गुंतता हृदय हे भाग 61

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का
गुंतता हृदय हे भाग 61
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

कबीरने फार्म हाऊस स्वच्छ करून घेतला होता. आवश्यक तिथे गालीचे टाकले होते. सगळ्यांना रहायला छोटे छोटे कोटेजेस होते. दोन-तीन मोठे हॉल होते. त्या बाजूला छान गार्डन होत. मध्यभागी सुंदर लॉन होत. तिथे कार्यक्रम होणार होते. सगळीकडे फुलाची सजावट होती. लाइटिंग लावलेली होती. सिक्युरिटी टाईट होती.

हे आधीच फार्म हाऊस आहे हे ओळखू येत नव्हतं इतकं सुंदर झालं होतं. कबीर सगळी कडे स्वतः लक्ष देत होता. त्यांच्या घरी पण खूप धावपळ सुरू होती.

"चला लवकर वेळ झाली. आपण तिथे पोहोचायला हवं. ते लोक येतीलच." सुलक्षणा ताई आवाज देत होत्या.

"कबीर कुठे आहे?" विलास राव विचारत होते.

"त्याचं घरात कुठे लक्ष आहे . तो फार्म हाऊस वर गेलेला आहे. सुदेश त्याला फोन लाव. त्याचे कपडे सामान कोणी घ्यायचं. हा विराज कुठे आहे?" सुलक्षणा ताई म्हणाल्या.

"तो सुद्धा कबीरदादा सोबत गेला आहे." सुदेश म्हणाला.

दोघे जण आले.

" आटपा तुमच्या दोघांचे बॅग कपडे घ्या लवकर. जा कबीर फ्रेश होऊन ये. " सुलक्षणा ताई सामानाची लिस्ट बघत होत्या.

दोघं नुसते उभे होते.

" सोनू जरा बघ या विराज आणि सुदेशच. जा रे हिच्या सोबत. सोनु त्यांना सेपरेट बॅग घ्यायला सांग. लग्नाचे कपडे घ्या. नाहीतर तुम्ही मुल तिकडे कपडे घरी अस होईल. सविता तू कबीरचे कपडे व्यवस्थित घेतले का बघ. त्याचा शेरवानी मी घेतला आहे. "

कबीर सविता मामी रूम मधे गेले.

" मामी तू ठीक आहे ना?"

" हो कबीर. "

" मामाचा निरोप आला होता तुला भेटायच आहे अस." कबीर म्हणाला.

"मला नाही भेटायच. मला तुझ्याशी महत्वाच बोलायच आहे कबीर .तुझ लग्न झाल्यावर. " सविता मामी म्हणाली.

" काय झाल मामी? "

" आत्ता नको. "

" काही प्रॉब्लेम? प्लीज सांग. "

" मला डिवोर्स हवा आहे. यांच्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही." मामी म्हणाली. कबीरला एकदम धस्स झाल.

" मामी तू एवढा कठोर निर्णय का घेते आहेस?"

"हे तू विचारतो कबीर? भाऊ, सुलक्षणा ताई थोडक्यात वाचले. तुझ्या मामा कडून शिकण्या सारख काय आहे. चोरी करा. दुसर्‍याला त्रास द्या. तू सांग मी मुलांना काय आदर्श देणार? मी यापुढे यांच्या सोबत राहू शकत नाही. ते या घरात परत येणार नाही. मी ठरवल आहे माझ्या मुलांवर त्यांची सावली नको. " सविता म्हणाली.

मामी.....

"कबीर माझ ठरल आहे. माझा निर्णय योग्य आहे. हे घे तुझी बॅग रेडी आहे. मी खाली जाते. " त्या गेल्या.

कबीर आंघोळीला गेला. तो मामाचा विचार करत होता.

विलासराव पुढे येवून बसले. " सुलक्षणा इकडे ये किती धावपळ करते आहेस. तू बस असं जरा शांत. "

" अहो तुम्ही सुद्धा आटपा चला पटापट. कपडे बदला. "

" माझं सामान तू घेतलंस असशील." विलास राव म्हणाले.

" तुम्ही सगळे अगदीच आमच्यावर अवलंबून आहात. म्हणे धावपळ करू नको. "सुलक्षणा ताई त्यांना ही ओरडल्या.

"मला खूप छान वाटतं आहे सुलक्षणा. आपलं करायला कोणी तरी आहे. तुझ्या आवाजाने घर कस भरल्या सारख वाटत. " विलास राव म्हणाले.

" ते सगळं ठीक आहे. आता उठा आणि मला मदत करा. " सुलक्षणा ताई त्यांच्या जवळ आल्या.

" बोल काय करू? "

" तुमचे कपडे घेतले आहेत. आत जावून बघून घ्या अजून काय हव? " दोघ तयार झाले.

कबीर ही फ्रेश होवुन तयार होता. देवाला नमस्कार करून ते निघाले.

सतीश राव, रश्मीताई फार्म हाऊस वर आले.

" मुलींची कार कुठे आहे? " त्यांनी फोन केला.

"येतो आहोत दहा पंधरा मिनिटात." भक्ती म्हणाली.

मंगेश, प्रकाशही आलेले होते. ते तिकडे मदत करत होते. सतीश राव सगळी व्यवस्था नीट आहे का ते बघत होते.

कबीर, विराज, सुदेश, सोनू, मामी, सुलक्षणा ताई, विलास राव सगळे आले.

सतीश राव सगळ्यांना भेटत होते.

कबीर इकडे तिकडे बघत होता.

" खुशी आली नाही अजून. " मंगेश म्हणाला.

त्याने बॉडीगार्डला फोन केला.

"दहा मिनिटात पोहोचु." त्याने सांगितल.

विलास रावांनी सतीश रावांना बोलवलं. " सतीश इथे बस बर माझ्या जवळ."

"अस बसुन राहील तर माझे काम कसे होतील विलास ." सतीश राव म्हणाले.

"हे मूल करतील. आपण फक्त एन्जॉय करायच गप्पा मारत बस माझ्याशी. "

" अरे आमची मुलीची बाजू. एक तर तुम्ही सगळ करुन घेत आहात. थोड तरी बघू दे. "

" कबीर यांना काही काम देवू नकोस." विलास राव म्हणाले.

"हो काका तुम्ही इथे बसा मी तुम्हाला चहा पाठवतो. " कबीर म्हणाला.

मुलींची कार आली. सगळे तिकडेच बघत होते.

मंगेश, प्रकाश, सुदेश, विराज मदत करायला गेले. कबीर लांबून बघत होता. माई हळूच उतरल्या. भक्ती, दिपू गडबड करत होत्या. श्रुती, खुशी नेहमीप्रमाणे सोबत होत्या. खूप बोलत होत्या. खुशी मागच्या बाजूने डिकीतून सामान घेत होती. तिला माहिती होतं कबीर इकडेच बघत असेल.

कबीर पटकन पुढे गेला. "मी काही मदत करू का खुशी?" त्याने तिच्याकडे बघत विचारल. तो इकडे आल्यामुळे ती जरा गडबडली होती. त्यात त्याने तिला हळूच मिठीत घेतल.

"मी घेते आहे सामान." ती म्हणाली.

कबीर अजून तिच्या जवळ होता.

"कबीर काय आहे हे? आजूबाजूला लोक तरी बघ. सरक ना." खुशी हळूच म्हणाली.

" आपण आता असंच अगदी प्रेमाने रहाणार आहोत. आपल ठरलं आहे ना. आठव. आपण एन्जॉय करायच. कोणाची काळजी कशाला करायची. आपल लग्न होत आहे ना. " कबीर म्हणाला.

"आजुबाजूला तुझे माझे आई बाबा आहेत." खुशी थोडी बाजूला सरकली.

" त्यांना आपल्याला अस बघून आनंद होईल."

" ठीक आहे तू म्हणशील ते." खुशीने त्याच्याकडे बॅग दिली.

कबीर तीच सामान घेवून उभा होता. तिच्या कॉटेज मधे तो सामान ठेवायला गेला.
.....

" ताई बघितल का कबीर आता बर बायकोच सामान घेवून उभा आहे . घरी त्याला त्याची बॅग घ्यायच सुचत नव्हत." सविता ताई म्हणाल्या.

"हो ना. " सुलक्षणा ताई हसत होत्या.

"मामी आता दादा सगळे काम करेल. घरात मदत करेल बघ." विराज म्हणाला.

" हो ना तू गम्मत बघ आता त्याची सविता ." सुलक्षणा ताई म्हणाल्या.
.....

भक्ती, श्रुती, दिपू सोबत होत्या. खुशी, कबीर त्यांच्या कॉटेज कडे गेले. त्या सामान नीट ठेवत होत्या. कबीर खुशी जवळ उभा होता. "तू सरक खुशी मी करतो. "

" कबीर नको मी करते. " खुशी म्हणाली.

" बॅग जड आहे. खुशी बाजूला हो. " कबीर तिला म्हणाला.

त्यांच प्रेमळ बोलण सुरू होत.

" जीजु तुम्ही आमच्या बाजूला का आले? तुमची समोरची साईड आहे ना तिकडे जा. आम्हाला डिस्टर्ब होत. " भक्ती म्हणाली.

"हो ना." श्रुती ही म्हणाली.

कबीरला समजल ह्या मुद्दाम मला त्रास देत आहेत.

"माझी बायको आहे ना इकडे. म्हणून मी आलो. ठीक आहे तिला घेवून जातो मी. चल खुशी. " कबीर म्हणाला.

"होणारी बायको. ती अजून आमची आहे. " श्रुतीने चूक ठीक केली.

" दोन दिवस अजून." कबीर खुशी जवळ जात म्हणाला.
" चल खुशी. आपण आपल्या बाजूला जावू. यांना डिस्टर्ब होत."

"खुशी कश्याला? ती नाही येणार . "भक्तीने रस्ता अडवला.

" तुम्ही मुलींनी काही जरी केल ना तरी मी आता खुशीला माझ्या सोबत घेवून जाणार. माझ्या घरी. " कबीर म्हणाला.

"खुशी इकडे ये." भक्तीने आवाज दिला.

"जमणार नाही. खुशी माझी आहे ." कबीर म्हणाला. त्याने तिला जावू दिल नाही.

" अस चालणार नाही जीजु. काकू इकडे या. " भक्ती आवाज देत होती.

"तुम्हाला पार्टी हवी का गर्ल्स. कुठे ते विचार करून ठेवा. अजून काय हव. दीपु चॉकलेट. खूप आहेत माझ्याकडे. माझ्याशी चांगल वागल सपोर्ट केला तर तुमचा फायदा आहे." कबीरने ऑफर दिली.

"नुसती पार्टी?" भक्ती म्हणाली.

"अजून काय हव? जे हव ते घ्या . शॉपिंग वगैरे." कबीर म्हणाला.

"ठीक आहे. खुशीला गर्ल्स प्रोग्राम पार्टीला पाठवायच. हो ना करायच नाही. "श्रुती म्हणाली.

" ठीक आहे. अजून काही?" कबीरने मान्य केल.

भक्ती, श्रुती, दिपू विचार करत होत्या. "हो चालेल. एवढच होत. "

" भक्ती दी ते सांग ना ट्रीप स्पोन्सर शीप. " दिपू म्हणाली.

" हो आम्हाला ट्रीपला जायला मदत करायची. "त्यांच कार मधे हे सगळं ठरल होत.

" सगळ मंजूर. पण मला हेल्प केली तर." कबीर म्हणाला.

" हो हेल्प करू. "

" चला आता बाहेर जा दोन मिनिट. मी खुशीला मदत करतो ना. " कबीर म्हणाला.

" खुशी पटकन ये. आम्ही बाहेर आहोत ." त्या गेल्या.

खुशीचा चेहरा पहाण्यासारखा झाला होता. कबीर जवळ येत होता. ती मागे सरकली. "कबीर मला पण बाहेर जायच आहे ."

" जमणार नाही."

" बाहेर सगळे वाट बघत असतिल. अस बरोबर वाटत नाही. " खुशी म्हणाली.

" माझ्या जवळ ये. " कबीर म्हणाला.

" नाही. " खुशी बाहेर येत होती. कबीरने तिचा हात धरून ठेवला जवळ ओढून घेतल." आता एवढ लाजून कस होईल खुशी? मोकळ रहात जा."

" जावू दे ना कबीर . अस बर वाटत नाही." खुशी म्हणाली.

"रात्री भेटणार का?"

"नाही कबीर. "

" मग मी जावू देणार नाही. "कबीर हट्ट करत होता.

" बर हो .चल ना इथून." खुशी म्हणाली.

"तू तुझ्या नवर्‍या सोबत आहे. काय अस खुशी? एवढी काय घाबरते." कबीर आणि खुशी बाहेर आले.

"तू मला मुद्दामून त्रास देतोस ना कबीर." ती हसत होती.

"हो. छान वाटत. "

खुशी सगळ्यांना भेटत होती. ती जिथे जाईल तिथे कबीर मागे मागे येत होता. सुलक्षणा ताई, सविता, रश्मी ताईंना खुशी भेटायला गेली.

" तू एकटीच? " सविता मामी इकडे तिकडे बघत होत्या.

" मी आहे ना सोबत." कबीर म्हणाला.

" तेच बघतो आहोत आम्ही. छान चाललय." सविता म्हणाली.

"ती माझी बायको आहे."

" माहिती आहे ते आम्हाला." सगळे कबीरला चिडवत होते.

सगळ्यांचा चहा झाला. पुढे काय काय कार्यक्रम आहे?

आधी संगीत. मग मेहंदी. हळद. लग्न आणि रिसेप्शन असा कार्यक्रम होता. नंतर कबीर कडे सत्यनारायणाची पूजा होती.

सतीश राव, रश्मीताई, सामान ठेवत होते. मंगेश, प्रकाश, त्यांना मदत करत होते. खुशी, माई, श्रुती, दिपू, भक्ती अजून बाहेरच होत्या. त्यांच्यात सोनू ही होती. खुशी सुलक्षणाताई आणि मामींशी बोलत होती. मामी स्वभावाने चांगल्या आहेत तिला समजलं.

विराज, सुदेश... कबीर, खुशी जवळ आले. "वहिनी आमची ओळख करून दे ना."

"कोणाशी?" कबीर म्हणाला.

"तुझ्या फ्रेंड्स आणि बहिणीशी." दोघ म्हणाले.

"विराज, सुदेश जरा आरामात." कबीर ओरडला.

"अच्छा स्वतः वहिनीच्या मागे मागे करायच. आम्ही कोणाशी बोलायच नाही का? तुला काय वाटल आम्हाला दिसत नाही का? वहिनी प्लीज." विराज म्हणाला.

खुशी हसत होती.

"त्या मुली तुमच्या पेक्षा मोठ्या आहेत. " कबीर म्हणाला.

" माझ्या पेक्षा नाही. " विराज म्हणाला.

" दिपु खूप लहान आहेत."

" हो ते माहिती आहे. "

" श्रुतीच लग्न जमलं आहे रोहित सोबत. " कबीरने सांगितल.

" ओह एक नंबर गेला. भक्तीशी ओळख करून दे ना." विराज म्हणाला.

" तुम्हाला नाव माहिती आहे तीच." खुशी म्हणाली.

" हो मागे भेटलो होतो तिला. छान आहे." विराज म्हणाला.

कबीर रागाने बघत होता.

"अरे म्हणजे चांगली मुलगी आहे. " विराजने वाक्य दुरुस्त केल.

" भक्ती, श्रुती, दिपू इकडे या. हे विराज, सुदेश. " खुशी ओळख करून देत होती.

हाय ते... बोलत होते.

विराज भक्ती कडे बघत होता. "हाय."

मी? तिने विचारल

हो.. तो म्हणाला.

"एवढी हिम्मत?"

" तू काय करतेस भक्ती ? "विराज म्हणाला.

" मी इथे लग्नाला आली आहे." भक्तीने मुद्दाम तिरकस उत्तर दिल.

त्याने डोक्याला हात लावून घेतला." तस नाही. शिक्षण झाल का?"

"मी कॉलेजला आहे. फर्स्ट इयर आर्ट्स."

" माझ इंग्लिश चांगल आहे. काही वाटल तर मला विचार. मी तुला माझ फोन नंबर देवू का? तुझी अजून माहिती सांग? " विराज एकदम मूड मधे होता.

"हो दे ना फोन नंबर. या दोघांकडे आणि माझ्या बद्दल हे दोघ नीट माहिती सांगतील. मंगेश, प्रकाश इकडे या. " भक्तीने त्यांना बोलावलं.

" कोण आहेत हे?"

"माझे भाऊ. माझ्या वर खूप प्रेम करतात आणि मला त्रास देणार्‍यांना चांगला प्रसाद ही देतात. मागच्या वेळी काय झाल माहिती आहे का असाच एक मुलगा मागे येत होता. मंगेशने त्याला रात्रीच गाठून खूप मारल. " भक्ती तिखट मीठ लावून किस्से सांगत होती.

मंगेश विराज कडे बघत होता.

त्या दोघांना बघून विराज थोडा शांत झाला.

सुदेश त्याला हसत होता.

" झाल विराज?" कबीरने विचारल. खुशी ही त्या दोघांकडे बघत होती.

"मी तिकडे बघतो काही काम आहे का. " विराज गेला.

दुपारी जेवण झाल्यावर सगळ्यांनी आराम केला. संध्याकाळी संगीत होतं.

खुशी आत मध्ये तयारी करत होती. बाहेर लाॅन वर कार्यक्रम होता. नुसत एन्जॉय करायच. एकमेकांशी ओळख करून घ्यायची हाच उद्देश होता.

खुशी बऱ्याच वेळ झाला बाहेर आली नाही. कबीर तिची वाट बघत होता. एवढं तयार व्हायची गरजच नाही. खुशी साधी छान दिसते. आधीच वाट बघून बघून कबीर कंटाळला होता त्याची चिडचिड होत होती. "सोनू इकडे ये. जा तुझ्या वहिनीच आवरल का बघून ये."

सोनु आत आली. "खुशी वहिनी वाह किती गोड दिसते आहेस. तुला दादा बोलवतो आहे आटोप."

खुशी बाहेर आली आली त्या बाजूला सगळे बघत होते.सगळया मुली खूपच सुंदर दिसत होत्या . विराज सुदेश एकमेकांकडे बघत होते.

" भक्तीने तुझा पत्ता कट केला विराज दादा." सुदेश म्हणाला.

"तिचे ते दोन भाऊ का आले लग्नाला ते समजत नाही." विराज म्हणाला.

दादा कडे बघ पूर्ण कामातून गेला आहे. कबीर खुशी येत होती तिकडे बघत होता. ते दोघ हसत होते.

खुशीने डार्क निळ्या रंगाचा अनारकली घातला होता. केस मोकळे सोडलेले. स्टोन टिकली. हातात बांगड्या.

"आज वेगळीच दिसते आहे ही खूपच सुंदर." कबीर पुढे गेला. तिला हात दिला. दोघं एकमेकांकडे बघत होते.

" एवढा वेळ?" त्याने विचारलं.

"तयार होत होते."

"काही गरजच नाहीये. तू साधी छान दिसते ."

" एकदा लग्न होत. जरा हौस करू दे." खुशी म्हणाली.

" बरेच पाहुणे आले आहेत चल त्यांच्याशी बोलू." दोघ पाहुण्यांना भेटत होते.

सतीश राव, कबीर आणि विलास रावांची बऱ्याच ओळखी होत्या. पाहुणे ओळख करून देत होते.

मधेच म्युझिक सुरु झालं. विराज, सुदेश यांनी नाचायला सुरुवात केली. त्यांनी रश्मी ताई, सुलक्षणा ताईंना आत ओढल. मुल खूप नाचत होते. भक्ती, श्रुती, मंगेश प्रकाश सोबत होते. ते ही सविता मामीला घेवून आले. सोनू, दिपू सोबत होत्या . ते एन्जॉय करत होते. विलास राव सतीश राव उठून आले. ते ही नाचत होते. खूप फोटो काढले.

"चला आता कबीर खुशी पुरे झाल्या गप्पा."

" हो दादा चल पटकन आई किती छान नाचते आहे." विराज बोलवत होता. त्याला खूप कौतुक वाटत होत. आईची आधीची तब्येत झालेला त्रास त्यांनी बघितला होता. कबीर आई बाबां कडे बघत होता. त्याने त्यांना मिठी मारली.

सगळ्यांनी त्यांना आत मध्ये ओढलं. खुशी छान नाचत होती. खूप मजा येत होती.

थोड्यावेळाने मुलींचा डान्स सुरू झाला . त्यांनी बरेच गाणे एकत्र केले होते. खुशी मध्यभागी होती. एका बाजूला श्रुती, भक्ती, दुसर्‍या बाजूला दिपू, सोनू होत्या. खूप छान डान्स झाला.

कबीर एका जागी उभ राहुल खुशी कडे बघत होता. त्याच्या साठी ती वेळ जशी थांबली होती. माझ्या आयुष्यातली खुशी. किती मुश्किलीने मिळाली. मी तिला खूप जपणार आहे. तिला खूप सुखी ठेवेल.

" या चौघी ठीक आहे पण सोनू कस काय यांच्यात?" सगळे विचारत होते.

त्यांनी तिला ऑनलाईन डान्स शिकवला.

"मला तर हा प्रोग्राम संपू नये अस वाटत आहे सुदेश. भक्ती किती छान नाचत होती. " विराज अजूनही स्टेज कडे बघत होता.

कबीर त्याच्या जवळ येवून उभा राहिला. "हो ना छान झाला डान्स. " कबीर म्हणाला.

विराज उठून उभा राहिला.

"विराज काय झालं?"

"काही काही दादा."

"तुझ काय सुरू आहे मला समजत नाही का? तू भक्तीच्या मागे लागला का? "कबीरने विचारल?

" नाही दादा."

"तिला त्रास दिला तर बघ."

कबीर खुशी जवळ गेला.

"खूप छान डान्स झाला. तुझ्यात हे ही टॅलेंट आहे का?" तो म्हणाला.

खुशी लाजली होती. "तुम्ही मुलांनी का नाही बसवला डान्स?"

" आता काय तुझ्या तालावर नाचायच आहे ना. "

" काहीही कबीर. "

" जिजू आम्ही ही होतो डान्स मधे. "भक्ती त्यांच्या जवळ आली.

" तरीही खुशी जास्त चांगली नाचली." कबीर म्हणाला.

" हिरव्या रंगाचा चष्मा घातला की जग हिरव दिसत. अस आहे ना जिजु. "

"म्हणजे?"

"काहीही झाल तरी माझी खुशी बेस्ट. "

हो. ते हसत होते.

सगळ्यांना नाचायचा आग्रह झाला. त्यांनी खूप धमाल केली

जेवणही खूप छान होतं. जेवताना कबीर खुशीला सारख विचारत होता." रात्री भेटणार ना ?"

"नाही कबीर. आई सोबत असेल. " खुशी म्हणाली. खर तर तिला कबीरची भीती वाटत होती.

" चालणार नाही तू सकाळी काय म्हणाली होती. " कबीरने आठवण दिली.

" नाही जमणार. "

" मग मी आता तुला तिकडे जावू देणार नाही. सगळ्यांसमोर माझ्या कॉटेज मधे घेवून जाईल. आणि इथे कोणी काही म्हणणार नाही."

"अस का कबीर. नको ना त्रास देवू."

"चल खुशी आराम कर, कबीर तुम्ही ही सकाळ पासून दमले आहात. जा आराम करा. " रश्मी ताई म्हणाल्या. खुशी त्यांच्या सोबत गेली. ती कबीरला हसत होती. बाय.

कबीर भक्तीशी बोलत होता." ठीक आहे जीजु मी मदत करेन. "

खुशी कपडे बदलून फ्रेश होऊन आली.

रश्मी ताई ओरडत होत्या. "कपड्यांच्या घड्या करा. पसारा आवरा उद्या काही सापडणार नाही मुलींनो."

दिपू, खुशी, भक्ती बॅग मधे कपडे ठेवत होत्या.

"खुशी आपल्याला जायच आहे." भक्ती म्हणाली.

"कुठे? "

"कबीर जिजु वाट बघत आहेत. "

" नाही भक्ती."

"चल ना."

"आई ओरडेल." खुशी म्हणाली.

"काकू जातील आता त्यांच्या कॉटेज मधे. "

" माई आहेत नको." खुशी घाबरली.

रश्मी ताई गेल्या. माई, दिपू झोपल्या.

" चल ना खुशी."

तिने श्रुतीला सांगितल. "जा ना खुशी आधी कबीरला भेटायला उत्सुक असायची. आता काय झालं? "

यांना काय होत बोलायला. मला कबीर सोबत धडधड होते. आता हल्ली तो अजिबात ऐकत नाही. मला त्रास देतो.

भक्तीने तिला ओढत बाहेर नेल.

इकडे... विराज हात देत होता. दोघी गेल्या.

" थँक्यू भक्ती. खुशी चल." कबीरने तिला हात दिला. दोघ त्या बाजूला गेले.

🎭 Series Post

View all