गुरुदक्षिणा (भाग ९ वा)
©® आर्या पाटील
" अरे ये मुलांनो , तुम्ही कुठे गेला होता ? आसावरी खूप चिडली आहे." म्हणत त्यांनी यशला उचलून घेतले.
" गुरुजी, यशला ओढा बघायचा होता म्हणून घेऊन गेलो." सरांच्या मागे चालत बारकू घाबरतच म्हणाला.
" आणि हे तुला यशनेच सांगितलं असणार ?" सरांच्या या प्रश्नाचे उत्तर मात्र त्याने टाळले.
थोड्याच वेळात ते घरी येऊन पोहचले. यशला सरांकडे पाहून त्याच्या आईच्या जीवात जीव आला. त्यांच्या कडून यशला जवळ घेत उराशी कवटाळले. तोच वीजही गेली आणि अंधार पडला. सरांनी चाचपडत कंदिल शोधून तो पेटवला. त्या मिणमिणत्या प्रकाशात यशच्या चेहऱ्यावरून हात फिरवतांना मॅडम मात्र भावनिक झाल्या. दिवाबत्तीची वेळ झाल्याने त्यांनी त्याच्यावर आलेला राग आवरता घेतला. पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरवात झाली होती. कडाडणारी वीज कानठळ्या बसवत होती. मॅडम अजूनही यशला घेऊन तश्याच बसल्या होत्या.
" आसावरी, अगं उठ.त्याला अंघोळ घाल." सरांनी आठवण करून देताच त्या भानावर आल्या.
न्हाणीघरात अंघोळ घालतांना त्याची चांगलीच कान उघाडणीही केली. पायाला सारखं सारखं खाजवतांना पाहून त्यांचे लक्ष त्याच्या पायाकडे गेले.
" काय झालं आहे पायाला ? का खाजवतोस ?" म्हणत त्यांनी त्याच्या पायावरून हात फिरवला.
अंधार असल्याने त्यांना स्पष्ट काही दिसलं नाही.
" मच्छर चावले आहेत." पुन्हा एकदा खाजवत तो म्हणाला.
" म्हणूनच सांगत होते ना बाहेर नको जाऊस. तू ऐकशील तेव्हा. थांब मी पाहते उजेडात." म्हणत त्यांनी त्याला अंघोळ घातली.
दिवाबत्तीची वेळ झाल्याने यशची तयारी करून त्या देवघरात आल्या. वीज गेल्याने अंधारात सगळच चाचपडत करावं लागत होतं. जेवण आधीच बनवल्यामुळे त्या थोड्या निवांत होत्या. देवघरातला दिवा प्रकाशित होण्यासाठी फडफडत होता. मॅडमने दिव्याभोवती हातांच कुंपण घातलं. थोड्याच वेळ की दिवा मात्र विझला. मॅडमच्या मनात नको नको त्या शंका येऊ लागल्या.
" आई, मला झोप येतेय." यशने असे म्हणताच मॅडम भानावर आल्या.
मनातून गणरायाला आळवित त्यांनी पुन्हा एकदा दिवा प्रकाशित केला. यावेळेस मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
देवपूजा करून त्यांनी यशला ताट वाढून आणले. त्याला आपल्या हाताने जेवण भरवले. झोपेमुळे त्याची जेवायचीही इच्छा नव्हती. मॅडम ओरडतील म्हणून बळजबरीने त्याने जेवण केले. सरांनी तोवर त्याचा बिछाना तयार करून ठेवला होता. जेवण आटोपताच त्यांनी त्याला झोपवले. अंगावर पांघरूण घालत ते बाहेर येऊन बसले. सरांनी आज बारकूला तिथेच ठेवून घेतले. मॅडमचा रागही आता निवळला होता.
थोड्याच वेळात त्यांचीही जेवणं झाली. पावसाचा जोर आणखी वाढला होता. एवढ्या पावसात वीज येणे शक्य नसल्याने थोडा वेळ गप्पा गोष्टी करत सर आणि मॅडम झोपायला आले. बारकूलाही तिथेच झोपायची व्यवस्था करून दिली.

झोपायला येताच मॅडमना यशने पायाला खाजवल्याचे आठवले. तात्काळ कंदिल जवळ घेत त्यांनी त्याचा पाय पाहिला. पायावर उमटलेले सर्पाच्या दाताचे व्रण मात्र त्यांची झोप उडवून गेले.
" अहो.." म्हणत त्या किंचाळल्या.
" काय झालं ?" म्हणत सर त्यांच्यापाशी येऊन पोहचले.
" यश.." असे जोरात ओरडत त्यांनी कंदिलचा प्रकाश यशच्या चेहऱ्याच्या दिशेने रोखला.
तोंडातून आलेला फेस पाहून मात्र त्या आणखी जोरात ओरडल्या. डोळ्यांतून अश्रूधारा ओघळू लागल्या.
" यश, बाळा उठ ना.." म्हणत त्या रडू लागल्या.
सरांनाही यशला सर्पदंश झाल्याचे कळायला वेळ लागला नाही. बारकू सोबत घरी येतांना त्याला एका विषारी सापाने दंश केला होता. त्या सापाचं विष मंद गतीने चढत असल्याने कदाचित त्यांना ते कळायला वेळ लागला होता. सरांनी यशला जवळ घेऊन जोरात हाक मारली पण प्रतिसाद आला नाही. त्यांच्या आवाजाने बारकूही उठून तिथे आला. यशची अवस्था पाहून तो ही जोर जोरात रडू लागला. सरांना काहीही कळेनासे झाले.
" यशला, दवाखान्यात न्यावं लागेल." म्हणत त्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला.
त्याच्या हृदयाचे ठोके सुरु होते. बारकू तसाच धावला आणि गावातील काही माणसांना घेऊन आला. यशची अवस्था पाहून त्यांनाही अश्रू अनावर झाले. त्यांनी तातडीने त्याला दवाखान्यात न्यायची व्यवस्था केली. ओढ्याला पाणी आल्याने तो ओलांडायला खूप कसरत करावी लागणार होती. त्याला वेळेत उपचार मिळणे खूपच कठिण होते. रानातल्या औषधी पाल्याचा लेप दशांच्या ठिकाणी लावून त्यांनी त्याचा पाय कपड्याने गच्च बांधला. एकाने त्याला खांद्यावर घेतले आणि ओढ्याच्या दिशेने निघाला.
" मी पण येते." मॅडम रडत म्हणाल्या.
" ओढ्याला खूप पाणी आले आहे. तू इथेच थांब. सकाळी कोणीतरी येईल तुला दवाखान्यात घेऊन.आपल्या यशला काहीच होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव.बारकू, तू बाईंकडे बघ. आजीला बोलव." मॅडमना समजावत आणि बारकूला सूचना देत डोळे पुसत सर त्यांच्यामागे निघाले.
मॅडमचा नाईलाज झाला. त्यांना घरीच थांबावे लागले.
पावसाचा वेग आता पुन्हा कमी झाला होता. अथक प्रयत्नांनी ओढा
ओलांडून त्यांनी दुसऱ्या डोंगराची चढाई सुरु केली. अंधार आणि पावसामुळे निसरडी झालेली वाट त्यांचा प्रवास आणखी क्लिष्ट बनवत होती. वेळ हातातून निसटत होता. यशच्या श्वासांची गती मंद होऊ लागली होती. सरांच्या जीवात जीव नव्हता. कधी एकदा दवाखान्यात पोहचतो असे झाले होते. मॅडमने देवघरातील देव पाण्यात ठेवले. अश्रूंच्या अभिषेकाने त्या गणरायाला विनवणी करत होत्या. गावातल्या बायका त्यांच्याजवळ येऊन बसल्या होत्या. बारकू मात्र कोपऱ्यात बसून फक्त रडत होता. आईसोबत तिथे आलेली वृंदा त्याची समजूत काढत होती पण तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. डोळ्यांसमोरून यशचा हसरा चेहरा हलत नव्हता.

डोंगर चढून वर गेल्यावरही गाडीची समस्या होती पण सुदैवाने त्या गावात गाडी भेटल्याने त्यांना तालुक्याच्या गावी पोहचता आले. या सगळ्यात खूप जास्त वेळ गेला परिणामी दवाखान्यात पोहचायला खूप उशीर झाला. डॉक्टरांनी यशला आत घेतले पण थोडाच वेळ की ते लगेच बाहेर आले.
" कोणाचा मुलगा आहे ?" त्यांनी असे विचारतात सर थरथरत पुढे आले.
" दवाखान्यात पोहचायला तुम्हांला खूप उशीर झाला. पूर्ण शरीरात विष भिनलं आणि त्यातच तुमचा मुलगा दगावला." डॉक्टरांनी असे म्हणताच सर उभ्या जागी कोसळले.
त्यांच्या काळजाचा तुकडा त्यांना कायमचा सोडून गेला होता. आज संध्याकाळपर्यंत ज्या आवाजाने त्यांच अंगण निनादलं होतं तो आवाज कायमचा शांत झाला होता. सरांचा श्वास सुरू होता पण जगणं मात्र थांबलं होतं. बसल्या जागी त्यांनी हंबरठा फोडला.
यशला साद घालत ते रडू लागले. गावकऱ्यांच्या डोळ्यांतूनही अश्रूधारा ओघळू लागल्या.
सर तसेच उठून उभे राहत आत धावले. निपचित पडलेल्या यशला पाहून डोक्यावर मारून घेत ते त्याच्यापाशी पोहचले. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत ते त्याला साद घालू लागले. आसावरी मॅडमची आठवण येताच ते आणखी सैरभैर झाले. त्यांना असे अनावर झालेले पाहून गावकऱ्यांनी त्यांना आधार दिला. त्यांना मोकळं होऊ देत त्या परिस्थितीत उभं राहण्याची ताकद दिली. परिस्थितीच अशी बिकट होती की, उभ्या आयुष्यात ते यातून बाहेर पडणे शक्य नव्हते पण तरीही आता त्यांना सावरावे लागणार होते. मॅडमसाठी तरी परिस्थितीचा सामना करावा लागणार होता. दवाखान्यातून फोन लावून त्यांनी घरी ही बातमी कळवली. यशच्या आजी आजोबांना तर हे ऐकून जबर धक्का बसला. भर पावसात गाडी काढून पाटील सरांचे भाऊ आणि बाबा तिकडे येण्यासाठी निघाले.

पाटील मॅडमना ती रात्र नकोशी वाटत होती. त्यांच्या काळजाचा तुकडा बिकट अवस्थेत त्यांच्यापासून खूप दूर होता. कधी एकदा सकाळ होते आणि आपण दवाखान्यात जातो असे काहीसे त्यांना झाले होते. त्यांच्या घरी काम करणारी महिला त्यांच्यासोबत सावलीसारखी होती. बारकूची आजीही रात्रभर तिथेच थांबली. वृंदाही तिथेच बारकूजवळ बसून होती. पहाट होताच गावातील काही पुरुष मंडळी मॅडमना घेऊन दवाखान्यात जायला निघाले. सोबत घरी काम करणारी ती महिलाही होतीच. बारकूची मामीही हट्ट करून त्यांच्यासोबत निघाली. मॅडमच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. कधी एकदा यशला डोळ्यांत पाहते असे त्या माऊलीला झाले होते. छोटेखानी नावेत बसवून गावकऱ्यांनी महिलांना ओढा ओलांडून दिला. डोंगर चढतांना आणि मग उतरतांनाही मॅडम जास्तच गतिशील झाल्या होत्या. लेकराला डोळ्यांत पाहायची इच्छाशक्ती सगळ्याच अडचणींवर मात करत होती. जवळजवळ दोन तासांनी ते दवाखान्यात येऊन पोहचले. एव्हाना यशचे काका आणि आजोबाही तेथे पोहचले होते. त्यांच्या कुशीत शिरून रडणाऱ्या सरांना पाहून मॅडमची पावले जड झाली. हृदयाची धडधड अनियमित गतीने होऊ लागली. त्यांना चालत येतांना पाहून सर सावध झाले. तसेच मॅडमच्या दिशेने धावत त्यांनी त्यांना गच्च मिठी मारली.
काहीही न बोलता ते फक्त ओक्साबोक्सी रडत होते. मॅडमने तात्काळ त्यांना स्वतःपासून दूर लोटले.
काहीही न बोलता ते फक्त ओक्साबोक्सी रडत होते. मॅडमने तात्काळ त्यांना स्वतःपासून दूर लोटले.
" माझा यश कुठे आहे ? मला भेटायचं आहे त्याला." डोळे पुसत त्या म्हणाल्या आणि आत दवाखान्याच्या दिशेने निघाल्या.
त्यांचा हात पकडत सरांनी त्यांना थांबवले.
" आसावरी, मला माफ कर. आपल्या यशला..." ते पुन्हा त्यांना जवळ घेत रडू लागले.
" आपल्या यशला काय झाले आहे ?" आता मात्र त्यांची कॉलर पकडत मॅडम आक्रमक झाल्या.
" आपला यश कायमचा सोडून गेला गं आपल्याला. देवा, माझा जीव का नाही घेतलास ? जग बघायला आलेल्या माझ्या लेकराशी असा का वागलास ?" तिथेच खाली बसत सर रडू लागले.
त्यांच्या बोलण्याने मॅडम खाली कोसळल्या आणि मूर्च्छित झाल्या. त्यांना उचलून सरांनी दवाखान्यात नेले.
तिथल्या सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले होते. मॅडम शुद्धीवर येताच सरांनी त्यांना यशच्या पार्थिवाजवळ आणले. आपल्या लेकाला असे निपचित पडलेले पाहून मॅडम सैरभैर झाल्या. त्यांना सावरत सरांनी यशजवळ बसवले. त्यांना भानावर आणत वास्तवाची जाणीव करून दिली. यशला उराशी कवटाळून मॅडम धाय मोकळून रडू लागल्या. त्यांचा आक्रोश एवढा प्रचंड होती की देवही हळहळला असेल.
दवाखान्यातले सगळे सोपस्कर पूर्ण करून यशचे पार्थिव घरच्यांच्या ताब्यात देण्यात आले.

" बारकूने जीव घेतला पोराचा." बारकूच्या मामीचे शब्द मॅडमच्या कानावर बरोबर पडले.
लागलीच गावकऱ्यांनी तिला गप्प केले. सरांच्या मूळ गावी यशच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला. जवळजवळ सगळेच गावकरी सरांच्या दुःखात सामील झाले होते. यशच्या अश्या अचानक जाण्याने त्यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला होता. बारकूची अवस्था फारच वाईट झाली होती. यश गेल्याचे कळताच त्याने स्वतःला घरात बंद करून घेतले होते. त्याची मानसिक अवस्था पार ढळली होती. या साऱ्यांत वृंदा सावलीसारखी त्याच्यासोबत होती. परिस्थितीने असा काही आघात केला होती की, वास्तवाच्या चितेवर त्यांच सुखी आयुष्य जळत होतं.
क्रमश:
©® आर्या पाटील
एवढ्या मोठ्या दुःखातून सर आणि मॅडम कसे सावरणार ? जाणून घ्या पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा