गुंतता हृदय हे भाग 57

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का
गुंतता हृदय हे भाग 57
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

खुशी ऑफिस मधून घरी आली. आज त्या मुलींनी नूडल्स केल्या होत्या. रश्मी ताईंनी त्या तिघांसाठी पोळी भाजी केली होती. घरात छान वातावरण होत. जेवण झाल.

"खुशी अभ्यास कसा सुरू आहे?" सतीश रावांनी विचारल.

"करते आहे बाबा." खुशी म्हणाली.

"मला तर काही दिसत नाही. लगेच परीक्षा आहे ना? "

"आज पासून सिरियसली करते ."

"हो करावा लागेल."

खुशी आत मधे गेली.

" भक्ति, दिपू तुमच काय सुरू आहे कॉलेज मधे?" सतीश राव विचारत होते.

"दिपू सांगत होती. "

"भक्ती तुला शिकवलेले समजत ना ?" त्यांनी विचारल.

"हो काका हे कॉलेज छान आहे ."

खुशी थोड्या वेळाने अभ्यास करत होती. भक्ती दिपूच्या रूम मधे होती.

कबीर रूम मधे आला. ही आनंदाची बातमी खुशीला सांगू या. त्याने तिला मेसेज केला . " काय सुरू आहे?"

" अभ्यास करते आहे परीक्षा जवळ आली आहे. "

" ओके आपण नंतर बोलू." कबीर खूप खुश होता.

थोड्या वेळाने त्याने पोलिस स्टेशनमध्ये फोन केला. मामाची केस सुरू होणार होती. बरेचश्या साईडच्या लोकांना बेल मिळाली होती. मेन मामा लोक लॉक अप मधे होते.

"साहेब प्रशांत मामा तुमच्याशी बोलायच म्हणता आहेत. " इन्स्पेक्टर म्हणाले.

" जमणार नाही. त्या मामाला एक निरोप द्या. तुला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ना ते मी बघणार आहे."

पुढे केस मधे काय होईल आहे ते दोघ बोलत होते. कबीरने फोन ठेवला. त्याला ही अशी पोलिस केस वगैरे आवडत नव्हतं. पण दोघी मामा उद्योगी होते. त्यांना असच सोडल तर ते पुढे जावून अजून त्रास देतील. खुशीला ही किडनॅप केल होत ते मला अजिबात आवडल नाही. कोण ते त्याच्या बाजूंचे मूल खुशीच्या मागे पुढे करत होते. या मामाला समजत नाही का ती माझी होणारी बायको आहे.

कबीर, विराज सकाळी लवकर निघाले. सुलक्षणा ताई, विलास राव, मामी कार जवळ उभे होते.

" लवकर ये कबीर. " सुलक्षणा ताई नेहमी प्रमाणे हळव्या झाल्या होत्या.

" आई मी पण जातो आहे." विराज म्हणाला.

"तु पण लवकर ये विराज. कबीरला त्रास देवू नको. " सुलक्षणा ताई म्हणाल्या.

"बघितल का मामी कस आहे." बाकीचे हसत होते.

घरी सामान ठेवून कबीर लगेच निघाला. तो खुशीच्या बिल्डिंग जवळ उभा होता. खुशी सकाळी ऑफिसला जायला निघाली.

"हॅलो मॅडम."

ती त्याच्या कडे बघत राहिली. "कबीर तू?"

"आता आमच्या कडे कोणी लक्ष ही देत नाही." तो तिच्या कडे बघत म्हणाला.

तीने त्याच्या बघितल कबीर जबरदस्त दिसत होता. फॉर्मल ड्रेस होता. गॉगल घातलेला. डॅशिंग एकदम. तिला दोन मिनिट स्वतः चा हेवा वाटला. हा माझा आहे.

खुशी लाजली होती. "कबीर येण्याआधी सांगायचं तरी."

"काय झालं?"

खुशीने काहीच तयारी केली नव्हती. म्हणून ती म्हणत होती.

"खुशी तू अशी साधी छान दिसते ." कबीरने बरोबर ओळखलं.

तिने नेहमी प्रमाणे जीन्स कुर्ता घातला होता. केसांची वेणी. आधी सारखा काळजी नसलेला निरागस चेहरा.

"कोणाला तरी आठवत असेल तर सांगतो मी काल फोन केला होता. हेच सांगायच होत. की मी उद्या भेटायला येतो आहे पण तु बिझी होतीस." कबीर म्हणाला.

"ओह ते मी अभ्यास करत होती. काल बाबा ओरडले." खुशी म्हणाली.

"बरोबर आहे. बर झाल तु सिरियसली अभ्यास केला. आता लगेच परीक्षा आहे ना. चल तुला ऑफिस मधे सोडतो. माझ्यासोबत यायला काही प्रॉब्लेम तर नाही ना आता?" कबीर मुद्दाम वेगळया आवाजात म्हणाला.

"मला जमणार नाही कबीर. मी ऑफिस कॅबने जाईन." खुशी ही हसत म्हणाली.

"अस का बर. मला आता काही सांगू नकोस." तो त्या बाजूने तिच्या जवळ आला. तिला उचलत होता.

"कबीर काय करतोय. सोड. आपण रस्त्यावर आहोत. " खुशी गडबडली.

" मला काही फरक पडत नाही. तू येत नाही. मी उचलून घेवून जाणार."

"मी येते चल. तुला गम्मत कळत नाही का? काहीही आपल. " खुशी चिडली.

" अस एकदा सांगितल की ऐकायच मग." कबीर म्हणाला.

डेंजर आहे हा. खुशी कार मधे बसली.

" आज अगदी सकाळी इकडे? तू गावाहून आला का? "

"हो मी आणि विराज आलो. आता काम सुरू केल." कबीर म्हणाला.

"मग तु इकडे राहणार? " खुशीने आनंदाने विचारल

कबीर तिच्याकडे बघत होता. तिला खूप आनंद झाला होता. ते दिसत होत.

वेडी मुलगी.

" खुशी आज मीटिंग आहे वकीलां सोबत. तुमची कंपनी परत करायची आहे ना. त्यानंतर मी आणि आई बाबा तुमच्याकडे येणार आहोत. आपल्या लग्नाची तारीख काढून टाकू. "

" माझी परीक्षा झाल्यावर या. " खुशी म्हणाली.

" चालेल, तू अभ्यासाला सुट्टी नाही घेतली का?"

" नाही, काही अभ्यास झाला नाही. माझं काय होणार आहे. परीक्षेत माहिती नाही "

" तू हुशार आहेस बरोबर करशील." कबीर म्हणाला.

" हे घे तुला. " त्याने खूप चॉकलेट आणले होते .फुल होते. खुशीने ते सगळे आनंदाने पर्समध्ये ठेवले.

"मला तर दे एखाद चॉकलेट? भूक लागली आहे. "कबीर म्हणाला.

" नाश्ता नाही केला का? "तिने विचारल.

" सकाळी केला होता. "

खुशीने तिचा डबा बाहेर काढला. बटाट्याची भाजी होती. तिने कबीरला घास भरवला.

"अरे वाह भाजी खूप छान झाली आहे, कोणी केली?"

मी. खुशी म्हणाली. तिची बर्‍याच दिवसां पासून इच्छा होती की कबीरने माझ्या हातचे पदार्थ खावून बघावे. आज तिला खूप छान वाटत होत.

"काहीही सांगू नकोस. नक्की काकूंनी केली असेल. तुझ्या कडे बघून वाटत नाही तुला काही येत असेल. "कबीर हसत म्हणाला.

"कबीर मला चांगला स्वयंपाक करता येतो. "

" ऑफिस मधे चहा कॉफी किती कसतरी करत होती."

"ते मी मुद्दाम करत होते. तुला त्रास द्यायला."

"बर अस आहे का?"

खुशी हसत होती. ती त्याला खावु घालत होती.

" पुरे आता तुला राहू दे डबा. "

" अजून एक डबा आहे रोहित साठी. त्याला मी केलेली भाजी आवडते. " खुशी म्हणाली.

" तु मला नंतर डबा करून देशील ना असा गोड गोड. "कबीर विचारत होता.

" हो. पण ही भाजी काही गोड नाही. छान तिखट झाली आहे."

"मला गोड लागली ना. त्यात तू तुझ्या हाताने भरवल." त्याने तिचा हात हातात घेतला त्यावर ओठ टेकवले. खुशीने पटकन हात काढून घेतला.

" कबीर तू आपल्या बद्दल घरी सांगितल?"

" माझ्या घरचे हो म्हणाले. आपण लवकर मुहूर्त काढून घेऊ. "कबीरने सांगितल.

"कधी ?"

"कालच. "

"सांगितल का नाही."

"त्यासाठी तर फोन केला होता. आईला आधी पासून माहिती होत. खुशी आता आपल लग्न."

खुशी लाजली होती.

" घरचे कसे आहेत? काका काकू? मामी? "

" ठीक आहेत. मामी दाखवत नाही पण दुःखी आहे. "

" वाटणारच. "

" माझ्या आईने बाबांनी खूप त्रास सहन केला. नाहीतर मी मामाला सोडवल असत. "कबीर म्हणाला.

" नको ते डेंजर आहेत. मला माहिती आहे. " कबीर तिच्या कडे बघत होता.

"म्हणजे सॉरी."

"तु बरोबर आहे. तू मोकळ बोलू शकते. "

दोघ जरा वेळ गप्प होते. नवीन नात आहे. आधीच इतक काही घडून गेल. कस वागावं हा प्रश्न होता. खुशीने विषय बदलला.

" माझं कॉलेज सुरू होईल. लग्नानंतर कसं करू या? "

" काही नाही आपण इकडे राहायचं." कबीर म्हणाला.

" तुमच्या घरचे काही म्हणणार नाही ना? "खुशीने विचारल.

" नाही, विराजच पण कॉलेज आहे ना. तो पण आपल्यातच राहील. वाटलं तर आई-बाबा येऊन राहतील इकडे."

" हे चांगलं होईल. "

" पण अजून हे लग्न जमू शकत नाही."

"का?" खुशी कबीर कडे बघत होती.

"तू मी म्हणालो ते केल नाही. त्यामुळे पुढची बोलणी होणार नाही. "

"काय? "

"लव यु म्हण छान प्रपोज कर. आधी कशी सारखी माझ्या मागे मागे करत होती. तस मागे मागे करायच. मला भेटायला अधीर व्हायच." कबीर म्हणाला.

खुशी हसत होती." जमणार नाही." ती मुद्दाम म्हणाली.

" बर ठीक आहे आता काय म्हणणार. तुझ्या मनाप्रमाणे होत. " कबीर समोर बघून कार चालवत होता.

"परीक्षा झाल्यावर काहीतरी कराव लागेल. " खुशी विचार करत होती.

ऑफिस आलं. कबीर खुशी बोलत होते. रोहित मागून आला." चल कबीर आत मध्ये."

ते रोहितच्या केबिनमध्ये गेले. खुशी तिच्या जागेवर जाऊन बसली. ते दोघ ऑफिस बद्दल बोलत होते. चहा झाला.

"खुशी आज काय झालं एवढं हसायला?" स्नेहाने विचारलं

"कबीर आला आहे."

" अच्छा तू त्याच्यासोबत ऑफिसला आली का ?"

" हो आणि इथे सुद्धा आला आहे. "

" कुठे आहे?" तिला त्याला बघायच होत.

"रोहितच्या केबिनमध्ये."

रोहित, कबीर बाहेर आले. रोहित त्याला त्याची फॅक्टरी दाखवत होता. नंतर ते फिरून खुशीजवळ आले .

स्नेहा तिच्याकडे बघत होती." हा आहे का? "

हो. खुशीने मान हलवली.

राहुल आला.

" कबीर एक मिनिट मला ओळख करून द्यायची आहे. हा माझा बॉस आहे राहुल आणि ही माझी बेस्ट फ्रेंड स्नेहा... हा कबीर आहे."

"हाय स्नेहा. " कबीर म्हणाला. नंतर तो राहुल कडे वळाला.

" हाय राहुल. तू खूप शिस्तप्रिय बॉस आहे असं मी ऐकलं आहे. तू सारखं आमच्या खुशीला रागवत असतो. काय करायचं तुझं?" कबीर म्हणाला

राहुल थोडा घाबरल्यासारखा वाटला होता.

" रोहित याच काय करायच? खुशी मला भेटायला येते तर हा रागवतो. " कबीर म्हणाला.

" हो ना काय करू या? राहुल तूच सांग. " रोहित म्हणाला.

राहुल दोघांकडे बघत होता. खुशी त्याला हसत होती. असंच पाहिजे याला.

" या पुढे अस होणार नाही. खुशी तू केव्हाही बाहेर जा." राहुल म्हणाला.

सगळे हसत होते.

"जस्ट जोकींग. लग्नाला या. खुशी या दोघांना पत्रिका दे. "

" तारीख काढली का ? " रोहित विचारत होता.

"नाही अजून मोठी परीक्षा बाकी आहे दोघांची. खुशीची एमबीए एन्टरन्स. माझी वर परीक्षा. "

" म्हणजे? "

" परांजपे मॅडम त्यांच्याशी बोलायचं आहे."

"ओह माय गॉड."

"रोहित तू काल भेटला होता का श्रुतीला? " खुशीने विचारल.

हो.

" मग काय ठरलं? "

" श्रुती तयार आहे. "

" अरे वाह. "

" काॅग्रॅजुलेशन रोहित." कबीर ही खुश होता.

"खुशी मूळे झाल."

"श्रुती आणि तू कॉलेज मधे एकमेकांशी बोलले नाही का ?" कबीरने विचारल.

"बोलत होतो. "

"हो हा श्रुतीशी खूप प्रेमाने बोलायचे. आणि माझ्याशी भांडायचा. "

तिघे हसत होते.

"ते तर आत्ताही भांडतो."

हो का.

हो.

" कबीर तुला ऑल द बेस्ट ही डेंजर मुलगी आहे. काय मुद्देसूद भांडते. "रोहित म्हणाला.

" अजिबात नाही खुशी साधी छान मुलगी आहे. " कबीर म्हणाला.

खुशी लाजली होती.

" खुशी मी निघतो. मला खूप काम आहेत. "

कबीर ऑफिस मधे आला. ऑफिस बरच मोकळ वाटत होत. बरेच एप्लाई दुसर्‍या ऑफिस मधे शिफ्ट केले होते.

जाधव वकील आलेले होते. सगळे पेपर तयार होते. परांजपे साहेबांना ऑफिस मधे बोलवलं होत. परांजपे इंडस्ट्री परत करायची प्रोसेस सुरू झाली.

सतीश राव, रश्मी ताईं सोबत ऑफिस मधे आले. त्यांच्या सोबत दीक्षित होते. त्यांचा वकील होता. ते सगळे केबिन मधे बसलेले होते.

काका येवून भेटले. "साहेब आता तुम्ही परत कंपनीत येणार."

हो.

"मला खूप आनंद झाला आहे." ते चहा घेवून आले.

सतीश राव वकिलांशी बोलत होते. दीक्षित राऊत सोबत प्रोजेक्ट हॅन्डल करण्या बाबत बोलत होते.

कबीर आला. रश्मी ताईंना बघून तो थोडा गडबडला.

"कबीर मी ओळख करून देतो ही रश्मी परांजपे. "सतीश राव म्हणाले.

" नमस्ते मॅडम. "

" हे कबीर भालेराव. सॉरी नाईक."

ते तिघ हसत होते.

"तुम्ही आता घरून येतं आहात का कबीर? "

"नाही सर मी सकाळी आलो. दुसरा वर्क शॉप घेतला तिथे काम सुरू आहे. मी तिकडेच असतो. माझा स्टाफ आमच्या ऑफिस मधे शिफ्ट केला. हे ऑफिस तुमच तुम्हाला परत करतो." कबीर म्हणाला.

"घरी कसे आहेत नाईक साहेब?"

"बाबा ठीक आहेत हळू हळू रूळता आहेत. "

"केस सुरू झाली का? "

" हो. त्या लोकांनी बेल साठी प्रयत्न केला. मी जमू दिल नाही. "

सतीश राव छान बोलत होते. रश्मी ताई बघत होत्या कबीर कसे उत्तर देतो. रश्मी ताईंना माणसाची पारख होती. कबीर शांतपणे बोलतो आहे हे बघून त्यांना बर वाटल.

त्याने सगळ्या पेपर वर सह्या केल्या. कंपनी, घर, वर्क शॉपचे सगळे पेपर होते." हे घ्या सर. "त्याने हात जोडले "चुकी झाली."

सतीश रावांनी त्याचे हात हातात घेतले. "काही हरकत नाही कबीर." दोघ भेटले.

त्यांनी पेपर वकिलां कडे दिले. ते सही नीट झाली का ते बघत होते. लवकरच सगळ सतीश रावांच्या नावावर येणार होत .

" आम्ही एक दोन दिवसात आमच सगळं सामान इथून नेवू. "कबीर म्हणाला.

" काही हरकत नाही आरामात. "सतीश राव खुश होते.

रश्मी ताईंशी काय बोलाव अस कबीरला झाल होत.
"मॅडम ही ऑफिसच काम बघता का?" त्याने विचारल.

"हो ती फायनान्स सांभाळते. तुला बोलायच होत ना कबीर सोबत." त्यांनी रश्मी ताईंना विचारल.

"हो. झाल का तुमच ऑफिसच काम?" रश्मी ताई म्हणाल्या.

हो.

" तुम्हाला वेळ आहे ना कबीर? "

" हो मॅडम. "

दीक्षित बोलवत होते. सतीश राव उठून गेले. कबीर, रश्मी ताई दोघ केबिन मधे होते. कबीर शांत बसलेला होता.

" आपण या आधी भेटलो नाही." रश्मी ताई म्हणाल्या.

हो ना.

" खुशी तुमच्या बद्दल सांगत होती. मला हे विचारायच होतं की हे रीलेशन दोघी बाजूने सिरियस आहे ना? कारण खुशीला या प्रकरणात जो त्रास झाला ना तो मी स्वतः बघितला आहे. रात्र रात्र भर ती रडायची. माझ्या मुळे झाल हे. मी का सही केली हेच तिच्या मनात बसल होत. आता परत तिला त्रास झाला तर ती यातून बाहेर पडणार नाही. आधी ही ती तुमच्या मागे मागे करायची अस तिने मला सांगितल होत . तुम्हाला खुशी बद्दल काही वाटत नसेल तर आत्ताच सांगा. मी तिला समजावेल." रश्मी ताई म्हणाल्या.

"मॅडम मी खुशी वर खूप प्रेम करतो. मलाही तिच्याशी लग्न करायच आहे. काहीही झाल तरी मी तिला सोडून राहू शकत नाही. मी धोकादायक मुलगा नाहिये. तुम्ही काळजी करू नका. ती वेळ तशी होती मला ही समजल नाही.
माझी चुकी झाली मॅडम. मी त्यासाठी मनापासून माफी मागतो.
मला ही या प्रकरणाचा फार त्रास झाला. हळू हळू समजत गेल दोषी कोण. नंतर मी परत तीच चूक केली नाही. मी आधी खुशीच्या मैत्रीचा वापर केला. तिच्याशी गोड बोलून तिच्या सह्या घेतल्या. पण खर काय आहे ते समजल्या पासून मी तिला त्रास दिला नाही. "कबीरने जे झाल ते स्पष्ट सांगितल.

" काही हरकत नाही. " रश्मी ताई विचार करत होत्या. मुलगा प्रामाणिक पणे सगळ खर सांगतो आहे .

" तुम्हाला माहिती आहे कबीर आमच्या साठी येणारा प्रत्येक दिवस एक आव्हान होता. खुशी, तिचे बाबा, मी आम्ही सगळे विचार करत होतो हे झाल कस? आम्ही कधी कोणाच नाव घेतल नाही. करता आली तर समोरच्याला मदत केली आहे."

"सॉरी मॅडम."

"अस नाही. मला माफी नको आहे. प्रॉमीस हव आहे. तुम्ही ही या पुढे अस वागावं. समाजासाठी काही करता आल तर बघा. खुशीला नेहमी सपोर्ट कराल. तिला सांभाळून घ्या. तिच्या पाठीशी नेहमी रहा. " रश्मी ताईंचे विचार खूप छान होते.

"नक्की आणि मी काय पाठीशी उभ रहाणार मलाच खुशी च्या सपोर्ट ची गरज आहे. तुमचा आशिर्वाद हवा आहे. " कबीर म्हणाला.

" आपण आता एक परिवार होणार आहोत जुन्या गोष्टी परत व्हायला नको."

" मी कधीच्या सोडल्या. "

" आम्ही खूप साधे लोक आहेत. यांना बघितल ना कधी काही बोलत नाही. चिडत ही नाहीत. असाच आमचा विश्वास कायम ठेवा. " रश्मी ताई म्हणाल्या.

" हो नक्की. माझ्याशी ही सर नीट वागले." कबीर म्हणाला.

" खुशी अतिशय समजूतदार हुशार आहे. दोघ सोबत छान रहा. तुम्ही दोघ लग्न करायच म्हणताय. ठीक आहे माझी काही हरकत नाही. तिच्याकडे नीट लक्ष द्या. " रश्मी ताईंनी होकार दिला. कबीर खुश होता.

" हो मॅडम."

" खुशीत खूप फरक पडला ना. आधी कॉलेज मधे हट्टी निरागस अशी होती. आता एकदम शांत जबाबदार झाली आहे . तिला घरकाम विशेष येत नाही. आता हल्ली स्वयंपाक छान करते. "रश्मी ताई खूप बोलत होत्या. खुशी बद्दल सगळं सांगत होत्या. कबीर ऐकत होता.

" तुमच्या घरी कोण कोण आहे?" त्यांनी विचारल.

"माझे आई ,बाबा. खुशी मुळे माझे बाबा सापडले. माझा भाऊ, मामी त्यांचे दोन मुल. "कबीरने सांगितल.

" मामी ठीक आहेत ना? मामांना अटक झाली ना?"

"हो ती ठीक आहे. जरा नाराज आहे. "

" खुशी एमबीएला अ‍ॅडमिशन घेते आहे. "

" हो आमचा इथे ही बंगला आहे माझ काम ही इथे आहे. मी इथेच राहीन. " कबीर म्हणाला.

" या लग्नाबद्दल तुमच्या घरी माहिती आहे का? "रश्मी ताई विचारत होत्या.

" हो घरी माहिती आहे. "

आता रश्मी ताई कबीरशी आरामात बोलत होत्या. त्यांना कबीर आवडला होता. डॅशिंग आहे पण डाऊन टु अर्थ ही आहे. खुशी याच्या सोबत सुखाने राहील.

"तुम्ही तुमच्या आई बाबांना घेवून आमच्या कडे या . आपण ठरवून टाकू. तुमच्या काही अपेक्षा?"

"चालेल. अपेक्षा अस काही नाही. तुम्ही हे सगळं मनातून काढून टाका. मी पण लहान आहे मला माफ करा. खुशी सारख समजा. वेळ प्रसंगी गाईड करा. ओरडा. " कबीर म्हणाला.

"तुमच्याशी बोलून चांगल वाटल नाहीतर मला खुशी ची खूप काळजी वाटत होती. "रश्मी ताई म्हणाल्या.

" मला ही. तुम्ही दोघ खूप शांत समजूतदार आहात. आता हे कंपनी प्रोजेक्ट ट्रान्सफरच काम झाल की मी तुमच्या कडे यायच ठरवतो. तो पर्यंत खुशीची परीक्षा ही होईल. मॅडम ही चावी तुमच्या घराची. तुम्ही आज पासून तिथे राहू शकता. "

🎭 Series Post

View all