गुरुदक्षिणा (भाग २ रा)
©® आर्या पाटील
©® आर्या पाटील
वनमाळी सर दिंडोशीला परत आले ते आनंदाची वार्ता घेऊनच. ते शाळेत आल्याचे कळताच गावकरी मंडळी त्यांच्याकडे पोहचली.
" सर, काय नांगलं कलेक्टर सायबानी.येणार आहेत ना ?" एका गावकऱ्याने विचारले.
" हो. येणार आहेत कलेक्टर. रविवारी गुरुपौर्णिमेच्या मुहुर्तावर शाळेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करायचं ठरलं आहे. आपल्याला बरीच कामे करावी लागतील. तयार आहात ना सगळे ?" सरांनी साऱ्यांना विचारले.
" सगळेच तयार आहोत की. तुम्ही फक्त सांगा काय करायचं आहे ते." सगळ्यांनीच होकार दिला.
"पाटील सरांना निमंत्रण पत्रिका पाठवली आहे. त्यांना आणायची व्यवस्था मी करेन. साफसफाई तेवढी करावी लागेल. पावसाळा सुरू आहे तेव्हा मंडप करतांना ती काळजीही घ्यावी लागेल." सरांनी असे सांगताच एक वयोवृद्ध आजोबा पुढे आले.
" व्हय मास्तर आमी बी तयार होत.लवकरच माझ्या देवाचं दर्शन घडणार हाय." हात जोडत ते असे म्हणताच गावातले सगळेच भावूक झाले.
" सर, येणार आहेत म्हणजे सणच साजरा व्हायला हवा. आम्ही सगळे बघतो मंडपाचं. अजून काही लागलं तर सांगा." म्हणत तरुणांचा म्होरक्या आश्वासन देत म्हणाला.
" तुम्ही सगळे सोबत होता म्हणून हे शक्य झालं." सरांनी असे म्हणताच साऱ्यांनी मात्र पुन्हा हात जोडले.
" पाटील सर, कलेक्टर साहेब आणि सर तुम्ही आम्हांला देवासारखे भेटलात. कितीतरी वर्षांपासून सुरू असलेल्या या लढाला यश मिळाले ते तुमच्यामुळेच." एक तरुण गावकरी हात जोडत म्हणाला.
" मग आता हे यश साजरे करूया. गावात ऐन पावसाळ्यात दिवाळी साजरी झाली पाहिजे." सरांनी असे म्हणताच सगळ्यांनाच हुरूप आला.
कामाची आपापसात वाटणी करून सगळेच घरी परतले. ते निघून जाताच त्या शाळेच्या सहशिक्षिका परवानगी घेत आत आल्या.
" या वृंदा मॅडम. तुमच्या निमंत्रण पत्रिकेची खूप स्तुती केली कलेक्टर साहेबांनी. कितीतरी वेळ त्यांची नजर तुमच्या हस्ताक्षरावरच खिळली होती." सर म्हणाले.
त्यांच्या शब्दांनी मात्र वृंदाच्या नजरेला भरती आली. भरल्या हृदयाने बोलणे शक्य नव्हते म्हणून तिने मानेनेच होकार दिला.
" फलकलेखनाची जबाबदारी तुमची. रविवारी कलेक्टर साहेब स्वतः येत आहेत उद्धाटनाला." सरांनी असे सांगताच वृंदाला मात्र डोळ्यांतील अश्रू लपवणे अशक्य झाले.
तशीच मागे वळत तिने डोळ्यांच्या कडा टिपल्या.

" आलेच मी सर." म्हणत बाहेर पडली.
मधली सुट्टी झाल्याने मुले जेवायला बसली होती. व्हरांड्यात बसलेल्या मुलांच्या पंगतीकडे जातीने लक्ष देऊन ती आपल्या वर्गखोलीत आली.
मघापासून डोळ्यांत रोखलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत तिने आठवणींना मनाच्या ओंजळीत गोंजारले. वर्गखोलीतील भिंतीवरून हात फिरवतांना स्मित हास्याची हलकी लकेर चेहऱ्यावर उमटली. त्या वर्गात जगलेल्या लहानपणीच्या असंख्य आठवणी जिवंत झाल्या.
ज्या शाळेने तिला घडवले होते आज त्या शाळेत शिक्षिका बनून ज्ञानदानाचं कार्य ती करत होती. दुर्गम भागात, हलाखीच्या परिस्थितीत जगत असतांना पाटील सर दीपस्तंभाप्रमाणे तिच्या, नव्हे नव्हे तिच्यासारखे अनेकांच्या आयुष्यात आले आणि जगण्याचा मार्ग प्रकाशित केला. शिक्षणाच्या मशालीने कठिण परिस्थितीच्या अंधारावर मात केली. अथक प्रयत्नांच्या जोऱ्यावर आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली तिने आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. पाटील सरांप्रमाणे शिक्षिका बनण्याचे तिचे ध्येय तिने प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर गाठले. आपल्या गावातील शाळेतच रुजू होत तिने निमशहरी भागात मिळालेली नोकरी नाकारली आणि अतिशय दुर्गम भागात असलेल्या आपल्या गावी बदली करून घेतली. सरांप्रमाणे तिलाही वंचित समाजाच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणायचे होते. त्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी जगायचे होते. स्वप्नपूर्तीचा आनंद आजही तिच्या डोळ्यांतून बरसत होता.ऐन गुरुपौर्णिमेला पाटील सरांच्या हातून शाळेचं होऊ घातलेलं उद्घाटन तिला आणखी हळवं बनवत होतं. तिच्या हळवेपणाचं आणखी एक कारण मात्र तिने मनातच बंदिस्त केले आणि डोळे टिपले.

" वृंदा, जेवायला चल. आम्ही कधीची वाट पाहत आहोत." देशमुख मॅडम आत येत म्हणाल्या.
त्यांच्या आवाजाने ती भानावर आली.
" आलेच मॅडम. तुम्ही सुरवात करा." म्हणत तिने टेबलामध्ये ठेवलेली आपल्या डब्ब्याची पिशवी काढली आणि ती देशमुख मॅडमच्या वर्गात गेली.
सगळेच जण तिची वाट पाहत थांबले होते.
सगळेच जण तिची वाट पाहत थांबले होते.
" वृंदा मॅडम, आज एवढा उशीर केलात ?" मोहिते सर डब्बा उघडत म्हणाले.
" मग आज मॅडम एकदम खुश आहेत. कलेक्टर साहेबांनी स्तुती केली म्हटल्यावर तिचं पोट आनंदानेच भरलं असणार." देशमुख मॅडमने हसत उत्तर दिले.
त्यांच्या बोलण्यावर फक्त हसत वृंदाने उत्तर देण्याचे टाळले.
" कलेक्टर साहेब मूळचे पालघरचेच आहेत असे ऐकले आहे मी." घास हातात घेत मोहिते सर म्हणाले.
" वृंदा मॅडम तुम्हांला माहित असेल की त्यांच्याविषयी." राणे मॅडम असे म्हणताच वृंदा मात्र सावध झाली.
" हो. पालघरमधल्या भुईगांवचे सुपुत्र आहेत ते." ती उत्तरली.
" भुईगांव म्हणजे आपल्या तालुक्यातलेच ?" मोहिते सरांनी विचारले.
होकारार्थी मान हलवत तिने पुढचे बोलणे टाळले.
" खूपच अभिमानाची गोष्ट आहे ही. जिल्ह्याचा सुपुत्र आज आपल्या जिल्ह्याचा कार्यभार सांभाळत आहे." राणे मॅडम स्तुती करत म्हणाल्या.
वृंदा खाली मान घालून जेवत होती. खूप बोलायचं होतं पण बोलण्याची हिंमत होत नव्हती. खूप सांगायचं होतं पण मनाची तयारी होत नव्हती.
मधली सुट्टी संपली तसे सारेच शिक्षक आपापल्या वर्गात निघून गेले.
उद्घाटनाच्यावेळी काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याची जबाबदारी वृंदाकडे होती. वर्गातील काही निवडक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तिने सराव सुरू केला होता. स्वागतगीत, तारपा नृत्य अश्या छोटेखानी कार्यक्रमांचा त्यात समावेश होता. मधल्या सुट्टीनंतर सरावाला सुरवात व्हायची. आजही वृंदाने मुलांना एकत्र करून सराव सुरू केला.
कार्यक्रमासाठी सगळेच उत्साही होते पण तिच्या मनाला मात्र वेगळीच हुरहुर लागली होती. आज तर तिचे सरावातही लक्ष लागत नव्हते.
कसेबसे पाच वाजले आणि शाळा सुटली. ती गावातच राहत असल्याने सगळे गेल्याची खात्री केल्यावरच शाळा बंद करून ती बाहेर पडायची. आजही सर्वात शेवटी बाहेर पडत ती घराकडे न जाता ओढ्याच्या दिशेने निघाली. ओढ्याचं पात्र मोठं असल्याने पावसाळ्यात त्याला नदीचं रूप यायचं. पाऊस नव्हता त्यामुळे नेहमीच्या झाडाखाली बसत तिने भूतकाळाला नव्याने आळवले. किती गोड होत्या त्या सगळ्याच आठवणी ज्यांनी बिकट परिस्थितीतही तिचं जगणं सुंदर बनवलं होतं.
त्या ओढ्यावरच तर ते दोघे भेटायचे. एकमेकांच्या दुःखाचे सोबती व्हायचे. सुखाच्या क्षणांनी एकमेकांची ओंजळ भरायचे. कधी हसायचे तर परिस्थितीपुढे हतबल होत रडायचे आणि मग पुढच्याच क्षणी एकमेकांची प्रेरणा बनायचे.त्याने खूप काही सहन केले होते. ती त्याच्या सहनशक्तीची प्रेरणा बनली होती. पक्की मैत्री आणि व्यक्त न केलेल्या पवित्र प्रेमाने ते एकमेकांशी जोडले गेले होते. त्या ओढ्याकाठीच तर अथक परिश्रमाचा मार्ग निवडला होता दोघांनी. शिक्षणाचा आधार घेत परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला होता. शिक्षिका होऊन आपल्याच शाळेत शिकवण्याचे स्वप्न तिने त्याच्या सोबतीने पाहिले होते. तो त्या स्वप्नातही भागीदार झाला होता. त्यालाही ज्ञानाजर्नाचा मार्ग अवलंबायचा होता. पाटील सर आदर्श होते दोघांचे. सगळच सुरळीत सुरू असतांना पुन्हा एकदा परिस्थितीच्या सर्पाने दंश केला आणि साऱ्या आणाभाका दिवास्वप्ने ठरली. गाव सोडून तो निघून गेला ते कायमचाच. पुन्हा ना त्याचा कोणता निरोप आला ना कधी तो आला. सारच आठवतांना वृंदा कमालीची भावनिक झाली. कंठ दाटून आला. हाताच्या ओंजळीत चेहरा झाकून ती रडू लागली.

' चुकत आहेस तु वृंदा. भावनिकतेला प्रेमाचं लेबल लावून सत्यात न उतरणारं स्वप्न पाहत राहिलीस. ज्या प्रेमाचा त्याने कधी स्विकारच केला नव्हता त्या प्रेमाला मनाच्या गाभाऱ्यात जपत, अजूनपर्यंत त्याची वाट पाहत राहिलीस. त्याने मित्र बनून मन मोकळं केलं आणि तू त्याला प्रेम समजून जगत राहिलीस.' बुद्धीने मनाला समजावलं.
' त्याच्या डोळ्यांत प्रेम अनुभवलं आहे मी. ती फक्त मैत्री नव्हती. मैत्रीच्या पलिकडची जाणीव होती. कदाचित आता त्याच्यासाठी नात्याचं समीकरण बदललं असेल पण माझं आजही त्याच्यावर तेवढच प्रेम आहे. या प्रेमासाठी आयुष्यभर एकाकी जीवन जगायलाही मी तयार आहे.' लगेच मन बुद्धीवर वरचढ ठरले.
मनाचा कौल स्विकारत तिने डोळे टिपले. आठवणींच्या फुलांना मनातल्या प्रेमदेवतेला अर्पण करताच तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य तरळले. एव्हाना अंधार पडायला सुरवात झाली होती. हलक्या पावसाच्या सरीही बरसू लागल्या होत्या. उठून उभी राहत तिने घरचा रस्ता धरला.
क्रमश:
©® आर्या पाटील
भूतकाळातल्या कोणत्या आणि कोणाच्या आठवणींनी वृंदा एवढी व्याकूळ होत असेल ? ती कलेक्टर साहेबांविषयी बोलण्याचे का टाळत असेल ?
याची उत्तरे कळतील पुढच्या भागात.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा