गुंतता हृदय हे भाग 63

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का

गुंतता हृदय हे भाग 63
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

खुशीची लग्नासाठी तयारी सुरू झाली. भक्ती, दिपू तयार होत्या. त्या दोघी घागऱ्यामध्ये खूप छान दिसत होत्या. सोनु ही तयार होवुन आली. ती या मुलींमध्ये होती. श्रुती, खुशी सोबत होती.

"खुशी माझ्या लग्नात अशी गडबड असेल का?"

"हो श्रुती, तेव्हा मी तुझ्या मदतीला येईल. रोहित केव्हा येणार आहे?" खुशीने विचारल.

"तो निघाला आहे येईलच."

" तुला साडीत बघून तो कामातून जाईल. " खुशी बघत होती श्रुती खूपच छान दिसते आहे .

" काहीही मी काही एवढी ही सुंदर दिसत नाही. " श्रुती म्हणाली.

"तू खूप छान दिसते आहे श्रुती. जा बाहेर रोहित आला बघ." रश्मी ताई आत येवून सांगत होत्या.

श्रुती बाहेर गेली. रोहित त्याच्या आई बाबां सोबत बोलत होता. त्याने श्रुतीकडे बघितल. तो बोलता बोलता थांबला. तिच्याकडे बघत होता.

" हाय. " श्रुती म्हणाली. खर तर ती लाजली.

आई बाबां समोर तो काही म्हणाला नाही. पण त्याच्या डोळ्यातून श्रुती साठी प्रेम स्पष्ट दिसत होत.

"रोहित दादा तुला कबीर दादाने आत बोलवलं." सुदेश सांगायला आला.

"आई बाबा आलोच. श्रुती चल." त्याने हात दिला.

" श्रुती तू आज खूपच छान दिसते आहेस. साडी कोणाची आहे? तयारी ही छान झाली आहे." तो तिच्या कडे बघत होता.

श्रुती सांगत होती. आम्ही इथे दोन तीन दिवस खूप मजा केली.

" ओह मी यायला हव होत का? आपण तरी सोबत राहिलो असतो. माझी खूपच महत्वाची मीटिंग होती. आपण सोबत परत जावू." रोहित म्हणाला.

हो.

कबीरच्या रूम मध्ये खूप गडबड सुरू होती. रोहित आत गेला. श्रुती परत खुशी जवळ गेली. विराज, सुदेश कबीरला तयार करत होते. सोनु पावडर दे ना. अरे एवढा परफ्यूम नका मारू. काही सामान सापडत नव्हत. कोण काय म्हणत ते समजत नव्हत. शेवटी सविता मामी मदतीला आली. तिने सगळं नीट ठेवल. तेव्हा ते सगळे तयार झाले.

कबीर शेरवानी मध्ये खूप रुबाबदार दिसत होता. सतीश राव येऊन त्याला फेटा बांधून गेले. सोन्याची चैन, अंगठी घातली. त्याने पाया पडल्या. सतीश रावांनी त्याला जवळ घेतल.

"खूप खुश रहा. आमच्या खुशीला सांभाळा." ते हळवे झाले होते.

"मी काय तिला सांभाळणार. तीच मला सांभाळेल." कबीर म्हणाला.

"हो ना इथे आम्हाला साधे बॅग मधून कपडे सापडत नाही. कोणाची तरी मदत लागते." विराज म्हणाला.

बाकीचे हसत होते.

बाहेर बँड वाजत होता. सगळीकडे प्रसन्न वातावरण होत.

" मग खुश ना कबीर? " रोहित म्हणाला.

" हो खूप. आज बर वाटत आहे. " कबीर म्हणाला.

" खुशी खूप चांगली आहे. तिला जप, प्रेमाने रहा. नाहीतर मी आहे. " रोहित म्हणाला.

" हो रे बाबा. खुशी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे." दोघ भेटले.

"चल कबीर मंदिरात." तिथे पूजा झाली.

लग्नाची वरात निघाली. कबीर घोड्यावर बसला होता. मुलांमधे खूप उत्साह होता. नाचायला सुरुवात झाली. ते सगळ्यांना आत मधे ओढत होते.

कबीर ही खुश होता तो सगळ्यांची गम्मत बघत होता. वरात झाली की लग्न. खुशी माझी होईल. जेव्हा मी तिला पहिल्यांदा बघितल होत तेव्हा वाटलच नव्हतं की हीच माझी बायको आहे. मामाने सांगितल होत ही परांजपेची पोरगी. हीच कामात येईल. तेव्हा मी म्हणालो होतो हिला नको मधे घ्यायला. मी हिच्या मागे जाणार नाही. तो म्हणाला होता तुला थोडी हिच्याशी लग्न करायच आहे आपल काम काढ.

ती किती निरागस तीच खर प्रेम बघून मी केव्हा तिच्या प्रेमात पडलो तेच समजल नाही. आता तर तिच्या शिवाय मी राहू शकत नाही. खुशी तयार झाली असेल माझी वाट बघत असेल. आता हल्ली ती खूप सुंदर दिसते.

मुलांना किती नाचू किती नको अस झाल होत.

" मुली नाही तर मजा नाही कुठे आहेत ह्या?" विराज सुदेशला म्हणाला.

" त्या तयार होत असतिल." सुदेश म्हणाला.

फार्म हाऊसवर मिरवणुक आली. तिथे बराच वेळ बॅन्ड वाजत होता. कोणी आत येत नव्हत.

"चला सगळ्यांनी पटकन बाहेर या. मुलींना कोणी तरी बोलवा." विराज आवाज देत होता.

सतीश राव, रश्मी ताई ही गेले. सोनु, दिपू. भक्ती श्रुती ही पळत गेल्या. मंगेश प्रकाश ही त्यांच्या सोबत होते.

खूपच मजा येत होती. सगळ्यांना उत्साह आला. रोहित, श्रुती सोबत नाचत होते. विराजने बरोबर भक्ती जवळ जागा मिळवली. सोनू, दिपू सोबत होत्या.

खुशीची तयारी होत आली होती .

"आटपा ग वरात गेट जवळ आली." माई पार्लर वाल्या ताईला सांगत होती. त्या खुशीला गजरे लावून देत होत्या.

" माई चांगली झाली ना तयारी?" खुशीने विचारल.

"खूप छान बेटा लग्नात मुली छान दिसतात."

" माई मला थोडं दडपण आलं आहे." खुशी म्हणाली.

"दडपण कशाला घेते. मोकळ रहा तुझ्या सासरचे लोक चांगले आहेत." माई म्हणाल्या.

" सासरी असंच वातावरण असेल ना?" खुशी विचारत होती.

"बऱ्यापैकी. काही समजलं नाही तर घरी विचारून घ्यायचं. बहुतेक त्यांच्याकडे पण सगळ्या कामांना लोक असतील. तुला फक्त प्रेमाने वागाव, बोलाव लागेल आणि काय हवं नको ते बघायचं. त्यात चूक करायची नाही. " माई सांगत होत्या.

" हो माई. "

" आता तुझा स्वभाव शांत झाला आहे. पूर्वी जर तुझं लग्न झालं असतं तर मला काळजी वाटली असती. " दोघी हसत होत्या.

" मी खरच हट्टी होती ना? " खुशी म्हणाली.

" हो लहान होती. आताही तशी तू लहानच आहेस. "

मिरवणूक आली. माई आणि खुशी आतून बघत होत्या. सगळे खूपच आनंदात दिसत होते. छान नाचत होते. तिने कबीर कडे बघितलं. शेरवानी मध्ये छान दिसत होता. फेटा त्याला शोभत होता. खुशी लाजली होती. कबीरचे फोटो घेतले की नाही? किती छान दिसतो आहे तो. एकदम रुबाबदार राजकुमार जसा . नको बघायला त्याच्या कडे. ती आत येवून बसली. बाहेर मस्ती मजा सुरू होती. रश्मीताईंनी कबीरला ओवाळून आत मध्ये घेतलं.

खुशीला बोलवा. सगळे शांत झाले.

"चल खुशी." श्रुती, भक्ती आल्या.

"आमची खूप मजा आली. आम्ही खूप नाचलो." भक्ती सांगत होती.

"बघितल मी रोहित आणि विराज सोबत तुम्ही दोघी होत्या ना. भक्ती काय सुरू आहे?"

"खुशी कबीर खूपच खुश आहे . चल पटकन नाहीतर तो तुला घ्यायला आत येईल." श्रुती म्हणाली.

"तयारी ठीक आहे ना? अति वाटत नाही ना? "खुशी म्हणाली.

"तू खूप सुंदर दिसते आहेस. "

"माई चला. "

खुशी स्टेज कडे आली. तिला खूप धडधड होत होती. सगळे तिच्या कडे बघत होते. स्नेहा, राहुल आलेले होते. ते भेटले.

" हाय थँक्स तुम्ही आले. "

ते रोहित जवळ उभे होते.

" खूपच गोड दिसते आहेस खुशी कॉग्रॅजुलेशन." स्नेहा म्हणाली.

" खुशी आर यू सिरियस. खरच लग्न करतेस? अजून विचार कर." राहुल म्हणाला.

"आता काही ऑप्शन आहे का?" खुशी म्हणाली.

"याच ऐकु नकोस. एन्जॉय कर खुशी. कबीरला हाक मारू का राहुल. मग कसा गप्प बसशील." स्नेहा म्हणाली.

" माझ्या डोळ्या समोर सगळया सुंदर मुलींच लग्न होत आहे." राहुल तोंड पाडुन म्हणाला.

" आणि तू तसाच आहेस सिंगल. " स्नेहा म्हणाली.

खुशी त्याला हसत होती.

"मग काय करू? स्नेहा खुशी मी आता डॅशिंग होणार आहे." राहुलची बडबड सुरू होती.

" जा खुशी तू याच सुरू असत." स्नेहा म्हणाली.

कबीर तिची वाट बघत होता. खुशी येतांना दिसली. तिने समोर बघितल. कबीर तिच्याकडे बघत होता. तिची नजर आपोआप खाली गेली.

तिला लाल शालू खूप छान दिसत होता. लाल टिकली, केसांची हेअर स्टाईल, त्यावर गजरे लावलेले होते, मुंडावळ्या बांधलेल्या. हातात हिरवा चुडा. सुंदर ज्वेलरी. हळदीमुळे आलेले तेज. मुळात सुंदर खुशी खूपच छान दिसत होते. लाजलेली नजर . सावकाश पावल टाकत ती स्टेज जवळ आली.

कबीरने हात देऊन तिला स्टेजवर घेतलं. "तयारी छान झाली. खूपच सुंदर दिसते आहेस." तो म्हणाला.

ती थोडी हसली. तिने डोळ्याच थोड काजळ काढून कबीरला कानामागे लावल. तो बघत होता ही काय करते आहे. तो ही हसत होता. "तुझ्या समोर माझ्याकडे कोण बघणार आहे खुशी?"

"असू दे. तुला कोणाची नजर नको लागायला. " खुशी म्हणाली.

" म्हणजे मी खूपच भारी दिसतो आहे का? " कबीर विचारत होता.

हो... खुशी म्हणाली.

स्टेजवर खूपच गर्दी झाली होती. भक्ती, दिपू, श्रुती, विराज, सुदेश, सोनू मंगेश, प्रकाश सगळेच गडबड करत होते. भक्ती सगळ्यांना अक्षदा देत होती.

दोघांमध्ये अंतर पाठ धरला. मंगलाष्टक सुरू झाले. रश्मी ताई, सतीश राव जवळ जवळ उभे होते. सुलक्षणा ताई, विलास राव खूपच खुश होते. लग्न लागलं. खुशीने कबीरला हार घातला. त्याने तिला हार घेतला. मिठीत ही घेतल. सगळे दोघांच अभिनंदन करत होते. दोघ हातात हात घेवून बसले होते.

"खुशी आज मला किती छान वाटत आहे माझ मला माहिती. माझ तुझ्या वर खूप प्रेम आहे. थँक्यु माझ्या आयुष्यात आल्या बद्दल. माझ्या मागे लागल्या बद्दल. हे काम तू खूप चांगल केल."

ती खूपच हसत होती. मी किती अल्लड होती. चक्क कबीरच्या पाठी फिरत होती.

पुढच्या पूजा सुरू झाल्या .सात फेरे झाले ." खुशी प्रत्येक फेर्‍याचा अर्थ वेगळा आहे. नीट ऐक. " गुरुजी माहिती देत होते.

सविता दोघांच्या मदतीला तिथेच होती. सविता मामीने कबीर कडे मंगळसूत्र दिल. गुरुजी सांगत होते त्याप्रमाणे कबीरने तीला मंगळसूत्र घातलं. कुंकू लावलं. जोडवे घालून दिले. मिठीत घेतल. "आय लव यू. "

ती फक्त हसली.

" आज तरी मोकळ बोल."

" लव यु टु."

मुली स्टेज वर होत्या. श्रुती, रोहित त्याच्या घरच्यांसोबत समोर बसलेली होती. तिचे ऑफिसचे मित्र मैत्रीणी त्यांच्या सोबत होते. ते जेवून लगेच निघणार होते.

"तुमच्या लग्नाची तारीख काढली का रोहित, श्रुती ?" रश्मी ताई त्यांना विचारत होत्या.

"नाही अजून आता भेटू आम्ही." रोहित म्हणाला.

श्रुतीचे आई बाबा आलेले होते.

"इथेच ठरवून घ्या सगळे जमले आहेत तर." सगळे म्हणत होते.

"ही आयडिया भारी आहे." रोहित श्रुतीला म्हणाला.

बाकीची मंडळी खुर्च्यांवर आरामात बसलेली होती. विशेष काम नव्हतं. नवरदेव नवरी सोबत खूप छान दिसत होते. सगळे खुश होते.

खुशीच्या चेहर्‍यावर तेज आल होत. ती वेगळीच खुश होती. तो पहिला दिवस जेव्हा मी कबीर भेटला होता. त्या हॉटेल मधे अगदी वेड्या सारखी मी त्याला शोधत होती. मला काहीही करून तो हवा होता. त्याच्या साठी मी वेडी झाली होती. रडली होती. वाटल नव्हत आमच लग्न होईल. पण देवाची कृपा आहे. की कबीर मला मिळाला. तिच्या चेहर्‍यावर खूप आनंद होता. ती कबीर कडे बघत होती. हा माझा नवरा आहे. ओह माय गॉड. हा गप्प झाला आहे एकदम.

"कबीर तू एकदम शांत का झालास?" तिने विचारल.

" लग्न एन्जॉय करतो आहे. हे जे क्षण आहे ते मनात साठवतो आहे. खूपच छान वाटतं आहे. आता काही टेंशन नाही. तुला माहिती आहे खुशी मला एक वेळ अशी भीती वाटली होती की तू मला मिळणार नाही. मी खूप डिस्टर्ब होतो. सगळ आहे खुशी नाही तर काय अर्थ आहे अस वाटायच. आज आपल लग्न झालं मला खूप आनंद झाला आहे. " कबीर म्हणाला.

" कबीरने मला आधी खूप त्रास दिला. पण तरी तो प्रत्येक वेळी माझ्यावर प्रेम व्यक्त करायचा. आई-बाबांवर राग होता. पण मला त्याने कधीच अंतर दिले नाही. त्यामुळे मी सत्य शोधू शकले. तो माझ्यावर रागावला असता तर काही खर नव्हत. जे झाल ते चांगल्या साठी झाल. आज त्याचे बाबा सापडले. " खुशी विचार करत होती. तीलाही खूप छान वाटत होतं. मी आता कबीर सोबत नीट राहीन. जुन्या गोष्टी अजिबात बोलायच्या नाहीत.

जेवणाची पंगत बसली. खूप मजा येत होती सगळे एकमेकांना घास खाऊ घालत होते. कबीर खुशी साठी सेपरेट व्यवस्था होती. त्यांच्या सोबत घरातल्या लोकांची ही पंगत बसली होती. कबीर, खुशी सगळ्यांना मिठाई खावु घालत होते. ते दोघ जेवायला बसले.

"त्यांचे पोट भरले असतिल. त्यांना थोड वाढा." रोहित म्हणाला.

खूप गम्मत सुरू होती.

"आता तर हात सोड कबीर. खुशी जेवेल कशी?" रोहित चिडवत होता. श्रुती भक्ती तिला हसत होत्या.
......

संध्याकाळी रिसेप्शन होतं. ज्यांना लग्नाला यायला जमलं नाही ते संध्याकाळी येणार होते. खुशी आत तयारी साठी गेली. कबीर बाहेर बसुन गप्पा मारत होता.

"आटोप कबीर पाहुणे यायला सुरुवात होईल. तयार होवुन बोलत बसा वाटल तर." सविता म्हणाली.

खुशीने गोल्डन घागरा घातला होता. काही तयारी करायची गरज नव्हती एवढी सुंदर दिसत होती. मंगळसूत्र खूप शोभत होत. रश्मी ताई परत एकदा नजर काढून गेल्या.

कबीरही तयार होता. चला मॅडम. त्याने आवाज दिला.

दोघेजण स्टेजवर उभे होते. भेटणारे बरेच जण येत होते. खाण्याचे भरपूर स्टॉल होते. सगळी तरुण मंडळी खूप एन्जॉय करत होते. त्यांचं काम झालेलं होतं.

विराज, भक्ती खूपच बोलत होते.

" विराज मला अस वाटत आपली जुनी ओळख आहे."

"मला ही तस वाटत आहे. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. तू मनाने खूप चांगली आहेस. " विराज म्हणाला. तो बघत होता भक्ती किती काम करते आहे. सगळ्यांना सपोर्ट करते.

घरचे बाकीचेही भरपूर गप्पा मारत होते.

खुशी आणि कबीर सुद्धा एकमेकांसोबत रमले होते. ते कोणी नसताना खुर्च्यांवर बसून बोलत होते. कबीरने तर दुपारपासून खुशीचा हात सोडलाच नव्हता.

म्युझिक सुरू झाल. सगळे खूप नाचत होते.

"चल खुशी तू दुपारी नाचली नाही ना. तुझ्या साठी ही खास अरेंजमेंट." कबीर म्हणाला.

खुशी घागरा सांभाळत नाचत होती. सगळी हौस झाली होती. तिने विचार केला त्या पेक्षा छान लग्न झाल होत. कबीरने लग्नात कोणतीच कमी ठेवली नव्हती.

"मला भूक लागली आहे कबीर." तिने त्याच्या जवळ जात सांगितल. म्युझिक जोरात होत तर आवाज येत नव्हता.

" पुरे झाल आता चला जेवायला." कबीरने आवाज दिला. दोघं सगळ्या स्टॉल वर फिरत होते. सगळे पदार्थ खुशीच्या आवडीचे होते .

श्रुती रोहित आणि त्याच्या घरच्यांसोबत परत निघाली. ती खुशीला भेटायला आली . खुशी तिच्याकडे बघून हळवी होत होती. "खुशी तिकडे मजेत रहा. कबीर तिला सांभाळ."

रोहित ही भेटला. "खुशी मजेत रहा. "

"मनाप्रमाणे झाल एन्जॉय." रोहितने कबीरला मिठी मारली. ते निघाले.

" तुम्ही आजच्या दिवस इथे थांबत आहात का निघता आहात?" सुलक्षणा ताई विचारत होत्या.

"आम्ही निघतो आहोत." रश्मी ताई म्हणाल्या. त्या गप्प झाल्या होत्या.

" तुम्ही खुशीची काळजी करू नका. बघितल ना कबीर तिला किती सांभाळतो आहे. जपतो आहे ." सुलक्षणा ताई म्हणाल्या.

"हो तो प्रश्न नाही. कबीर खूपच चांगला आहे . लहान होती हो माझी मुलगी लगेच लग्न झाल. ती माझ्या शिवाय कशी राहील? तिने कधी काही केल नाही. सांभाळून घ्या. तिला राग लगेच येतो. जेवणाच्या खूप आवडी निवडी आहेत. " रश्मी ताई म्हणाल्या.

" चांगली आहे खुशी. मी आहे ना. मी बघेन तिला काय हव ते. " सुलक्षणा ताईंच्या डोळ्यात पाणी होत." मुली असतात अश्या, खूप प्रेम देतात .आधार देतात. काळजी घेतात. एक दिवस सासरी निघून जातात. जनरीत आहे ती कोणाला चुकली आहे. " त्या रश्मी ताईंना समजावत होत्या.

बाकीच्यांची आवरायची तयारी सुरू झाली होती.

खुशी, कबीर एकत्र बसले होते. ते बघत होते सतीश राव, रश्मी ताई निघण्याची तयारी करत होते. भक्ती त्यांना मदत करत होती. दिपू अजूनही खुशी सोबत होती.

"खुशी दी तू घरी नाही येणार?" तिने विचारल. एवढ्या वेळ गप्प असलेली खुशी आता रडत होती.

"नाही. नीट रहा दिपू. छान अभ्यास करत जा .आई बाबां कडे बघ. "त्या दोघी रडत होत्या.

कबीर त्यांच्या मधे पडला. "काय सुरू आहे दिपू, खुशी? शांत व्हा. दिपू तू ही चल आमच्या कडे. आपण तुझ इकडे इंजिनिअरिंग कॉलेज मधे अ‍ॅडमिशन घेवू."

"नाही मी आईकडे राहील. " दिपू म्हणाली.

" मग रडायच नाही. "

" दिपू तुझं सगळं सामान घेतला आहे का बघ आणि भक्ती खुशीची बॅग बाजूला ठेव. तिच्या सामान आपल्यात नको." रश्मी ताई म्हणाल्या. त्या बघत होत्या दोघी रडत आहेत. त्यांनी लक्ष दिल नाही. त्या मुद्दाम काम करत होत्या. त्यांनी हळूच डोळे पुसले.

खुशीचा चेहरा उतरलेला होता. कबीर तिला सांभाळत होता." अजिबात रडायचं नाही तू रडली तर बाकीच्यांना पण त्रास होईल. "

चला कबीर, खुशी पूजा करून घ्या. परांजपे कडून पूजा करायची आणि इकडे आपल्या कॉटेजमध्ये येऊन थांबायचं.

रश्मीताई, सतीश राव, माई, भक्ती, दिपू समोर उभे होते. मंगेश प्रकाश ही होते.

"तुम्ही निघा आधी सुलक्षणाताई मग आम्ही जाऊ." रश्मी ताई म्हणाल्या.

खुशी रडत होती. कबीर तिला समजावत होता. तिचा हात धरून उभा होता. माई पण हळव्या झाल्या होत्या. त्यांच्याकडे सगळे लक्ष देत होते. खुशी त्यांना भेटली.

रश्मी ताई, सतीश राव खुशी जवळ गेले. कबीर खुशीने त्यांच्या पाया पडल्या. बाबा खुशी भेटली.

त्यांनी तिला जवळ घेतल. "बेटा तुझ्या मनाप्रमाणे झाल. खूप खुश रहा. काळजी करायची नाही. तुझ्या घरचे चांगले आहेत . त्यांच्याशी आपल समजून वाग. एकमेकांची काळजी घ्या. आनंदी रहा. सुखाने संसार करा. "

रश्मी ताई काही म्हणण्याच्या पलिकडे गेल्या होत्या. त्या खुशीला मिठी मारून रडत होत्या. सतीश राव त्यांना सांभाळत होते." पुरे रश्मी. दोघींना ही त्रास होईल. "

" आई सांभाळ स्वतःला. तुझ्या शिवाय रहायला मला जमणार आहे की नाही माहिती नाही. " खुशी म्हणाली.

" तिकडे शहाण्या सारखी वाग बेटा. नीट रहा."

"हो आई. "

भक्तीला ती भेटली." आई बाबांना बघ. भक्ती, दिपू अभ्यास करा. मंगेश दादा, प्रकाश घरी येत जा. आई बाबां कडे बघा." भक्ती रडत होती. खुशी तिच्या जवळ होती. तिने दिपूला पापी दिली.

"आई बाबा येते मी."

खुशी, कबीर इकडच्या बाजूला आले. सुलक्षणा ताई, विलास राव अजूनही सतीश राव रश्मी ताईंची समजूत काढत होते.

विराज लांबून बघत होता. त्याला भक्तीला भेटायच होत. ती सामान घेवून कार जवळ आली.

"भक्ती इकडे ये. " ती त्याच्या सोबत गेली.

"हा माझा फोन नंबर मला फोन कर."

"हो विराज."

"माझ ही थोड्या दिवसांनी कॉलेज सुरू होईल. मी पण तिकडे रहायला येईल." विराज म्हणाला.

भक्तिला आनंद झाला होता. "येवू मी?" तिने विचारल.

हो. बाय.


🎭 Series Post

View all