गुरू

Best wishes to all GURU

गुरू

गुरु मायेची माऊली,

भरुनी प्रेमाची कुपी,

शिंपडता परमसुखाचा होई साक्षात्कार,

गुरु मार्गदर्शक,

नका होऊ निराश,

करी प्रत्येक शंकेचे समाधान निरंतर,

गुरु आशेचा किरण,

जो देतो प्रकाश,

जो हटवी अंध:कार,

गुरु तोचि खरा,

जो घेई शिष्यांची कसोटी,

आणि बनवी त्यांस कणखर,

गुरु देई सावली,

जो करतो दु:ख दूर,

सावली मुळे मिळे आधार,

गुरु देता धैर्य,

करी संकटांवर मात,

जो बनवतो आपणांस आत्मनिर्भर,

किती वर्णावी गुरुची महती ,

भासते जलकण समुद्राचा,

वंदन करु त्यांना जीवनाच्या प्रत्येक वळणावर.

रुपाली थोरात