गुंतता हृदय हे भाग 67 अंतिम

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का

गुंतता हृदय हे भाग 67 अंतिम
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

सतीश राव घ्यायला आले. खुशी खूप आनंदाने तयारी करत होती. कबीर तिच्याकडे बघत होता. "खुशी तू तुझ्या घरी जातेस? तू खुश आहेस का? " त्याने विचारल.

"हो. आई बाबां कडे जाते ना म्हणून. तू तर काय मस्त तुझ्या घरी रहातो. "खुशी म्हणाली.

" एकदा तर म्हण मी नाही जात कबीर. तुझ्या शिवाय मी कस राहू ." कबीरचा रडवेला आवाज ऐकुन खुशी हसत होती.

" का अस? मला आनंद होत आहे. मी जाणार आहे. तिकडे भक्ती, दिपू सोबत मजा करणार आहे." खुशी म्हणाली.

कबीरने तिला जवळ घेतल." खर्चायला पैसे आहेत का?"

"माझी सॅलरी कोणीही मला दिली नाही. तू ही नाही. रोहितने ही नाही. " खुशी म्हणाली.

"महिना भर काम केल का? " कबीरने विचारल. त्याने तिला पैसे दिले.

" हे बघ कबीर तुझ क्रेडिट कार्ड माझ्याकडे आहे. "खुशी दाखवत होती.

" तु आजपर्यंत त्यावर काहीही घेतल नाही." कबीर म्हणाला.

"हो मला लागत नाही. तू परत घे."

" असू दे तुझ्या पाकीटात ठेव." दोघ खाली आले.

सतीश राव, विलास राव खूप बोलत होते. नाश्ता झाला. "चला आम्ही निघतो."

खुशी सगळ्यांना भेटली. कार मधे बसली. कबीर मागून तिच्याकडे बघत होता. तिचा ही पाय निघत नव्हता.

रस्त्याने तिने रश्मी ताईंना फोन केला. त्यांना खूप आनंद झाला होता.

ते घरी आले. रश्मी ताई, भक्ती, दीपु, माई भेटल्या. जेवायला खुशीच्या आवडीच होत. तिने श्रुती, स्नेहाला फोन केला. त्या दोघी संध्याकाळी येणार होत्या.

खूप मजा येत होती. भक्ती, दिपू तर खूप खुश होत्या. श्रुती आली. ती खुशी कडे बघत होती. "काय मग फिरायला गेली होती ना. कबीरने बर माहेरी येवू दिल?"

"गप्प बस कोणी ऐकेल. तुझ रोहितच काय सुरू आहे? मी ऐकल त्याला लग्नाची घाई झाली आहे." खुशी ही तिला चिडवत होती.

श्रुती लाजली.

स्नेहा आली. दोघी मिळून खुशीला चिडवत होत्या. त्या जेवण करून गेल्या.

रात्री खुशी रश्मी ताईंशी बोलत बसली होती." मंगळसूत्र नवीन आहे का? "

" हो आई कबीरने दिल. "

" बाबा ऑफिस काय म्हणत? दोन दोन काम जमताय का?"

" तिकडे आता विजय हेड आहे. त्याने फोन केला तर मी सांगतो." सतीश राव नवीन कामाबद्दल खुशीला सांगत होते.

माईंनी तिच्यासाठी छान नाश्ता बनवला होता. ती सतीश राव, रश्मी ताई परांजपे इंडस्ट्री मधे आली. कंपनी आधी सारखी छान वाटत होती .दीक्षित काका भेटले." खुशी मॅडम मजेत ना? "

" हो काका. "

" काय म्हणताय कबीर साहेब?"

" ते ही मजेत बिझी आहेत." खुशी म्हणाली.

" मोठे माणस." दोघ हसत होते.

संध्याकाळी घरी रोहित त्याचे घरचे आले होते. ते जेवायला थांबले होते. "अरे वाह इतके पदार्थ?"

सगळे खुशीच्या आवडीचे होते . रश्मी ताईंना माहिती होत ही किती दिवस रहाते माहिती नाही. नवीन लग्न झाल आहे. कबीर लगेच घ्यायला येईल. झाल तस.

रात्री कबीरचा फोन आला. दोघ खूप बोलत होते. " खुशी उद्या तुला यायला येऊ का?"

"कालच तर आली ना मी इकडे." खुशी नाराज होती. थोड ही राहू देत नाही.

"मला अजिबात करमत नाही ." कबीर म्हणाला.

"नाही. मी येणार नाही. अजून दोन दिवस राहू दे ना प्लीज." खुशी म्हणाली.

"मग कधी येऊ?"

"आई म्हटल्या आहेत चार-पाच दिवस रहा."

"जमणार नाही मी उद्या येतो आहे."

"असं काय करतो कबीर? "

" माझ्याकडे कोणी बघायच. नवरा एकटा बिचारा कसा रहात असेल." कबीर म्हणाला.

" लग्नाआधी एकटा रहात होता ना . आपल आत्ताच लग्न झाल आहे. त्या आधी काय करत होता. " खुशीने आठवण दिली.

" तेच म्हणतो मी आपल आत्ताच लग्न झाल. आणि तु अशी माहेरी जावून बसली. " कबीर म्हणाला.

खुशी खूप हसत होती." मला वाटल नव्हत कबीर तू एवढा रोमँटिक असशील. मी येणार नाही. काय करशील? " ती त्याला चिडवत होती.

" विचार करून बोल खुशी. नंतर उगीच तुला शिक्षा होईल." कबीर म्हणाला.

खुशी लाजली होती. शिक्षा म्हणजे काय तिला समजल होत. कबीरच तिच्यावर भरभरून प्रेम करण ती पण मिस करत होती.

दुसऱ्या दिवशी कबीर आला. सुलक्षणाताई सोबत होत्या. कबीर खुशीला शोधत होता. खुशी आली. सुलक्षणा ताईंना भेटली. कबीर तिच्याकडे बघत होता. ती छान हसली. चहा नाश्ता झाला.

"आई मी थोड्या वेळ ऑफिसला जावून येतो. खुशी मला फ्रेश व्हायच आहे." ते दोघ रूम मधे आले. कबीरने तिला मिठीत घेतल. "खुशी तुला किती मिस केल. माझ मलाच माहिती. तयारी करून ठेव. घरी चल. तू तिकडे नव्हती कोणालाच करमत नव्हत."

कबीर ऑफिसला गेला. दुपारी जेवण झाल्यावर ते लगेच घरी जाणार होते. ऑफिसमधे राऊत भेटले त्यांचं काम व्यवस्थित सुरू होतं.

"मी पुढच्या आठवड्यात इकडे येतो आहे." कबीर म्हणाला.

"आरामात या साहेब काही घाई नाही." राऊत म्हणाले.

जेवायला छान बेत होता. सतीश राव, कबीर बोलत होते. सुलक्षणा ताई जश्या घरच्या झाल्या होत्या. त्यांनी सगळीकडे फिरून घर बघितल. त्यांच रश्मी ताईंच खूप जमल.

खुशीची निघायची तयारी झाली. तिच्या डोळ्यात पाणी होतं." नीट रहा बेटा. काळजी करायची नाही. " सतीश राव, रश्मी ताई, माई, दिपू, भक्ती सगळेच हळवे झाले होते.

ते घरी आले. विराज ऑफिस मधे होता. सविता, सुदेश, सोनू खूप बोलत होते. विलास राव ही खुश होते.

कबीर त्याच्या कामात बिझी होता. आज विलास राव ही त्याच्या सोबत ऑफिस मधे गेले होते. ते संध्याकाळी आले.

"वहिनी आली पार्टी करू. " मुल खुश होते.

रात्री कबीर तिची वाट बघत होता. खुशी आली. ती कबीरशी खूप बोलत होती." आपल्या घरी येवून खरच छान वाटत आहे कबीर."

" बघ बर झाल ना तू आलीस. आता आमचा काही विचार?" कबीर म्हणाला.

खुशी त्याचा इशारा समजली. ती पण त्याच्या जवळ जायला अधीर होती. दोघ रमले होते.
.....

दोन-तीन दिवसांनी कोर्टाची तारीख होती. कोर्टात केस सुरू झाली. सतीश राव, खुशी, भक्ती, मंगेश, बर्‍याच जणांना बोलवलं होत. त्यांची साक्ष झाली.

विलास राव ही आलेले होते. ते नक्की काय झाल ते सांगत होते. विकास प्रशांत कसे वागले ते सांगत होते. सगळे ऐकत होते. सुलक्षणा ताईंच्या डोळ्यात पाणी होत. खुशी त्यांना सांभाळत होती.

विकास, प्रशांत मामा सुलक्षणा ताईं कडे बघत होते. त्या त्यांच्याशी बोलल्या नाही.

पुढची तारीख मिळाली. ते बाहेर आले.

"हाय कबीर." विकी होता.

"मी ओळखल नाही." कबीर म्हणाला.

"विकी, रुद्रचा भाऊ. तुझ्याशी थोड बोलायच आहे."

"बोल. मी त्या दिवशी त्यासाठी तुला ऑफिस मधे बोलवल होत. तू आला नाहीस." कबीर म्हणाला.

"रुद्र दादा वरचे आरोप मागे घे." विकी म्हणाला.

"अरे पण त्याने विकास मामाला सपोर्ट केला. तुला माहिती नाही काय झाल ते. "

"माहिती आहे. त्याने मित्राला मदत केली. त्याला काही माहिती नव्हत की ही केस इतकी कॉप्लीकेटेड आहे. त्याला वाटल याला पैसे लागताय त्याने दिले. खरे दोषी तुझे मामा आहेत ना. त्यांना कर की करायच ते. " विकी म्हणाला.

" अरे अस कस तो पैसा पुरवत होता. घर वापरायला देत होता. नको त्या आयडिया देत होता. तू यात पडू नको विकी. "कबीर चिडला.

" तु मला सांगू नको मी काय करायच ते समजल ना कबीर . एक लक्ष्यात ठेव रुद्र दादाला शिक्षा झाली तर तू आहे मी आहे." विकीने धमकी दिली.

"हे बर आहे चोर तर चोर वर शिरजोर. कर काय करायच ते मी पण इथेच आहे. "कबीर म्हणाला.

" शांत व्हा. रुद्र कधीच आला नाही फार्म हाऊसवर.
त्याला काही माहिती नव्हत. त्याने पैसे दिले असतिल पण मदत म्हणून. " विलास राव म्हणाले.

" हो काका मी हेच म्हणतो आहे." विकी म्हणाला.

"ठीक आहे विकी. मी चौकशी करतो रुद्रने काही केल नसेल तर मी चार्जेस मागे घेईन." कबीर म्हणाला.

" तुझी फॅमिली आहे वाटत सोबत. नमस्कार वहिनी." विकी खुशी कडे बघत होता.

खुशीने त्याच्याकडे बघितल. तिने नमस्कार केला.

"खुशी कार मधे बस. मी आलोच. "कबीर म्हणाला.

खुशी ,सतीश राव ,विराज कार कडे गेले. कबीर ही निघाला. सुलक्षणा ताई, विलास राव त्याच्या सोबत होते.

"मामाने सगळे बदमाश लोक जमवून ठेवले आहेत. " कार मधे कबीर म्हणाला.

" हो ना, पण हा विकी म्हणतो ते बरोबर आहे." विलास राव म्हणाले.

त्याने बॉडीगार्डला फोन केला. "ये रे बाबा परत ड्युटीवर. खुशी कडे लक्ष द्यायच." तिच्याकडे कोणी बघितल तरी मला राग येतो.

कबीर ऑफिसमध्ये बसला होता. त्याला टेन्शन आलं होतं. एक झालं की एक सुरूच असतं. आता या विकीच काय करू या? त्याने विकीला भेटायला बोलावलं. बरोबर रुद्र सुद्धा होता.

"कबीर मला माहिती नव्हतं तुझे वडील फार्म हाऊसवर आहेत. मला वाटलं होतं की विकास आणि प्रशांतला पैसे लागतात. मी म्हणून त्यांना मदत केली. ते पण कर्ज देवून. हे बघ पेपर." रुद्रने पेपर दाखवले. कबीर तारीख बघत होता. बरोबर आहे.

विराज त्याचा मित्र सौरभ ही सोबत होता. त्याने त्याच्याकडे बघितलं. त्याने हो सांगितलं. "रुद्र दादाला माहिती नव्हतं. "

" ठीक आहे रुद्र वरचे चार्जेस मी मागे घेतो. पण आमच्या वाटेला जायचं नाही यापुढे मामांना सपोर्ट करायचा नाही. त्यांना बाहेर काढायच नाही. तुमचा बिजनेस वेगळा आमचा बिजनेस वेगळा." कबीर म्हणाला.

"चालेल." ते लगेच पोलीस स्टेशन मध्ये गेले. प्रोसेस केली.

थोड्या दिवसांनी कोर्टाचा निकाल त्या मानाने लवकर लागला. कारण केस क्लिअर होती. सगळ्यांनी मामांच्या विरोधात साक्ष दिली होती.
प्रशांत मामाला पाच वर्षाची शिक्षा झाली. विकास मामाला सात वर्षाची शिक्षा झाली आणि रुद्रला दंड भरावा लागला. त्याला दम दिला. बाकीच्या मुलांना थोडीशी शिक्षा झाली.

सविता मामीने पण प्रशांत मामाला घटस्फोट द्यायचा विषय काढला. तिला सगळे समजावत होते. तिला आता प्रशांत मामा सोबत रहायचं नव्हतं.

" सविता नंतर बघू तू परत एकदा विचार कर." सुलक्षणा ताई म्हणाल्या.

कबीर रूम मधे शांत बसला होता. मामाला शिक्षा झाली त्याला कसतरी वाटत होत. सुदेश, सोनू लहान आहेत आमच्या सारख त्यांना ही वडलांच प्रेम मिळाल नाही. खुशी त्याच्या जवळ येवून बसली. " काय झाल कबीर?"

" मुलांच वाईट वाटत. "

" पण हेच बरोबर आहे. मामांकडून काही शिकण्यासारख नाही. तुझ्या आई बाबांना किती त्रास झाला ते आठव ."

" हो ना." तिने त्याला जवळ घेतल. कबीर आता ठीक होता.
.....

रोहित श्रुतीच लग्न होतं. ते घरी येवून पत्रिका देवून गेले. कबीर खुशी लग्नाला गेले होते. ऑफिस मधले खूप लोक आले होते. खूप मजा येत होती. खुशी श्रुतीच्या सोबत होती. श्रुती खूपच सुंदर दिसत होती. खुशीने खूप मदत केली.

लग्नात परांजपे आले होते. आई वडिलांना भेटून खुशीला खूप बरं वाटत होतं.

रोहित फारच खुश होता. सगळे त्याला चिडवत होते. "बघ अजून विचार कर."

राहुल खुशीच्या मागे होता. " काय म्हणतो तुझा डेंजर नवरा?"

" कबीर डेंजर नाही चांगला आहे." खुशी म्हणाली.

"आता तू असच म्हणणार. काही पर्याय नाही ना."

" तुझ जमल का कुठे?" तिने विचारल.

" नाही ना."

" मग त्याकडे लक्ष दे राहुल. मी तुझ्यासाठी स्थळ बघू का. थांब त्या आधी तुझ नाव आमच्या यांना सांगते. कबीर इकडे ये." कबीर त्यांच्यात येवून उभा राहिला.

" अरे राहुल म्हणत होता की तू.... "खुशी सांगत होती.

" खुशी मी थोडा बिझी आहे. काम आहे. बॉसच लग्न आहे ना. मी येतो." तो पळून गेला. खुशी खूप हसत होती.

" काय झाल ग? " कबीर त्याच्याकडे बघत होता.

" अरे तो राहुल तुला घाबरतो. "

लग्न लागल. खुशी पूर्ण पूजा होई पर्यंत थांबली. नंतर ते निघाले. कार मधे ती रडत होती. श्रुती सासरी जाईल म्हणून तिला वाईट वाटत होत.

" पुरे ना खुशी. आता तुझ्या सगळया मैत्रिणी सासरी जातांना तू रडशील का?" कबीर तिला समजावत होता.

" वाटतच ना कबीर."

रात्री ते घरी आले. खुशी खूपच थकली होती. ती झोपली. सकाळी कबीर रेडी होता. खुशी पटकन उठली. तिने आवरल. कबीरला नाश्त्याला दिल.

"वहिनी ईमेल बघितली का कॉलेज सुरू होत आहे." विराज म्हणाला. कबीर, खुशी ईमेल वाचत होते.

"आपण तिकडे शिफ्ट होऊ. मला ही त्या प्रोजेक्टच काम बघाव लागेल." कबीर म्हणाला.

कबीर, खुशी, विराज शहरात रहायला आले.

विराजला वेगळे कॉलेज मिळालं होतं. खुशीकडे भक्ती दिपू आले होते . भक्ती खूप खुश होती. ती आणि विराज एकमेकांकडे बघत होते. कॉलेजचा विषय निघाला.

"बर झाल वहिनी माझ्या सोबत नाही. नाहीतर तिने माझा रीपोर्ट दादाला दिला असता." विराज म्हणाला. खुशी, भक्ती हसत होते.

"विराज आपण पिझ्झा घेवू."

कबीर ही आला. "अरे वाह पार्टी सुरू आहे वाटत."

रात्री ते भक्ती, दिपूला सोडायला गेले.

खुशीचं कॉलेज सुरू झालं. कबीरचा व्यवस्थित ऑफिस सुरू होतं. विलासराव, सुलक्षणीताई कधी इकडे कधी तिकडे रहायला होते. भक्ती विराज मधून मधून भेटत होते. सुलक्षणा ताई आलेल्या होत्या. त्या खुशीचे लाड करत होत्या.

कबीर मधे खुप बदल झाला होता. तो एकदम शांत झाला होता. त्याला खुशी सारखी डोळ्यासमोर हवी असायची.

आजही तो ऑफिस मधून आला. खुशी वरती रूम मधे फोन वर आईशी बोलत होती. तो तिला सगळीकडे शोधत होता. ती बाल्कनीत उभी दिसली. त्याने तिला हळूच मिठीत घेतल. खुशी दचकली. काय हे? तिने डोळ्याने विचारला.

फोन ठेव. तो खुणेने म्हणाला. तू माझी आहेस माझ्याशी बोलायच.

"अरे काय अस?" ती हसत होती. "आई मी नंतर बोलते हे आले आहेत." तिने फोन ठेवला.

"खुशी हे म्हणजे कोण?" कबीरने विचारल.

"तु कबीर. "

"तू मला अहो म्हणते ?" कबीर हसत होता.

"हो मोठ्यां समोर. अस ही म्हणू का रोज?" खुशीने विचारल.

" नको. कबीर ठीक आहे."

"काय अर्जंट होत? फोन वर ही बोलू देत नाही." खुशी लटक्या रागात म्हणाली.

"मी आत्ताच ऑफिस मधून आलो ना. माझ्या सोबत रहायच. मला वेळ द्यायचा." कबीर म्हणाला.

"बर तू म्हणतोस तस , आटोप जेवून घेवू. मला ही अभ्यास आहे." खुशी म्हणाली.

"नाही आज आपण सोबत वेळ घालवू." कबीर तिला प्लॅन सांगत होता. खुशीच्या गालावर गुलाबी रंग चढला. ती हसत होती.

कबीर तिच्याकडे बघत होता. "हे अस तू गोड दिसते म्हणून मला काही सुचत नाही. माझ तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे खुशी." त्याने तिला जवळ घेतल.

" माझ ही तुझ्यावर खूप प्रेम आहे कबीर. " दोघ खूप सुखी समाधानी होते.

सुलक्षणा ताई आवाज देत होत्या. "मुलांनो चला जेवायला."

दोघ खाली गेले. कबीर खुशी जवळ बसला होता. ती पण त्याची खूप काळजी घेत होती. त्यांच्यात किती प्रेम आहे ते लगेच समजत होत.

"कबीर, मी आणि बाबा आम्ही उद्या घरी जातो आहोत . विराज ही येणार आहे." त्या म्हणाल्या.

"हो चालेल आई."

सकाळी ते लवकर निघाले. कबीर, खुशी बाहेर पर्यंत सोडायला आले होते. ते आत मधे आले. खुशीला माहिती होत आता काय होईल. पूर्ण घरात कोणी नाही. ती पुढे पळत होती. कबीरने तिला पकडल. उचलून घेतल.

" सोड ना कबीर. " ती रीक्वेस्ट करत होती.

त्याने ऐकल नाही. दोघ रूम मधे आले. त्याने दरवाजा लावला.

" आता दोन तीन दिवस मी म्हणेल तेच होईल खुशी." ती खूप लाजली होती. कबीर तिच्या जवळ येत होता. ❤️
.....

हे पर्व इथेच थांबवते आहे. नंतर सुचलं तर पर्व दोन लिहील. त्यात विराज भक्ती. रोहित श्रुती ही असतिल.

वाचकांचे खूप आभार. तुम्ही खूप प्रेम दिलं. ❤️

🎭 Series Post

View all