गुंतता हृदय हे भाग 66

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का
गुंतता हृदय हे भाग 66
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

खुशी सकाळी उठली. कबीरला बघून ती थोडी लाजली होती. पटकन आवरून किचन मधे गेली. ती काम करत होती. तिचा फोन वाजला. कबीर होता. "तू कुठे आहेस?"

"खाली किचन मधे आहे. सकाळ झाली ना. चहा करते आहे." खुशी म्हणाली.

"आधी वरती ये."

"नाही कबीर."

"मी खाली आलो तर तुला उचलून वरती घेवून येईल." तो म्हणाला.

"उगीच हट्ट करू नको कबीर. तू खाली ये ना माझ्या हातचा चहा घे. मग आपण वरती रूम मधे जावू." खुशी म्हणाली.

"चालेल." कबीर खाली आला. "वाह चहाचा मस्त वास येतो आहे . कोणी केला आहे? " त्याने माहिती असून मुद्दाम विचारल.

खुशी त्याच्या कडे बघत होती. ती हसत होती.

"कुठे वास येतो आहे. काहीही दादा. वहिनीने चहा केला म्हणून एवढ?" विराज ही तयार होता.

" कुठे चालले तुम्ही दोघ? " खुशी विचारत होती.

" ऑफिस मधे. याला काम दाखवून देतो ना. विराज ही आता मेन माणूस आहे ." कबीर म्हणाला.

" बघितल का वहिनी. आता मी पण खूप काम करणार. ऑफिसला जाणार. " विराज कॉलर ताठ करत म्हणाला.

" म्हणजे विराजला सगळं काम कराव लागेल आणि कबीर खुशी सोबत मजेत राहील." सुलक्षणा ताई तिकडे येत म्हणाल्या.

" अस आहे का? " विराजला लक्ष्यात आल. कबीर, खुशी त्याला हसत होते.

विराज पुढे बसला होता. त्याच्या सोबत सुलक्षणा ताई होत्या.

" खुशी बॅग भरून तयार रहा. आपण फिरायला जाणार आहोत." कबीर हळूच म्हणाला.

" हो. तुझी बॅग?"

"मी आल्यावर भरेन. "

चहा नाश्ता झाला. कबीर तयार व्हायला रूम मध्ये गेला. त्याने खुशी कडे बघितल .ती पण मागे गेली.

खुशी... त्याने तिला जवळ ओढून घेतल. "सकाळी सकाळी मला तुला बघायच असत. तू अस मला न भेटता खाली जायच नाही. "

" घरचे काम करायच नाही का? घरचे ओरडतील ना. " खुशी म्हणाली.

" इथे कोणी काही बोलत नाही. नवरा इंपोर्टंड. समजल ना. मी आंघोळीला जातो आहे. माझ्या साठी कपडे शोधून ठेव." कबीर हक्काने म्हणाला.

" चांगल आहे, मी या साठी इथे लग्न करून आली ना. कबीर तू मलाच काम देतोस." खुशी कपडे शोधत होती.

कबीर तयार झाला. खुशी त्याच्या कडे बघत होती. तो जबरदस्त दिसत होता. आरश्यात केस सेट करत कबीर खुशीकडे बघत होता. "जावू ना?"

"हो, लवकर ये." खुशी म्हणाली.

" नाही, तू माझ्याकडे खूपच बघते आहे. " कबीरने अस म्हटल्यावर खुशी लाजली. तिचा चेहरा चोरी पकडल्या सारखा झाला होता.

" आपण रिसॉर्ट वर छान वेळ घालवू. आराम कर थोडा. बाय." त्याने तिच्या जवळ येत सांगितल. खुशी त्याच्या त्या सानिध्याने ही शहारली होती.

कबीर विराज निघाले. "तुला समजल का दादा, रुद्रला बेल मिळाली."

"हो काय आहे ते." त्याने पोलिस स्टेशनमध्ये फोन केला.

" रुद्रचा भाऊ विकी आला आहे. त्याने मोठा वकील लावला आहे. आता मामाला सोडायचा प्रयत्न सुरू आहेत." इन्स्पेक्टर म्हणाले.

"हे होता कामा नये." कबीरने वकिलांना फोन केला. तो बराच वेळ बोलत होता.

" काय ताण आहे एक एक. "विराज म्हणाला.

" हो अरे बिझनेस मधे अस असत. दोन मिनिट शांत जात नाही. लोकांना लांबून एवढी प्रॉपर्टी दिसते. त्या मागची मेहनत दिसत नाही. "कबीर म्हणाला.

" हो ना. चोर भामटे टपून बसले असतात."

ते ऑफिस मधे आले. मॅनेजर भेटला. कबीर त्याला रीपोर्ट विचारत होता.

"या ऑफिस मधे आता थोडे दिवस विराज येईल. त्याला हाताशी घेवून काम करा. त्याला सगळी माहिती द्या. " कबीर म्हणाला.

" साहेब पेमेंट वगैरे. "

" विराजची सही घ्या. "

कबीर बिझी होता. तिकडच काम झाल. त्याने राऊतला फोन केला. " राऊत काय सुरू आहे ऑर्डरच?"

ते दोघ बोलत होते. बरच काम झाल होत. कबीरच्या चेहर्‍यावर समाधान होत.

"विराज मी निघतो. आम्ही दोन तीन दिवस नाही .सांभाळ सगळं. तू बॉस आहे लक्ष्यात ठेव. डीसीजन घे. "कबीर म्हणाला.

"दादा काही चुकलं तर. "विराज म्हणाला.

" मी आहे नीट करायला. डोन्ट वरी. बिनधास्त काम कर. "

" ठीक आहे दादा एन्जॉय."

" काही वाटल तर विचार. मी आल्यावर बघू त्या विकी कडे. आता माझा भांडणाचा मूड नाही. " कबीर निघाला. दुकानातून खुशी साठी चॉकलेट घेतले. थोड खायच सामान घेतल.

तो घरी आला. खुशी सुलक्षणा ताई सोबत होती. त्या छान बोलत होत्या." चला जेवून घ्या आणि मग निघा."

" ड्रायवर, बॉडीगार्ड सोबत न्या. अनोळखी लोकांशी बोलणे वगैरे करू नका." विलास राव सांगत होते. त्यांना वाईट लोकांचा खूप अनुभव होता.

खुशी रूम मधे आवरत होती. कबीर आत आला. चल निघायला हव.

"कबीर तुझी बॅग?"

"पाच मिनिटात भरतो. मी नेहमी गावाला जातो तर सवय आहे. "

"तु खुप हुशार आहेस. "खुशी बघत होती तो भराभर आवरत होता.

" एवढी मोठी बॅग खुशी? काय घेतल आहे एवढ? आपण तीन चार दिवस जात आहोत." कबीर तिला हसत होता.

"कार मधे तर ठेवायची ना. तुला थोडी धरायची आहे. असू दे मला माझ सामान लागत." खुशी म्हणाली.

ते निघाले.

सुलक्षणा ताई, सविता ताई बाहेर पर्यंत आले होते, " कबीर खुशीला सांभाळ."

" हो आई. "

" लवकर या. सामान सांभाळा." त्या दोघी खूपच सूचना देत होत्या.

" तुम्ही दोघी येता का आम्हाला सांभाळायला." कबीर हसत म्हणाला.

" आम्ही तयार आहोत. तु नेशील का आम्हाला?" सविता म्हणाली.

"हो ना सविता. याला आता इथून निघायची घाई झाली आहे. चल आपल सामान आण सविता . आपण ही जावु." सुलक्षणा ताई हसत म्हणाल्या.

खूप गम्मत सुरू होती. ते दोघ निघाले. कबीर खुशीला जवळ घेवून बसला होता.

"किती वेळ लागेल? बूकिंग झाली का? कधी परत यायच? खुशी खूप प्रश्न विचारत होती. कबीर न कंटाळता तिला उत्तर देत होता. "हे घे तुला खावु, चॉकलेट."

खुशी त्याच्या जवळ जरा वेळ झोपली होती.
.....

विराज केबिन मधे बसलेला होता. त्याने भक्तीला मेसेज केला. उत्तर आल नाही. कुठे आहे ही? बहुतेक कॉलेज मधे असेल.

थोड्या वेळाने तिच उत्तर आल... "हाय."

" कुठे आहेस? "

" कॉलेज मधे. तू? "

" मी बॉस झालो आहे. केबिन मधे बसलो आहे. " विराजला तिला ही बातमी आधी द्यायची होती.

" म्हणजे?"

" मी ऑफिस मधे आहे. मेन बॉस. इथे सगळे माझ ऐकतात. " विराज म्हणाला.

" जिजु कुठे आहेत? " भक्तीने विचारल.

" दादाला वेळ नाही. तो वहिनी सोबत फिरायला गेला. "

" ओह म्हणून तू तात्पुरता बॉस आहेस. "भक्तीला ही गम्मत वाटली.

" मी तेवढा तरी आहे तू झाली का कधी बॉस? "त्याने विचारल.

" हो मी घरची बॉस आहे. परांजपे काका काकू माझ ऐकतात. "

" हो का हुशार आहेस."

" माझा क्लास सुरू होत आहे बाय." भक्तीला हसू येत होत. विराज ही ना गमतीदार आहे. पण चांगल्या मुलांसोबत चांगल वाटत. माझ तर नशीब एकदम पालटल. हे खुशी मुळे झाल. थँक्यू डीयर.
.....

खुशी कबीर रिसॉर्ट वर आले. तिचा फोन वाजत होता. " आई बोल. आम्ही रिसॉर्ट वर आलो आहोत. तू कुठे आहेस?"

" मी ऑफिस मधे आली आहे." रश्मी ताई म्हणाल्या.

" बाबा कुठे आहेत?"

" ते दीक्षित सोबत बिझी आहेत."

" तुम्ही तिकडे आत्ताच पोहोचले. आपण नंतर बोलू." रश्मी ताई फोन ठेवला. यांना डिस्टर्ब करायला नको.

कबीर तो पर्यंत सामान आत घेवून आला. दोघांसाठी चहा सांगितला.

" आपला काय प्लॅन आहे?" खुशी विचारत होती.

" काही नाही. मस्त प्रेमाने छान रहायच. सोबत वेळ घालवायचा. " त्याने तिला ओढून जवळ बसवल.

" इथे फिरायला जावु. " खुशी तिथले फिरायचे ठिकाण काय आहेत याची माहिती मोबाईल मधे बघत होती.

"कबीर हे बघ बरेच ठिकाण आहेत. आपण तिकडे जावू. नाहीतर दोन तीन दिवस इथे काय करणार ना?" ती सहज म्हणाली.

" समजेल तुला." कबीर तिच्या जवळ येत होता.

"मोकळ बस ना कबीर. काय अस?" खुशी बाजूला सरकली.

"लग्नाला फक्त दोन दिवस झाले खुशी . एवढ्यात अस? जरा प्रेमाने रहा. सॉफ्ट आवाजात बोल. " कबीर म्हणाला.

"म्हणजे कस?"

"लग्ना आधी कस बोलत होती हळूच कबीर सर तस. " कबीर म्हणाला.

"तेव्हा तू परका होता. आता तू माझा आहेस. "खुशी हसत म्हणाली.

" म्हणून जवळ घेतल होत. तर तू चिडलीस. "

"सारख काय जवळ जवळ. "खुशी म्हणाली.

"हनीमूनला असच रहातात . "कबीर तिच्या कानात म्हणाला.

खुशी हसत होती. तो चान्स बघून कबीरने तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.

चहा झाला.

खुशी बाहेर काय आहे ते बघत होती." कबीर इकडे छान थंड वातावरण आहे. हे आपल रिसॉर्ट आहे का?"

" हो अर्धा भाग हॉटेल आहे. बाकीच्या लोकांसाठी. हा भाग प्रायव्हेट आहे . "

थोड्या वेळाने ते फिरायला निघाले. तिकडनं जेवून आले. रात्री कबीर पिक्चर लावून बसला होता. खुशी त्याच्या शेजारी बसली होती. तिला झोप लागली. त्याने तिला अलगद उचलून जागेवर झोपवल. तो बराच वेळ तिच्या निरागस चेहर्‍याकडे बघत होता.

सकाळी तिच्या आधी कबीर उठला होता. त्याच काहीतरी काम सुरू होत. ती उठून बाहेर आली. त्याचा जवळ सोफ्यावर परत झोपली.

"खुशी उठ आता. नाश्ता कर."

आज ते रूम होते. कबीर आणि ती स्विमिंग पूल मधे खेळत होते. दोघांनी सोबत छान वेळ घालवला. दुपारनंतर ते फिरायला गेले. खूप मजा आली. संध्याकाळी बाजूच्या गार्डनमध्ये आरामात बसलेले होते.

"किती शांती आहे ना इथे." कबीर म्हणाला.

"हो ना अगदी बर वाटत आहे. "

तिसऱ्या दिवशी ते आजूबाजूच्या परिसरात साईट सिंगला गेले होते. सुंदर मंदिर होते. आजचा दिवस त्यांनी वेगळया पद्घतीने घालवला. शॉपिंग केली. संध्याकाळी तलावावर बोटिंग केलं. सन सेट पॉईंट वर सूर्यास्त बघितला. पॉईंट हून येतांना खूप अंधार झाला होता. खुशीला चालतांना काही दिसत नव्हतं. कबीरने खुशीला उचलून कार पर्यंत आणल.

रात्री छान डिनरचा प्लॅन होता. खुशी साडी नेसली होती. केस मोकळे सोडलेले होते . थोडासा मेकअप केला . ती खूप छान दिसत होती. कबीर रूम मधे आला तिला बघत राहील. त्याने रूम वर जेवण ऑर्डर केल. बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल केला. त्याने रूम लॉक केली.

खुशी त्याच्या कडे बघत होती. "आपल्याला जायच ना?"

कबीरने नाही अस म्हटलं. तो तिच्या जवळ आला. तिला मिठीत घेतल.

" सोड ना कबीर. काय अस?"

" तू किती सुंदर दिसते आहे बघितल का आरश्यात. उद्या आपण घरी जावू. आज हव तस राहून घेवू." कबीर म्हणाला.

"मला का एवढी तयारी करायला सांगितली." खुशी चिडली होती. ती त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करत होती ते शक्य झाल नाही. कबीरने काही ऐकल नाही. खुशी ही थोड्या वेळाने त्याच्या सोबत रमली होती.

सकाळी नाश्ता झाल्यावर खुशी बॅग भरत होती. कबीर तिच्या मागे होता. ती मुद्दाम जास्त बोलत नव्हती.

" खुशी काय झाल? तू रागावली का?"

खुशी चिडलेली होती. "कबीर तू अति करतोस. थोड ही माझ ऐकत नाही."

" एकदा माझ्या नजरेतून स्वतःला बघ मग समजेल की तू किती सुंदर आहेस. मी कस काय कंट्रोल करणार. आपण इतक छान सोबत होतो चिडू नको ना ." कबीर म्हणाला.

आता खुशी हसत होती. "तू पण ना कबीर. तुझ्यावर मी जास्त रागवून राहू शकत नाही. "

कबीर हसत होता. लक्ष्यात राहील अशी सुट्टी त्यांनी एंजॉय केली होती.

ते घरी आले. सोनु, सविता, खुशी सोबत होत्या. तिने काय काय आणल ते दाखवल. सुलक्षणा ताई विलास राव बाहेर गेले होते ते आले. कबीर, खुशीला बघून ते खुश होते.

"खुशी ताट कर. मला जेवून ऑफिसला जायच आहे." कबीरचा आवाज आला. खुशी पटकन कामाला लागली. तिकडे किती वेगळा वागत होता हा. जेवताना तो बाबांसोबत बोलत होता.

थोड्या वेळाने कबीर ऑफिस मधे गेला. "विराज काय म्हणतय काम?"

"नीट सुरू आहे दादा. मी काल एक मीटिंग ही घेतली. एक काम थांबल होत ते सुरू करून घेतल." विराजने सांगितल.

"वाह विराज तू हुशार आहे." कबीर बिझी होता.

"त्या विकीच काय करू या. तो मामाला बाहेर काढायच्या मागे आहे." विराज म्हणाला.

"त्याला भेटायला बोलव. " कबीर म्हणाला.

विराजने फोन केला. विकी भेटायला नाही म्हणाला .

" हा का वाकड्यात शिरतो आहे ते समजत नाही." कबीर काळजीत होता.

" जावू दे दादा केस सुरू झाली की स्वतः येवून बोलेल. "

कबीर वकीलांशी बोलत होता." लवकरात लवकर हे काम व्हायला हव. "

रात्री उशिरा विराज कबीर घरी आले. बाकीच्यांच जेवण झाल होत. खुशी जेवायला थांबली होती. तिने ताट केल. जेवताना दोघ भाऊ ऑफिस बद्दल बोलत होते.

" वहिनी तू रोहित दादाच्या ऑफिस मधे काय काम करत होती."

खुशी सांगत होती." खूप गम्मत येत होती. अतिशय हलक फुलक वातावरण होत."

"असच छान वाटत." कबीर म्हणाला.

"बघा कोण बोलतय." खुशी म्हणाली.

विराज हसत होता. त्याला माहिती होत दादाने वहिनीला ऑफिस असिस्टंट बनवल होत. चहा पाणी पासून ऑफिस साफ करायच काम असायच.

"कबीर तर नुसता ऑफिस मधे स्ट्रीक्ट होता. तो असला की भीती वाटायची. सगळ्यांना रागवण हेच त्याच काम होत. " खुशी सांगत होती.

"ते मी तुमच्या कंपनीत तस होतो. नाहीतर अंजलीला विचार मी आमच्या ऑफिस मधे मोकळ रहात होतो." कबीर म्हणाला.

" आमच्याशी ही चांगल वागला असता तर बर झाल असत. " खुशी म्हणाली.

" ओके ओके दादा वहिनी तुम्ही खूप जून कपल असल्यासारख भांडू नका. "विराज म्हणाला.

जेवण झालं. तिघानी मिळून भांडी आवरली. कबीर, खुशी रूम मधे आले. कबीरला राग आला होता. तो सोफ्यावर बसला. खुशी जवळ आला ही नाही.

खुशी त्याचाशी बोलत होती. त्याने उत्तर दिल नाही. ओह याला राग आला आहे वाटत. ती मुद्दाम त्याच्या जवळ येवून बसली." कबीर काय केल आज दिवसभर? काल या वेळी आपण काय करत होतो."

त्याला थोड हसू आल. पण त्याने मुद्दाम फोन कडे बघितल.

खुशीला सतीश रावांचा मेसेज आला. "उद्या येवू का घ्यायला."

तिला खूप आनंद झाला होता. "मी सांगते बाबा. पाच मिनिटात."

ती कबीर कडे बघत होती. त्याला समजल नक्की काहीतरी काम आहे. त्याने दुर्लक्ष केल. मला स्ट्रीक्ट म्हणाली. माझ्या पेक्षा तो रोहित चांगला का?

"कबीर एक मिनिट."

त्याने तोंड फिरवल.

" कबीर बाबा विचारता आहेत उद्या तुला घ्यायला येवू का? मला आईकडे जायच आहे. "

"जमणार नाही खुशी. त्यांना नाही सांग." कबीर म्हणाला.

"कबीर प्लीज. तू काय म्हणाला होता आपण फिरून आलो की तू माहेरी जा." खुशी म्हणाली.

"मी चांगला नाहिये. या पुढे स्ट्रीक्ट पती म्हणून वागणार आहे. कुठे जायची गरज नाही खुशी . घरात भरपूर काम आहे ते बघ जरा. " तो म्हणाला.

" सॉरी ना कबीर. तु खुप चांगला आहेस. राग सोड. प्लीज सांग .आई म्हणाल्या तुला सांगून जा. माझे बाबा मेसेजची वाट बघत आहेत. " खुशी थोडी घाबरली होती. उगीच जुन्या गोष्टी बोलत बसले. या पुढे अशी चूक करायची नाही.

" मग मला यापुढे अस चीडवायच नाही. " कबीर म्हणाला.

" हो. सॉरी. मी पण काहीही बोलते या पुढे लक्षात ठेवेन. " खुशी हळू आवाजात म्हणाली.

"खुशी काय झाल? अग मी गम्मत करत होतो. तू सिरियस झालीस का? " त्याने तिला जवळ घेतल.

" मी जावू ना?"

" हो आणि माझ्या परमिशनची गरज नाही. तुझे आई बाबा आहेत. तू केव्हाही त्यांना भेटायला जा. पण पटकन परत येत जा. इथे कोणी तरी तुझी वाट बघत असत. "कबीर म्हणाला.

आता खुशी छान हसत होती." मी बाबांना मेसेज करते. "

खुशीने लाइट बंद केला.

" तू काय म्हणत होतो खुशी? काल या वेळी आपण काय करत होतो. " कबीर तिच्या जवळ येत म्हणाला.

आता खुशी खूप हसत होती." कबीर नको ना त्रास देवू."

" आता तू दोन तीन दिवस नाही. म्हणून आत्ताच वसुली करून घेतो. "


🎭 Series Post

View all