गुंतता हृदय हे भाग 59

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का
गुंतता हृदय हे भाग 59
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

दुसर्‍या दिवशी खुशी आणि घरचे बिझी होते. त्यांनी बंगल्यावर सामान शिफ्ट केल. भक्तीला घर खूप आवडलं होत. ती सगळीकडे फिरून बघत होती. आपण इथे रहायचं आहे का ? नक्की का? मला तर हे घर खूप आवडलं . किती मोठ आहे. माझी रूम कुठे आहे? बापरे इथलं बाथरूम किती मोठा आहे. गार्डन आपलं आहे का? किचन तर किती मोठा आहे. तुम्ही सगळे वेगवेगळ्या रूम मध्ये रहाणार का? दिवसा एकमेकांशी कस बोलायचं? आपण हॉल मधे भेटणार का? स्वयंपाक तयार आहे हे कसं समजणार? मला करमल नाही तर काकू मी तुमच्या रूम मधे येवू शकते ना? असे बरेच प्रश्न तिला पडले होते.

रश्मीताई त्याला उत्तर देत होत्या. बाकी सगळे हसत होते.

"अजिबात आमच्या भक्तीला कोणी हसायच नाही." त्यांनी तिला जवळ घेतल.

भक्ती खूपच एक्साईटेड होती. तिने मंगेश, प्रकाश सगळ्यांना फोन करून घराबद्दल सांगितलं होतं. ते दोघ रविवारी येणार होते.

भक्तीची मोठी रूम होती. ती सामान नीट ठेवत होती.
एन्जॉय करत होती. तिचं आणि रश्मीताईंचं खूप छान पटत होतं. कुठलीही गोष्ट त्या तिचा विचारून करत होत्या.

"काकु मला अस वाटत तुमच माझ नक्की मागच्या जन्मी काहीतरी नात असेल म्हणून मला तुम्ही भेटल्या." भक्ती म्हणाली.

"मला पण अस वाटत भक्ती." रश्मी ताई म्हणाल्या.

दिपू, खुशी त्यांच्या कडे बघत होत्या. "आम्हाला ही थोड जवळ घ्या की. नुसते भक्तीचे लाड सुरू आहेत."

रश्मी ताई हसत होत्या. "चला आटपा अजून बरच सामान लावायच बाकी आहे." तसे मदतनीस होते. पण तरी लक्ष द्याव लागत होत.
.....

कबीर, विराज गावाला आले. जेवण झाल. विलास राव कबीर आल्या मुळे खुश होते. मुल इथे नव्हते तर करमत नव्हत.

"झालं का तिकडच काम? परांजपेची कंपनी परत केली का?" सुलक्षणा ताई विचारत होत्या.

" हो आई ते काम झालं आहे. आपण परांजपे कडे जावू." कबीर हळूच म्हणाला.

"हो पुढची बोलणी करून घेवू. "

विलास राव, कबीर खूप गप्पा मारत होते. तो त्यांना नवीन कामाबद्दल सांगत होता. विलास राव वेगवेगळ्या आयडिया देत होते.

" बाबा हे छान आहे. मी आता बिझनेस मधे वापरेन. बाबा तुम्ही खूप हुशार आहात. "कबीर म्हणाला.

" तुझ्या हातात अंगठी आहे का दादा? बघू." सोनु म्हणाली.

सगळे अंगठी कडे बघत होते.

" याचा साखरपुडा झाला?" सोनू म्हणाली.

"आम्हाला का नाही बोलवलं?" सगळे विचारत होते . विलास राव हसत होते.

" हो काल दादा खूप उशिरा आला. " विराज मुद्दाम म्हणाला.

"तुला ही नाही बोलावलं. " सोनूने विचारल.

" नाही ना. मीच त्याची तयारी करून दिली तेव्हा काही सांगितल नाही. " विराज सगळ्यांना सांगत होता.

"आई ,मामी थांबा अस काही नाही. मी सांगतो. मुलांनो शांत व्हा. ते आम्ही असच अंगठी एक्स्चेंज केली. "कबीर म्हणाला.

" असच म्हणजे? " सविता म्हणाली. "बघा ताई. "

हो ना.

सगळे चिडवत होते. कबीर उत्तर देवून थकला.

तो वैतागून आत निघून गेला.
.......

घरातलं सामान लावायला बराच वेळ झाला होता. रश्मीताई स्वतः सगळं आवडीने करत होत्या. दोन-चार पूर्वीच्या ताई कामाला आलेल्या होत्या.

"रश्मी आता आराम कर." सतीश राव म्हणाले. त्यांना त्याचा उत्साह समजत होता. त्या अगदी आधी सारख्या एक्टीव्ह झाल्या होत्या.

"अहो मला वाटतय आपण घरात पूजा करून घेऊ." रश्मी ताई म्हणाल्या.

"नक्की."

दुसऱ्या दिवशी सगळे ठरवत होते. खुशी आवरून आली. "काय चाललं आहे? "

"या रविवारी आपण घरी पूजा ठेवणार आहोत."

"अरे वा."

"डबा घे ग. "

खुशी ऑफिसमध्ये आली. रोहित आणि श्रुतीचही आता बऱ्यापैकी जमलेलं होतं. तेही या रविवारी भेटणार होते.

" मला या रविवारी तुझ्या सोबत यायला जमणार नाही रोहित . घरी पूजा आहे." खुशी म्हणाली.

"ठीक आहे मी माझ्या आता घरच्यांना घेवून जावून येतो. "

" लग्न ठरवून टाका. "

" बहुतेक जवळचाच मुहूर्त बघू. तुमचं काय ठरलं?" रोहित विचारत होता.

"अजून काहीच नाही. कबीर गावाला जाऊन बसला आहे. तो खूप बिझी आहे. बघू अजून कबीर आईशी बोलला नाही. "खुशी म्हणाली.

" सांग ना मग त्याला. "

" अरे तो बिझी असतो. आम्ही पण आता शिफ्टिंग मध्ये होतो. इतर वेळी आपले ऑफिस असतं. "

" बघ अजून विचार कर. एवढा सक्सेसफुल नवरा नको. तो दिवस रात्र मीटिंगमध्येच बिझी असेल. तू त्याची वाट बघत बसशील. "रोहित तिला चिडवत होता.

" तुझं काय? तू पण सक्सेसफुल आहेस. तुझ्या पण मीटिंग चालतात. मी करू का श्रुतीला फोन? " खुशी म्हणाली.

" नको ग बाई एकतर ती कशीतरी हो म्हणाली आहे. " रोहित हात जोडत होता.

खुशी जागेवर आली. स्नेहा.... ती अंगठी दाखवत होती.

" वॉव किती सुंदर डिझाईन आहे. डायमंड ह्म्म. एंगेजमेंट झाली? "तिने विचारल.

" नाही ग आम्ही असच भेटलो होतो. त्याने प्रपोज केल."

" अशी अंगठी देवून. ओह माय गॉड. खुशी असे मूल कुठे असतात. मला का दिसत नाही." स्नेहा म्हणाली.

दोघी खूप बोलत होत्या.

राहुल जवळ येवून उभा राहिला.

" झाल्या का गप्पा? स्नेहा आटोप काम कर. "

"फक्त स्नेहा? तुला खुशी दिसत नाही का? " स्नेहा चिडली.

" तिला ओरडल तर ती माझ नाव तिच्या नवर्‍याला सांगते. तो डेंजर आहे. खुशी एकदा विचार कर. तुला तो कबीर ओरडला म्हणजे?" राहुल म्हणाला.

" खुशी कबीर छान आहे. डॅशिंग एकदम, भारी बिझनेस मॅन. या राहुलच ऐकु नकोस."

"अंगठी प्रकरण झाल असेल तर कामाच बघता का? तुम्हाला नाही मला टार्गेट असत. पुढच्या वेळी जास्त लेडिज स्टाफ नको मला. "राहुल वैतागला होता.

" आम्ही मुली आहोत म्हणून वेळेवर काम होत. मुल असते तर अजून अर्ध झाल नसत. ते इकडे तिकडे फिरत बसतात. " स्नेहा म्हणाली.

" बरोबर आहे. आपण लागोपाठ दोन तीन तास एका जागी बसुन काम करतो. राहुल काहीही बोलतो. "खुशी ही म्हणाली.

" आता मुद्दाम स्लो काम कर खुशी. "

हो.

लंच ब्रेक मधे रोहित भेटला.

" रोहित मी जॉब राहू देवू का सोडू?" खुशीने विचारल.

" तुला जमेल का लग्नानंतर? "

" पंधरा दिवस तरी जमणार नाही. नंतर कॉलेज सुरू होईल. "

" एवढी धावपळ करू नकोस. आता दोन कंपनीची तू मालकीण. परांजपे इंडस्ट्री, भालेराव ग्रुप. मला लोन लागल तर दे. एक मिनिट हात बघू. अंगठी तर जबरदस्त आहे. कुठून घेतली." रोहित बघत होता.

"माहिती नाही कबीरने प्रपोज केलं ."

" रेअर डायमंड आहेत. महाग असेल. मोठे लोक मोठ्या गोष्टी. डबा आणला ना दे ना. "

दोघ जेवत होते.
....

संध्याकाळी सतीश रावांनी विलास रावांना फोन केला." या रविवारी आमच्याकडे पूजा आहे. तुम्ही सहकुटुंब सहपरिवार आमच्याकडे या. दिवसभर यायचं आहे. "

"नक्की येऊ."

"अजून एक. हे मुलं काय म्हणत आहे तेही जरा बघून टाकू." सतीश राव म्हणाले.

"काही हरकत नाही." विलास राव खूप गप्पा मारत होते.

" एक मिनिट." त्यांनी फोन रश्मीताईंकडे दिला. त्या बोलत होत्या. विलासराव यांनी फोन सुलक्षणाताईंकडे दिला.

"यापूर्वी आपण कधी बोललो नाही. मी खुशीची आई रश्मी आहे. तुम्ही आमच्याकडे रविवारी या. "रश्मी ताई म्हणाल्या.

" नक्की येऊ. "

" तुम्हाला समजलं असेल ना कबीर आणि खुशी बद्दल." रश्मी ताईंनी विचारल.

" हो मला पूर्वीपासून माहिती होतं. आमची काही हरकत नाही. चांगली जोडी आहे. आपण रविवारी पुढचे प्रोग्राम ठरवून टाकू. "सुलक्षणा ताई म्हणाल्या.
......

रश्मी ताई भक्ती मार्केट मधे गेल्या होत्या. पूजेच सामान त्यांना स्वतःला घ्यायच होत. भक्ती विचारत होती कसली पूजा आहे? त्या माहिती देत होत्या.
......

कबीर आज तिकडच्या ऑफिस मधे गेला होता. खूप काम झाल. त्या बरोबर शेतावर नवीन लोक ठेवले. ते काम सुरू झाल. येतांना तो पोलीस स्टेशन मधे जावुन आला. मामाची केस सुरू होती.

घरी सुलक्षणा ताई कामात होत्या. उद्या तिकडे जायच त्या तयारी करत होत्या.

विराज... सुदेश, सोनुला अभ्यासाबद्दल विचारत होता. कबीरला त्याच्या कडे बघून हसू आल. स्वतः ची परीक्षा झाली तर किती भारी भरतो.

कबीर रूम मधे होता. सुलक्षणा ताई आत आल्या.
"कबीर तू उद्या काय घालणार? कुर्ता घालतो का?"

"काहीही आई, त्यांच्या कडे पूजा आहे मी काय कुर्ता घालायचा. मी नेहमीच्या कपड्यांवर येणार." तो म्हणाला.

त्याने आज मुद्दाम खुशीला फोन केला नाही. तिचा मेसेज आला होता. त्याने बिझी आहे सांगून दिल. त्याला तिला उद्या घरी येतो आहे ते सांगायच नव्हत.

सकाळी विलास राव, सुलक्षणा ताई तयार होते. बाकी कोणी येणार नव्हते. अजून काही ठरल नव्हत. उगीच तिथे गर्दी नको.
....

रश्मी ताई धावपळीत होत्या. किचन मधे स्वयंपाक सुरू होता. त्या प्रसाद करत होत्या. भक्ती किचन मधे होती. मुलींनी छान ड्रेस घातले होते. सतीश राव गुरुजीं सोबत पूजेची तयारी करत होते. खुशी त्यांना मदत करत होती. दीपु माई फुलांच्या माळा करत होत्या.

पूजा सुरू होती. खुशी, भक्ती बसलेल्या होत्या. दिपू रश्मी ताईं जवळ बसलेली होती.

कबीर, विलास राव सुलक्षणा ताई निघाले. "आम्ही रात्री पर्यंत येतो. "
ते दोघे मागे बसले होते. कबीर पुढे ड्रायवर जवळ होता. त्याला खूप छान वाटत होत. खुशीला कधी बघू अस झाल होत. तिला माहिती नाही. आम्ही येतो आहोत ते. तो फोन मधे बघत होता. खुशी काय करत असेल? चला तिला त्रास देवु.

कबीरने मेसेज केला. "काय चाललय खुशी ?"

" पूजा आहे. मी पण बिझी आहे. " तिने त्याच्या सारख उत्तर दिल. काल तो बोलला नाही त्याचा तिला राग आला होता.

अरे बापरे राग आला वाटत मॅडमला. "तू तयार झालीस का?" त्याने विचारल.

हो.

"खूप सुंदर दिसत असशील. "

मेसेज वाचून खुशी लाजली होती.

" खुशी तुझा फोटो पाठव. " त्याने विचारल.

" जमणार नाही. "

" काय अस? मला तुला बघावासं वाटत आहे." कबीर म्हणाला.

" तु इकडे येवून मला बघ." खुशीने उत्तर दिल.

" बघ ह मला चॅलेंज करायच नाही. "

खुशीला वाटल एवढीशी पूजा हा कश्याला येईल. तिने फोन बाजूला ठेवला.
......

" कबीर आज त्या लोकांना वेळ असेल तर लग्नाची तारीख ही ठरवून ठेवू. कारण पुढच्या महिन्यात लग्नाचे मुहूर्त नाहीत." सुलक्षणा ताई म्हणाल्या.

खरंतर कबीरला खूप आनंद झाला होता. पण तो नुसता हो म्हणाला.

सुलक्षणा ताई काय काय घ्याव लागेल ते विलास रावांना सांगत होत्या.

कबीर ही बाबा हे बघा ते बघा अस करत होता.

ते परांजपे बंगल्यावर पोहोचले. त्यांची पूजा झालेली होती. खुशी, भक्ती. दीपु रूम मधे होत्या. माई आराम करत होत्या.

सतीश राव, रश्मी ताईंनी तिघांचा छान स्वागत केल . तिघ घराकडे बघत होते. आज घर खूप छानच वाटतं आहे. कबीर विचार करत होता .

" छान घर आहे." सुलक्षणाताई म्हणाल्या.

कबीर बघत होता खुशी कुठे आहे?

"मुली दिसत नाहीत." सुलक्षणाताई म्हणाल्या.

रश्मीताईंनी खुशीला फोन लावला. "खुशी कबीरच्या घरचे आणि कबीर आले आहेत. जरा बाहेर ये."

"काय?" खुशी एकदम उठून उभी राहिली.

"भक्ती, दिपू, माई मी काय करू? " ती गडबडली.

"काय झालं ?"

"काय खाली पाहुणे आले आहेत. खाली बोलावलं आहे." खुशी म्हणाली.

" त्यात काय एवढं? कोण आले आहेत?"

" कबीर आणि त्याच्या घरचे. बहुतेक त्याचे आई-बाबा आले असतील. भक्ती माझी वेणी घालून दे पटकन. ओढणी कुठे आहे? दिपू तू बघत काय बसली आहेस जरा ते पावडर लिपस्टिक इकडे दे. या कबीरला येण्याआधी सांगता येत नाही का? चॅलेंज केल म्हणून लगेच यायच का? " खुशी बडबड करत होती.

भक्ती तिचे केस विसरत होती. माई कौतुकाने बघत होत्या. दीपु सुद्धा तिला मदत करत होती.

" मला तर नुसतं धडधड वाटत आहे. माई मी काय करू? "खुशीने विचारल.

" काही नाही खाली गेल्यावर रश्मीताई जवळ उभा रहा. त्या सांगतील तसं कर. पाया पड. मोठ्या मोठ्याने बोलू हसू नको."

"माई तुम्ही काहीही सांगता. " भक्ती हसत होती.

" तुझा पण नंबर येणार आहे. थोडे दिवस थांब. "

दिपू तर आत्तापासूनच हसत होती.

" तुम्ही लोक शांत रहा ना. माई तुम्ही खाली चला माझ्यासोबत. "खुशी म्हणाली.

" हो पण तू पुढे हो. पाहुणे तुला भेटायला आले आहेत. "

" भक्ती माझा फोन आण. " तिने कबीरला मेसेज केला
" येण्याआधी सांगता येत नाही का? "

त्याने मेसेज बघितला. उत्तर दिलं नाही.

"बघितलं का किती जास्त करतो आहे हा. अजून तर लग्नही झालं नाही. नंतर काय होईल? "खुशी विचार करत होती.

खुशी, भक्ती, दिपू, माई सगळ्या बाहेर आल्या. कबीर ओळखीचा होता त्याच्याशी ती इतक बोलत होती तरी आज ती घाबरून गेली होती.

माईंनी सांगितल्याप्रमाणे खुशी रश्मीताई जवळ उभी राहिली.

"खुशी यांना ओळखते ना तू ते आज सगळे तुला भेटायला आले आहे." सतीश राव तिला समोर घेऊन आले.

कबीर बघत होता खुशी साधी आणि छान दिसत होती. लाल अनारकली घातला होता. दमलेली वाटत होती. थोडी घाबरलेली ही. किती शांत जशी.

तिने विलासराव आणि सुलक्षणाताई यांच्या पाया पडल्या. नंतर सतीश राव रश्मीताईंच्या पाया पडल्या.

" आमच्या कशाला पडते आहे आता बस आरामात. " सतीश राव म्हणाले.

" ही भक्ती , दिपू तुम्हाला माहिती आहे. दिपू, भक्ती नमस्कार करा. या माई माझ्या मोठ्या बहिणी सारख्या आहेत. त्या आधीपासून आमच्याकडे असतात." सतीश राव ओळख करून देत होते.

" मोठ माणूस असावं कोणीतरी घरात. आधार असतो. " सुलक्षणा ताई म्हणाल्या

खुशी सुलक्षणाताईंच्या बाजूला बसली. विलासराव तिच्याशी बोलत होते. "तुझी पण परीक्षा होती ना कसा गेला पेपर?"

"चांगला गेला ऍडमिशन मिळायला पाहिजे."

"आमच्या विराजची पण परीक्षा होती."

हो.

कबीर भक्ती आणि दिपू सोबत बसलेला होता.

" दिपू, भक्ती तुम्ही दोघी कॉलेजला आहात ना?"

" हो जिजु." तो थोडासा हसला.

"मी आता बारावीत आहे. भक्ती दीदी फर्स्ट इयरला."

" हे घ्या तुम्हाला. " त्याने चॉकलेट आणले होते. दिपू खुश होती.

खुशी मुद्दाम त्याच्याकडे बघत नव्हती. चहा आला.

"खुशी चहा दे सगळ्यांना." खुशी उठली. तिच्या मदतीला भक्ती होती. तिने विलासराव, सुलक्षणाताईंना चहा दिला. नंतर ती चहा घेऊन कबीर कडे आली. तो तिच्याकडे बघून हसत होता." हाय. ओळख आहे ना. कस आहे सरप्राईज."

खुशी काही म्हटली नाही. काय करणार आता? कबीर नेहमी जिंकतो. त्याची वर परीक्षा होती ना. माझी वधू परीक्षा होते आहे.

"तु आज जास्त बोलत नाही खुशी काय झाल?" कबीर हळूच म्हणाला.

" काही नाही."

त्यांनी पूजा केली. लगेच जेवणाचा कार्यक्रम होता.

रश्मीताई सगळ्यांना आग्रह करत होत्या.

" छान झाला आहे स्वयंपाक." सुलक्षणा ताई म्हणाल्या.

आई कबीर चांगले बोलता आहेत. त्या दिवशी ही ती कबीरशी छान बोलत होती. खुशीला आश्चर्य वाटत होतं.

जेवण झालं. ते सगळे हॉल मधे बसले होते.

"कबीर खुशी यांच्या लग्नाचा मुहूर्त बघून घेऊ." सतीश राव म्हणाले.

खुशी आश्चर्याने बघत होती.

"करायचा आहे ना लग्न अशी का बघते आहेस?" रश्मी ताई विचारत होत्या.

"तुला कबीरशी बोलायचं होतं ना?"

" झालं आहे आमचं बोलून म्हणून तर आज तिकडे आले आहेत ना ." रश्मी ताई म्हणाल्या.

कधी?

" ज्या दिवशी कंपनी परत केली त्या दिवशी आम्ही बोललो आणि मला काही अडचण नाही. " रश्मी ताई सांगत होत्या.

कबीर हसत होता.

रश्मीताई फोनवर बोलत होत्या. त्यांनी दोन-चार मुहूर्त काढले. जास्त मुहूर्त नाहीयेत नंतर.

" हो मी पण आज सकाळीच बघितलं." सुलक्षणाताई म्हणाल्या.

जवळच्या पंधरा दिवसाची तारीख फिक्स झाली.

" तयारी होईल का पण? कॉन्ट्रॅक्ट द्यावे लागेल." रश्मी ताई म्हणाल्या.

"आपणच ठरवतो आहे. कबीर खुशी तुमचं काय म्हणणं आहे?" सुलक्षणा ताई विचारत होत्या.

"मला खुशी सोबत बोलायच आहे. " कबीर म्हणाला.

खुशी आणि कबीर बाहेर बागेत फिरत होते.

"काढायचं ना मग लगेच मुहूर्त." कबीरने विचारल.

खुशी लाजली होती.

"काय विचारतो आहे? तू आत्ता पासून किती लाजते आहेस. आत जाऊन हो म्हणायचं ना? "कबीर म्हणाला.

" आईने कसा काय होकार दिला ? ती तर खुप चिडली होती. "खुशी च्या मनात अजून तेच होत.

"हो मग आपली जादू सगळे सगळ्यांवर चालते तुला माहिती आहे." कबीर म्हणाला.

" मला का नाही सांगितलं? "

" असं तुला भेटायला येता आलं नसतं. बरं काय महत्त्वाचं आहे तुला सांगितलं नाही ते का? की आता आपलं लग्न जमत आहे ते. उगीच रुसून बसू नको खुशी. सांग ना जवळचाच मुहूर्त घ्यायचा ना? लग्न करून घेऊ नंतर तुझं कॉलेज सुरू होईल त्या आधी आपण फिरून येवू." कबीर सहज म्हणाला.

खुशीला काय कराव अस झाल होत. कबीर डायरेक्ट अस कस बोलतो. फिरायला म्हणजे हनीमूनला.

" खुशी तू लाजली का? अरे आता लग्न झाल तर पुढच्या गोष्टी येतील ना. त्यात काय? मोकळ बोल. "

"कबीर प्लीज ."

तो हसत होता.


🎭 Series Post

View all