्याकडून चुक झाली आहे. त्यालाही मान्य आहे पण त्याला आम्ही सगळेच खूप बोललो आहोत. ऑलरेडी भरपूर शिक्षा झालेली आहे. "खुशी म्हणाली.

"आता एवढ्यातच तू मला त्याच्याबद्दल काही सांगू नकोस मी स्वतः कबीरशी बोलेल आणि मग ठरवेल." रश्मी ताई म्हणाल्या.

"चालेल आई." खुशी आनंदातच रूममध्ये परत आली

" भक्ती... आई कबीरशी बोलणार आहे. मला असं वाटत आहे बाबांनी तिची समजूत काढली आहे. बहुतेक आई लग्नाला हो म्हणेल. "

दोघीजणी आनंदात होत्या.
.....

कबीर घरी आला. पुढे आई बाबा टीव्ही बघत होते. विराज अभ्यास करत होता. मामी, सुदेश, सोनु दिसत नव्हते.

"कबीर फ्रेश होवुन ये. " सुलक्षणा ताई म्हणाल्या.

" आई मामी कुठे आहे? "कबीरने विचारल.

" आतमधे. "

" काय झाल? "

त्यांनी विलास रावां कडे बघितल.

मी बघतो कबीरने डोळ्याने सांगितल.

तो मामीच्या रूम मधे गेला. तिघ तिथे होते. मुल अभ्यास करत होते.

" काय चाललय सुदेश सोनू ? तुम्ही तिघे एवढे शांत? तब्येत बरी आहे ना मामी? असे का आत बसला आहात?" त्याने नेहमीप्रमाणे विचारल.

"हो आम्ही ठीक आहोत." मामी म्हणाली.

"काही मनात आहे का? बोलायचं आहे का?"

"नाही."

"मोकळ बोल मामी. मोकळ रहा. " कबीर म्हणाला.

" भाऊं समोर अपराधी सारख वाटत. त्यांच्या आयुष्यातले पंधरा वीस वर्ष तुझ्या मामा मुळे खराब गेले. तरुण वयात भाऊ ताई दूर झाले. ताई किती आजारी होत्या. तरी यांना दया आली नाही. बहिणीचा संसार मोडला. कसतरी वाटत आहे. कस काय त्यांच्या समोर जावून बसू? " सविता म्हणाली.

"ते झालाच मला ही वाईट वाटत आहे. पण तुझ्या मुळे थोडी झाल मामी. याला फक्त मामा जबाबदार आहे. तू मोकळ रहा. तू अशी आत गप्प बसुन राहिली तर बाबांना अजून वाईट वाटेल. मामी तू फक्त मामी नाही अगदी आई सारख तू आमच केल आहे. तुझ्या वर कोण राग धरेल. चल ना बाहेर. सगळ्यांमधे बस. मनातल काढून टाक. तुला आमच्या पैकी कोणी काही म्हणाला का? मी माफी मागतो. "कबीर म्हणाला.

" काहीही काय कबीर, ताई, भाऊ देव माणूस आहेत. मला किती आधार वाटतो त्यांचा. माझ मन मला खात. यांची कमी जाणवते. "सविता म्हणाली.

"उलट तुझ्यापेक्षा मी मामा सोबत जास्त असायचो. तो नाहिये मला ही कसतरी वाटत आहे. काय करणार पण? मामाला किती चान्स दिले. त्यांने ती संधी वापरली नाही. मी सगळ विसरायला तयार आहे. फक्त तुझ्या साठी मामी. परत सांगतो तु म्हणशील ते करू. तु अशी गप्प बसुन राहशील तर वाईट वाटत. मुलांकडे तरी बघ. मामाला सोडवू का?"कबीर विचारत होता.

"नाही त्याना शिक्षा झाली पाहिजे. " सविता मुलांकडे बघत म्हणाली.

"चल मग बाहेर .अस इथे तोंड उतरवुन बसू नकोस. सुदेश, सोनू आधी सारखा दंगा हवा."

विराज ही आला. " मी संध्याकाळ पासून हेच सांगतो आहे यांना. चला बाहेर. "

" चला पटकन जेवायला मला खूप भूक लागली आहे. मामी आज काय केल?" कबीर विचारत होता.

"कढी, मसाले भात. " सविता म्हणाली.

" पापड भाजा चला. "कबीर म्हणाला.

"बाबांसाठी मिरचीची भजी आहे. " विराज म्हणाला.

"आईस्क्रीम घ्यायला कोण येणार आहे?" कबीर मुलांजवळ बसला.

" आम्ही. " सोनु, सुदेश म्हणाले.

सुलक्षणा ताई ही रूम मधे येवून उभ्या होत्या." बर झाल हिला बोललास. उद्या पासून सविता अस केल ना तर बघ मी ओरडेन. "

" ताई अस होणार नाही."

सगळे बाहेर आले. हसत खेळत जेवण झालं. मुल आईस्क्रीम घ्यायला गेले. सविता पुढे बसलेली होती. आवडता कार्यक्रम सुरू होता. सुलक्षणा ताई सोबत ती ही आता हसत होती. दोघांना बर वाटल.

मुलांनी आईस्क्रीम आणल. विराज आतून वाट्या घेवून आला. सुदेश सगळ्यांना वाटत होता. कबीर बाबांसोबत छान बोलत बसला होता. आज काय काम होत ते तो सांगत होता. विलास रावांना बिझनेसच्या गप्पांमधे खुप इंट्रेस्ट होता. ते खूप खुश होते.
.......

भक्ती खुशी बोलत होत्या.

"खुशी तुझ लगेच लग्न असेल तर? ओह माय गॉड. आपल्याला तयारी करावी लागेल." भक्ती म्हणाली.

"काहीही भक्ती." खुशी लाजली होती. खर तर तिला खूप छान वाटत होत.

"एकदा होकार आला की जिजु घाई करतील बघ." भक्ती म्हणाली. खुशी कबीरचा विचार करत होती. कस असेल पुढच आयुष्य. कबीर सोबत खूप छान वाटत. आता तो जसा माझ्या पुढे मागे असतो तसाच कायम असेल का ? की तो बिझी असेल. मला साडी नेसता येत नाही. तिकडे जीन्स चालेल का?

" भक्ती अग सासरी जीन्स घालू शकतो का? "तिने विचारल.

" नाही, सासरी साडी नाहीतर ड्रेस, घरात कुर्ता घाल. तुझ्या या बोरींग जीन्स फेक आता. दिवस रात्र घातलेल्या असतात." भक्ती म्हणाली.

" किती कंफर्टेबल वाटत जीन्स मधे."

" तिकडे चालणार नाही समजल."

"भक्ती काय अस?" खुशीला टेंशन आल होत.

दीपू आली. "खुशी दी तुझ लग्न जमलं का? "

" नाही ग, अजून जमलं नाही दिपू. पण तू देवाकडे छान प्रार्थना कर म्हणजे माझं लग्न लगेच जमेल. तू मला लकी आहेस. " दिपू पण आनंदात होती. ती गप्पा ऐकत होती.

माई पण ऐकलं ऐकत होत्या. माझी खुशी. आत्ता तर लहान होती. लगेच सासरी चालली जाईल. त्या काही म्हणाल्या नाहीत. त्यांनी खुशीला जवळ घेतलं. "तुझ्या मनासारखं होऊदे पोरी."

भक्ती मी कबीरला फोन करते. ती उठून बाहेर गेली. फोन लागला. " हॅलो कबीर काय करतो आहेस ?"

"मी आता रूम मधे आलो. तू खुश आहेस का? इतका आवाज का गोड येतोय. " कबीरने ओळखल.

" माझ्या साठी आनंदाची बातमी आहे. तुझ्या साठी टेंशनची." खुशी हसत म्हणाली.

" काय झाल आता? " कबीरने विचारल.

" आई तुला भेटणार आहे. "

का?

"का म्हणजे काय कबीर? मी आईशी बोलले आपल्या बद्दल. "खुशी म्हणाली.

"तू त्यांना काय सांगितल?" त्याने विचारल.

" जा अस नाही. "

" अरे तू अजून माझ्याशी मोकळ बोलत नाही. लव यू म्हणत नाही. मग घरी काय सांगितल ते विचारतो आहे. " कबीर हसत म्हणाला.

खुशी लाजली होती. आधी जरी ती त्याच्या मागे मागे करत होती तरी त्यांनी एकमेकांना प्रपोज केल नव्हत. उगीच केला याला फोन आता हा मला बोलण्यात अडकवेल. तसा फार हुशार आहे.

" घरी काय सांगितल खुशी? " त्याने परत विचारल.

" की मला तुझ्या सोबत रहायच आहे." खुशी हिम्मत करून म्हणाली.

" ओह माय गॉड. माझ्या सोबत रहायच म्हणजे काय? मला नाही जमणार." कबीर म्हणाला.

"कबीर गम्मत नको ना. मी ठेवते फोन. "

" एक मिनिट मॅडम. मी बरोबर बोलतो आहे. तस ही इथे आपल काही फिक्स नाही. नीट हो म्हण. सोबत रहायच म्हणजे काय लग्न की लीव इन? मी तयार आहे. तू काहीही सांग. पण त्या आधी मला नीट हो म्हणायच तरच मी काकूंशी बोलेल. " कबीर तिला चिडवत होता.

" कबीर काय हे. " खुशी खुशी लाजली होती. बोलू का ती विचार करत होती. "कबीर मला लग्न करायच आहे. "

कबीर खूप खुश होता. तरी तो मुद्दाम म्हणाला. " मला अजून वर्ष दोन वर्ष जमणार नाही. एक तर मी आता काम सुरू केल. तुला बघून मला काही सुचत नाही. घरचे ओरडतील. आणि महत्वाच सुरुवातीला तू नीट वागशील नंतर भांडशील. आपल्या भांडणात तूच मला खूप बोलतेस. मी गप्प बसतो."

एवढ्यात ती त्याला खूप वेळा बोलली होती तो एकदाही उलटून काही म्हणाला नव्हता. तिला आठवल.

"सॉरी ना कबीर ते विसर. ऐक ना. मी नाही भांडणार. आता मी घरी काय सांगू तू लग्नाला तयार नाही अस. आत्ताच आई, बाबा, माझ्याशी बोलले." खुशीला टेंशन आल होत.

कबीर हसत होता.

" चल मी फोन ठेवते." ती म्हणाली.

" खुशी मी माझी अट सांगितली मला लव यु म्हण तरच मी पुढे बोलेल. "

" आई आधी चिडली होती. आता ती तुला भेटायला तयार आहे. तर का अस करतोस कबीर. मी आपल्या साठी किती प्रयत्न करते आहे. "खुशी म्हणाली.

" मी गम्मत करत होतो." कबीरला वाटल जास्त ताणायला नको.

" तू आईशी बोलशील?" खुशी आनंदाने म्हणाली.

" हो खुशी. "

" तुझी आता वर परीक्षा होणार आहे ."

" म्हणजे?"

" आई तुला प्रश्न विचारेल."

"मला जमणार नाही हे खुशी मला भीती वाटते." कबीर म्हणाला.

"आपल्या साठी तुला हे कराव लागेल. नाहीतर आता मी आईच ऐकुन लग्नाला नकार देईल." खुशी म्हणाली.

"नाही अस नको. बर कधी असेल ही मीटिंग?" कबीर विचारत होता.

"अजून ठरल नाही. बहुतेक तुझ्या कडून विचारल तेव्हा आई बोलले तुझ्याशी." खुशी म्हणाली.

" म्हणजे मी अस तुझ्या घरी विचारायच आहे का? " कबीरने विचारल.

" कबीर जा तू मुद्दाम करतो ना? "

कबीर हसत होता." अग मी घाबरलो आहे. "

"तू किती हुशार आहेस किती मोठ्या मोठ्या मीटिंग घेतोस का घाबरतो. "

" ते ऑफिसच काम असत. हे म्हणजे पर्सनल इंटरव्यू टाइप त्या काय विचारतील ते टेंशन आहे ."

खुशी खूप हसत होती." आई विचारेल तुला काय काय येत? "

"मला खुशी वर प्रेम करता येत." कबीर म्हणाला.

"ते काही घर काम आहे का. स्वयंपाक येतो का?"

"हो येतो. "

"अजून तू वागायला बोलायला कसा आहे ते बघतील."

"माझा अश्या कांदे पोहेच्या कार्यक्रमाला विरोध आहे. "कबीर म्हणाला.

"आता का ?आम्हाला बघायला येतात तेव्हा छान वाटत का. या वेळी उलट होणार. तुझी वर परीक्षा होईल. "

"लग्नानंतर मी तुझ्या कडे रहायला यायच का ?" कबीर हसत म्हणाला.

"चालेल. समजेल तरी तुम्हा मुलांना की सासरी जाण किती अवघड असत. "

"खुशी प्लीज हा कार्यक्रम नको. "

"तुला लग्न करायच आहे ना ?"

हो.

"मग तयार रहा. "

"ठीक आहे आता मी काय बोलणार तुझ्या समोर. जरा सोपे प्रश्न विचारा. " कबीर हळू आवाजात म्हणाला.

खुशी हसत होती.

"तू मला का हसते आहे. मी नंतर बघतो तुझ्याकडे. आता फोन ठेव मला थोडा विचार करू दे. " कबीरने फोन ठेवला.

मुद्दाम करतो हा कबीर .खुशी आत येवून बसली.

कबीर त्याच काम करत होता. चेहर्‍यावर हसू होत. खुशी किती गडबड करते. दहा मिनिट जरी फोन आला तरी पुढचा पूर्ण दिवस छान जातो. खुशी मला तुझ्याशी लगेच लग्न करायच आहे. तुमची कंपनी परत केली की मी घरी बोलणार आहे.

🎭 Series Post

View all