गुंतता हृदय हे भाग 65

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का

गुंतता हृदय हे भाग 65
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

रश्मी ताई सकाळी झोपून होत्या. सतीश राव बघत होते. त्यांना ही खुशीची आठवण येत होती. पण अस करुन कस चालेल.

"रश्मी उठ मला चहा हवा आहे." सतीश राव मुद्दाम आवाज देत होते.

"अहो मला काही करावसं वाटत नाही. नुसती खुशीची आठवण येते." रश्मी ताई म्हणाल्या.

"अस कस चालेल. ऑफिस मधे जायच आहे. चल आटप बरेच दिवस झाले कामाच काही बघितल नाही. मला तुझ्या मदतीची गरज आहे. आता जोरात काम सुरू करू." त्यांना वाटल होत तेवढच रश्मीच मन रमेल.

"आई खुशी दी उठली असेल का? तिला फोन करू का?" दिपू रूम मध्ये आली. ती विचारत होती.

" बेटा आज तिकडे पूजा आहे. ती बिझी असेल. " रश्मी ताई म्हणाल्या.

" ती इकडे कधी येईल? " दिपूला ही बोर झाल होत.

" दोन तीन दिवसांनी. आली तरी ती इथे जास्त रहाणार नाही. " रश्मी ताई उठल्या. माई चहा नाश्ता करायला मदत करत होत्या. या घरात मदतनीस होत्या.

भक्ती आवरून आली. ती नाश्ता वाढत होती." काकू बसा बर आधी खावून घ्या. कोणीच खुशी खुशी करायच नाही. त्रास करून घ्यायचा नाही. आपल आपल काम करा. " तिने सांगितल.

" बरोबर भक्ती." सतीश राव म्हणाले. ही एकटीच या घरात हुशार आहे. समजल ना रश्मी, दिपू?"

हो.

" प्रत्येकाला आपल लाइफ असत. इतके दिवस खुशी आपल्या सोबत होती. आता तीच वेगळ जग आहे. थोडा वेळ लागेल. आपणही यातून बाहेर पडायला हव. " सतीश राव समजावत होते. रश्मी ताई तयार झाल्या. ते ऑफिस साठी निघाले.

"भक्ती, दीपू पुरे झाल्या सुट्ट्या. आज कॉलेजला जा." रश्मी ताई म्हणाल्या. माई येतो आम्ही.

"हो निघतो आहे." दिपू तयारी करायला आत गेली.
......

आज घरी सत्यनारायणाची पूजा होती. खुशी लवकर उठली. बाजूला कबीर होता. अति कोपर्‍यात झोपलेला. ती तिची तिची हसली. आवरून किचन मधे गेली. ती किचनमध्ये उभे होती.

"सविता हिला तयार कर. जा खुशी साडी, दागिने घेवून ये." सुलक्षणा ताई म्हणाल्या.

ती रूम मधे आली कबीर अजून झोपलेला होता. ती लांबून बघत होती. तिला हसू आलं. हा किती निरागस दिसतो आहे. अजून उठला नाही. तिने हळूच सामान घेतल.

खुशी सविता मामी सोबत तिच्या रूम मधे होती. ती छान तयार झाली. किचन मधे आली.

" आई तयारी ठीक आहे का?" खुशीने विचारल.

"हो बेटा खूप छान दिसते आहेस. जा तू बाहेर जाऊन बस." सुलक्षणा ताई म्हणाल्या.

"नाही मी तुमच्यासोबत थांबते काही काम आहे का?" खुशी म्हणाली.

"हा चहा दे बाहेर."

विलास राव पेपर वाचत होते.

"बाबा चहा." खुशीने आवाज दिला.

"अरे थँक्यू बेटा तू का आणला? कबीर कुठे आहे?" विलास राव विचारत होते.

"ते झोपलेले आहेत." तिने सांगितल.

विराज, सुदेश तिला हसत होते.

" काय झालं? " ती त्यांच्या जवळ येवून बसली.

"तू दादाला चक्क अहो म्हणाली? " विराज म्हणाला.

"बाबांसमोर काय म्हणणार मग. " खुशी त्या दोघांशी बोलत होती.

" वहिनी चहा घे." सुदेश म्हणाला.

"नको. "

" बापरे नवर्‍याने चहा घेतल्यावर तू काही खाणार नाही का?" विराज चिडवत होता.

" नाही, उपास आहे. पूजा झाल्यावर चहा घेते. "खुशीने हसत सांगितल.

बाकीच्यांचं चहापाणी झालं.

कबीर खाली आला. तो खुशीला शोधत होता. ही इतक्या लवकर कशी उठली? नीट झोप लागली की नाही माहिती नाही? की परत रडतच होती.

तो किचनमध्ये आला. खुशी साडीत उभी होती. हिरवी साडी. त्याला लाल काठ. दागिने घातलेले. साधी छान वेणी घातलेली खुशी खूप छान दिसत होती. तो छान हसला.

"तु ठीक आहे ना खुशी?" त्याने फक्त खुणेने विचारल.

ती मानेने हो म्हणाली.

"आई चहा हवा आहे." कबीर म्हणाला.

"पूजा झाल्यानंतर मिळेल." सुलक्षणा ताई म्हणाल्या.

"गुड मॉर्निंग खुशी. तू किती वाजता उठली होती? सकाळी सकाळी एवढी तयारी? सिरियल मधे दाखवता तशी नटून थटून तयार आहे. बघू काय काय घातल. " कबीर मुद्दाम म्हणाला. त्याला तीच नाव घ्यायची हुक्की आली होती . सुलक्षणा ताई हसत होत्या.

"आई बघा ना सांगा काहीतरी. " खुशी चिडली.

" कबीर तू ही तयार हो. पूजा आहे ना. " सुलक्षणा ताई बाहेर गेल्या. कबीर अजूनही खुशी कडे बघत होता." छान दिसते आहेस. " तो म्हणाला.

"मामींनी मला तयार केलं." खुशी म्हणाली.

"मला का नाही उठवल." कबीर तिच्या जवळ येत म्हणाला.

"मी आपल्या रूम मधे नव्हती. मामीं सोबत होती. कबीर तिकडे सरक. काल रूम मधे रात्र भर सोबत होतो तेव्हा दूर झोपला. आता का त्रास देतोस. " खुशी म्हणाली.

" आज बघ सगळी कसर भरून काढेन." कबीर म्हणाला.

" कबीर काहीही बोलायच का? कोणी ऐकेन ना." खुशी इकडे तिकडे बघत होती.

" तुझ्याशी नाही मग कोणाशी अस बोलणार. माझा कुर्ता शोधून दे. " तो म्हणाला.

" म्हणजे? "

" मला कपाटात काहीच सापडत नाही. "त्याला खुशीला रूम मधे बोलवायचं होत.

" चल, पण या पुढे अस चालणार नाही. निदान स्वतःच काम स्वतः करत जा. " दोघ रूम मधे आले. खुशी कुर्ता शोधत होती. कबीर तिच्या जवळ उभा होता.

" हा काय कुर्ता. घे." तिने दिला.

" खुशी एकदा मिठीत ये ना ."

" आटोप कबीर कोणी येईल."

त्याने तिला मिठी मारली. " तुला ही आवडत ना माझ्या जवळ. उगीच हो नाही करते."

खुशी हसत होती. कबीर तयार झाला. दोघ बाहेर येऊन बसले. पूजेची तयारी झाली होती. पूजा सुरू झाली. आरती झाली.

चहा नाश्ता झाला. ते मंदिरात जाणार होते. घरातले सगळेच जाणार होते. मुलांना खूप उत्साह होता. मोठी गाडी काढली होती. खुशी पूजेच सामान घेत होती. कबीर तिच्या जवळ बसला होता. जवळच मंदिर होत. दोघांच्या हातून छान पूजा झाली. त्यांनी डबे नेले होते तिथे बागेत छान जेवण झाल. थोड्या वेळाने ते घरी आले.

खुशी माहेरी जाणार नव्हती. दुसऱ्या दिवशी ती कबीर सोबत फिरायला जाणार होती.
संध्याकाळी मंदिरातून परत आल्यानंतर खुशी आराम करत होती.

सुलक्षणाताई आल्या. त्यांच्यासोबत दोन बायका होत्या. "खुशी तुझं सामान यांच्याकडुन लावून घे. आणि थोड्या वेळाने खाली ये."

"हो आई." सोनू आली होती. तिची बडबड सुरू होती. खुशीला दीपू भक्तीची आठवण आली तिने त्या दोघींना फोन केला. त्या बर्‍याच वेळ बोलत होत्या. सतीश राव रश्मी ताई घरी आलेले होते. माई टीव्ही बघत होत्या. त्या ही बोलल्या. रश्मी ताई खुशीशी बोलून खुश होत्या.

" आई आम्ही उद्या फिरायला जातो आहोत. त्या नंतर मी घरी येईल."

"चालेल तिकडून आली की सांग. बाबा येतील तुला घ्यायला." रश्मी ताई म्हणाल्या.

कबीर स्टडी रूम मध्ये त्याच ऑफिसच काम करत होता. विलास राव त्याच्याशी बोलत होते. खुशी, सोनु खाली आल्या. त्या गार्डन मधे फिरत होत्या. विराज, सुदेश त्यांच्या बरोबर होते. ते खूप बोलत होते.

जेवायची वेळ झाली. सविता मामी काम करत होत्या. खुशी त्यांच्या मदतीला गेली.

" वहिनी तुला काम येतं? ताट वाढता येत?" सोनू विचारत होती .

"हो मला स्वयंपाक ही करता येतो. सगळ काम करू शकते."

"आम्हाला वाटल तुला काही येत नसेल." विराज म्हणाला.

" सगळ्यांना सगळे काम यायला हव." खुशी म्हणाली.

जेवण झाल्यावर ते सगळे बोलत बसले होते. सुलक्षणाताई सविताला काहीतरी सांगत होत्या.

"खुशी सविता सोबत जा."

त्यांनी तिला छान तयार केल. सुलक्षणाताई आल्या. "छान दिसते आहे ही."

खुशीने लाल साडी नेसलेली होती. विशेष मेकअप नाही फक्त लाल टिकली लावलेली होती. मंगळसूत्र बांगड्यांमध्ये ती छान दिसत होती.

खुशीला कल्पना आली होती हे काय आहे. ती काही म्हणाली नाही. मामीने तिला रूम मध्ये सोडलं.

रूम मधे सगळीकडे फुलांची सजावट होती. खूप प्रसन्न वाटत होतं. यांनी हे केव्हा केल? खूप छान आहे. खुशीने फुलांचे फोटो घेतली. गुलाबांचा खूप छान वास येत होता. ती खिडकी जवळ उभी होती. कबीर केव्हा येईल? तिला थोडी धडधड होत होती. तस तिला कबीर खूप आवडत होता. पण काय होईल अस वाटत होत.

कबीर आणि विलासराव गप्पा मारत होते. कबीर नवीन ऑर्डर मिळाली ते विलासरावांना सांगत होता. "विराजला उद्या पासून काम बघायला सांगतो. त्याच कॉलेज सुरू होई पर्यंत करेल. त्याला ही सवय हवी."

"हो बरोबर." विलास राव म्हणाले.

सुलक्षणाताई आल्या. "पुरे झाल्या गप्पा. कबीर जा आराम कर. अहो तुम्ही चला आपण सिरियल बघू."

कबीर बोलता बोलता थांबला. तो इकडे तिकडे बघत होता. खुशी दिसत नव्हती. म्हणजे नक्कीच ती आमच्या रूममध्ये असेल. त्याला आनंद झाला होता. त्याने त्याच सामान ठेवलं. तो वरती रूममध्ये आला. पूर्ण रूम सजवलेली होती. त्याला माहिती नव्हतं. संध्याकाळपासून तो वरती आला नव्हता. त्यात कहर म्हणजे खुशी लाल साडीत होती. तो तिच्याकडे बघतच राहिला. " खुशी किती गोड दिसते आहेस. हे डेकोरेशन कोणी केलं?" त्याने विचारलं.

खुशी त्याला बघून थोडी बावरली होती. "मला नाही माहिती. मी पण आत्ताच इथे आली."

"छान सजवली ना आपली रूम."

" हो ना. "

" तू ही सुंदर तयार झालीस. अगदी साडी नेसून. " कबीरने तिला कमरेत हात घालून जवळ ओढल.

खुशी लाजली होती. ती थोडी बाजूला सरकली.

"का?" त्याने मुद्दाम विचारल.

खुशी त्याच्याकडे बघत होती. तिने उत्तर दिल नाही.

"खुशी तू कुठे बाहेर जाते आहेस का? साडी का नेसली? मी काय विचारल. " त्याने मुद्दामून परत विचारल.

" मामींनी तयारी करून दिली. "

कबीर बघत होता. ही अगदी निरागस साधी छान दिसते आहे. निर्मळ मन. म्हणून चांगली वाटते.

" ही साडी हा रंग तुझ्यावर खूपच छान दिसतो आहे." त्याची नजर तिच्या सर्वांगावरून फिरत होती. खुशीने खाली बघितल.

" आज पासून आपण नवीन सुरुवात करणार आहोत. माझी साथ देणार ना खुशी." कबीरने हात पुढे केला. तिने ही हातात हात दिला.

हो.

" गैरसमज भांडण अजिबात करायच नाही. काही वाटल तर मोकळ बोलून घ्यायच. "

" प्रॉमीस. नाहीतरी मी भांडत नाही. " खुशी म्हणाली.

" अस? " कबीर हसत होता.

दोघांना वेगळेच वाटत होतं. खुशी कॉटवर येवून बसली. कबीर तिच्याजवळ येऊन बसला. तो तिच्या बांगड्यांशी उगाच खेळत होता. तिचा पदर खातात घेतला." किती सुंदर आहे ही साडी. तू एखाद्या अप्सरे सारखी दिसते आहे. परफेक्ट फिगर....."

"कबीर अस म्हणु नको ना." ती म्हणाली. कबीर गप्प बसला. जावू दे ही खूपच लाजते.

" खूपच फुल आहेत ना इथे? थोडे आवरू या का? यावर झोप कशी येईल. "कबीर म्हणाला.

" हो मी पण तोच विचार करत होती. " दोघांनी फुल साईडला केले. दोघ बोलत बसले.

" खुशी तू ठीक आहे ना ? घरी करमत ना? मला माहिती आहे अस सासरी येण अवघड असत. नवीन घर नवीन लोक सगळ वेगळ. " कबीर म्हणाला.

"या घरचे लोक चांगले आहेत. आणि तू आजुबाजुला असला की मला सेफ वाटत." खुशी म्हणाली.

"खुशी तुला मी कसा काय आवडलो." कबीरने विचारल.

"माझ लव अॅट फर्स्ट साइट झाल." खुशी हसत म्हणाली.

"बापरे हो का."

" हो. मी बर्थडे पार्टीला गेली होती. त्या दिवशी तू मला पहिल्यांदा हॉटेल मध्ये दिसला. तेव्हा पासून तू खूप आवडत होता. मला वाटल होत त्या नंतर तू कधीच दिसणार नाही. पण तू रोहितचा मित्र निघाला. मला खूप आनंद झाला. "

कबीरला ही जूने दिवस आठवत होते. तो हसत होता.

" काय झालं हसायला?" खुशी त्याच्याकडे बघत होती.

" तुझी किती माहिती काढली होती. तू केव्हा कुठे जातेस वगैरे. त्या दिवशी मला समजल की तू बर्थडे पार्टीत आहेस मी मुद्दामहून तिकडे आलो होतो. " कबीर म्हणाला.

" पण बर झाल तु आलास. आपण भेटलो तरी." खुशीने त्याचा खांद्यावर डोक टेकवले. हातात हात होता.

"कबीर तू सांग आधी तू मला अजिबात भाव देत नव्हता. म्हणजे प्रेम अस नव्हत. मग नंतर माझ्या प्रेमात कसा पडला?" खुशीने विचारल.

कबीर हसत होता. " ते झाल अस की एका गोड मुली पासून कोणी दूर राहू शकत नाही. "

" अस नाही नीट सांग. "

" तुझ्या सोबत राहून प्रेम आपोआप झाल. तू कधी परकी वाटली नाही. मला पण तुझ्या जवळ खूप छान वाटत. तू चांगली आहेस. खुशी मला तुझी माफी मागायची आहे. " कबीर म्हणाला.

" कश्याबद्दल?" ती आश्चर्याने बघत होती.

"एकंदरीत जे सगळ झाल ना ते कठिण होत. खूप गैरसमज झाला. मला आधी तुझा खूप राग येत होता. म्हणजे तुझा नाही तुझ्या घरच्यांचा. त्यामुळे चिडून मी तुझ्यावर बळजबरी करायचा प्रयत्न केला होता. " कबीर खाली मान घालून म्हणाला.

खुशी त्याच्या कडे बघत होती." मी पहिल्यांदा तुझ्या रूम वर आली होती तेव्हा ना? मला ही जाणवल होत. काय झाल होत? "

" बदला घेण्यासाठी मी काहीही करायला तयार होतो. तुझ्या बाबांनी माझ्या मागे माणस लावली होती. ते मला त्या दिवशी पकडणार होते. मी नेमक ऑफिसला न जाता रूम वर आलो होतो म्हणून वाचलो. मला आमच्या लोकांनी ही बातमी सांगितली. मी खूप चिडलो होतो. तेव्हा मला वाटल मी खुशीला आत्ताच माझी बनवली तर कोणी काही करू शकत नाही. मी जिंकेन. मला समजल नाही खुशी मी असा विचार का केला. खूप सॉरी. पण मी हे करू शकलो नाही. कारण माझ तुझ्यावर खूप प्रेम होत. मी तुझ नुकसान करू शकलो नाही. " कबीर म्हणाला.

खुशीला थोडी कल्पना होती. " माफी नको मागूस कबीर ती वेळ तशी होती. कठिण काळ होता. "

" खुशी मी ही गोष्ट जेव्हा आठवतो ना तेव्हा खूप वाईट वाटत. आज तुला हे हिम्मत करून बोलतो आहे. मला माफी मागु दे. मला मागच काहीच बाकी ठेवायच नाही. मला हे आठवून खूप मानसिक त्रास होतो. "कबीर मनापासून म्हणाला.

खुशीने कबीरला मिठी मारली." कबीर जुन्या गोष्टी मनातून काढ. मी तुझी आहे ना. यापुढे आपण जुन्या गोष्टी बोलायच्या नाहीत. काहीही झाल तरी एकमेकांवर विश्वास ठेवायचा. आता आपण नीट राहू. "

कबीरने तिला अजून जवळ घेतल.

झालेल्या प्रकरणाचा कबीरला ही खूप त्रास झाला होता. त्याने त्याच मन मोकळ केल. खुशी आतून हादरली होती. केवढ मोठ संकट होत. यातून सगळं ठीक झाल म्हणुन बर आहे. नाहीतर माझ, आई, बाबांच काय झाल असत? या मामाने कबीरला काहीही सांगून भडकावून ठेवल होत. तिच्या डोळ्यांत पाणी होत.

कबीरने तिचे डोळे पुसले. तिला जवळ घेतल. तो तिला कंफर्टेबल करत होता. दोघ शांत बसले होते.

"पुरे झाल आता टेंशन. मी तुझ्यासाठी काय आणलय. सरप्राईज आहे." कबीर म्हणाला.

"काय?" खुशी बघत होती... दे ना.

"अस नाही. थोड्या वेळाने."

"काय अस कबीर, बघू तरी." तिला समजल ड्रॉवर मधे काहीतरी आहे. कारण कबीर तिकडेच बघत होता. ती ते उघडत होती. कबीरने तिला हात लावू दिला नाही. "चिटींग करायची नाही. आधी तू माझ्या साठी काय आणल."

" मी कश्याला काही घेवू तुझा बर्थडे आहे का?" खुशी हसत म्हणाली.

कबीरला राग आला होता.

बर... तिने कपाट उघडल. त्यातून कबीरला चिठ्ठी ग्रिटींग कार्ड दिल.

कबीर आश्चर्याने बघत होता. वाह वेगळ गिफ्ट. किती छान. तो वाचत होता.

पत्र लिहायला कशी सुरुवात करू ते समजत नाही कबीर प्लीज हसू नकोस.

पहिल्याच वाक्याने त्याला हसू आल.

"इकडे दे ते पत्र कबीर तू मला हसतो आहेस." खुशी चिडली.

"नाही हसणार सॉरी. मी वाचतो."

प्रिय कबीर.
मला तू खूप आवडतो.
हसू नकोस... खरच.
तुला माहिती आहे ना तुझ्याआधी माझ तुझ्यावर खूप प्रेम होत आणि राहील.
तु खुप चांगला आहेस. माझ सगळं ऐकतो.
यापुढे मी म्हणेल ते करायच.
कबीर मला ना खूप काही करायच. कॉलेज झाल्यावर मी पण ऑफिस मधे तुला मदत करणार.
मला तुझ्या सोबत आवडत.
तु परका वेगळा वाटत नाही.
तु मला समजून घेतो. प्रेमाने वागतो.
मला असच प्रेम करत रहा.
बरच काही लिहिल होत. अगदी निरागस विचार होते.
खुशी मनापासून मला आपल मानते. कबीर खुश होता.

" खूप छान लिहिल आहे खुशी. एवढ लिहिल पण आय लव यु लिहिल नाही?" कबीर म्हणाला.

तिने ग्रिटींग कडे बघितल .

"ओह हे राहील का?" कबीरने ते हातात घेतल.

खुशी लाजली होती. "नको बघू." ती म्हणाली.

"सरक खुशी. लाजू नकोस." कबीर उठून उभा राहिला. आता ग्रिटींग कार्ड पर्यंत खुशीचा हात जात नव्हता. ती बाजूला झाली.

खूप सुंदर ओळी लिहिल्या होत्या.

तु आणि मी, आणि आपल प्रेम, अतिशय सुंदर अस जग, आपल्या प्रेमात मला तुझी प्रेमळ साथ हवी, आधार हवा. बाकी काही नको, तुझ्या गप्पा तुझे जोक, मला नेहमी हसत खेळत ठेवतात. तु माझ्यावर खूप प्रेम करतो ना कबीर. एक सांगू का? माझ ही तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव यु.

खुशी तोंड लपवुन बसली होती.

"खुशी किती सुंदर लिहितेस तू."

"नाही असच काहीही लिहिल आहे कबीर. ते पत्र ग्रिटींग परत कर ना." खुशी म्हणाली.

"नाही ते कायम माझ्या सोबत राहील." त्याने ते प्रेमाने कपाटात ठेवल.

कबीरने ड्रॉवर मधून गिफ्ट काढल. तिला दिल. खुशी बघत होती नाजूक मंगळसुत्र होत. "हे कॉलेज मधे छान वाटेल. कबीर घालून दे. "

ती खूप छान दिसत होती.

" आवडल? "

" हो खूप. "

त्याने तिला गुलाबाच फुल दिल." हे फुल या डेकोरेशन मधल नाहिये. सेपरेट आणल."

"हो दिसत वेगळ."

तो तिला आवडेल त्या विषयावर बोलत होता. ती ही मोकळ बोलत होती.

"खुशी माझ्या जवळ येतेस?" त्याने विचारल.

तिने हो म्हटलं. नाही म्हणायचं प्रश्न नव्हता. प्रेम खूप होत. परके पणा नव्हता. लग्न तर एक फाॅरमॅलीटी होती. ते प्रेमी जीव कधीचे एकमेकांचे झाले होते. दो दिल ऐक जान है हम सारखे .

कबीर तिच्या जवळ आला. तिला उचलून घेतल. तिने लाजून त्याच्या छातीवर तोंड लपवल. अलगद कॉटवर बसवल. कबीर तिच्या कडे बघत होता. त्याने साडीला हात लावला.

"कबीर आधी लाइट बंद कर."

कबीरने लाइट बंद केला. "मोकळी रहा खुशी. तू माझी आहेस ना."

तो तिच्या जवळ येत होता. ती थोडी घाबरली. त्याने मोकळ बोलून तिला शांत केल. आता ती पण त्याला साथ देत होती. दोघ सोबत होते. त्यांच प्रेम फुलल होत. रात्र पुढे जात होती. दोघांवर प्रेमाचा रंग चढत होता. तो आता कधीच उतरणार नव्हता.


🎭 Series Post

View all