गुरुदक्षिणा ( भाग ६ वा)
©® आर्या पाटील
शाळेचा पहिला दिवस जरी उत्साहात गेला असला तरी सरांसमोर अनेक समस्या दत्त म्हणून उभ्या होत्या. दुर्गम भागातील त्या शाळेत त्यांच काम फक्त शिकवण्यापुरते मर्यादित नव्हते. मुलांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी त्यांना एक शैक्षणिक दुवा बनायचे होते.
शाळेची इमारत, मुलांचे गणवेश, क्रीडा साहित्य, त्यांचे आरोग्य अश्या एक ना अनेक समस्या त्यांना जाणीवपूर्वक सोडवायच्या होत्या. सोबत बारकूच्या समस्येवरही तोडगा काढायचा होता. या साऱ्यांत त्यांच्या वैयक्तिक आणि घरगुती समस्याही होत्याच. वर्गातल्या आदिवासी लेकरांमुळे मात्र या समस्या सोडवण्याची इच्छाशक्ती प्रबळ झाली होती.

आज परतीच्या वेळी ती लेकरे अर्ध्या वाटेपर्यंत सरांना सोडायला आली होती. पाटील सर नाही म्हणत असतांनाही त्यांना ओढा ओलांडून आणि डोंगर पार करून देत ते मागे परतले होते. सरही त्या विद्यार्थी प्रेमाने आनंदून गेले. आजचा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागला. सकाळी आपल्याच विवंचनेत हरवलेले ते, संध्याकाळी घरी परततांना मात्र स्वतःलाच नव्याने उमगले होते. शेवटची बस मिळाली आणि ते तालुक्याच्या गावी येऊन पोहचले. घरी जाण्यापूर्वी वाटेतच कॉईन बॉक्सवरून बायकोला कॉल करून स्वतःची खुशाली कळवली.
" आपल्या यशची काळजी घे. इथे सगळी व्यवस्था करून लवकरच तुम्हांला इकडे घेऊन येईन." म्हणत सरांनी फोन ठेवला.
बाहेर शिक्षण घेत असतांना स्वावलंबनाचे गिरवलेले धडे सरांच्या अनेक समस्या सोडवते झाले. स्वयंपाक, कपडे धुणे, केरकचरा काढणे ही सारी कामे करतांना त्यांना जास्त त्रास झाला नाही.
शाळेची जबाबदारी एकहाती सांभाळत पाटील सरांची रोजची, तारेवरची हवीहवीशी कसरत सुरू झाली. गावच्या त्या निसर्गरम्य वातावरणात ते शाळेत रमले. त्यांना शाळेत रमवून घेण्यात त्यांच्या विद्यार्थ्यांचा खारीचा वाटा होता. सर यायची वेळ झाल्यावर ही मुले ओढ्यापाशी येऊन त्यांची वाट पाहत थांबायचे. ते दृष्टीस पडताच त्यांची कळी खुलायची. सरांची बॅग सांभाळत त्यांच्यासोबतच ते शाळेत यायचे. तोवर मुलींनी शाळा स्वच्छ आणि टापटीप केलेली असायची. वृंदा यात मात्र आघाडीवर असायची. आपल्या लहानग्या भावाला मैत्रिणींकडे सोपवून वर्गातला आणि वर्गाबाहेरचा फळा, आपल्या सुंदर हस्ताक्षराने देखणा करायची. तिच्या सुवाच्च अक्षराने सरांच मन जिंकून घेतलं होतं. चित्रकलेत तिचा हात कोणीही धरू शकत नव्हते. देवाने तिच्या बोटांत अशी काही जादू दिली होती की त्यातून साकार होणारे चित्र नजरेला खिळवून ठेवत होते. वारली चित्रकलेचा वारसा तर तिला आपल्या समाजाकडूनच लाभला होता. हुरहुन्नरी होती पण मुलगी असल्याने तिच्या कलेला आवश्यक खतपाणी मात्र मिळत नव्हते. घरी राहून तिने आपल्या लहान भावंडांचा सांभाळ करावा यासाठी तिचे अशिक्षित पालक आग्रही होते. ती मात्र त्यांच्याशी भांडून, प्रसंगी मार खाऊन, आपल्या लहानग्या भावाला उराशी कवटाळून न चुकता शाळेत यायची. बारकू सावलीसारखा तिच्यासोबत असायचा. शाळेत येण्यासाठी, शिकण्यासाठी तिला प्रेरणा द्यायचा.
शाळेतली इतर मुलेही अनेक अग्निदिव्याला सामोरी जाऊन शाळेत पोहचायची. पाटील सरांनी आपल्या वेगळ्या शैलीने विद्यार्थ्यांना शिकावायला सुरवात केली आणि काही दिवसांतच ते विद्यार्थ्यांचे लाडके गुरुजी बनले. सगळेच विषय त्यांनी सोपे करून शिकवले. सभोवतालच्या पर्यावरणाचा उपयोग करून घेत मुलांना त्यांच्या हवाहव्याश्या जगात नवे ज्ञान दिले. रटाळवाणी शिक्षणपद्धती न वापरता त्यांनी कृतीयुक्त शिक्षणावर भर दिला. फक्त चार भिंतीत न शिकवता उघड्या माळरानावर उंच भरारीचे धडे दिले. मुलांना फक्त पुस्तकी किडा न बनवता त्यांच्यातील नैसर्गिक कौशल्य ओळखून नवनिर्मितीला चालना दिली. शाळेला लागून असलेल्या शेतात मुलांकडून भातशेती करून घेणे हा त्या कौशल्याचाच एक भाग होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले ज्ञानार्जनात रमली. हळूहळू पटसंख्याही वाढू लागली. सोबतच मुलांच्या पालकांचे प्रबोधन करण्याची जबाबदारीही त्यांनी स्विकारली. आदिवासी लोकं सरळ साध्या स्वभावाची असतात फक्त त्यांना त्यांच होऊन समजवता आलं पाहिजे. सरांनी बरोबर याच तंत्राचा वापर करून त्यांची मने जिंकली. त्यांच्या छोट्या छोट्या समस्या हक्काने सोडवल्या. त्यांना आधुनिक शेतीचे धडेही दिले. सरकारने जाहिर केलेल्या अश्या कितीतरी योजना ज्या अजून त्यांच्यापर्यंत पोहचल्या नव्हत्या, त्या त्यांना प्रयत्नपूर्वक मिळवून दिल्या. त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिली. शेतमाल विकतांना कोणा व्यापाऱ्याकडून फसवणूक होऊ नये यासाठी व्यवहारापुरती आकडेमोड शिकवली. अगदी कमी दिवसांतच सर गावकऱ्यांसाठी हक्काचे आपले माणूस बनले. दरम्यान त्या दुर्गम भागातील शाळेला एकदाही भेट न देणाऱ्या केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांचे सरांना आश्चर्य वाटले. शेवटी एक दिवस तेच केंद्रशाळेत पोहचले. त्यांना मुलांच्या आणि शाळेसंबंधीच्या समस्या मांडतांना पाहून तिथल्या शिक्षकांनी उलट प्रश्न विचारून त्यांचा उपहास करण्याचा प्रयत्न केला.

" आधी तुम्ही त्या शाळेत थांबणार आहात का ते निश्चित करा नाही तर इतरांप्रमाणे दोन महिन्यांतच बदली करून घ्याल." केंद्रशाळेतील एक शिक्षक म्हणाले.
" मुलांच्या समस्या बाजूला राहतील आणि तुमच्याच समस्या सोडवतांना होतील." दुसऱ्या शिक्षकाला असे बोलतांना पाहून आता पाटील सर मात्र आक्रमक झाले.
" बदली करून घ्यायची असती तर तुमच्याकडे का आलो असतो ? तुम्ही माझं टेन्शन नका घेऊ. मी खूप खुश आहे माझ्या शाळेत. शाळेच्या आणि मुलांच्या समस्या तेवढ्या सोडवा नाहीतर मला तसं पुढे कळवायला." सर हात जोडत स्पष्टच सांगते झाले.
त्यांच्या उत्तराने तिथले सगळे चांगलेच वरमले. केंद्रप्रमुखांनी शाळेला भेट देण्याची आणि समस्यांकडे जातीने लक्ष देण्याची ग्वाही दिली. प्रशिक्षणादरम्यान सरांची तालुक्यातल्या शाळेत उच्च प्राथमिक वर्गाला शिकवणाऱ्या तारमाळे सरांशी मैत्री झाली. बारकूचा विषय त्यांच्यासमोर मांडत मदतीची अपेक्षा व्यक्त केली. इयत्ता चौथीनंतर कोणत्याच शाळेत दाखल न झाल्याने त्याला यावर्षी पाचवीलाच बसवावे लागणार होते. तारमाळे सरांनी बारकूला आपल्या पाचवीच्या वर्गात कागदोपत्री दाखल करून घेतले.
" पाटील सर तुम्ही त्याचा अभ्यास घ्याल याची खात्री आहे पण परीक्षेला मात्र त्याला इथेच यावं लागेल." तारमाळे सरांनी स्पष्ट सांगितले.
" ती जबाबदारी माझी असेल." म्हणत सरांनी त्यांचे आभार मानले.
दिलेला शब्द पाळत पाटील सरांनी बारकूची तयारी करून घेतली. गेल्यावर्षी पाचवीचा अभ्यास झालाच होता. सरांनी आपल्या अनोख्या शैलीने तो आणखी पक्का करून घेतला. त्यांच्या प्रयत्नांची परिणिती बारकूच्या चांगल्या गुणांमध्ये झाली आणि त्यांना आपल्या विद्यार्थ्याचा सार्थ अभिमान वाटला. बारकूच्या आजीने दोघांची द्रिष्ट काढत, सरांना भरभरून आशीर्वाद दिला. त्यांच्यासाठी सर देवदूतापेक्षा कमी नव्हते. त्यादिवशी त्यांच्या पायावर नतमस्तक होत बारकू पुन्हा एकदा हळवा झाला.
" बारकू, खूप शिक आणि शिक्षक म्हणून माझं नाव मोठं कर." सरांनी असे म्हणताच त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुलांनी दिलेल्या सुखद धक्क्याने तर सरांना अश्रू अनावर झाले. सर नाही म्हणत असतांनाही मुलांनी आपली गुरुसेवेची इच्छा अनोख्या पद्धतीने पूर्ण केली. शाळेत सरांचे पाय धुवून त्यांवर मनोभावे फुले अर्पण करत आपल्या गुरुचे पाद्यपूजन केले. डोळे टिपत सरांनी मुलांना आशीर्वाद दिला. सर शाळेत आल्यापासून मुलांच्या आयुष्यात जगण्याचे नवे पर्व सुरू झाले होते. मुलांच्या आणि गावकऱ्यांच्या मनात आपल्याविषयी निर्माण झालेला आदर आणि आपुलकीची भावना सरांना भावनिक करत होती.
पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा ओढा दुधडी भरून वाहू लागला गावकऱ्यांनी सरांची राहायची व्यवस्था गावातच करून दिली. निदान पावसाळ्यापुरतं तरी तिथे राहणं त्यांच्यासाठी योग्य होतं. गावात राहत असतांना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. सरांच्या मनात मात्र गावकऱ्यांच्या पाचवीला पुजलेल्या या समस्या सोडवण्याचा निर्धार पक्का झाला. त्यादृष्टीने त्यांनी हालचाल सुरु केली. सगळ्यात महत्त्वाची समस्या होती ती रस्त्याची. ती सोडवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न मात्र अपयशी ठरले. तो आदिवासी भाग विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न तेथील राजकारण्यांनी उलथून लावला. वर्षभर सतत पाठपुरावा करत राहिल्याने वीज गावात पोहचली खरी पण एकदा का वीजपुरवठा खंडीत झाला की, त्याला पूर्ववत करतांना नाकी नऊ यायचे.
सरांच्या येण्याने गावचं रुपडं बदलत होतं. शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचवण्यात त्यांना मिळालेलं यश त्यांच्या प्रयत्नांची पोचपावती होती. बारकूच्या आयुष्य क्षितिजावर क्रांतीचा नवा सूर्य उगवला होता. त्याच्या जीवनातील अंधारवाटा ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून निघाल्या होत्या.

क्रमश:
©® आर्या पाटील
आनंदाचा हा सोहळा गावात असाच सजलेला राहिल की त्याला समस्यांच ग्रहण लागेल ? जाणून घेऊया पुढच्या भागात..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा