गुप्तहेर... भाग - २ (अंतिम भाग)
रात्रीचा अंधार अधिक दाट झाला होता. मुंबईच्या आकाशावर ढग जमले होते, जणू वादळ येण्याआधीची शांतता. अन्वी छतावर उभी होती. वाऱ्यामुळे तिचं जॅकेट हलत होतं, पण तिचं मन मात्र स्थिर होतं.
समोर फक्त एकच प्रश्न होता, राघव मल्होत्रा खरोखरच दोषी आहे का? स्पायसाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे संशय. कारण संशय चुकीच्या दिशेने गेला तर निष्पाप माणूस उद्ध्वस्त होऊ शकतो… आणि शत्रू मोकळा राहतो.
युनिट–७ मध्ये पुन्हा एक बैठक झाली. “आपण राघवला लगेच अटक करू शकत नाही,” कबीर सर म्हणाले,
“आपल्याला पुरावे हवेत. ब्लॅक व्हेल फार हुशार आहे.”
अन्वीने टेबलावर ठेवलेला पेन हातात घेतला.
“आपल्याला पुरावे हवेत. ब्लॅक व्हेल फार हुशार आहे.”
अन्वीने टेबलावर ठेवलेला पेन हातात घेतला.
“सर, मला एक संधी द्या,” ती म्हणाली, “मी त्याच्याजवळ जाईन. तोच मला सत्यापर्यंत नेईल.” कबीर सर काही क्षण शांत राहिले. “हे मिशन धोकादायक आहे,” ते म्हणाले, “आणि यावेळी बॅकअप कमी असेल.” अन्वीने मान डोलावली. “मी तयार आहे.”
राघव मल्होत्रा एकटा बसून कॉफी पीत होता. अन्वी तिथे पोहोचली, साधी अन्वी म्हणून, स्पाय म्हणून नाही. “इथे बसू का?” तिने विचारलं. राघव थोडा आश्चर्यचकित झाला, पण हसला. “हो, नक्की.”
दोन सामान्य लोकांसारखी त्यांची गप्पा सुरू झाल्या,
नोकरी, शहर, आयुष्य. पण त्या गप्पांमागे दोन वेगवेगळे खेळ चालू होते. राघव अन्वीला वाचण्याचा प्रयत्न करत होता… आणि अन्वी राघवच्या शब्दांमधल्या पोकळ्या शोधत होती.
नोकरी, शहर, आयुष्य. पण त्या गप्पांमागे दोन वेगवेगळे खेळ चालू होते. राघव अन्वीला वाचण्याचा प्रयत्न करत होता… आणि अन्वी राघवच्या शब्दांमधल्या पोकळ्या शोधत होती.
“कधी कधी,” राघव म्हणाला, “आपण जे दिसतो ते नसतो.” अन्वीचं हसू क्षणभर थांबलं. “खरंय,” ती म्हणाली, “काही लोक तर पूर्ण आयुष्य मुखवटा घालून जगतात.” त्या क्षणी अन्वीला खात्री झाली, हा माणूस काहीतरी लपवत होता.
त्या रात्री अन्वीला झोप येईना. तिला वडिलांची आठवण आली. ते म्हणायचे, “देशासाठी काम करणं म्हणजे फक्त शत्रूशी लढणं नाही, तर स्वतःच्या भावनांशीही लढणं आहे.”
अन्वीला अचानक जाणवलं, ब्लॅक व्हेलचा सूत्रधार कोणताही सामान्य गुन्हेगार नाही. तो कोणीतरी असा आहे, ज्याला यंत्रणेची पूर्ण माहिती आहे आणि तेव्हाच कबीर सरांचा फोन आला.
“अन्वी,” ते गंभीरपणे म्हणाले, “आपल्या सिस्टिममधून पुन्हा डेटा लीक झालाय.” अन्वीचं रक्त गोठलं. “म्हणजे ट्रेटर अजूनही युनिट–७ च्या जवळ आहे…”
युनिट–७ ने एक बनावट माहिती तयार केली. ती माहिती मुद्दाम लीक केली गेली, फक्त ट्रेटरला पकडण्यासाठी.
ती माहिती फक्त तीन लोकांपर्यंत पोहोचली होती.
अन्वी, कबीर सर आणि… राघव. जर ती माहिती बाहेर गेली, तर उत्तर स्पष्ट होतं.
ती माहिती फक्त तीन लोकांपर्यंत पोहोचली होती.
अन्वी, कबीर सर आणि… राघव. जर ती माहिती बाहेर गेली, तर उत्तर स्पष्ट होतं.
दोन दिवसांनी ब्लॅक व्हेलने तशीच कारवाई केली,
अगदी त्याच ठिकाणी, जिथली बनावट माहिती होती.
अन्वीला सगळं स्पष्ट झालं. पण सत्य इतकं सोपं नव्हतं.
अगदी त्याच ठिकाणी, जिथली बनावट माहिती होती.
अन्वीला सगळं स्पष्ट झालं. पण सत्य इतकं सोपं नव्हतं.
अन्वी राघवचा पाठलाग करत एका गोदामापर्यंत पोहोचली. तिथे ब्लॅक व्हेलचं चिन्ह स्पष्ट दिसत होतं.
“खूप लांब आलास,” राघवचा आवाज आला. अन्वीने बंदूक उचलली. “हे सगळं तूच केलंस.”
“खूप लांब आलास,” राघवचा आवाज आला. अन्वीने बंदूक उचलली. “हे सगळं तूच केलंस.”
राघव हसला, पण त्या हास्यात वेदना होत्या. “तुला वाटतं मी देशद्रोही आहे?” “पुरावे तसेच सांगतात,” अन्वी म्हणाली. राघव शांत झाला. “मी ब्लॅक व्हेलसाठी काम करतो… पण पैशासाठी नाही.”
राघवने एक फाईल उघडली. त्यात काही फोटो होते,
युनिट–७ मधल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे. अन्वी हादरली.
“हे… हे कसं शक्य आहे?” “ब्लॅक व्हेलचा खरा मास्टरमाइंड तोच आहे,” राघव म्हणाला, “मी आतून माहिती काढतोय… त्याला उघड करण्यासाठी.”
अन्वीच्या मनात वादळ उठलं. ज्याच्यावर ती संशय घेत होती, तोच खरं तर दुहेरी एजंट होता आणि ज्यांच्यावर विश्वास होता… तोच खरा शत्रू.

“माझ्यावर विश्वास ठेवशील का?” राघवने विचारलं.
अन्वी काही क्षण गप्प राहिली. स्पायसाठी विश्वास हा सर्वात मोठा जुगार असतो. “मी देशावर विश्वास ठेवते,” ती म्हणाली “आणि सत्यावरही.”तिने राघवशी हातमिळवणी केली.
अन्वी काही क्षण गप्प राहिली. स्पायसाठी विश्वास हा सर्वात मोठा जुगार असतो. “मी देशावर विश्वास ठेवते,” ती म्हणाली “आणि सत्यावरही.”तिने राघवशी हातमिळवणी केली.
युनिट–७ च्या मुख्यालयात एक विशेष बैठक बोलावण्यात आली. तो वरिष्ठ अधिकारीही तिथे होता.
अन्वीने शांतपणे पुरावे सादर केले, रेकॉर्डिंग्स, फाईल्स, ट्रान्सफर डिटेल्स.
अन्वीने शांतपणे पुरावे सादर केले, रेकॉर्डिंग्स, फाईल्स, ट्रान्सफर डिटेल्स.
क्षणात चित्र बदललं. “तू खूप हुशार आहेस,” त्या अधिकाऱ्याने थंडपणे म्हटलं, “पण हा खेळ इथेच संपत नाही.” त्याने पळण्याचा प्रयत्न केला. पण युनिट–७ आधीच सज्ज होतं. तो अटक झाला. ब्लॅक व्हेलचा कणा मोडला गेला.
सगळं संपल्यावर अन्वी एकटी बसली होती. कबीर सर तिच्याजवळ आले. “तू आज फक्त मिशन जिंकले नाहीस,” ते म्हणाले, “तू यंत्रणेला वाचवलंस.”
अन्वी हलकंसं हसली. “पण किंमत द्यावी लागते सर… प्रत्येक वेळी.”
अन्वी हलकंसं हसली. “पण किंमत द्यावी लागते सर… प्रत्येक वेळी.”
राघवला दुसऱ्या देशात नव्या ओळखीने पाठवण्यात आलं. कोणीही त्याला नायक म्हणणार नव्हतं. जसं अन्वीला कोणी म्हणत नव्हतं.
सकाळ झाली. अन्वी पुन्हा कॉलेजला जात होती,सामान्य मुलगी म्हणून. आईने विचारलं, “काय झालं गं, थकलेली दिसतेस.” अन्वी हसली. “थोडं काम जास्त होतं.”
ती बाहेर पडली. रस्त्यावर लोक गडबडीत होते, आयुष्य पुढे चाललं होतं. कोणालाच माहीत नव्हतं, की त्यांच्या सुरक्षिततेसाठी एक मुलगी छायेत उभी राहून लढत होती.
अन्वीने मनातच म्हटलं, “मी प्रसिद्धीसाठी नाही,
मी ओळखींसाठी नाही… मी फक्त देशासाठी आहे.”
आणि ती गर्दीत हरवली.
मी ओळखींसाठी नाही… मी फक्त देशासाठी आहे.”
आणि ती गर्दीत हरवली.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा