गुंतता हृदय हे भाग 58

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का

गुंतता हृदय हे भाग 58
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

रश्मी ताई कबीरशी बोलून खुश होत्या. हा मुलगा शांत पणे ऐकुन घेतो. धीराने घेतो हे बर आहे. नाहीतर मला वाटल होत हा नक्की अजून त्रास देईल.

सतीश राव आले. कबीर उठून उभा राहिला." सर तुमची केबिन. तुमची खुर्ची. "

ते तिघं हसत होते.

" तुमच झाल का बोलून?" सतीश राव विचारत होते.

हो.

"रश्मी अजून काही आहे का मनात?" त्यांनी विचारल.

"हो, कबीर तुम्ही मला मॅडम म्हणू नका." रश्मी ताई म्हणाल्या.

"हो मला ही सर नका म्हणू. तुमची आई मला भाऊ मानते." सतीश राव म्हणाले.

"मग मामा म्हणू का ?" कबीरने विचारल.

" नको. " तिघे हसत होते.

" काका हा चेक नुकसान भरपाई. हे माफी पत्र. खूपच गैरसमज झाला माफ करा." कबीर पत्र देत होता.

"पण बर झाल हे घडलं. त्यामुळे तुमचे बाबा सापडले. नाहीतर ते अजून कित्येक वर्ष त्या फार्महाऊस मधे राहिले असते." सतीश राव म्हणाले.

"हो बरोबर. खुशी मुळे ते सापडले. तिने सत्य शोधायचा प्रयत्न केला. नाहीतर मला ते फार्म हाऊस माहिती नव्हतं. " कबीर म्हणाला.

"हा चेक मी घेवू शकत नाही. माफ करा. " सतीश रावांनी चेक परत केला.

"प्लीज घ्या काका. मला बर वाटेल." कबीर आग्रह करत होता.

"नाही मला राग येईल." सतीश राव म्हणाले.

"हो आम्ही चेक घेणार नाही. "रश्मी ताई म्हणाल्या.

" मी निघतो. आपण भेटू मग. मी आई बाबांना सांगतो. तसा फोन करतो. चालेल ना. "कबीर विचारत होता.

" हो. "

त्याने दोघांच्या पाया पडल्या. सतीश राव, रश्मी ताई नको म्हणत होते.

कबीर, राऊत परत गेले.

दीक्षित मिठाई घेवून आले. ते खूप खुश होते. खूप मोठ संकट टळल.

"नुसत संकट टळल नाही तर आपल्या खुशीच लग्न ही जमलं. कबीर सोबत. "सतीश राव म्हणाले.

" अरे वाह अभिनंदन सर." दीक्षित म्हणाले. तस त्यांना थोड माहिती होत.

"दोघ पूर्वी पासून सोबत होते. आता काही प्रॉब्लेम नाही. दोघ मुलांनी विचारल आम्ही ही होकार दिला." त्यांनी सांगितल.

"काही हरकत नाही सर. भालेराव ग्रुप खूप मोठा आहे. छान झाल. त्यांच्याशी चांगले संबंध बरे. "दीक्षित म्हणाले.

" आता कुठून सुरुवात करायची?" सतीश राव म्हणाले.

" सर आपले एप्लाईज त्यांना आपल्या कंपनीत परत बोलावाव लागेल ." दीक्षित म्हणाले.

" दीक्षित आता तुम्ही काय ते ठरवा. चला काम खूप आहे." सतीश राव खुश होते.

" मला ही नंतर फाइल आणून द्या. आपल्या कडे किती पैसे आहेत कोणत्या प्रोजेक्ट साठी काय खर्च येईल तो बघावा लागेल." रश्मी ताई म्हणाल्या.

सगळ्यांना उत्साह आला होता.
....

कबीर कार मधे खुश होता. मी परांजपे मॅडमशी बोललो हे खुशीला सांगणार नाही. तिची गम्मत बघणार आहे. माझी वर परीक्षा घेते का? मीच तिला बघायला येईल आई बाबांना घेवून.

रश्मी ताई, सतीश राव घरी आले. त्यांनी देवा पुढे मिठाई ठेवली. माई, दिपू, खुशी, भक्ती आज आपल्याला आपली कंपनी, घर, वर्क शॉप परत मिळाल. खुशीची परीक्षा झाली की आपण तिकडे रहायला जाऊ.

सगळे आनंदात होते. रश्मी ताईंनी सांगितलं नाही की त्या कबीरशी बोलल्या.

खुशी पण अभ्यास करत होती. ती जागेवर जाऊन बसली. तिने कबीरला मेसेज केला. "थँक्यू. आई बाबा खुप खुश आहेत."

"आणि माझी खुशी? ती आनंदात आहे का?" कबीरने विचारल.

हो.

" मग पार्टी मिळेल का?" त्याने विचारल.

" हो परीक्षा झाल्यावर."

"आपण डिनर साठी जावू. काय करते आहेस?" कबीर म्हणाला.

"मी अभ्यास करते आहे."

"ऑल द बेस्ट." तो पण जास्त बोलला नाही. कबीर घरी आला. विराजला ही अभ्यास करत होता. दोघ शांत होते. कबीर त्याच काम करत होता. परांजपेंची कंपनी परत करून डोक्यावरून एक मोठ ओझ उतरल्या सारख वाटत होत. आता तो रीलॅक्स होता.

आज खुशीची परीक्षा होती. तिने ऑफिस मधे आधीच सुट्टी सांगितली होती. तिला पेपर चांगला गेला. बघू आता ऍडमिशन मिळते का? ती घरी आली. दुपारी जरा वेळ झोपली. उठली तर कबीरचे दोन-तीन फोन येऊन गेले होते.

"खुशी कसा गेला पेपर? " त्याचा मेसेज आला होता.

"ओके ओके होता. मला टेन्शन आलं आहे." ती म्हणाली.

" मिळेल ऍडमिशन."

"विराजला कसा गेला पेपर?" खुशीने विचारल.

"त्याला चांगला गेला. तो खूपच हुशार आहे. मी उद्या घरी जातो आहे घरच्यांशी बोलेल मग तुला सांगतो." कबीर म्हणाला.

"चालेल."

"तुमचं काय चाललं आहे? "त्याने विचारल.

"आम्ही आता सामान शिफ्ट करणार आहोत. आमच्या घरी रहायला जाणार आहोत. दोन दिवस घराची साफसफाई सुरू होती ."खुशी आनंदी वाटत होती.

"अरे वा."

" तू माझ्या आईशी कधी बोलणार आहेस?" तिने विचारल.

" हो बोलतो ना. भेटलो की बोलू." कबीर हसत होता.

" हसायला काय झालं? इतके दिवस तर तू आईशी बोलायचं म्हणून घाबरत होता ." तिला प्रश्न पडला होता.

"आपल्या लग्न जमत आहे ना म्हणून हसत होतो." त्याने काहीतरी सांगून दिल.

" काहीही कबीर. "

" खुशी आज डिनर साठी येणार का? प्लीज. " त्याला माहिती होत परांजपे काका काकू खुशीला पाठवतील.

" मी आईला विचारते. ती हो म्हणाली तर येईन. "खुशी भोळसट पणे म्हणाली.

" का अस?"

" मी आईला प्रॉमीस केल आहे. "

आई, बाबा अजून आले नव्हते. ते दोघ ऑफिस मधे होते. खुशीने फोन करून विचारल. "कबीर सोबत बाहेर जायच आहे. मी जावु का? "

" हो. लवकर दे. "

"कबीर आई हो म्हणाली." तिने आनंदाने सांगितल.

" मी सात वाजता घ्यायला येतो. " कबीर तयार होत होता. त्याने टी शर्ट जीन्स घातल होत.

" आज काय स्पेशल दादा? वहिनीला भेटायला जात आहेस का?" विराज खाली टीव्ही बघत होता.

" हो."

"हे काय कपडे घातले आहेत. बदल ते."

" अरे चांगले आहेत. "

" नाही छान दुसरे घाल, फॉर्मल."

"नको ऑफिस मधे ते कपडे असतात."कबीर म्हणाला.

" जमणार नाही. " विराजने त्याला तयार केल." जा आता. जबरदस्त दिसतो आहेस. एकदम हीरो."

" पुरे विराज." कबीर ही आरशात बघत होता. तो निघाला.
.......

खुशी पटकन रूम मधे गेली ती कपाटात ड्रेस शोधत होती." भक्ती पटकन इकडे ये. मला मदत कर. कबीर येतो आहे. कोणता ड्रेस घालू?"

"तु नेहमी जीन्स वर असते. डिनर साठी जाताय ना? वन पीस घाल ना. "

खुशी तयार होती. पिंक जांभळ्या रंगाचा सुंदर वनपीस घातला होता. केस मोकळे सोडले होते . पीक लिपस्टिक. मोठे स्टोनचे कानातले छान दिसत होते. मस्त तयारी झाली होती. भक्ती, दिपू, माई तिच्याकडे बघत होत्या.

" खुशी दी तू खूप छान दिसते आहेस."दीपू म्हणाली.

" माई मी निघते. आई बाबांना सांगितल आहे."

कबीरचा फोन आला.

"आले." ती खाली गेली. कबीर कार जवळ उभा होता. तो तिच्याकडे बघत राहिला. तिला ते समजल होत. जास्त तयारी झाली की काय?

"जायच का ?" तिने विचारल.

"कोण आहे ही मुलगी? तू नक्की खुशी आहेस ना? खूपच सुंदर. " त्याने मुद्दाम विचारल.

खुशी हसत होती. तिने त्याला पर्सने मारल.

" एक मिनिट." त्याने तिचा एक फोटो काढला. नीट उभ रहा खुशी. एक सेल्फी घेतला.

ती आत बसली.

कबीर ड्रायव्हींग सीट वर बसला. अजूनही तो तिच्याकडे बघत होता.

"कबीर समोर बघ ना. काय अस?"

"तु किती सुंदर दिसते आहेस. मला काही सुचत नाही. हा ड्रेस कधी घेतला? "

" जुना आहे आधी मला होत नव्हता. आता बरोबर झाला." खुशीने सांगितल.

" हो तू आता बारीक झाली. आधी कॉलेज मधे गब्बु होतीस." कबीर म्हणाला.

"आपण कुठे जातोय?"

"डिनर साठी ."

"हो पण काही ठिकाणाच नाव?"

कबीरने सांगितल नाही. बराच वेळ झाला तो कार चालवत होता.

"कबीर आपण केव्हा पोहोचणार? आता आपण सीटी बाहेर आलो. कुठे चाललोय?"खुशी बघत होती. बाहेर किती अंधार आहे.

" मी तुला पळवून नेत आहे. " कबीर वेगळया आवाजात म्हणाला.

" बर काही हरकत नाही. " खुशी त्याच्या कडे बघत म्हणाली. कबीर ही ना एक एक सुरू असत.

ते एका रिसॉर्ट वर आले. बरीच शांत छान जागा होती. कार पार्क केली.

"इथे कोणी नाही का? " खुशी इकडे तिकडे बघत होती.

" मी आहे ना. "

" हो पण ही जागा सेफ आहे ना?"तिने विचारल.

"ते बघ बॉडी गार्ड सोबत आहेत ."

"ओह ते ही जेवतील का? "

" हो आपल्या सोबत." कबीर गम्मत करत म्हणाला.

ती त्याला मारत होती.

"या ग्रुप मधे माझा बॉडीगार्ड दिसत नाही." खुशी बघत होती.

"खुशी चल त्यांची काळजी करू नकोस."

कबीरने तिचा हात पकडला. दोघ आत गेले. आत छान व्यवस्था होती. कोणीही नव्हतं. खुशी इकडे तिकडे बघत होती.

" इथे ही कोणी नाही. "

" कारण हे रिसॉर्ट फक्त आपल्या साठी बूक केल आहे." कबीर म्हणाला.

" ओह माय गॉड. काय गरज होती."

"मला नाही आवडत कोणी तुझ्याकडे बघितल तर. "

" मग रोज रस्त्याने, बिल्डिंग मधे, ऑफिस मधे किती लोक माझ्याकडे बघतात. तेव्हा काय करणार?" खुशीने विचारल.

"ते नॉर्मल. आज अशी स्पेशल डेट आहे. मला माहिती होत तु छान तयारी करशील. "

दोघ एका टेबल जवळ येवून बसले. छान एरेंजमेंट होती. म्युझिक सुरू होत.

" कबीर काय आहे हे सांग ना? "

" वेट अ‍ॅण्ड वॉच. "

थोड्या वेळाने वेटर आला. कबीर त्याच्याशी बोलत होता. तो केक घेवून आला.

" केक का?"

"असच आपण सोबत आहोत ते सेलिब्रेट करू. "आज कबीर खूपच खुश होता. परांजपे मॅडम ही हो म्हणाल्या. आता काही अडचण नव्हती. जेव्हा पासून ते एकत्र होते फक्त टेंशन होत. अस आरामात कधी भेटलो नाही म्हणून आज त्याला खुशी सोबत छान वेळ घालवायचा होता.

केक ही तिचा आवडता होता चॉकलेट केक. कबीर उभा राहिला. तो खुशी कडे बघत होता. तो एकदम गुडघ्यावर बसला . खुशी... त्याने तिच्या पुढे अंगठी धरली.

" हे माझ्या बाजूने प्रपोजल. माझ्याशी लग्न करशील का?" त्याने विचारल.

खुशी हसुन बघत होती.

"प्लीज काहीतरी म्हण." कबीर म्हणाला.

"कॉलेज मधे मी तुझ्या मागे येत होते तेव्हा कस करत होता?" खुशीला आठवल.

"तेव्हा माझा उद्देश वेगळा होता ना खुशी."

"आता?"

"आता मला फक्त तू हवी आहेस. तुझ्या सोबत आरामात रहायच आहे. " कबीर म्हणाला.

" नंतर तू मला ओरडणार नाही ना? "

"नाही."

" भांडण करणार का?"

"अजिबात नाही. "

" मी सांगेल ते. "

" लगेच ऐकेल. " कबीर हसून उत्तर देत होता.

खुशी हो म्हणाली. तिने हात पुढे केला. आता कबीर एक्टीव झाला. मला त्रास देते का?

"अस नाही खुशी नीट हो म्हण."

खुशीला बोलता येत नव्हत. अचानक लाजल्या सारखं झाल होत. कबीर तिच्याकडे बघत होता. तिने हिम्मत केली.

"कबीर तुला माहिती आहे आधी पासून मला तू खूप आवडतो . मला तुझ्या सोबत पूर्ण आयुष्य काढायच आहे. माझ्या सोबत असाच प्रेमाने रहा. "

तो हो म्हणाला.

" आय लव यु सो मच." तिने खाली बघितल.

कबीर छान हसत होता. "लव यु."

त्याने तिच्या हातात अंगठी घातली. अतिशय सुंदर टपोरे हीरे चमकत होते. वॉव ती डिझाईन बघत होती.

" डिझाईन आवडली का? "

" हो खूप."

त्याने हातावर ओठ टेकवले. खुशी लाजली होती.

" मला अंगठी? " त्याने विचारल.

" सॉरी कबीर मला काय माहिती तू अंगठी आणशील. मी नंतर देवू का?" तिला कसतरी वाटल.

" मला आत्ताच हवी."

काय करू अस खुशीला झाल होत.

"हे घे." त्याने तशी दुसरी अंगठी बाहेर काढली. कपल रिंग होती. दोघांची मॅचिंग.

" ही पण अंगठी तुलाच घ्यावी लागली कबीर."

"काही हरकत नाही." खुशीने त्याला अंगठी घातली.

दोघांनी मिळून केक कापला. कबीरने तिला मिठीत घेतल. " खुशी माझ तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. माझ्या पासून कधीच दूर जायचा विचार करायचा नाही."

"कबीर मला तर हे स्वप्नं वाटत आहे." खुशी म्हणाली.

" खर आहे हे आता या पुढे कोणाच काहीही झाल तरी चालेल. आपण अस प्रेमाने रहायच . प्रॉमीस कर."

"प्रॉमीस."

त्याने पुढे होवुन गालावर ओठ टेकवले. खुशी लाजली होती. ती बाजूला झाली.

" खुशी शांत हो आपण कपल आहोत. माझ्या सोबत लाजायच नाही ."

तिला ही त्याच्या सोबत आवडत होत. पण नवीन अनुभव होता. त्यामुळे थोडा विरोध तिच्या कडून आपोआप होत होता.

म्युझिक सुरू होत. दोघ छान नाचत होते. त्यांची केमिस्ट्री खूप छान होती. एकमेकाना काय हव ते न सांगता समजत होत. दोघ एकमेकांसोबत छान दिसत होते. तो जितका हॅन्डसम, तितकीच ती निरागस गोड. दोघ एकमेकांना जपत होते. त्याच्या कडे बघून तिला स्वतः चा हेवा वाटत होता. तो तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला होता.

सर जेवण रेडी आहे सर .

दोघ टेबल जवळ येवून बसले.

सूप स्टार्टर आले. मेन कोर्स ही तिच्या आवडीचा होता.

"तुझ्या आवडीच काही नाही घेतल का कबीर?" तिने सहज विचारल.

"माझ्या आवडीची आहे ना तू? माझ तुझ्या कडे बघून पोट भरलं?" कबीर म्हणाला.

खुशी हसत होती. वेगळच समाधान त्यांच्या चेहर्‍यावर होत. जेवण झाल. मागे गार्डन मधे ते बरच वेळ बोलत बसले होते .

"किती शांत छान वाटत ना इथे. " खुशी म्हणाली.

" हो खुशी. अस वाटत ही वेळ इथेच थांबावी. " कबीर तिचा हात हातात घेऊन बसला होता.

रश्मी ताईंचा फोन आला." खुशी बेटा उशीर झाला आहे. कुठे आहेस? "

" येते अर्धा तास. कबीर आहे तो सोडून देईल." तिने फोन ठेवला.

"चल कबीर. मला सांग ना तू आईशी कधी बोलणार आहे."

"बोलेन ना. मला भीती वाटते." कबीर म्हणाला.

"माझ्या समोर खूप दादागिरी करतो आता का? लवकर बोलून घे ना. "खुशी म्हणाली.

" का लग्नाची घाई झाली का?" त्याने तिला जवळ ओढल.

कबीर... ती ओरडली. बाजूला सरकून बसली.

" खुशी चिडू नको ना. "

" मग तू लगेच आईशी बोलायच. "

" हो. एकदा छान मिठीत ये. मग आपण निघू. "

रस्त्याने खुशी खूप बोलत होती. आधी सारखी निरागस दिसत होती. कबीर नुसत ऐकत होता. ते घरा जवळ आले.

" खुशी मी निघतो." तो तिच्या कडे बघत होता. तिला समजल तो तिला जवळ घेणार होता.

"कबीर ते समोर बघ आई बाबा."

"ते या वेळी इथे काय करताय? "कबीरने विचारल.

" वॉक घेत आहेत. माझ्यासाठी थांबले असतिल. "

तो उतरून आला.

"आई बाबा." खुशीने आवाज दिला. ते चौघे छान बोलत होते.

कबीर घरी गेला.

ते घरी आले. भक्ती, दिपु अभ्यास करत होत्या. "खुशीदी आज तुला जिजुंनी चॉकलेट दिल नाही का? "

सतीश राव, रश्मी ताई तिच्या कडे बघत होत्या.

" आज चॉकलेट नाही मिळाल. मी उद्या आणेल ह दीपु."

"आपल घे ना दिपु फ्रीज मधून." रश्मी ताई हसत म्हणाल्या.

खुशीने सगळ्यांना अंगठी दाखवली.

"ओह माय गॉड किती सुंदर आहे." भक्ती दिपू खूप गडबड करत होत्या.

"अंगठी महाग वाटते आहे." रश्मी ताई लांबून बघत होत्या.

"कुठे गेली होतीस खुशी दी?"

तिघी बोलत होत्या.

सतीश राव, रश्मी ताई रूम मधे गेले. दोघ खुश होते.

" सांग ना खुशी दी तू जिजुं सोबत कुठे गेली होतीस?"

"लांब रिसॉर्ट मधे. खूप छान होत. "खुशी सांगत होती.

" काय काय खाल्लं?"

"सगळं माझ्या आवडीच होत ." भक्ती, दिपू, खुशी खूपच गप्पा मारत होत्या.

खुशी आत रूम मधे होती. वेगळच हसू तिच्या चेहर्‍यावर होत. सगळ्यांना ते दिसत होत.

कबीरचा घरी पोहोचल्याचा मेसेज आला.

तिने गुड नाइटचा मेसेज केला.


🎭 Series Post

View all