भाषण क्रमांक 1
सन्माननीय व्यासपीठ आणि माझा पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो! मी सर्वप्रथम जगातल्या सगळ्या गुरूंना प्रणाम करून मी माझे भाषण सुरू करतो.
आज आषाढ पौर्णिमा व्यास पौर्णिमा हा दिवस आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो.
गुरू ब्रह्मा
गुरू विष्णु
गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नमः
गुरू विष्णु
गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नमः
या एका ओळीच्या संस्कृत श्लोकात गुरू आपल्यासाठी किती महत्त्वाचे असतात ते आपल्याला कळते. गुरु म्हणजे ब्रह्मा गुरू म्हणजे विष्णू आणि गुरू म्हणजेच शंकर आहे गुरू म्हणजे साक्षात परब्रम्ह आहे आणि अशा गुरूला माझे नमन असा या श्लोकाचा अर्थ होती. म्हणजेच किती थोडक्यात पण किती सुंदर शब्दात गुरुची महती सांगितली गेली आहे.
आपण जन्माला येतो तेंव्हा मरेपर्यंत आपण विद्यार्थी असतो. आपला पहिला गुरू म्हणजे आपली आई असते. आपल्याला अगदी चालण्या आणि बोलण्यापासून सगळं शिकावे लागते आणि ते सगळं आपल्याला आपली आई शिकवत असते. त्यानंतर आपण शाळेत जातो तिथे शिक्षण म्हणजे आपले गुरू असतात ते आपल्याला वाचायला लिहायला तर शिवतातच पण काय चांगले काय वाईट या सगळ्या गोष्टींचे संस्कार ते आपल्यावर करत असतात. आपल्या आयुष्यात गुरूला खूप महत्त्व आहे कारण जर गुरू नसेल तर आपले आयुष्य वादळात अडकलेल्या जहाजा प्रमाणे भरकटत जाईल.
आपल्या देशात गुरू-शिष्य परंपरा ही अनादी काळापासून आहे गुरूला पण देवतुल्य मानतो. बऱ्याच गुरू शिष्याच्या आदर्श जोड्या आपल्या इतिहासात आहेत महर्षी व्यास आणि भगवान राम, गुरू द्रोणाचार्य आणि अर्जुन आपल्याला खूप पुरातन गुरू शिष्य परंपरा लाभली आहे.आई वडील आपल्याला पंख देतात पण गुरू आपल्या पंखात उंच भरारी घेण्यासाठी पंख देत असतात.
गुरू परमात्मा परेषु प्रत्येक विद्या, कला शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरू-शिष्याची मोठी परंपरा दिसून येते.गुरू-शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते. शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा.समाजाला सकारात्मक दिशा दाखविणारा गुरू असतो.
विद्यार्थी मित्रांनो गुरू म्हणजे काय? तर दुःखाचा सागर पार करून आपल्याला सुखाच्या किनाऱ्यावर पोहोचवणारी व्यक्ती असते. ती आपल्याला कायम मार्गदर्शन करून सन्मार्गावर घेऊन येते आणि आपल्याला सुखाचा मार्ग दाखवत असते.
आपल्या आयुष्यात आपल्याला आई, शिक्षक त्यानंतर आयुष्यातील अनुभव आणि निसर्ग सगळे आपल्याला
तर शिष्य म्हणजे काय? तर शिष्य म्हणजे विद्येची आस असणारा एक नायक - शिष्य ही अशी एक बी आहे की, ज्या जमिनीत तुम्ही पेराल.तिथे फलदायी ठरणारच. शिष्य म्हणजे ज्ञानरुपी सागरात पोहणार राजहंस जीवनाशी सांगड घालणारा मूकनायक!

आधुनिक काळात सर्वच क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली आहे. तरीसुद्धा वेदकाळापासून ज्ञानदानाचे कार्य व प्रसार गुरू-शिष्य परंपरेनेच झालेला आहे व आजतागायत तो सुरू आहे. संत कबिरांनी लिहून ठेवले आहे ‛ गुरू बिन कौन बतावे बाट!’ या वेळीची प्रचिती प्रत्येक वेळी आपल्याला येत असते. जगात सर्वश्रेष्ठ दान कोणते असेल तर ते ज्ञानदान आहे कारण पैसा अडका चोरला जाऊ शकतो पण ज्ञान चोरले जाऊ शकत नाही. आणि हे अमूल्य ज्ञान आपल्याला गुरूकडून मिळत असते म्हणूनच गुरूला देवांचा दर्जा दिला जातो.
आयुष्य जगत असताना आपल्याला गुरूने शिकवलेले सादाचरण आपण कायम लक्षात ठेवायला हवे. गुरूंनी आपल्यावर केलेले संस्कार आपण आपल्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत करायला हवेत.
आयुष्य जगत असताना आपल्याला गुरूने शिकवलेले सादाचरण आपण कायम लक्षात ठेवायला हवे. गुरूंनी आपल्यावर केलेले संस्कार आपण आपल्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत करायला हवेत.
गुरू माझं गणगोत
गुरू हीच माऊली
गुरू स्पर्श दूर करी
दुःखाची सावली
गुरू भेटीसाठी झाली
जीवाची काहिली
गुरूची महती जितकी गावी तितकी ती कमीच आहे त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ न घेता माझे भाषण आता संपतो. धन्यवाद!
★★★★★
भाषण क्रमांक 2
व्यासपीठावरील मान्यवर आणि माझे आदरणीय शिक्षकवृंद त्यांचंबरोबर माझ्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो आज मी तुम्हाला जे चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्याल अशी मी आशा करतो.

आपण आज इथे जमलो आहोत ते म्हणजे गुरुपौर्णिमे निमित्त! आपल्या गुरूंचे आभार व्यक्त करण्यासाठी
गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम
आणि अखंड वाहणारा झरा
गुरू म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य
गुरू म्हणजे विश्वास आणि वात्सल्य
गुरू म्हणजे आदर्श आणि
प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक
गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम
आणि अखंड वाहणारा झरा
गुरू म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य
गुरू म्हणजे विश्वास आणि वात्सल्य
गुरू म्हणजे आदर्श आणि
प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात् देवाप्रमाणे मानव असे शास्त्रात कथन केले आहे. ‘व्यासोच्छिम् जगत् सर्वम्’ असे त्यांच्यासंबंधी लिहिले गेले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानवशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेऊ ‘ असे म्हणून सुरुवात केली.
आपल्या देशात गुरुशिष्य परंपरा खूप जुनी आहे अगदी अनादी काळापासून आपल्या संस्कृतीत गुरूला खूप महत्त्वाचे स्थान आहे.आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरुशिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदाम-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन, अशी गुरु शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पहिली कि सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.
आपण जन्माला येतो तेंव्हा मरेपर्यंत आपण विद्यार्थी असतो. आपला पहिला गुरू म्हणजे आपली आई असते. आपल्याला अगदी चालण्या आणि बोलण्यापासून सगळं शिकावे लागते आणि ते सगळं आपल्याला आपली आई शिकवत असते. त्यानंतर आपण शाळेत जातो तिथे शिक्षण म्हणजे आपले गुरू असतात ते आपल्याला वाचायला लिहायला तर शिवतातच पण काय चांगले काय वाईट या सगळ्या गोष्टींचे संस्कार ते आपल्यावर करत असतात. आपल्या आयुष्यात गुरूला खूप महत्त्व आहे कारण जर गुरू नसेल तर आपले आयुष्य वादळात अडकलेल्या जहाजा प्रमाणे भरकटत जाईल.
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घाटाने- घागरीने आपली मन खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान काहांसे लाऊं ?‘ हेच खरे आहे.
ज्ञानाच्या निमिरात
ज्ञानाचा दीप म्हणजे गुरू
जीवनाच्या समुद्रात
दीपस्तंभ म्हणजे गुरू
ज्ञानाचा दीप म्हणजे गुरू
जीवनाच्या समुद्रात
दीपस्तंभ म्हणजे गुरू
खरं तर आहे आपण जेंव्हा अज्ञानाच्या अंधारात भटकत असतो तेंव्हा ज्ञानाचा दिवा हातात घेऊन आपल्याला योग्य दिशा दाखवणारा आपला गुरुच असतो. आपली नौका जेंव्हा अज्ञानरुपी सागरात भरवटत असते तेंव्हा गुरू दीपस्तंभ होऊन आपल्या दिशा योग्य मार्ग दाखवतात.
गुरू बिन सब व्यर्थ
गुरू है तो सब सार्थ
गुरू है तो सब सार्थ
खरंच तर आहे आपल्याला योग्य गुरू लाभला तर आयुष्यचे सार्थक होते. आपल्या आयुष्य रुपी चिखलमातीच्या आकार नसलेल्या गोळ्याला ज्ञानाच्या चाकावर सुबक आकार देऊन एक सुंदर घडा तयार करतो तो म्हणजे गुरू. गुरू हे आपल्या आयुष्याची शिल्पकार असतात.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात देखील गुरुचे महत्त्व कमी झालेले नाही कारण हे तंत्रज्ञान देखील शिकवायला गुरुचीच गरज असते. काळ किती ही पुढे गेला तरी गुरूचे स्थान आपल्या आयुष्यात तसेच अढळ राहणार आहे. गुरू आहे तर ज्ञान आहे आणि ज्ञान आहे तर आपण आहोत. गुरुची महती जगद मान्य आहे.

विद्यार्थी म्हणजे अज्ञानरुपी सागरात भारकटणारे गलबत असतो.
आणि
गुरू म्हणजे त्या सागरातून मार्ग दाखवणारा दिपस्तंभ असतो.
आणि
गुरू म्हणजे त्या सागरातून मार्ग दाखवणारा दिपस्तंभ असतो.
गुरुजी महती किती ही गायली तरी कमीच आहे. तरी मी माझे भाषण थांबवतो. धन्यवाद!