गुंतता हृदय हे भाग 60

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का

गुंतता हृदय हे भाग 60
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

कबीर खुशी बाहेर बागेत बसुन बोलत होते.
"खुशी आपण लवकर लग्न करून घेवू. आता मी तुला भेटायला येणार नाही. आपली भेट लग्नातच होईल. " कबीर म्हणाला.

दोघ आत आले. त्यांनी जवळची तारीख काढायला सांगितली. पुढचे कार्यक्रम ठरत होते.

" लग्न इकडे होईल. " सतीश राव म्हणाले.

" नाही तिकडे गावाकडे. सगळा खर्च आम्ही करणार. आमच्या फार्म हाऊसवर कार्यक्रम करू. मोकळी जागा आहे." विलास राव म्हणाले.

" एवढे लोक कुठे रहातील? " सुलक्षणा ताई म्हणाल्या.

" कबीर तिकडे अॅरेंजमेंट करेल. मोठी जागा आहे. एकत्र राहू. मस्त मजा करू. दोन तीन हॉल आहेत. " विलास राव म्हणाले.

"मुलांना चालेल का? कबीर, खुशी? सतीश भाऊजी, वहिनी तुम्हाला ही चालेल का?" सुलक्षणा ताईंनी विचारल.

"आम्हाला चालेल. नाईक साहेब म्हणता आहेत ते करू. " दोघ म्हणाले.

" हो चालेल." कबीर म्हणाला. बाबांनी जे सांगितल ते त्याच्या साठी अंतिम शब्द होता. इतके दिवस विलास रावांना कोणतच सुख उपभोगता आल नाही. आता त्यांना खुश ठेवायचा सगळे प्रयत्न करत होते.

" मी लगेच फार्म हाऊसवर काम करून घेतो. " कबीर म्हणाला.

विलास राव कशी व्यवस्था हवी ते सांगत होते. त्यांच नियोजन नेहमी खूप चांगल असायच. त्यातून ते किती हुशार आहेत ते समजत होत.

" होईल का पण हे काम पंधरा दिवसात? " सुलक्षणा ताई म्हणाल्या.

" अरे मग. तू त्याला समजते काय? कबीर नाईक आहे तो." विलास राव खूप अभिमानाने बोलत होते.

सगळे हसत होते.

खुशी तर काहीच म्हणत नव्हती. ति खूप शांत झाली होती. काल पर्यंत तिला वाटत होत लगेच कबीर सोबत लग्न कराव. आज आई, बाबा, दीपु, भक्ती, माई सगळे डोळ्यासमोर दिसत होते. यांना सोडून जायच. तिला रडू येत होत.

सगळे एक एक सांगत होते. पूर्ण कार्यक्रम ठरला. परत एकदा चहा झाला.

"खुशी तू काही म्हणत नाही. तुला कबीर पसंत आहे ना ? काही टेंशन नाही ना बेटा?" त्या कबीर कडे बघत होत्या. एक तर मधे खुप काही होवुन गेल होत. या कबीरने त्यांचा ऑफिस, बंगला घेतला. बरेच वाद झाले. तो हिच्याशी बळजबरीने लग्न तर करत नाही ना . म्हणून त्या विचारत होत्या.

" काकू मला काही प्रॉब्लेम नाही." ती म्हणाली. आता मोठ्यां समोर काय बोलणार. तुम्ही ठरवत आहात मी ऐकते आहे.

" कबीर पसंत आहे ना पण? याच उत्तर दे. " त्यांनी परत विचारल.

आता सगळे हसत होते.

"आई माझ्या आधी तिने मला पसंत केल आहे." कबीर म्हणाला.

खुशी गडबडली. बाबा आहेत. सासरे आहेत. कबीर त्यांच्या समोर काहीही बोलतो.

" अस आहे का? मला काय माहिती तुमची लव स्टोरी." सुलक्षणा ताई म्हणाल्या.

खुशी लाजली होती.

" गप्प राहू नकोस बेटा." सुलक्षणा ताई तिला समजावत होत्या.

"मला काळजी वाटते. लग्न म्हणजे मोठी जबाबदारी आहे. मला जमेल का?" खुशी म्हणाली.

"मी आहे ना. मामी आहे .आम्ही तुला एकटीला पाडणार नाही. आणि कबीर तर तुझ्या ओळखीचा आहे. आमच्या सारख अनोळखी मुलाशी लग्न होत नाही ना. काळजी कश्याला करते."

"हो. बरोबर. कबीर आहे म्हणून बर वाटतय. " ती विचार करत होती.

" खुशी टेंशन घेवू नकोस. एन्जॉय कर." रश्मी ताई म्हणाल्या.

"नाहीतरी लग्ना नंतर तू इथेच या सिटीत तर रहायला येणार आहे." भक्ती म्हणाली.

एकीकडे कबीरची ओढ दुसरीकडे घरचे. खुशी द्विधा मनस्थितीत होती. प्रत्येक मुलीची हीच अवस्था असते. अचानक आई विषयी प्रेम दाटून येत. माझ घर, घरचे, भावंड, वडील याना सोडून जायचं. कठिण असत. नवरा कितीही जीव लावणारा असला तरी मन थोड हळव होतच.

" आम्ही निघतो आता. " कबीर खुशी कडे बघत होता. ती त्याच्याशी बोलायला गेली.

" काय झालं? " त्याने विचारल.

" काही नाही." खुशी म्हणाली.

" माझ्या सोबत रहायच टेंशन आहे का?"

" नाही, तू खूप चांगला आहेस. आई बाबांचा विचार येतो. ते एकटे रहातील. " खुशी म्हणाली.

" आपण आहोत ना त्यांच्या साठी. आत्ताही थोडे दिवस गावाला राहू . मग आपण इकडे येणार ना. काळजी करायची नाही. मी आहे ना. मी बघेल सगळं. येवू मी. आनंदात रहा." त्याने विचारल.

हो.

कबीर किती व्यवस्थित समजून सांगतो. तो चांगला आहे.

पण तरीही लग्नानंतर आधी सारख आरामात माहेरी रहाता येणार नाही. कबीरच राहू देणार नाही. खूप फरक पडतो. खुशी विचार करत होती.

पाहुणे गेले. सतीश राव रश्मी ताई आत येवून बसले. ते खूपच खुश होते. खुशी आराम करत होती.

विलास राव, सुलक्षणा ताई, कबीर त्यांच्या सिटी मधल्या बंगल्यावर आले. त्यांना तो बंगला खूप आवडला. तिथून नवीन वर्क शॉप बघितला. ऑफिस बघितल. राऊत भेटले.

" हाच वर्क शॉप विकत घेवून टाक कबीर. " विलास राव म्हणाले.

" हो बाबा. " कबीर थोड कामात होता. थोड्या वेळाने ते निघाले. ते घरी आले.

घरी सगळ्यांना लग्नाची तारीख काढल्याच समजल. विराज, सुदेश, सोनूने कबीरला त्रास देवून अर्ध केल होत. त्यांनी खुशीला व्हीडीओ कॉल केला.

ती आराम करत होती. परत उठून बसली. मुल तिची खूप मजा करत होते. तिला ही आता बर वाटत होत. चांगले आहेत याच्या घरचे.

लग्नाची खरेदी सुरू झाली. त्यांचा खर्च ते करणार होते. यांचा खर्च हे. खरेदी पण ज्याची त्यानेच करायची होती. लग्नाचा खर्च कबीर करणार होता.

रश्मीताई, भक्ती लिस्ट करत होत्या. "याप्रमाणे खरेदी करू. खुशी तुला काय काय हव?"

"आई तू सांग." खुशी म्हणाली.

"किती बोरींग नवरी आहे ही." भक्ती म्हणाली. "तुला काही वाटल असेल ना लहान पणा पासुन की लग्नात साडी नेसू की घागरा घालू."

"तस मी काहीच नाही ठरवल होत. " खुशी म्हणाली.

"काकू मी सांगते. खुशी संगीत मेहेंदीला ड्रेस घाल . हळदी ला साडी. लग्नात शालू नेस. रीसेप्शन साठी घागरा. "

" चालेल. "

भक्ती साड्या, शालू, घागरा कसा हवा ते सांगत होती. तिच्या डोक्यात पूर्ण डिझाईन तयार होती.

दिपू, भक्ती ही घागरा मागत होते. कलर ही त्यांनी फिक्स केले होते.

सगळ्यांची लिस्ट तयार झाली.

" उद्या केटरिंग वाल्याशी बोलून घेऊ. थोडे दिवस त्यांची मदत लागेल. मिठाई बनवावी लागेल. आमंत्रणासोबत मिठाई पाठवावी लागेल. नंतरही आणि आधीही पाहुणे असतील. त्याचा अंदाज बघून त्यांना ऑर्डर देऊन टाकू." रश्मी ताई म्हणाल्या.

"हो काकू." भक्ती बिझी होती.

रश्मी ताई, भक्ती, खुशी, दिपू दुकानात आल्या. तिने स्नेहाला फोन केला होता. ती खरेदीला आली. तिघींना छान घागरा घेतला.

" आई सोनु साठी ही घागरा घेवू. " खुशी म्हणाली.

" हो बरोबर. "

अनारकली ड्रेस घेतले. रश्मी ताईंनी भरपूर साड्या घेतल्या. द्यायला घ्यायलाही लागणार होत्या. घरच्यासाठी लागणार होत्या. बरेच प्रोग्राम होते. स्नेहाच्या ओळखीने बरेच कॉस्मेटिक्स वगैरे पण घेतले. तिची रश्मीताईंशी पण चांगली मैत्री झाली. स्नेहा, श्रुती साठी ही ड्रेस घेतला. ती परत गेली.

सतीश रावांसाठी पण कपडे घेतले. खुशीची खरेदी बाकी होती.

लग्नासाठी सुंदर शालू दाखवत होते. प्रत्येक शालू भक्ती खुशीला लावून बघत होती. ती आरश्या समोर खुर्चीवर बसली होती. एक मरून लाल शालू त्यांना खूप आवडला.

" खुशी तू या शालूत आत्ताच किती सुंदर दिसते आहे. लग्नात तर कमाल होईल."

" खुशी लाजली होती.

" समोर तर बघ." भक्ती म्हणाली.

खुशीने समोर बघितल. तिचा गोरा रंग, मरून शालू. चेहर्‍यावर आलेला ग्लो. त्यात दुकानातले पिवळे लाइट. ती अगदी एखाद्या अप्सरे सारखी दिसत होती.

ती कबीरचा विचार करत होती. मला या साडीत बघून तो काय म्हणेल. असा ही तो माझी विनाकारण तारीफ करत असतो.

" हो खुशी दी हाच शालू घे. खूपच छान आहे." दिपू म्हणाली.

" हा द्या."

इतर प्रोग्राम साठी सुद्धा साड्या घेतल्या. हळदीची साडी खूप छान होती.

"खरेदी खूपच छान झाली." रश्मी ताई समाधानी होत्या.

दुसर्‍या दिवशी दागिने खरेदी साठी ते दुकानात आले. या वेळी सतीश राव, रश्मी ताई, खुशी होते. भक्ती, दिपू कॉलेजला गेल्या होत्या.

"खुशी काय घ्यायचं ते बघ."

"आई तू सांग मला समजत नाही."

रश्मी ताई नाजूक लेटेस्ट डिझाईनचे दागिने बघत होत्या. सगळे दागिने खुशीला शोभत होते. खरेदी झाली.
.......

कबीरची ही खरेदी सुरू होती. सुलक्षणाताई आणि सविता यांची धावपळ होती. मधुत मधून सुलक्षणाताईंना प्रशांत मामाची आठवण येत होती. पण त्या काही म्हटल्या नाही.

सविता, सुलक्षणा ताई, कबीर, विराज खरेदी साठी गेले. विराज सांगत होता कसे कपडे हवे.

"नको. साधे दाखवा. " कबीर म्हणाला.

" चूप दादा मी सांगतो ते करायच." विराज ओरडला.

कबीर गप्प बसला. घ्या काय घ्यायचे ते. तो खुशी सोबत बोलत बसला. "आमची खरेदी सुरू आहे." त्याने मेसेज केला.

"आमची पण." खुशी म्हणाली.

"काय काय घेतल?"

"साड्या, घागरा, दागिने. खूप काही. "

"वाह तुला साडी नेसता येते का? " त्याने विचारल.

"हो येते ना." खुशी म्हणाली.

" मी तुला एकदाही साडीत बघितल नाही."

" आता लग्नात बघ. " ती म्हणाली.

"खुशी आहे का? तिला विचार तुला कोणते दागिने हवे. " सुलक्षणा ताई म्हणाल्या.

"तुला काय दागिने घ्यायचे आहेत. आई विचारते आहे." त्याने मेसेज केला.

" इकडे ही घेतले नको इतके. "खुशी म्हणाली.

विराज आवाज देत होता.

" मी सांगतो आईला. कपडे सिलेक्ट केले आहेत. मी जातो मला ड्रेस ट्राय करायचे आहेत. " कबीर म्हणाला.

" मला फोटो पाठव कबीर. " ती म्हणाली.

" नाही जमणार. मला लग्नात बघ तू शेरवानी मधे. " कबीर म्हणाला.

बर. खुशी विचार करत होती. कबीर खूपच छान दिसेल शेरवानी मधे. आधीच उंच पुरा आहे.

कबीरची खरेदी झाल्यावर. सुलक्षणा ताईंनी खुशी साठी बरेच दागिने घेतले.

" दादा हे बघ." तिकडे बरेच नाजूक मंगळसूत्र होते. कबीर ने एक बूक केल.

" आई हे नंतर माझ्या कडे दे."

" बर."

ते घरी आले. कबीर ऑफिस कामात बिझी होता.

विलास राव कौतुकाने कबीरच्या लग्नाची तयारी बघत होते. "अहो बरोबर सुरू आहे ना हे?" सुलक्षणा ताई विचारत होत्या.

"हो पण तुझी खरेदी कुठे आहे. मला तुला ही छान नटून थटून मिरवतांना बघायच आहे." विलास राव म्हणाले.

"माझ काय राहील आता. मला तुम्ही सोबत आहात हेच बर वाटत." सुलक्षणा ताई म्हणाल्या.

"अस कस? आम्हाला सगळ्यांना विचार आमच्या साठी तू किती महत्वाची आहेस."

"नको अहो तो प्रशांत जेल मधे आहे .सविता तयार होणार नाही. मी पण साधी बरी. " सुलक्षणा ताई हळूच म्हणाल्या.

"सविता ही तयार होईल. तू ही. आता तुम्ही ठरवल ना प्रशांतला शिक्षा झाली पाहिजे. तर मग मोकळ रहा. तुझ्या साठी सविता साठी दागिने मागवून घे. " विलास राव म्हणाले.

" सोनु काय घालणार आहे." सुलक्षणा ताई विचारत होत्या.

" आत्या खुशी वहिनीच्या बहिणी घागरा घालणार आहेत. त्यांनी माझ्या साठी ही घेतला." सोनूने सांगितल.

" अरे वाह तू ही अनारकली घे अजून. हे बघ तुझ्या साठी नेकलेस आणला."

ती खूप खुश होती.
....

रश्मी ताई लिस्ट चेक करत होत्या. सगळी तयारी झाली. माई बघून घ्या ना एकदा.

माई सामान बघत होत्या. काय राहील त्यांनी सांगितल.

खुशी, भक्ती, दिपू, श्रुती त्यांनी डान्स बसवला. त्या प्रॅक्टिस करत होत्या. माई मुलींमध्ये बसलेल्या होत्या.

तीन दिवस आधी ते गावाला जाणार होते.
......

पोलीस स्टेशन मधे, गावात कबीरच्या लग्नाची चर्चा होती.
फार्म हाऊसवर जोरात काम सुरू होत. लायटींग फुल वाले बूक केले होते. कंपनीत बोनस जाहीर केला होता. विलास रावांच्या हस्ते अन्नदान झाल.

"कबीरच लग्न आहे प्रशांत." विकास मामा म्हणाला. त्याला पोलिसांनी सांगितल होत.

"हो. तो लाखोने खर्च करत असेल. आपल्याला इथे अडकवल."

"आपण सांगायच का की आम्हाला लग्नाला जायच आहे. तू सविताला भेटायला बोलवून घे. थोड रड. तिच्यावर मुलांवर प्रेम व्यक्त कर. ती मदत करेल. " विकास मामा म्हणाला.

" हो ही आयडिया चांगली आहे."

खर तर ते दोघ जेल मधे कंटाळले होते. लग्ना मधे त्यांना इंट्रेस्ट नव्हता. बाहेर यायच होत.

त्यांनी रीक्वेस्ट केली.

पोलीस स्टेशन मधून कबीरला फोन गेला. दोघ मामांच म्हणण सांगितल. सविता मॅडमला भेटायच म्हणता आहेत.

" काहि गरज नाही मामीला भेटायची. आणि लग्नाला ही यायची. त्या मामाला आधी पासून खुशी आवडत नाही उगीच बाहेर येवून नसते उद्योग करेल. गैरसमज पसरवतील. ते आतच बरे. नुसती पैशाची अफरातफर असती तर ठीक होत. आई बाबांना त्रास दिला. त्यांच्या जिवाशी खेळले. मी त्या दोघांना सोडणार नाही. " कबीर म्हणाला.

मामाला समजल की कोणी आपल ऐकत नाही. त्यांच्या समोर काहीच उपाय नव्हता. आता शिक्षा होईलच.
......

खुशी आज दिवसभर पार्लरमध्ये होती. ती संध्याकाळी घरी आली.

रश्मीताई, सतीश राव बॅग भरत होते. घरात बरेच पाहुणे होते.

"खुशी, भक्ती आवरा आता. तुमची बॅग भरून घ्या. सामानाची गाडी आधी जाणार आहे. तिकडे तुमच्या बॅग द्या. तुमच्या बॅगवर नाव टाका." रश्मी ताई घाईत होत्या.

" आई काय काय घेवू." खुशीने विचारल.

"ड्रेस घे. नवीन साड्या घे." त्या अजून सामान सांगत होत्या.

"खरंच फायनल बॅग भरायची आहे का? माझी इथून जायची वेळ झाली." खुशी हळवी झाली होती.

" खुशी आमच्या साठी तू कायम आमची लाडकी लेक रहाशील. काळजी करायची नाही. " रश्मी ताई म्हणाल्या.

" हो ना किती चांगल सासर मिळाल आहे. आनंदात रहा. " सतीश राव म्हणाले. तरी खुशीच्या डोळ्यात पाणी होत.

"खुशी आता रडू नकोस. आत्ताच पार्लरमधून आलो ना. तुझा ग्लो जाईल. "भक्ती सांगत होती.

रश्मी ताई तिला बघून आत मध्ये निघून गेल्या. हिच्या समोर बसले तर रडू येईल. खुशीने बॅग भरली.

" दी तुझ सामान नीट घे. " दिपू तिला मदत करत होती.

" सगळे आमंत्रण गेले ना. " सतीश राव विचारत होते.

खुशी सगळ्या मित्र-मैत्रिणींना फोन करत होती. नक्की या लग्नाला आमंत्रण करत होती.

"रोहित तू कधी येणार आहेस . स्नेहा राहुलाही घेवून लवकर ये." तिने त्याला फोन केला होता.

"आम्ही लग्नाच्या दिवशी येवू. "रोहित म्हणाला.

" ठीक आहे तुझ्या लग्नाला ही मी वेळेवर येईल. " खुशी चिडली.

" खुशी फॉरेनचे क्लायंट आले आहेत. मी बिझी आहे. श्रुती येईल ना आधी. सॉरी ना. समजून घे."

"श्रुती अशी ही आधी माझी बेस्ट फ्रेंड आहे. नंतर तुझी होणारी बायको."

" हो समजल. आता नाराज होवू नकोस. झाली का तयारी?" त्याने विचारल.

" हो सुरू आहे. चल मी थोडी बिझी आहे. भेटू नंतर. " तिने फोन ठेवला.

थोड्या वेळाने कबीरचा फोन आला." आज काय सकाळपासून बिझी होतीस का ?"

"हो मी पार्लरमध्ये गेली होती. उद्या पासून प्रोग्राम सुरू होतील ना." खुशी म्हणाली.

"हो मला पण खूप उत्सुकता आहे. तुला कधी भेटू अस झाल आहे. आपण आपल लग्न खूप एन्जॉय करायचं खुशी. मला सगळ्या प्रोग्राम मधे आपण सोबत हव. हे मोमेंट्स परत येत नाहीत." कबीर खूप बोलत होता.

खुशीला आता कबीरशी बोलून बरं वाटत होतं.

रात्री खुशी रश्मी ताईं जवळ येवून झोपली. ती लाड करून घेत होती.

सकाळी ते सगळे फार्म हाऊस वर जायला निघाले. श्रुती सुद्धा सोबत होती.

मुली एका कार मध्ये होत्या. त्यांचा गोंधळ सुरू होता. त्यांच्यासोबत माई होत्या. सगळं घेतल का रश्मी ताई परत बघत होत्या.

दोन-तीन दिवसापासून रश्मीताई उगाच इमोशनल होत होत्या. खुशी जरी लग्नानंतर सिटीतच राहायला येणार आहे तरीसुद्धा यावेळी सगळे हळवे होतातच.

त्या सतिश राव सोबत निघाल्या. आता त्यांना रडू येत होत. सतीश राव त्यांना सांभाळत होते.

" रश्मी शांत हो. खुशीच चांगल होत आहे. असा त्रास करून घ्यायचा नाही. मुली आहेत. लग्न करून सासरी जाणार. उद्या भक्ती, दिपूच लग्न होईल. आपल्या दोघांना रहायचा आहे. अरे पण एक चांगल होईल आपण दोघेच राहू. छान एकांत मिळेल. मस्त वेळ घालवता येईल." सतीश राव मुद्दामून म्हणाले.

रश्मी ताई थोड हसत होत्या." अहो खुशी साठी मी खुश आहे. पण एक आई म्हणून रडू येत. "

" ते तर मला ही होत. ती माझी ही खूप लाडकी आहे. " सतीश राव म्हणाले.

आता रश्मी ताई खुश होत्या. त्या सतीश रावांजवळ सरकून बसल्या.




🎭 Series Post

View all