गुंतता हृदय हे भाग 56

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का
गुंतता हृदय हे भाग 56
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

सकाळी खुशी खूप उत्साही होती. तशी तिला रात्री नीट झोप आली नाही. सारखा कबीरचा विचार मनात येत होता. ती त्यांच्या लग्नाचे स्वप्नं रंगवत होती. कबीर सोबत मी नीट राहीन. अजिबात भांडणार नाही.

रश्मी ताई उठण्याआधी ती स्वयंपाकाला लागली होती . माई कांदा कापत होत्या.

"काय करताय?" रश्मी ताई आत आल्या.

"आई डबा तयार आहे. माई उपमा बनवणार आहेत."

त्यांनी चहा ठेवला.

खुशी डबा भरत होती. ती आत आवरायला गेली. रश्मी ताईंनी उपमा बनवला.

खुशी, सतीश राव पुढे बसले होते.

"बाबा आता तुम्ही तुमच्या जॉबच काय करणार?"

"सुरू ठेवणार. पाटील साहेबांनी गरज असतांना विश्वासाने मला काम दिल. लगेच ते सोडता येणार नाही. मी दोघ काम सोबत करणार. तो विजय खूप हुशार आहे. तोच करतो सगळ काम फक्त महत्वाचे निर्णय मला घ्यायचे असतात." सतीश राव म्हणाले.

" बाबा तुम्ही खूप हुशार आहात. पण जास्त धावपळ करायची नाही. "खुशी म्हणाली.

" हो बेटा. "

" बाबा मी माझ्या जॉबच काय करू? "

" तू तुझ ठरव. "

" आता कॉलेज ही सुरू होईल. ठीक आहे मी कबीरशी बोलून बघते. "ती म्हणाली.

" चला नाश्ता करा." रश्मी ताई प्लेट घेवून आल्या.

" थांब खुशी तुला लिंबाच लोणच लागत ना उपमा सोबत. "

आई आधी सारखी वागते खुशीला बर वाटल.

कॅब मधे खुशी गाण ऐकत होती. तिला अस वाटत होत प्रत्येक गाण तिच्यासाठी आणि कबीर साठी तयार केल आहे. ती हसून बाहेर बघत होती. सिग्नल वर तिला बॉडी गार्ड दिसला. ती आता त्याला ओळखत होती. ऑफिस जवळ तो आला. " गुड मॉर्निंग मॅडम."

" गुड मॉर्निंग. तुम्ही आता का मागे येताय?" खुशीने विचारल.

"माझी हीच ड्युटि आहे."

खुशी आत मधे आली.

बॉडी गार्डने कबीरला मेसेज केला. मॅडम ऑफिसला पोहोचल्या.

कबीरने मेसेज बघितला. त्याच्या चेहर्‍यावर छान स्मायल होत. कालच खुशीने लग्नासाठी घरी विचारल. तिला ही उत्सुकता आहे माझ्या सोबत रहायची. खुशी लव यू.

कबीर ऑफिसला जायला तयार होता. व्हाइट शर्ट ब्लॅक पँट. केस सेट केलेले. एकदम सिरियस आॅटीट्युड. तो बाहेर येवून बसला. आज काय काम आहे तो विचार करत होता. मामी, सुलक्षणा ताई किचन मधे होत्या. विलास राव पेपर वाचत होते. ते कबीर कडे बघत होते. असा ऑफिस मधे जातांना हा भारी दिसतो.

" गुड मॉर्निंग बाबा चला ऑफिसला."

"गुड मॉर्निंग बेटा. नको तू जावून ये."

"बाबा अस चालणार नाही." कबीर म्हणाला.

"हो ना अहो जा फिरून या." सुलक्षणा ताई बाहेर येत म्हणाल्या.

"मी आता बाबांना एक छोटा प्रोजेक्ट देणार आहे. बाबा अ‍ॅक्टीव व्हा."

"हो खरच दे मला ही बघायच आहे काम जमत का ते. " विलास राव हसत म्हणाले.

" बाबा तुम्ही आमच ट्रेनिंग घ्याल इतके हुशार आहात." कबीर त्यांच्याशी बोलत होता. विलास राव खुश होते.
.......

खुशी ऑफिस मधे आली. तिने तीची बॅग, लंच बॉक्स जागेवर ठेवला. ती पळतच रोहितच्या केबिनमध्ये गेली.

रोहित... रोहित.... धडकन खुर्चीवर जाऊन बसली. तो नुकताच आलेला होता.

"काय सुरू आहे हे खुशी? तब्येत ठीक आहे ना? आमच फर्निचर मोडेल. तुलाच पैसे भरावे लागतील."

"रोहित ऐक ना आज मी खुश आहे. मी आज तुला काही म्हणणार नाही. भांडणार नाही." खुशी म्हणाली.

" सूर्य कुठून उगवला. काय झाल? सांग तरी. " रोहित हसत होता.

"काल मी आई-बाबांशी बोलली. बाबांचा लग्नाला होकार आहे. आई कबीरशी बोलणार आहे. आमच लग्न ठरतंय." खुशीने घाईने संगीतल.

" अरे वा. हे कस काय झालं?"

"बहुतेक त्या दिवशी आणि इतर वेळी पण बाबांनी कबीरला बघितलं असेल. त्यांना तो पसंत असेल आणि तसही कबीर किती चांगला आहे. त्याचे बाबा नाईक काका माझ्या बाबांचे मित्र आहेत ना त्यामुळे काही प्रॉब्लेम नसेल."खुशी सांगत होती.

" बरोबर, चांगल आहे चला. आता तुमचं लग्न होईल. माझा एक चांगला मित्र... बिचारा सुखी होता. उगीच आ बैल मुझे मार अस करतो आहे. " रोहित म्हणाला.

" तुम्ही मुल लग्नावर असे जोक का करतात ते समजत नाही. जस तुम्हाला खूप त्रास आहे. खर तर तुम्ही घरात आरामात असतात. आम्हाला सगळ काम पडत. " खुशी इच्छा नसतांना ही मोठ्याने म्हणाली.

" आरामात असतो? म्हणजे काय? इथे ऑफिस मधे कोण काम करत? आमच्यावर केवढी जबाबदारी असते. तुम्हाला काय जॉब केला कींवा नाही केला तरी चालत. आम्हाला ऑप्शन आहे का? " रोहित ही म्हणाला.

"आता हल्ली दोघांना जॉब करावाच लागतो. आम्ही तर घरकामा सोबत बाहेरचे काम ही, ऑफिस काम ही करतो. सगळ सांभाळतो. जरा लागोपाठ आठ दिवस स्वयंपाक करून बघा. नुसत कुकींग नाही नंतरच ही आवरायच. भांडे वगैरे. घरची भाजी, सामान आणायच. सगळं सगळं.... " खुशी म्हणाली ते बरोबर होत. नुसत आपल तुम्ही घरी काय करता अस बोलण सोप असत. रोज एवढ आवरल तेव्हा समजत की घरकाम संपत नाही.

"माफ कर बाई. उगीच बोललो. मी तर विसरलो होतो खुशी समोर कोणी जिंकू शकत नाही. जा तुझ काम कर. बिचारा माझा मित्र. मला त्याला फोन करायला हवा. एकदा त्याचीशी बोलून बघतो. किती डेंजर मुलीशी त्याच लग्न होत आहे ." रोहित म्हणाला.

खुशी बाहेर आली. जागेवर बसली. स्नेहा तिच्या कडे बघत होती." काय झाल ग?"

" हा रोहित ना रोज माझ्याशी भांडतो. आज एक तर माझा मूड चांगला होता. "

" सोड त्या रोहितला. काय विशेष? का मूड चांगला आहे? सांग ना?" स्नेहा म्हणाली. खुशी परत हसत होती.

" स्नेहा माझ लग्न जमतय. "

"वॉव. कबीर घरी आला होता का?" तिने विचारल.

" नाही मीच आई बाबांशी बोलली." ती सगळ सांगत होती. त्या दोघी बोलत होत्या. स्नेहा तिला खरेदी कुठून करायची, लग्नात मेक अप कसा ठेव ते सांगत होती.

" माझ्या ओळखीचे खूप दुकान आहेत. तू म्हणशील तर आपण तिथे खरेदीला जावू. " स्नेहा अति आनंदात होती.

" हो मी आईला विचारून सांगते. "खुशी म्हणाली.

"आटपा झाल का काम? कोणाला खरेदी करायची आहे? तुम्हा मुलीना त्या शिवाय काही सुचत नाही का?" राहुल त्यांच्यात येवून उभा राहिला.

"झाला हा जजमेंटल. ठीक आहे याच्या लग्नात बघू. त्याला मदत करायची नाही. " स्नेहा म्हणाली.

" नका करू मला मदत. पहिली गोष्ट मी तुम्हाला दोघींना लग्नाला बोलवणार नाही. खुशी तुला दिलेल काम झाल का?" राहुल विचारत होता.

"सुरू आहे. दहा मिनिट. फायनल बघते एकदा. "

" आटोप फाईल आत रोहितला नेवून द्यायची आहे. " राहुल म्हणाला.

हो...

काम झाल. खुशी थोड्या वेळाने आत गेली.

" खुशी तू आता का आली?" रोहितने विचारल.

" कामा निम्मीत्त रोहित. हे घे यावर सही कर." खुशीने फाईल त्याच्याकडे दिली.

" कबीर इकडे आला का?" रोहितने विचारल.

" नाही अजून तिकडे घरी आहे. त्याचे बाबा बर्‍याच दिवसांनी भेटले ना त्यांच्या सोबत असेल." खुशी म्हणाली.

"हो ना पण छान वाटत ना त्याला त्याचे बाबा भेटले तर . "

" हो मलाही खूप आनंद झाला आहे. कबीर आता एकदम शांत प्रेमळ झाला आहे." खुशी म्हणाली.

" खुशी कोणी आपल भेटल की खूप छान वाटत ना?"

"हो रोहित. "

" खुशी तू आणि कबीर खूप छान रहा. कोणाकोणाचा विचार करायचा नाही. एकमेकांना जपायच. " रोहित मनापासून बोलत होता.

" रोहित काय झालं?"

"मला तुम्ही दोघ सोबत आहात ते छान वाटत आहे. तुला मधल्या काळात खूप त्रास झाला ना. मला मनातून सारख वाटत होत मी तुला सत्य का नाही सांगितल. पण आता सगळ ठीक आहे हे बघून बर वाटत आहे. खुशी कधीही काहीही लागल तर सांग. अर्धा रात्री ही मी तुझ्या साठी आहे. "रोहित म्हणाला.

"मला विश्वास आहे रोहित. तू खूप चांगला आहेस. तुमच्या लग्नाचं काय झाल?" खुशी ही इमोशनल झाली होती.

"कोण?"

"तु आणि श्रुती?"

"त्या दिवसा नंतर आम्ही भेटलोच नाही. मी फोन करतो तर ती विशेष बोलत नाही. फोन उचलत नाही. "रोहित म्हणाला.

" काय प्रॉब्लेम आहे तिला? "खुशीने विचारल.

" ते तिला गरीब श्रीमंत असं काहीतरी वाटतं आहे. "

" काहीही असतं तिच्या मनात. तुला तिच्याशी लग्न करायचं आहे ना ?" खुशीने विचारल.

" हो जर श्रुती हो म्हटली तर. "

" मी बोलू का? "

" तुझ्याकडे आधीच किती प्रॉब्लेम आहेत. अजून आमचं काय करशील. सोड होईल जस व्हायच तस. "रोहित म्हणाला.

" मै हु ना. डोन्ट वरी. मी बघते तिच्याशी बोलून. "

" चहा घेते का? "

" नाही आता जाते आणि काम करते. नाही तर तो राहुल माझा जीव घेईल. एक तर त्याने मला गैरहजर होती त्या दिवसाचे खूप काम लावलं आहे. काल मला खूप रागवल."

" असच पाहिजे. "रोहित म्हणाला.
....

खुशी जागेवर आली. थोड्या वेळाने तिने श्रुतीला फोन लावला. "काय चाललय श्रुती? आमची आठवण आहे की नाही? कधी काळी खुशी नावाची मैत्रीण होती. लक्षात आहे का?"

"तुझच माझ्या कडे लक्ष नसतं. आज तू किती दिवसांनी मला फोन केला आहे." श्रुती म्हणाली.

"अगं खूप काय काय झालं. ते सांगायला फोन केला आहे. मी परत कबीरच्या गावाला गेली होती आणि मला त्या तिथल्या मामा लोकांनी किडनॅप केलं. खूप फायटिंग झाली आणि खरं समजलं मामा दोषी आहेत आणि अजून एक विशेष म्हणजे कबीरचे बाबा सापडले. "

" काय? कुठे होते ते?" श्रुतीला आश्चर्य वाटल.

"तिथेच त्यांना फार्म हाऊस वर कोंडून ठेवलं होतं." खुशी तिला काय काय झालं ते सगळं सांगत होती.

"बापरे खूपच कठीण झालं. कोण कोण गेले होते तुम्ही?"

"आधी मी आणि भक्ती गेलो होतो. नंतर कबीर आणि बाबा आले. त्यांच्या सोबत रोहितही होता. खूप मारामारी झाली. मंगेशने माहिती काढली होती त्यामुळे सोपं पडलं आणि आम्ही कबीरच्या घरी सुद्धा गेलो होतो. खूप छान घर आहे त्याचं. त्याची आई चांगली आहे. त्यांच्या घरी ते मामाच कुटुंब पण राहतं. "

" अरे वाह लग्ना आधी सासरी चक्कर. "

खुशी हसत होती.

" तुझं आणि रोहितचं काय ठरलं?" तिने विचारल.

"आमचं अजून काहीच ठरलं नाही. "

" का? काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? "

"तुम्ही सगळे लोक खूप श्रीमंत. तुमच्या सगळ्यांमध्ये मला अगदीच गरीब असल्यासारखं वाटतं. " श्रुती हळूच म्हणाली.

" कशाला असेल असं श्रुती? काहीही विचार करते. मी पण तसं कबीरच्या मानाने गरीबच आहे. तुला रोहित खरच आवडत असेल आणि प्रेम असेल तर या गोष्टीचा तू विचार करायला हवा. श्रीमंत गरिबी ही फक्त तात्पुरती स्टेट आहे. तू बघितलं ना. इतके दिवस आम्ही श्रीमंत होतो आणि लगेचच राहायला जागा नाही, खायला काही नाही अशी परिस्थिती झाली होती. पैसा कधीच जास्त टिकत नाही. टिकत ते माणूस आणि त्याचा चांगला स्वभाव. जर तुला खरंच रोहित योग्य वाटत असेल तर विचार कर. "

श्रुती विचार करत होती खुशी बरोबर बोलते आहे.

" तू त्याने फोन केल्यावर उचलत नाही. त्याच्याशी नीट बोलत नाही तो काळजीत आहे. "

खरं?

" हो त्याने सांगितल. आणि मठ्ठ पणा सोड ही चांगली संधी घालवू नको ना पागल. तुला किती समजवायच ग मी?"

"खुशी खरच बोलू का रोहितशी ?"श्रुती म्हणाली.

हो .

खुशी फोन घेऊन केबिनमध्ये गेली. " रोहित हे घे."

तिने फोन म्युट केला.

"कोण आहे?"

श्रुती.

" जरा वेळाने फोन बाहेर आणून दे. ती हो म्हणते आहे. घरच्यांच भेटायच ठरव. लगेच लग्न करून घ्या वेळ घालवू नको. "खुशी पटापट सांगत होती.

हो... रोहित लाजला.

ती निघून गेली.

" हाय श्रुती."

"हाय रोहित."

" कशी आहेस?"

"ठीक आहे. खुशीच ऐकल भयानक आहे हे. बर झाल मामाला पकडल." श्रुती म्हणाली.

"हो ना. "

" श्रुती मला तुला भेटायच आहे. तुझ काय म्हणण आहे नीट ऐकायच होत. आज संध्याकाळी भेटू या का?"रोहितने डायरेक्ट विषय काढला.

"चालेल ." ती म्हणाली. दोघ गप्पा मारत होते. रोहितने बर्‍यापैकी तिची समजूत काढली.

थोड्या वेळाने रोहित फोन घेवून आला." काय ठरलं?"

"आज भेटणार आहोत. "रोहित हळूच सांगत होता.

"लगेच तुझ्या घरी सांग. तिकडे ही श्रुतीच्या घरी भेटून घे. "

" श्रुती कडे जातांना तू येशील का खुशी?" रोहितने विचारल.

"हो येईल ना .असा तर खूप शूरवीर सारखा वागतो आता काय झाल? शेवटी माझीच गरज पडते ना?" खुशी म्हणाली.

"मदत कर ."

"ठीक आहे येईल मी. आधी तुम्ही दोघ ठरवा. किती हो नाही करताय. "खुशी म्हणाली.

रोहित गेला.

" थोड्या वेळाने राहुल आला. मी अस ऐकल की तू दुसर्‍यांच लग्न जमवतेस? माझ ही कुठे तरी जुळवून दे ना.

"अस काही नाही राहुल."

"मी ऐकल रोहित सोबत तू बोलत होतीस. प्लीज बघ ना. तुझ्या आजुबाजुला असतिल सुंदर मुली तुझ्या सारख्या." राहुल मुद्दाम म्हणाला.

खुशी हसत होती. "अस कोणी नाही माझ्याकडे."

"तुझ्या बहिणी, मैत्रीणी?"

"मला दोन बहिणी आहेत. दोघी लहान आहेत कॉलेज मधे जातात. त्यांच इतक्यात लग्न करायच नाही. "

"काय यार मी मोठी अपेक्षा घेवून आलो होतो." राहुल म्हणाला.

" स्नेहा?"

ते दोघ हसत होते.

" तिचा हात खूप लागतो ह. ती मारेन आपल्याला. " राहुल म्हणाला.
.......

कबीर ऑफिस मधे बिझी होता. राऊतचा फोन आला. ते ऑफिस कामा बद्दल बोलत होते. "साहेब परांजपे इंडस्ट्रीचे पेपर तयार आहेत."

" मी उद्या तिकडे येतो. हे राहिलेल काम करून टाकू. "

कबीर घरी आला. विलास राव बाहेर फिरत होते. सुलक्षणा ताई, मामी बसलेल्या होत्या. "आई मी उद्या निघतो. तिकडे ही खूप काम बाकी आहे. "

"परत कधी येशील? "

"तिकडे परांजपेंची कंपनी परत करतो. ते काम झाल की आपण नंतर मग त्यांच्याकडे परत जावू ." कबीर एकदम बोलून गेला.

"परत का जायच?" सुलक्षणा ताई विचारत होत्या.

कबीरला समजल तो काय म्हणाला. तो हसत होता. "आई नंतर सांगेन."

"नंतर का आता सांग. " सुलक्षणा ताई म्हणाल्या. मामी ही हसत होत्या.

"आई तुला माहिती आहे ना?"

"काय. "

" अस नको. मामी मदत कर ना. " कबीर म्हणाला.

" मी काय बोलू. मला कुठे कोणी काही सांगत." सविता म्हणाली.

"काय अस? आई मी खुशी बद्दल बोलतोय. "कबीर शेवटी म्हणाला.

" हो माहिती आहे. तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे."

"आई तुला खुशी खरच आवडली."

"हो खूप गोड मुलगी आहे. आपण जावू त्यांच्या कडे स्थळ घेवून. पण ते लोक हो म्हणतात की नाही माहिती नाही. " सुलक्षणा ताई सहज म्हणाल्या. नाहीतरी कबीरला कोण नाही म्हणणार.

" हो ना जरा टेंशन आहे. त्याने जास्त सांगितल नाही. की परांजपे हो म्हणाले आहेत. "

विलास राव आत आले." काय सुरू आहे? "

"कबीरला काहीतरी बोलायचं आहे ."सुलक्षणा ताई म्हणाल्या.

" काय बोल रे. "

" काही नाही बाबा. "

" लाजतेस काय सांग ना त्यांना ही."

"मामी तू सांग." कबीर म्हणाला.

सविता, विलास राव, सुलक्षणा ताई सगळे कबीर कडे बघत होते. मामी सांगत होती खुशी बद्दल. विलास राव छान हसत होते.

"कधी पासून सुरू आहे हे?" त्यांनी मुद्दाम विचारल. कबीर सुलक्षणा ताईं कडे बघत होता. काय उत्तर देवु. बाबांचा धाक आता समजत होता.

" ते आत्ताच आम्ही एकमेकांना भेटलो." तो हळूच म्हणाला.

" मला आधी का नाही सांगितल?"

"बाबा मला सुचल नाही."

"आता तुझ काय म्हणण आहे?" त्यांनी आवाज कडक ठेवला.

"त्यांच्या घरी जायच आहे. "

"नुसत मला फ्रेंड म्हणतो मोकळ बोलत नाही. यापुढे अस होईल का कबीर?"

" नाही बाबा मी तुम्हाला सगळ सांगेन. सॉरी. "

" छान, उडवून द्या यांच्या लग्नाचा बार."

ते सगळे हसत होते.

" मुलगी खूप छान आहे. फोटो बघू. " सविता मामी म्हणाली.

" फोटो नाहिये. " कबीर उगीच म्हणाला. त्याच्या लॅपटॉप मधे खुशी नावाच मोठ फोल्डर होत. त्यात तिचे खूप फोटो होते.

" नाटक नको फोटो दाखव. "

त्याने खुशीचा एक फोटो दाखवला.

आता सगळे जमले होते. विराज, सुदेश, सोनु फोटो बघत होते.

" ही त्या दिवशी आली होती. जीन्स घातली होती." सोनू म्हणाली.

" हो ही वहिनी नेहमी जीन्स वर असते." विराज म्हणाला.

" किती छान दिसते. दादा तुझ लग्न जमलं? " सोनू कबीर जवळ जावून बसली.

" नाही अजून."

" खोट बोलू नकोस. पार्टी दे."

" हो नंतर करू."

विराज, सुदेश खूप गप्पा मारत होते. कबीर त्यांच्यात बसला होता. त्याला खुपच छान वाटत होत. सगळ्यांना सांगून झाल. बर झाल .

" आम्हाला पिझ्झा हवा." मुल गोंधळ घालत होते त्यांना माहिती होत कबीर ओरडणार नाही.

" स्वयंपाक झालेला आहे. " सविता म्हणाली.

" घेवू दे ग." सुलक्षणा ताई म्हणाल्या. "कबीर तुझ्या बाबांसाठी सूप ही घे."

"हो आई."

सुदेश ऑर्डर करत होता.

"विराज तू उद्या येणार ना तयारी करून ठेव. "

"हो दादा."
........

🎭 Series Post

View all